Discover and read the best of Twitter Threads about #भयकथा

Most recents (6)

सकाळी लवकर उठून रमेश तयारीला लागला. पुण्यात आयटी कंपनी मधे नवीनच नोकरी भेटली होती त्याला . घरातले सगळेच जरा काळजीत होते . नवीन शहर नवीन जागा . कायम सोबत राहिलेला काळजाचा तुकडा आता दूर जाणार होता .त्याच्या आईचे काळीज याच विचाराने चर्र करत होते . पोटाच्या खळग्याला भरण्यासाठी
कोणतीच कारणे देऊन चालत नाय . तसे खुश ही होते . आजी तर सकाळपासून कोपरा धरून बसली होती . डोळ्यातून आसवे चालूच होती ..खायला वगेरे सगळं करून झालं होतं .दुपारची १ ची गाडी आली की निघायचं बेत होता . रमेशच्या मनावरही थोडं दडपण होतंच. अकरा साडेअकरा वाजले असतील . सहज त्याची
आजी बोलली अर रमेश ते कॅलेंडर तर बघ आज कसला दिस हाय ..
होय बघतो म्हणून रमेशने कॅलेंडर बघितलं तर अमावस्या होती .
" आजे आज अमावस्या हाय बघ "
" आता र मग पोरा ..आज रहित करायला लागतय बघ जायचं .. अमावस्यच कुठं जतूयास नवीन ठिकाणी ... असं जायचं नसतं" आजी काळजीने बोलली .
Read 16 tweets
पुण्याला एक दिवसाचं काम होतं म्हणून सकाळी पहाटे निघालो . इकडून जाताना कॅब सारख्या बऱ्याच गाड्या असतात आणि बस पेक्षा लवकर पोहचवत असतात म्हणून तसा प्रत्येक वेळेस पुण्याला जायचं म्हटलं की कॅब नी निघायचं . सकाळी १०-१०.३० वाजेपर्यंत पुण्यात टच करतात . आजही आलो पुण्यातील सगळी
कामे उरकली . आज जरा काम जास्त असल्याकारणाने थोडा उशीर झाला . प्रत्येक वेळेस ३ वाजता माघारी फिरणार तिथं ६ वाजले ..थोडा थोडा म्हणता म्हणता बऱ्याच वेळ कश्यात गेला समजलं नाही . स्वारगेट ल आलो बस बघितली तर होती एक शेवटची ६.३० ल डायरेक्ट मला खानापुरला सोडेल अशी म्हणून मग
तिचं बस पकडली म्हटल चला डायरेक्ट घरी तर जातोय . मस्त हेडफोन लाऊन गाणी लावली आणि झोपून गेलो . कात्रज मद्ये एक कोणीतरी बाजूला येऊन बसल्याची चाहूल लागली झोप महत्वाची म्हणून मी लक्षच नाही दिलं . बसलं असेल कोणीतरी जाऊदे म्हटलं . थोड्या वेळानी कानावर आवाज पडला ...
Read 33 tweets
मी, इस्ल्या(विशाल), ,आणि सोन्या विट्याहून सिनेमा बघून येत होतो . रात्रीचे साधारण ११.४५ वाजले असतील सिनेमा संपला आणि निघालो . तिघेच असल्याने एकच बाईक घेऊन गेलो होतो . इस्ल्याला लागल्या होत्या भुका " सोन्या गाडी थांबव आय*व्यां....पोटात कावळ वर्डायला लागल्यात " मधी बसलेला
इसल्या सोण्याला म्हणत होता. तोवर मी त्याला थांबवत " सोन्या गाडी थांबवू नको ह्याच्यात लै किडे हायती... घरातन ज्यून यी म्हटलं व्हतं तसच आलंय... ढाब्यावर खायची हौस हाय आयघालायला " . " शाप्या गाडी डुलत्या ऱ... हवा तर कमी न्हाय ना झाली ... " सोन्या मला थांबत म्हणाला ...
गाडी थांबली उतरलो आणि बघितल तर मागचं टायर पंक्चर...! " आता कशी आयघालायची ...झाली की पंचायत" ईसल्या डोक्याला हात लावून म्हंटला. " तामखडी पर्यंत ढकलत न्हावी लागल" सोन्या म्हंटला . " आलिया भोगासी असावे सादर .. ढकला आता काय" मी नाराज होत बोललो .. मस्त गप्पा मारत गाडी ढकलत चाललो होतो
Read 23 tweets
त्रिकाळ
(ही निव्वळ काल्पनिक भयकथा आहे. कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीचा आणि घटनांचा याच्याशी कोठेही संबंध नाही)
भाग 1
कोकणा मधील एक गाव. तसे तुरळक वस्तीचे. भर पावसाळ्याचे दिवस होते. आधीच पुर येऊन गेलेला. यावेळचा पूर तसा भयानक होता. आजूबाजूच्या वस्त्यांमधील लोक वाहून गेले होते
बाजूच्या गावांमध्ये प्रचंड मोठी दरड कोसळली होती. भर रात्री. अख्खीच्या अख्खी कुटुंब पूर्ण डोंगराखाली गाडली गेली. आजूबाजूचे सर्व गावे व त्यामधील लोक निसर्गाच्या अशा प्रकारच्या रूपाला भेदरून गेले होते.
एकंदरीतच स्मशान शांतता होती. एकप्रकारची काळी विकृत सावली पडली होती.
या गावामधील रम्या तसा हुशार मुलगा आणि धाडसी देखील. दहावी मध्ये होता तो.  फारशी कोणाची फिकीर नाही. त्याच्या घरी कधी पुराचे पाणी शिरत नसे. यावर्षी त्यानेदेखील स्वतःच्या घरात पाच फूट पाणी अनुभवले होते.
Read 26 tweets
#भयकथा दुसरी
सन 2008 माझी नोकरी आता सरकारी आहे
(आणि मी इथे राजकीय व्यक्तीना ही ट्रोल करतो म्हणून मी खाते कोणते हे सांगत नाही
कृपया समजून घ्या)
माझ्या कामाच्या ठिकाणापासून 40 km अंतरावर एक गाव आहे.
त्याठिकाणी आमची 1 गाडी जाऊन फसली होती.
यांत्रिक प्रॉब्लेम होताच
आणि पावसाळी दिवस असल्याने गाडी रुतत जाऊन क्रेन ला पर्याय उरला नव्हता.
म्हणून अगोदर क्रेन नेऊन ती गाडी तिथून बाहेर ओढून काढून नंतर यांत्रिक काम करून गाडी कार्यशाळेत आणण्याचा आदेश मिळाला होता.
त्यानुसार क्रेन बरोबर क्रेन वर काम करणारी नेहमीची माणसे व आम्ही असे तिथे गेलो
गाडीची
स्थिती बघितल्यावर
"हा काय!हातचा मळ, सहज काढू ओढून" अश्या वलग्ना आमच्या कडून झाल्याही
आता ओढून योग्य जागेवर घेतल्यावर काम करायचे होते.
सहजपणे काढू शकू ह्या आत्मविश्वासाने मग OC चे रूप केव्हा घेतले हेच समजले नाही.
क्रेन लावून पूर्ण ताकदीने गाडी ओढूनही ती गाडी 1 mm ही सरकत नव्हती.
Read 19 tweets
#भयकथा पहिली
माझ्याबद्दल माझ्या आयुष्यात घडलेला 1 विलक्षण चकवा
1991 चा काळ होता.माझी नोकरी 3 शिफ्ट मध्ये असायची.
माझे रहाते घर ते कंपनी हे अंतर चालत 10 मिनिटांचे म्हणजे अदमासे 1 km जेमतेम
माझी आई मला कायम सांगायची की रात्री घरी येऊ नकोस.
तिथेच झोपून सकाळी उठून येत जा,कारण रात्री तिची झोपमोड होत असे.
मी संध्याकाळी 4 ते रात्री 12 अशी शिफ्ट असली की कायम कंपनीत झोपून सकाळी उठून घरी येत असे.
त्यावेळी माझी आई उठून सकाळी अंगणातील कचरा झाडत मला कायम दिसायची.
एकदा दुसऱ्या दिवशी माझी सुट्टी असल्याने बाहेर फिरायला जायचा
प्लॅन केला होता.रात्री जेवणाच्या सुट्टीत जेव्हा घरी आलो तेव्हा आईला म्हटले की उद्या सुट्टी आहे आणि मी सकाळी उठून मित्रांसोबत फिरायला जाणार आहे म्हणून मी रात्री घरी येईन.
आई मला ये असे बोलली पण का कोण जाणे मला काहीतरी वेगळेच वाटले.
मनातून विषय काढून टाकत मी कंपनीत आलो.
Read 9 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!