Discover and read the best of Twitter Threads about #म

Most recents (24)

आयपीएलमधून अब्जावधी रुपये कमावणाऱ्या बीसीसीआयला टॅक्स मात्र शून्य!

आयपीएल, भारतातली सर्वाधिक लोकप्रिय लीग. दोन अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये होणाऱ्या या लीगमध्ये अब्जावधी रुपयांची उलाढाल होते.
#म #मराठी
खेळाडूंच्या लिलावाच्या रकमा, सामन्यांच्या प्रक्षेपणासाठीच्या रकमा याचे आकडे घाम फोडणारे असतात. हे आकडे दरसाल वाढतच चालले आहेत. बीसीसीआयसाठी आयपीएल ही एक सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
#म #मराठी
मात्र याच आयपीएलमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर बीसीसीआय एक रुपयाही कर भरत नाही असे तुम्हाला सांगितले तर? होय हे खरे आहे. आयपीएल कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरण्याकरता लाएबल नाही.
#म #मराठी
Read 6 tweets
#गोपी_चंदन_उटी_तुळशीच्या_माळा_हार
#मिळवती_गळा_टाळ_मृदुंग_घाई_पुष्प
#वर्षाव_अनुपम्यसुख_सोहळा.#वारी ❤️
🐘🚶🏻‍♂️🐎🚶🏻‍♂️🏇🏻🎠 🌺👣🌺 🚶🏻‍♂️
👩🏻‍🦯👨🏼‍🦯🚶🏻‍♀️🧑🏻‍🦯🚶🏻‍♀️🚶🏻‍♂️🚌🚑🚒🚓
#विठ्ठल_विठ्ठल_नाम_स्मरावे...👏
टाळ मृदुगांचा गजर आणि ज्ञानोबा
माऊलींचा जयघोष करत जगद्गुरु
संत तुकाराम महाराज पालखीचे
पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे
#वारी
एवढा मोठा सोहळा आहे पण कोणालाही
निमंत्रण नाही आठरा पगड जातिचे लोक
पण कधी वाद नाही ,लाखो वारकऱ्यांचा
सोहळा पण उपाशी कोणी नाही ,९० वर्ष
चालणा-याचे वय पण चालण्याचा कसला
ही त्रास नाही ,उन वारा ,पाऊसचा सामना
Read 7 tweets
माचीवरला बुधा आणि योगायोग:
काही दिवसांपूर्वी 'माचीवरल्या बुधा'शी ओळख @sunandanlele यांच्या एका व्हिडीओ ब्लॉग वरून झाली..त्या नंतर ट्विटर मित्र @amlya02 यांच्या संभाषणात देखील बुधाचा रेफरन्स आला, दुवा होता- प्रवासवरी मधील राजमाची चा उल्लेख
..
@sunandanlele @amlya02 उत्सुकता चाळवल्याने @amazonIN वरून मागवलं, थोडं वाचलं आणि थोडं @Storytel_In वर ऐकलं

गोनीदांच्या लिखाणात फक्त प्रवास वर्णनच नाही तर व्यक्ती वर्णन, प्राणी-पक्षी वर्णन एवढं जिवंत आहे की बुधा, राजमाची, टेम्बलयी चं पठार, बुधाचा कुत्रा, खारी, शेळ्या-मेंढ्या म्हैस डोळ्यासमोर उभे राहिले
त्यातील काही शब्द, जसे- झाप, हरीख, पावटी, किंजळ आणि अनेक असे @MarathiDeadpool यांच्या कडूनच समजून घ्यावे लागतील.

आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे, आज साप्ताहिक सकाळ मध्ये आलेला अंजली काळे यांचा राजमाची वरील लेख..
Read 5 tweets
👇ह्याचे उत्तर किचकट आहे..आणि पहिल्यांदा ऐकणाऱ्याला ते विज्ञान..विज्ञान वाटतच नाही..इतके ते अजब आहे..तरी एक प्रयत्न करतो..

आपण पाहिले की आइन्स्टाईनने प्रकाश गुरुत्वाकर्षणाने वळतो हे सिद्ध केले..पण प्रकाश तसे का वळतो ह्याच्या कारणासाठी त्याने सांगितले की गुरुत्वाकर्षण #म १/९
हे मुळात बल अर्थात force नाहीये..!

आणि आपण ज्याला विश्वाची पोकळी म्हणतो ती निव्वळ पोकळी नसून ती एक त्रिमितीय रचना आहे..!

त्या रचनेची कल्पना नीट यावी म्हणून त्याला fabric of universe (उदा 👇निळा कपडा) असे म्हणतात..म्हणजे काय तर - २/n
अशी कल्पना करा की हे विश्व म्हणजे एक मोठा हवेत तरंगणारा तागा/कपडा आहे..आणि हे आपला सूर्य हा त्या ताग्यावर ठेवलेला एक वजनी गोळा आहे-

आता त्या गोळ्याचे वजन जेवढे जास्त तेवढा तो त्या कपड्याला खाली ढकलतो..तेच सर्व ग्रहांचे पण..ते त्यांच्या त्यांच्या वजनाने त्या कपड्याला खाली ढकलतात
Read 9 tweets
👇ह्या ट्विट वरून आइन्स्टाईनची एक भारी गोष्ट आठवली..

गोष्टीची सुरुवात👇खग्रास सूर्यग्रहणाच्या छायाचित्रापासून करू..ह्या चित्रात उजवीकडे वर एक तारा दिसतोय..खरे तर अशाच एका चिमुकल्या तारा समूहाच्या मदतीने आइन्स्टाईनने जग नेहमीसाठी बदलून टाकले..!

ही त्याचीच गोष्ट आहे..❤️ #म १/९
साल होते..१९१६..पाहिल्या महायुद्धाने जोर धरला होता..ह्या महायुद्धाच्या धामधुमीत वैज्ञानिक जगतात नवखा म्हणावा अश्या फक्त ३७ वय असलेल्या अल्बर्ट आईन्स्टाईनने सापेक्षवादाचा सामान्य सिद्धांत (Theory of General Relativity) मांडला..!

खरं तर वैज्ञानिक जगात प्रतिष्ठेला फार महत्व असते.. Image
त्यात आइन्स्टाईन पडला जर्मन..त्यात नवीन..त्याने त्याचा सिद्धांत मांडून इंग्लंड साठी देवासमान असणाऱ्या न्यूटनच्या सिद्धांतालाच आव्हान केले होते..!!

न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रकाश किरण हे एका सरळ दिशेत प्रवास करतात आणि आइन्स्टाईनचे म्हणणे होते की - Image
Read 9 tweets
८-१० वर्षांपूर्वी पृथ्वीच्या कुठल्याश्या (बहुतेक चीनचाच असावा!) कोपऱ्यात, कुणाच्या तरी डोक्यात खिश्यात घेऊन फिरता येईल अश्या हलक्या, सुटसुटीत, स्वस्त मोबाईल स्टॅन्डची कल्पना आली असावी.

#म #मराठी #कृतज्ञता

१+
त्याने खटपट करून प्रोडक्ट तयार केलं असावं. रॉ मटेरियल, लॉजिस्टिक्स वगैरेची तजवीज करून घेतली असावी. आणि जगभर (किमान आमच्या डोंबिवलीपर्यंत तरी!) ते स्टॅन्ड जाण्याची साखळी यंत्रणा उभारली असावी.

२+
त्या सर्व प्रक्रियेची फक्त रुपये १० किंमत मोजून मी माझ्या मोबाईलसाठी प्लास्टिकचं फोल्डिंग स्टॅन्ड विकत घेतलं.

ऑफिसला गेल्यावर बॅगेतून ते स्टॅन्ड काढून टेबलवर ठेवताना क्षणभर त्या अज्ञात डोकेबाजाला धन्यवाद देतो मी रोज.

३+
Read 14 tweets
लंकादहन..🔥

श्रीलंका..!

१९४८ मध्ये ~ भारतासोबतच स्वतंत्र झालेला हा देश..अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला.. पांढऱ्या शुभ्र वाळूने नटलेल्या समुद्र किनाऱ्यांची खाण असलेला हा आपला शेजारी आज आगीत धुमसतोय..!!

असे काय झाले की श्रीलंकेवर ही अशी वेळ आली ?

ही आहे त्याची गोष्ट.. #म
श्रीलंका..१९४८ला सिलोन/Ceylon नावाने स्वतंत्र झाला..~७५% सिंहीली बौद्ध,~१२% तमिळ आणि बाकी तमिळ भाषिक मुस्लिम,ख्रिश्चन अशा लोकांचा हा देश होता.

पण नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशात जेव्हा आशावाद,देशप्रेम यांना खतपाणी घालायचे असते तेव्हा श्रीलंकेच्या नेत्यांनी द्वेषाला मोठे केले..!
सुरुवात झाली ती ' फक्त ' सिंहीली राष्ट्रभाषा आणि कामकाजाची भाषा जाहीर करण्यापासून..

आणि नंतर राष्ट्रवादाच्या नावाखाली निवडणुकांच्या वेळी दंगली करून तमिळ भाषिकांची अनेकदा कत्तल झाली..!

हे सर्व सहन न झाल्याने तमिळ भाषिक प्रदेशाने 'एलटीटीई' स्थापन करून स्वातंत्र्य जाहीर केले..!
Read 24 tweets
🌻 🌈🌧️🌲🌴 🌿 🌱 🌾
#भुईशी_नातं_आकाशाला_साद
#असणारच_डौल_दिमाखदार
🌳 🌴 🌿 🌱 🌾 👏👍💝
#निसर्ग_रमणीय_प्रसन्न_सकाळ
सकाळ चांगली झाली की दिवस
चांगला जातो म्हणतात सकाळीच
प्रफुल्लीत करणारा रमणीय निसर्ग
दर्शन लाभले तर दिवस उत्साहानं
सळसळणाराच एवढं मात्र नक्की
प्रसन्नतेनं बहरलेली फुलं पानांवरून
ओघळणारे दवबिंदुचें तेजानं तळ
पणं वाऱ्यावर सळसळणं उत्साहानं
आसमंत बहरवणं बघीतल सकाळ
अधिकच ऊर्जादायी होते निसर्ग
दर्शन. डोळ्यांना सुखद दिलासा
देणारे सभोवलतालच्या छोट्या
छोट्या आनंदी क्षणांसारखीच.
फक्त गरज ते मोकळे पणानं
अनुभवण्याची. फुलांचं_मला
एक खूप आवडतं मुसळधार
Read 7 tweets
'भारतीय शास्त्रीय संगीतातील स्त्रिया'
थ्रेड पहिला.

सुरश्री गानसम्राज्ञी वंदनीय 'केसरबाई केरकर'

#SeriesOfThreads
#शास्त्रीय_संगीत
#DoyensOfClassicalMusic
#म #मराठी @MarathiRT @ashish_jadhao
हा काळ सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचा. भारतीय शास्त्रीय संगीत हा मुख्यत्वाने पुरुषांचा प्रांत समजला जाई. भलेभले पुरुष गायक आपल्या प्रतिभेने राज/लोकमान्यता मिळवत होते. सुरसम्राट अल्लादिया खाँ, फैय्याझ खाँ, अब्दुल करीम खाँ, सवाई गंधर्व, बालगंधर्व हे त्यांत आघाडीवर होते.
हा तो काळ आहे, जेव्हा फुले दाम्पत्याने 1848साली नुकतीच मुलींसाठीची शाळा सुरू केली होती. तरीही या काळात मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी एत्तदेशीय पितृसत्ता किती झटत होती हे आपण जाणतो. मग पुरुषसत्ताक कलेच्या प्रांतात बायकांनी कला शिकायला जाणं हा फारच मोठा विद्रोह झाला असता.
Read 22 tweets
LIC चा IPO येतोय..हा IPO घ्यावा म्हणून LIC कडून मोठी जाहिरातही केली जाते आहे.

पॉलिसी असणाऱ्यांनी हा IPO घ्यावा यासाठी LIC ने ६० रुपयांचा डिस्काउंट ही जाहीर केलाय..मग -

LIC चा मेगा IPO घ्यावा का ?

आणि

इन्शुरन्स चा धंदा मुळात चालतो कसा ह्याचा घेतलेला हा वेध..

#म #मराठीत
इन्शुरन्स चा धंदा मोठा किचकट आहे.

ह्यात पॉलिसी घेणाऱ्याकडून थोडे पैसे (प्रीमियम)घेतले जातात आणि काही अघटीत झाल्यास(पॉलिसीत नोंदल्याप्रमाणे उदा. अपघात ,मृत्यू ,आजारपण इ इ)पॉलिसी असणाऱ्याला भरलेल्या प्रीमियमच्या काही पट रक्कम दिली जाते..त्या रकमेला म्हणतात - Sum assured .
आता प्रश्न असा पडतो की इन्शुरन्स कंपनी इतके पटीने पैसे आणते तरी कुठून..??

ह्यासाठी इन्शुरन्स कंपन्या २ गोष्टी करतात - १.मागच्या वर्षी समजा १०० लोकांनी पॉलिसी घेतली आणि त्यातले १० लोकांनी क्लेम केला तर ह्या बाकीच्या ९० लोकांच्या प्रीमियममधून क्लेम केलेल्या लोकांना रक्कम दिली जाते
Read 22 tweets
मित्रांनो .. अपार स्नेह !
बरेच दिवस झाले आपल्याशी गुफ्तगू करून. चुकल्या-चुकल्या सारखे वाटतेय. गेली दोन वर्षे तुमच्याशी संवादी राहण्याचा हाच तर एक ज़रिया होता , हे कसे विसरू ? आता मैफिली सुरू झाल्या आणि दौरे सुद्धा. संपर्कात कदाचित थोडे अंतर पडेल यापुढे , एवढेच !
असो !
#म #मराठी
मैफिलींचे जुने रेकॉर्डिंग्ज धुंडाळताना दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, पार्ले - मुंबई येथील साधारण दहाएक वर्षांपूर्वीच्या 'गज़लांकित' मैफिलीतील ही तुमची एक खूप आवडती गज़ल मिळाली ...

तू चोर पावलांनी येऊ नकोस आता
स्वप्नातल्या प्रमाणे ये राजरोस आता...
व्वा , क्या कहने !
दीपक करंदीकर या जेष्ठ गज़लकाराची ही गज़ल चंद्रकौंस रागाचा आधार घेऊन मी स्वरबद्ध केली आणि तुम्ही रसिकांनी भरघोस दाद देऊन ती आपलीशी केली.
आपल्या सेवेत त्याच गज़लचे हे लाईव्ह रेकॉर्डिंग पेश आहे ...

माझा-तुझा घरोबा मृत्यो जुनाच आहे
होऊन हाडवैरी का वागतोस आता..!
Read 4 tweets
#Alert
आजकाल ऑनलाईन आणि फोन वरून बँक फ्रॉड मोठ्या प्रमाणात होतात पण असं आपल्यासोबत झाल्यावर काय करायचं ? फक्त रडत बसायचं की गेलेले पैसे आपल्याला परत मिळवता येतील ?
आपले पैसे आपल्याला १००% रिफंड मिळू शकतात ते कसे हे जाणून घेण्यासाठी पूर्ण थ्रेड नक्की वाचा 👇
#१
#मराठी #म
RBI च्या गाईडलाईन्स नुसार 'तुमच्या बँक खात्यातून तुमच्या नकळत कोणताही अनधिकृत इलेक्ट्रॉनिक व्यवहारामुळे तुमचं नुकसान होत असेल तर तुम्हाला त्वरित-तीन दिवसांच्या आत बँकेला या व्यवहाराची सूचना द्यावी, बँकेला तुमची तक्रार मिळाल्यानंतर १० दिवसांच्या आत तुम्हाला पूर्ण...
#२
#माहिती
पूर्ण रिफंड देणे बंधनकारक आहे' लक्ष्यात ठेवा बँक अश्या फ्रॉड व्यवहारांसाठी विमा करून ठेवते, जेव्हा आपण अश्या व्यवहाराबद्दल त्वरित तक्रार करतो तेव्हा बँक विमा कंपनीकडून नुकसानाचे पैसे वसूल करते, आणि आपल्याला रिफंड वेळेत मिळतो.
हे E-Fraud आणि ATM Fraud साठी सुद्धा लागू आहे.
#३
Read 5 tweets
#धागा: नाणार एक शोध

कोकणात रिफाईनरी झाली कि नक्की काय फरक पडेल परिसरात🤔..

हृदयावर दगड ठेऊन, जे चित्र उभारलं ते फार क्लेशदायी होत, अजून अस्वस्थ वाटतंय, पण हीच अस्वस्थता लढ्याला प्रेरणा देईल ,म्हणून इथे शेअर करीत आहे.. #Save_Kokan_Movement #SayNoToRefinery
#म
1) परप्रांतीय वाढतील.
2) कोकणी माणूस दुय्यम स्थानावर जाईल.
3) केमिकल झोन कोकणभर पसरेल.
4) विजयदुर्ग खाडी तिचे सौंदर्य, विविधता गमावेल.
५) 16 गावातील बागायती, घरे, मंदिरे, झरे, ओढे, तलाव सर्वच भुईसपाट करून, पाइपांचे कुरूप जंजाळ पसरलेले असेल.++
6) चकचकीत इमारती उभ्या राहतील. परिसरातील दुकाने जैन- मारवाड्यांचीच असतील. शिपाई, माळी, सफाई कर्मचारी आदी वर्ग स्थानिक असेल.
7) एमप्लॉयीज च्या कोलोनीत स्थानिक कुणबी स्त्रिया भांडी, कपडे आदी घरकामाला असतील.++
Read 16 tweets
कॉफीचा स्टॉक संपवायचा म्हणून बनवली आणि जगप्रसिद्ध झाली

अमेरिकेन स्टॉक मार्केटमध्ये १९२९ मध्ये मोठा क्रॅश झाला होता. या क्रॅशमुळे जगभरात सगळीकडे कॉफीच्या किंमती पडल्या. इतक्या पडल्या की उत्पन्नाचा खर्चही निघेल की नाही याची शास्वती नव्हती.
#म #मराठी #nescafe
लॉसमध्ये विकण्यापेक्षा साठवलेली बरी म्हणून जगात कॉफीचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या ब्राझील या देशाने कॉफी विकलीच नाही. परिणामी देशात मोठ्या प्रमाणावर कॉफीचा साठा तसाच पडून राहिला.
#म #मराठी
यावर उपाय म्हणून ब्राझीलने थेट नेस्ले या कंपनीला साकडे घातले. आमच्याकडे असलेल्या जास्तीच्या कॉफीचा वापर करून काहीतरी बनवता येईल का? अशी विचारणा करण्यात त्यांनी केली. नेस्लेने हे आव्हान स्विकारण्याचे ठरवले.
#म #मराठी
Read 11 tweets
एक ना धड भाराभर चिंध्या

उद्यापासून मॅकडोनाल्डने पिझ्झा बनवायला सुरुवात केली तर? या कंपनीची साईझ पाहता त्यांच्यासाठी हे करणे फार अवघड नाही. याच्याउलट डॉमिनोज किंवा पिझ्झा हट बर्गर का बनवत नाहीत? तेही बर्गर बनवूच शकतात की?
#म #मराठी Image
महिंद्रा जसे ट्रॅक्टर बनवते तसेच टाटा का बनवत नाही? त्यांच्याकडे अशी क्षमता आहेच की? तरीही टाटा असे करत नाहीत.

पण आपल्या प्रॉडक्ट ऑफरिंग सोडून वेगळे काहीतरी करणे या कंपन्यांच्या तत्वात बसत नसेल.
#म #मराठी Image
त्यासाठी लागणार वेळ, कष्ट, पैसा त्यांच्या सध्याच्या प्रॉडक्टसवर खर्च करून आणखी काहीतरी चांगले आपल्या कस्टमर्सला देता येईल असाही विचार असू शकेल.
#म #मराठी
Read 6 tweets
एलआयसीचा नफा काय सांगतो?

आयपीओ येणार येणार म्हणून चर्चेत असलेल्या एलआयसीने नुकतेच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत एलआयसीला २३५ कोटींचा नफा झाला आहे. हाच नफा आर्थिक वर्ष २०२१ च्या तिमाहीत ९४ लाख रुपये होता. हा प्रॉफिट इतका का वाढला?
#म #मराठी Image
एलआयसीने आपली प्रॉफिट शेअरिंग पॉलिसी नुकतीच बदलली. म्हणजे नक्की काय केलं? आर्थिक वर्ष २०२१ पर्यंत एलआयसीचा एक पोलिसहोल्डर्स फंड होता. या फंडातला ९५% वाटा पॉलिसीहोल्डर्समध्ये वाटला जाई तर ५% वाटा शेअरहोल्डर्ससाठी असे. #म #मराठी Image
प्रायव्हेट कंपन्या ९०% वाटा पॉलिसीहोल्डर्सला तर १०% वाटा शेअरहोल्डर्ससाठी ठेवतात.
आता एलआयसीचा आयपीओ येणार आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरहोल्डर्सची संख्या वाढणार आहे. मग ही प्रॉफिट शेअरिंग सिस्टीम रिटेल शेअरहोल्डर्ससाठी योग्य ठरली नसती.
#म #मराठी Image
Read 13 tweets
एलआयसी आयपीओच्या निमित्ताने उभे राहिलेले प्रश्न

एलआयसी ही भारत सरकारची कंपनी आहे. आता आयपीद्वारे सरकार या कंपनीतला आपला काही हिस्सा विकणार आहे. हा हिस्सा विकला तरीही बराचसा हिस्सा सरकारकडे कायम असणार आहे.
#म #मराठी #LIC #LICIPO
मग ही सरकारी कंपनी आयपीओनंतर प्रायव्हेट झाली तर तिचा कारभार कसा चालणार? जे नवे लोक एलआयसीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतील त्यांच्या कंपनीकडून असलेल्या अपेक्षा वेगळ्या असल्या तर काय करायचे? असे काही प्रश्न या निमित्ताने उभे राहतील.
#म #मराठी #LICIPO
१. सरकार आपला हिस्सा किती आणि कसा कमी करणार?
आयपीओच्या नियमानुसार सरकारला एलआयसीमधील कमीत कमी ५% हिस्सा कमी करावा लागेल. कंपनीचे लिस्टिंग झाल्यावर दोन वर्षात आणखी १०% आणि नंतर पुढच्या पाच वर्षात २५% पर्यंत हिस्सा कमी करावा लागेल.
Read 16 tweets
एलआयसी आयपीओचा थेट परिणाम होणारे चार घटक

एलआयसीचा आयपीओ लवकरच मार्केटमध्ये येणार आहे. या आयपीओची साईज साधारण ५३,००० ते ९३,००० कोटींच्या घरात असेल असा अंदाज अनेक विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. हा आयपीओ भारतीय मार्केटमधील सर्वात मोठा असेल.

#म #मराठी #lic #LICIPO Image
तुम्ही एलआयसीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा अथवा नका करू, पण या आयपीओचा थेट परिणाम होऊ शकतील असे चार घटक या थ्रेडमधून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
#म #मराठी #lic #LICIPO
१. CDSL - एलआयसीने आपल्या आयपीओमध्ये १०% कोटा आपल्या पॉलिसीहोल्डर्ससाठी राखीव ठेवला आहे. यातले बरेच लोक असे असणार आहेत की जे पहिल्यांदा डिमॅट अकाऊंट ओपन करतील. कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार त्यांचे साधारण २९ कोटी पॉलिसीहोल्डर्स आहेत.

#म #मराठी #lic #LICIPO Image
Read 10 tweets
शिवाजी महाराजांवर हिंदी, राजस्थानी, तमिळ आणि बंगाली भाषांमध्ये पण काही सुंदर पण अप्रसिद्ध स्तुतिकाव्य आहेत.

हिंदी राष्ट्रकवी मैथैलीशरण गुप्त (१८वे शतक) हे त्यांच्या 'भारत-भारती' ह्या काव्यकृतीमध्ये शिवाजी महाराजांचे यथायोग्य वर्णन करतात :

बस 'सिंह' कह देना अलम!

#म #शिवजयंती Image
मात-भूमि भक्ति-सक्ति अविचल साहस की,
सहित प्रमाण प्रतिपादि छिति छाजी है  !
राना मूल-मंत्र जो स्वतंत्रता प्रकास किजो,
ताकी महाभास कियो सरजा सिवाजी है !!

जगन्नाथदास 'रत्नाकर (वीराष्टक, छत्रपति शिवाजी, छन्द १) Image
डॉ श्रीधर भास्कर वर्णेकर ह्या संस्कृत साहित्यकार विद्वानाने शिवाजी महाराजांवर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते "श्रीशिवराज्योदयम्" नावाचे महाकाव्य लिहिले आहे. Image
Read 13 tweets
स्वराज्य म्हणजे परकीय सत्तेच्या राजकीय दास्यापासून मुक्तता एवढाच मर्यादित अर्थ शिवाजी महाराजांच्या स्वराज्यास प्राप्त होत नाही; तर परकीय सत्तेप्रमाणेच स्वकीय जुलमी लोकांपासूनही मुक्तता‚ हाही अर्थ स्वराज्यात अभिप्रेत होता!
त्याचबरोबर स्वराज्यात स्वधर्म व स्वसंस्कृती यांचे संरक्षण व संवर्धन झाले पाहिजे‚ असाही त्यांचा आग्रह होता. या दृष्टिकोनातून महाराजांच्या स्वराज्याच्या कार्याकडे पाहिले की‚ त्यांच्या ऐतिहासिक कार्याची महत्ता द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही.
केवळ प्रशासन‚ लष्कर‚ आरमार‚ दुर्ग‚ व्यापार‚ उद्योग या क्षेत्रांतच शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात नवे युग सुरू केले असे नाही‚ तर धर्म व भाषा यासारख्या सामाजिक क्षेत्रांतही नवे पायंडे पाडले‚ नवे दंडक निर्माण केले.
Read 6 tweets
संपूर्ण थ्रेड बघा Important 👍🏻
Some #Software_Skill Courses
😊 All Free ✔️
With Certified Approved ✔️

⭕️ Python Flask Course :-
learnvern.com/python-flask-t…

⭕️ Advance PHP with MVC Programming with Practicals :-
learnvern.com/course/advance…

⭕️ WordPress Course :-
learnvern.com/course/wordpre…
⭕️ PHP For Beginners :-
learnvern.com/course/core-ph…

⭕️ Codelgniter Course :-
learnvern.com/course/codeign…

⭕️ Android Development for Begninners :-
learnvern.com/course/android…

⭕️ C# Course :-
learnvern.com/course/c-sharp…

⭕️ Angular JS Course :-
learnvern.com/course/angular…
#म @MarathiRojgar
⭕️ Angular JS Advance :-
learnvern.com/course/advance…

⭕️ Ruby Programming :-
learnvern.com/course/ruby-pr…

⭕️ R Programming :-
learnvern.com/course/r-progr…

⭕️ Magento Course :-
learnvern.com/course/magento…

⭕️ Python Programming :-
learnvern.com/course/core-py…
@MarathiRT
@MarathiBrain
Read 5 tweets
Skill Coruse :- Totally Free 👌
संपूर्ण थ्रेड नक्की बघा.
#मराठिनोकरी
वैशिष्ट्य :
1) कोर्स पूर्णपणे मोफत आहे. 😊
2) सोबत केंद्र सरकार मान्य प्रमाणपत्र मिळवा.
कोर्स :

1) MS Excel :
learnvern.com/course/ms-exce…

2) Tally Prime :
learnvern.com/course/tally-p…
@MarathiRojgar @MarathiRT
3) Photpshop :
learnvern.com/course/photosh…

4) Computer Networking :
learnvern.com/course/compute…

5) Computer Hardware :-
learnvern.com/course/compute…

6) Data Science :-
learnvern.com/course/beginne…

7) Graphics Design :-
learnvern.com/course/coreldr…

8) Stock Market :-
learnvern.com/stock-market-c…
Read 4 tweets
Some IMP Course for 👉
#Mechnical
#Civil
#Electrical

All Courses #Free.
Certified Govt Of India. ✔️

⭕️ Autodesk Inventor :-
learnvern.com/autodesk-inven…

⭕️ Autocard Mechnical :-
learnvern.com/autocad-tutori…

⭕️ CREO Course :-
learnvern.com/course/creo-pa…

@MarathiRojgar
⭕️ Autocard Mechnical Hindi :-
learnvern.com/course/autocad…

⭕️ Autocard Civil 2D :-
learnvern.com/course/autocad…

⭕️ Matlab Programming :-
learnvern.com/course/matlab-…

⭕️ Industrial Automation Course with PLC/scada :-
learnvern.com/course/industr…

#म @मराठीरत
⭕️ Sketch up Tutorial :-
learnvern.com/course/sketchu…

⭕️ Master Solidworks 2022 with Real time example and project :-
learnvern.com/course/solidwo…

⭕️ Complete MATLAB Simulink :-
learnvern.com/course/matlab-…

⭕️ HVAC Course :-
learnvern.com/course/hvac-co…
Read 4 tweets
#थ्रेड
मुलगी चीडचीड करते, तिचे मूडस्विंग होतात तर पाळीची तारिख जवळ येणार असेल किंवा पाळी आली असेल असं समजून तिला जपलं जातं.
पुढे चाळीशी नंतर Menopause जवळ आला किंवा आहे म्हणून पाळी जाताना किंवा गेली असताना तिची काळजी घेतली जाते आणि घ्यायलाच हवी त्यात दुमत नाही.
👇
मला नाही माहित मुलं चीडचीड, मूड स्विंग कसे सांभाळतात ? त्यांना पाळी येत नाही म्हणून त्यांचा राग-रुसवा, चीडचीड समजून घेतलीही जात नाही व त्यांना जपलंही जात नाही.
पण जपायला हवं समजून घ्यायला हवी त्यांची चीडचीड आणि मूडस्विंग.
👇
आपण स्त्री पुरुष समानता म्हणतो तर ती मुलांची चीडचीड, राग-रुसवे, मूड स्विंग समजून घेण्यात ही हवी.निसर्गाने आपल्याला स्त्री पुरुष म्हणून विभागलं असलं तरी भावना ह्या दोघांच्या सारख्या असतात शिवाय बरेच hormone ही सारखे आहेत ज्या मुळे राग येतो मूड स्विंग होतात.
👇
Read 7 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!