Discover and read the best of Twitter Threads about #मराठी_उद्योजक

Most recents (5)

Story of hidden side of an Entrepreneur
उद्योजकाच्या अनोळखी विश्वात.
काहीतरी करून दाखवायचं हा विचार ज्या दिवशी येतो त्या दिवसा पासून सुरु होतो एक खडतर, काटेरी प्रवास, जो बाहेरून खूप रंगीबेरंगी दिसतो. सगळं सुरळीत चालू असतं, ३० तारखेला बँकेत पगार जमा व्हायचा, (1/n)
सुट्ट्या मिळायच्या, नवरा बायको मुलं असं सगळं सुरळीत चालू असताना काहीतरी करून दाखवायचा विचार त्याला बसू देत नाही. भला मोठ्ठा पगार सोडून काहीतरी करू नको पासून ते आपण करू इथपर्यंत चा प्रवास म्हणजे आपल्या जोडीदाराला समजावून सांगणे.
(2/n)
एकदा आपण करू हा शब्द ऐकला की गड्याला इतका हुरूप येतो की काय करू काय नाही होऊन जातं. घरी छान गोड धोड जेवण एकमेकांना भरून प्रत्येक क्षणात सोबती असल्याचा अप्रत्यक्ष पुरावा देत असतात. काल्पनिक सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या, सुंदर दिसतात.( 3/n)
Read 16 tweets
१. कोणत्याही उद्योगात सुरू करताना खालील बाबींचा नक्की विचार करा.

१.मार्केट चा अभ्यास करा.
२.कच्या मालाची वाहतूक कमी होईल असे ठिकाण निवडा.
३. ह्या उद्योगातील काम करत आहेत अश्या व्यक्तींना भेटून अधिक जाणून घ्या.
#मराठी_उद्योजक
#म

४. ह्या प्रक्रिया साठी लागणारे यंत्र खरेदी करण्या आधी , यंत्र बनविणाऱ्या कंपनी ची प्रत्येक्ष भेट द्या. त्यांनी बनविलेले यंत्र कुठे कार्यान्वित असतील तर त्या ठिकाणी सुद्धा भेट द्या. तोपर्यंत कोणावरही विश्वास ठेऊ नका. डिजिटल युग आहे, फोटो मध्येच छान दिसते.

५. कच्चा मालाची उपलब्धता आणि साठवणूकक्षमता ह्यावर लक्ष केंद्रित करा.
६. तुमची कंपनी झीरो वेस्ट तयार करेल ह्याकडे लक्ष द्या. कच्या मालापासून ते तुमचा प्रॉडक्ट तयार झाल्यावर एकही वेस्ट प्रॉडक्ट शिल्लक राहणार नाही ह्याची काळजी घ्या.
Read 5 tweets
#थ्रेड
टोमॅटो प्रक्रिया उद्योग - नव संजीवनी
१. महाराष्ट्रातील प्रमुख फळभाज्यांच्या पिकांत टोमॅटोचा समावेश होतो. टोमॅटोचे मूळ स्थान पेरू व मेक्सिको, तर भारतात त्याला आणले पोर्तुगीजांनी.
टोमॅटो सर्वसाधाणपणे भारतीयांच्या परिचयाचा आहे. भारतात बारमाही उत्पन्न येणारा फळ म्हणजे टोमॅटो.
२. भारतीय बाजारपेठा मध्ये शेतकऱ्यांना नेहमीच त्याने कष्टाने कमावलेले पीक कवडी मोलात विकताना पाहतो ह्याचे कारण म्हणजे कोणतीही ठोस उपाययोजना नसणे.
परंतु ह्याच कवडी मोलाने विकलेल्या पिकावर मोठ्या कंपन्या भला मोठ्ठा नफा कमावतात.
३. आपण शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर नक्कीच चांगला बदल दिसून येईन. आज आपण टोमॅटो, त्यांच्या पासून प्रक्रिया करून कवडी मोल टोमॅटो ना चांगला भाव मिळवून देऊ शकतो.टोमॅटो उत्पादनात जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. चीन नेहमी प्रमाणे प्रथम आहे.
Read 27 tweets
#थ्रेड
बांबू उद्योग- एक सुवर्णसंधी

बांबू उत्पादन मध्ये भारत देश जगातील नंबर २ चा देश आहे.बांबू बद्दल असणारी उदासीनता झटकून पुढे येणाऱ्या संधीचा फायदा आपण करून घ्यायला हवा. वातावरणामध्ये होणारे बदल, त्याचा होणार परिणाम ह्या वर अंकुश मिळविण्या साठी प्रत्येक देशाने कंबर कसली आहे.
२. ह्या बाबीमध्ये येणाऱ्या काळात बांबू ला विशेष प्राधान्य दिलं जाईल त्यामागचं प्रमुख कारण म्हणुजे कार्बन शोषून घेण्याची सर्वात जास्त क्षमता बांबू मध्ये आहे. भारतामध्ये दर वर्षी एक माणूस साधारण २००० किलो कार्बन उत्सर्जित करतो.
३. एका माणसाने ५ बांबू ची झाडे लावली तरी उत्सर्जित कार्बन neutral होण्यास मदत होईल कारण एक बांबू चे झाड प्रतिवर्षी ४०० किलो कार्बन शोषून घेते.
आज प्लास्टिक चा वापर खूप जास्त होत आहे आणिजग प्लास्टिक साठी पर्याय शोधात आहे त्यासाठी बांबू हा पर्याय नक्कीच उपलब्ध आहे आणि राहील.
Read 23 tweets
हेअर सलून आणि ब्युटी स्पा इंडस्ट्री - एक संधी.

१. कोरोना राज्यात आणि देशात धुमाकूळ घालत असताना त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न प्रत्येक मराठी माणसाने केला पाहिजे. मराठी माणसासाठी सर्वात दुर्लक्षित क्षेत्र म्हणजे हेअर सलून.
२. काही लोकांना लाज वाटेल परंतु व्यवसाय हा व्यवसाय म्हणून पहिला कि कोणत्याही गीष्टी ची लाज वाटत नाही. ह्या विषयावर सविस्तर लिहिण्याचं कारण म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळात होणारी वाढ , आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं असणारं लक्ष , होणारी उलाढाल हि खूप मोठी असणार आहे.
३. त्यामध्ये प्रामुख्याने मेट्रो सिटी , टायर २ , ह्यावर लक्ष केंद्रित करण्याचा मोठ्या कंपन्यांचा मानस आहे. आजच्या मितीला भारतामध्ये जवळपास १ कोटी पेक्षाही जास्त लहान मोठी सलून, ब्युटी पार्लर , स्पा आहेत. भारतामध्ये आज घडीला ह्या उद्योगाची उलाढाल २५ ते ३० हजार कोटींच्या घरात आहे.
Read 17 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!