Discover and read the best of Twitter Threads about #राष्ट्रहितसर्वोपरि

Most recents (6)

नववर्ष इ.स.२०२१ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शंभूराजांना केलेला उपदेश मनी धरावा :

अखंड सावधान असावे । दुश्चित कदापि नसावे ।
तजवीज करीत बैसावे । येकांत स्थळी ।।

काही उग्रस्थिती सांडावी । काही सौम्यता धरावी ।
चिंता पराची लागावी । अंतर्यामी ।।

(१/४)
श्रेष्ठी जे जे मेळविले । त्यासाठी भांडत बैसले ।
तरी मग जाणावे, फावले । गनिमासी ।।

ऐसे सहसा करू नये। दोघां भांडण तिसऱ्या जाय।
धीर करोन महत्कार्य । समजोन करावे ।।

आरंभीच पडीली धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ती ।
याकारणे समस्ती । बुद्धी शोधावी ।।

(२/४)
समय प्रसंग वोळखावा । राग निपटुनी काढावा ।
आला तरी कळो न द्यावा । जनामाजी ।।

शिवराजांस आठवावे । जिवीत तृणवत मानावे ।
इहलोकी-परलोकी रहावे । कीर्तिरूपे ।।

शिवराजाचे आठवावे रूप ।
शिवराजाचा आठवावा प्रताप ।
शिवराजाचा आठवावा साक्षेप ।
या भूमंडळी ।।

(३/४)
Read 4 tweets
#सावरकरांचे_विचार
भाग १६

" 'नाही, नाही, राष्ट्रे कधीही मरत नाहीत, परमेश्वर गांजलेल्यांचा कैवारी आहे. त्याने मनुष्याला स्वातंत्र्यात राहण्यासाठी उत्पन्न केले आहे. तुम्ही मनांत आणा की तुमचा देश स्वतंत्र झालाच!' याहून अधिक उत्साहक असा दुसरा कोणाचा #राष्ट्रमंत्र आहे ?

(१/८)
'एकदा मनुष्याने असा निश्चय केला की मी स्वातंत्र्य, स्वदेश व मानव्य यावर भक्ती करतो, की मग त्याने स्वातंत्र्यासाठी, स्वदेशासाठी व मानव्यासाठी लढलेच पाहिजे, अखंड लढले पाहिजे, सर्व आयुष्यभर लढले पाहिजे, शक्य त्या त्या शस्त्राने लढले पाहिजे, -

#स्वातंत्र्यवीरसावरकर
(२/८)
- तिरस्कारापासून तो मरणापर्यंत सर्व संकटे तुच्छ मानली पाहिजेत, द्वेषाला नि निंदेला तोंड दिले पाहिजे, दुसऱ्या कोणत्याही फलाची आकांक्षा न करता फक्त कर्तव्य म्हणून त्याने तत्पर झाले पाहिजे !' याहून अधिक दिव्य असा दुसरा कोणता #राष्ट्रमंत्र आहे ?

#स्वातंत्र्यवीरसावरकर

(३/८)
Read 8 tweets
#चाणक्य
भाग १

यह धारावाहिक उस महापुरूष के जीवन, उनके विचारोंपे आधारित है, जिन्होंने #राष्ट्रहितसर्वोपरि विचार सर्वप्रथम रखा और #अखंडभारत को सशक्त एवं एकसंघ राष्ट्र बनाने का स्वप्न देखा!

इस धारावाहिक को मूर्तरूप देने वाले 'पागल' व्यक्ति का नाम है - डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी।

१/१०
चलिए देखते है #चाणक्य धारावाहिक से जुड़े कुछ दिलचस्प तथ्य:

१) लेखक एवं निर्देशक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदीजी ने पूरे ५ साल एकाग्र चित्तसे अनुसंधान (research) करने के पश्चात इस धारावाहिक की निर्मिती की है। मराठी, गुजराथी, हिंदी, अंग्रेजी एवं अन्य भारतीय प्रादेशिक भाषा -

२/१०
में चाणक्य एवं उस कालखंड के उपर लिखित कई पुस्तकोंका आधार बनाकर द्वेवेदीजी ने अपना अनुसंधान किया है।

२) धारावाहिक का प्रत्यक्ष छायाचित्रण शुरू होने के पूर्व ही द्वेवेदीजी ने पहले ३३ भागोंका लेखन पूर्ण कर दिया था।

३) ३३ से आगे सभी भागोंका लेखन करने का दायित्व जिस -

३/१०
Read 10 tweets
त्या साहसी उडीला आज ११० वर्ष पूर्ण !
तो दिवस होता ७ जुलै १९१० !

फ्रान्समधल्या मार्सेलिस बंदरावर हिंदुस्थानास निघालेली 'मोरिया' बोट काही काळासाठी स्थिरावली होती.

त्या बोटीत साखळदंडात कैद होते #स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.
इंग्रजांचे अतिशय #डेंजरस् कैदी !

(१/१८)
कारण लंडनला, शत्रूच्या घरातच जाऊन सावरकरांनी तेथील भारतीय क्रांतिकारकांच्या सहाय्यानं #अभिनव_भारत या आपल्या क्रांतिकारी संघटनेचं जाळं विणलं होतं.
पिस्तुलं जमविली होती, बॉम्ब बनविण्याचं प्रशिक्षण मिळवलं होतं.
अगदी भारतात सुद्धा ते तंत्र आणि बॉम्ब पाठविले होते.

(२/१८)
भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा सावरकरांचा प्रयत्न होता कारण भारतीयांच्या इच्छेनुसारच आम्ही त्यांच्यावर राज्य करीत आहोत असा अपप्रचार ब्रिटिश करत होते.

सावरकरांच्या ब्रिटिशविरोधी कारवायांमुळे त्यांना अटक करण्याची संधीच ब्रिटिश शोधत होते.
(३/१८)
Read 19 tweets
२७ जून २००८
पाकिस्तानी लष्कराला अवघ्या १८ दिवसांत शरण आणणारे भारतीय लष्कराचा मानबिंदू फिल्ड मार्शल्स् #सॅममाणेकशा यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी नमन !

संपूर्ण नाव - सॅम हॉर्मूसजी फर्मजी जमशेदजी माणेकशा
जन्म- ३ एप्रिल १९१४, अमृतसर

स्वतंत्र भारताचे पहिले #फिल्डमार्शल्स

१/१०
सॅम यांच्या लष्करात जाण्याचा निर्णयास त्यांच्या वडिलांचा विरोध होता. त्यावेळस 'मला लष्कारात जाऊ देत नसाल तर लंडनला पाठवा तिथे मी वैद्यकीय शिक्षण घेऊन गायनोकोलॉजिस्ट होईन' अशी इच्छा सॅमनी व्यक्त करताच वडिलांनी त्या गोष्टीलाही नकार दिला. शेवटी सॅम भारतीय लष्करात दाखल झाले.

२/१०
आपल्या एकूण ४० वर्षाच्या लष्करी कारकिर्दीत ५ मोठ्या लढायांमध्ये भाग घेतलेला आधुनिक जगातील एकमेव योद्धा म्हणजे फिल्ड मार्शल्स सॅम माणेकशा !
१.दुसरं महायुद्ध
२.भारत-पाक युद्ध १९४७
३.भारत-चीन युद्ध १९६२
४.भारत-पाक युद्ध १९६५
५.बांग्लादेश स्वातंत्र्ययुद्ध १९७१

#राष्ट्रहित
३/१०
Read 11 tweets
#समाजसुधारक_सावरकर
भाग १ : अखिल हिंदु गणेशोत्सवाची सुरुवात

श्री पतितपावन मंदिराचा कोनशिला समारंभ झाल्याने स्वा. सावरकरांना आपल्या मताप्रमाणे समाजक्रांतीचे कार्य बिनदिक्कत करण्यासाठी स्वतंत्र्य व्यासपीठच प्राप्त झाले.

दरवर्षी गावातील विठ्ठल मंदिरात सार्वजनिक गणेशोत्सव -

(१/५)
साजरा होत असे.
परंतु स्वा. सावरकरांच्या समाजक्रांतीचा धसका घेतलेल्या त्यावेळच्या गणेशोत्सव कार्यकारी मंडळातील सनातन्यांनी बहुमत करून अस्पृश्यांना सभामंडपात प्रवेश देण्यास स्पष्ट नकार दिला.

तेव्हा सावरकरांनी या सार्वजनिक गणेशोत्सवात अस्पृश्यांसह सर्व हिंदु बांधवांस सहभागी-

(२/५)
होता यावे यासाठी तो विठ्ठल मंदिराबाहेर मंडप उभारून तेथे करावा असे सुचविले व त्यासाठी स्वतः सर्व खर्च करण्याची तयारी दर्शवली.

पण त्यासाठीही सनातन्यांनी नकार दिला.

त्यावेळी निरुपाय म्हणून स्वा. सावरकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्या कार्यकारी मंडळाच्या सभासदस्यत्वाचा -

(३/५)
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!