Discover and read the best of Twitter Threads about #रिम

Most recents (24)

स्वतंत्र भारताचे वास्तव...
पण हे थांबायला हवे.

अमेरिकेत देव नाही, मठ नाही,
पण पाऊस मात्र वेळेवर व भरपूर आहे. गेल्या २०० वर्षात दुष्काळ नाही.
कुठले होम हवन नाही,
कसली वारी नाही,
कसले अभिषेक नाही,
अनुष्ठानं नाही,
हरिनाम सप्ताह नाही,
पारायणे नाहीत.
१/१४
अमेरिकेत लोकसंख्या नियंत्रणात आहे.
अन्नधान्य विपूल आहे.
सुखसोयी भरपूर आहेत. कशाचीच कमतरता नाही.
माणशी २८७६ वृक्ष आहेत.
भारतात फक्त माणशी २८ झाडे आहे.
आपल्याकडे वृक्षवल्ली आम्हां सोयरे म्हणतो.
पण एकही भारतीय झाड लावत नाही, जपत नाही. अमेरिकेत घरासमोर हिरवळ नाही असं घर नाही...
२/१४
भारतात दारात झाड नाही,
तर हिरवळ कुठली.
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, साधं पिण्याच पाणी देवू शकत नाही.
अमेरिकेचे क्षेत्रफळ भारतापेक्षा तिप्पट आहे.
अमेरिकेची लोकसंख्या ३१ कोटी, तर भारताची आहे १३५ कोटी.
३५ कोटीची १३५ कोटी झाली,फक्त ७५ वर्षात.
एवढीच जबरदस्त प्रगती आहे.
३/१४
Read 14 tweets
#उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान जास्त वेळ १००-१०१ फॅरेनाईट किंवा त्याहून अधिक स्थिर राहणे. सामान्य पणे दुपारी शरीराचे तापमान ९७.५ ते ९८ फॅ. असते. #उष्माघातामध्ये हे तापमान १०१ फॅ. पेक्षा जास्त होणे व हे जीवघेणे ठरते. उष्ण कोरडी त्वचा हे उष्माघाताचे लगेच ओळखून येणारे लक्षण.

१/६
#उष्माघाताची लक्षणे खालील प्रमाणे
*हृदयाची धडधड वाढणे
*दिर्घ श्वास घ्यावा लागणे, व श्वासाची गती वाढणे
*रक्तदाब (Blood pressure) वाढणे किंवा कमी होणे
*घाम येणे थांबणे
*चिडचिड होणे, बेशुद्धी (ग्लानी) किंवा भ्रम वाढणे
*चंचलता येणे किंवा कमी होणे
*डोकेदुखी
*मळमळ (ऊलट्या)
२/६
*शरीरात ताठरता येणे
*खूप तहान लागणे
*हात आणि पायात आकड (Cramps)
*आक्रमकता/चिडचिड वाढणे...
*खोल बेशुद्धी

प्रथमोपचार...
व्यक्तिला उन्हापासून दुर थंडाव्याच्या किंवा सावलीच्या ठिकाणी आणावे.
व्यक्तिला खाली झोपवून त्याचे हातपाय सरळ करावे.
कपडे सैल करावे किंवा काढून टाकावे.

३/६
Read 6 tweets
कोण आहे श्रीकृष्ण ?

पहिला अपशब्द ऐकल्यानंतर शिरच्छेद करण्याची शक्ती असताना सुद्धा नव्यान्नव अपशब्द ऐकण्याचा संयम आहे ! सुदर्शन चक्रासारखे शस्त्र असताना सुद्धा हातात मुरली आहे ! द्वारका नगरी सारखं वैभव असताना देखील सुदामा सारखा मित्र आहे ! शेषनागाच्या मृत्यू रुपी मुखावर उभे
असताना देखील नृत्य होत आहे ! प्रचंड सामर्थ्य असताना देखील युद्धात सारथी बनून सारथ्य करत आहे ! तो श्रीकृष्ण आहे.

श्रीकृष्ण व्यक्ती नाही, विचार आहे. जन्मानंतर लगेच जन्मदात्यांना सोडावं लागलं ! पालनकर्त्यांनाही सोडावं लागलं ! मित्रमंडळींना सोडावं लागलं ! जिच्यावर प्रचंड प्रेम केलं
तिलाही सोडावं लागलं! गोकुळ सोडलं ! शेवटी मथुरा ही सोडली ! आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर परिस्थितीच अशी निर्माण झाली की काही ना काही सोडावं लागलं ! पण काही सोडावं लागलं नसेल, तर ते आहे... देवत्व! निर्मळ हास्य ! प्रचंड मोठी सकारात्मकता !

श्रीकृष्ण जाणून घेणे म्हणजे जीवनाचा सार
Read 4 tweets
म्हातारीचा चौदावा झाला आणि पोरानं घराला मोठा टाळा लावून म्हाताऱ्याला एस.टीत घालून कायमचा शहराकडे आणला. पण उभं आयुष्य रानामाळात गेल्यानं त्याच मन काही इथे रमत नाही. तो खुर्चीत बसून गरगर फिरणाऱ्या पंख्याकडं नुसता एकटक बघत राहतो. जगून झालेल्या आयुष्यावर विचार करत... सकाळी पाच वाजता
उठून अंथरुणात बसून राहतो. आतील नळाला पाण्याचा आवाज आला की बादलीभर थंड पाणी रापलेल्या देहावर मारून घेतो. तसा तो सहा पासूनच चहाची वाट पाहत बाहेरच्या हॉल मधे टांगलेल्या घड्याळाकडे बघत बसून असतो, आतल्या बेडरुमचा दरवाचा उघडण्याची वाट बघत...कित्येक वेळा तो हलणाऱ्या मानेने आत डोकावूनही
बघतो. मग एके काळी भल्या पहाटे बाहेरच्या चुलीवर म्हातारीने चहासाठी ठेवलेलं जर्मनचं पातेलं त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागतं... दहा वाजता सुनेनं कपातून दिलेला चहा थरथरत्या हाताने घश्यात ओतून तो धोतर सावरत जिन्याच्या पायऱ्या उतरुन सोसायटीच्या गार्डन मध्ये थकलेल्या शरीलाला नेवून बसवतो.
Read 8 tweets
ते दिवस....!

पाचव्या इयत्तेपर्यंत पाटीवरची पेन्सिल जिभेने चाटत *कॅल्शियमची* कमतरता भरून काढायची आमची जन्मजात सवय होती.

पण यामध्ये 'सरस्वति देवी नाराज न होवो' हा पापभिरुपणा पण असायचा.
अभ्यासाचं टेन्शन आम्ही पेन्सिलीचं मागचं टोक चावून झेललं होतं

पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि
मोरपिस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा दृढ विश्वास होता.

कापडाच्या पिशवीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं
दरवर्षी जेव्हा नव्या इयेत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा.
आई वडिलांना आमच्या शिक्षणाची फारशी फिकीर नव्हती आणि ना हि आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजा होते. वर्षानुवर्षं आमच्या आईवडिलांची पावलं कधी आमच्या शाळेकडे वळत नव्हती.

एका मित्राला सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आता
Read 8 tweets
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच गोष्टी सांगितल्या जातात....!
1.अफजलखानाचा कोथळा
2.शाईस्तेखानाची बोटे
3.आग्राहून सुटका
पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात....!
1.आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती"
करणारे होते...!
2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे "लोकपालक" राजे होते...!
3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक" होते...!
4.विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून
जगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक" होते...!
5.समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे "स्व-धर्मचिकित्सक" होते ...!
6. मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या
Read 6 tweets
!! स्वराज्याची शिवकालीन जकात वसुली पद्धत व जकातीचे दर तसेच जकात जकात व अर्थव्यवस्था. !!

शिवकाळातील स्वराज्याच्या अर्थ व्यवस्थेचा अभ्यास करताना प्रामुख्याने जकात वसुली, कर वसुली, पेठेचा कारभार, गावचा कारभार यांचा अभ्यास करावा लागतो. स्वराज्यात जास्त करुन माल तयार होत नसे. Image
तो माल आयात होत असे बंदरावरांवरुन. त्या मुळे बंदरे ताब्यात असणे गरजेचे असायचे. जकात हि दोन प्रकारे वसुल केली जायची. एक बंदरावरील कर वेगळा तो कर हा प्रत्येक व्यापाऱ्यास द्यावा लागे. त्या नंतर माल वाहतूक करत असताना घाट उतरल्यावर जकात वसुल केली जायची. शिवकाळामध्ये कारवार, गोबे,
बेंगुर्ले, मालवण, राजापूर, जैतापूर, खारेपाटण, रत्नागिरी, चिपळूण, हर्णे, दाभोळ, महाड, दंडा-राजपुरी, नागाव, नागोठाणे, चेऊल, पेण, पनवेल, अष्टमी, कारंजा, मुंबई, कल्याण, भिवंडी, वसई, ठाणे इत्यादी लहान मोठी बंदरे प्रसिद्ध होती. यातील बहुतांशी बंदरे स्वराज्यात होती तर गोवे, मुंबई, करंजा
Read 11 tweets
तलाठ्याला वाटतं फेरफार साठी शेतकर्याने 30-40 हजार रूपये द्यावे कारण पाच एकर जमीन हाय ना. काय मरतो का शेतकरी एवढ्यानं..
बँक मॅनेजर ला वाटते शेतकर्‍याने लाखाच्या कर्जाला किमान १०हजार रूपये दलाला कडे जमा करावे. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
सोसायटी चेअरमनला वाटतं मीच शेतकऱ्यांला कर्ज
वाटप करतो तेव्हा मी लाखामागं १५-२० हजार काढुन घेतलं तर काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
दुधडेअरी चेअरमनला वाटतं दुधाचा पगार आपणच करतो मग लिटरमागं चार रुपये ढापलं तर काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
दुधसंघाला वाटतं शेतकऱ्यांपेक्षा आपली मेहनत जास्त कारण बाळाला आत जाऊन
टँकर धुवा लागतो ना... मग करा दुधाची फॅट कमी, काढा लिटरमागं ५ रुपये भाव कमी. मरतो का शेतकरी एवढ्यानं......
म्हणजे झाला दुधसंघ करोडोपती आणि लागला पठारावरच्या ईलेक्शन जिंकु.
व्याजानं पैसं देणारा सगळं सोनं-नाणं तर हडप करतोच आणि शेतीलाही गिर्‍हाईक शोधतो एवढ्यावरच त्याचं भागत नाही तर
Read 9 tweets
तुमच्या अंत्यसंस्कारानंतर सहसा काय होते हे तुम्हाला माहीत आहे का?

काही तासांत रडण्याचा आवाज पूर्णपणे बंद होईल.

नातेवाईकांसाठी हॉटेलमधून जेवण मागवण्यात कुटुंब गुंतून जाईल.

नातवंडे धावत-खेळत राहतील.

झोपायला जाण्यापूर्वी काही पुरुष तुमच्याबद्दल काही अपमानजनक टिप्पणी करतील!
एक नातेवाईक तुमच्या मुलीशी फोनवर बोलेल की तो आणीबाणीच्या कारणास्तव वैयक्तिकरित्या येऊ शकत नाही.

दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणात काही नातेवाईक कमी होतील, तर काहीजण भाजीत पुरेसे मीठ नसल्याची तक्रार करतील.

जमाव हळूहळू पांगू लागेल..

येत्या काही दिवसात
तुम्ही मेला आहात हे माहीत
नसताना काही कॉल तुमच्या फोनवर येऊ शकतात.

तुमची जागा घेण्यासाठी तुमचे कार्यालय किंवा दुकान त्वरीत कोणीतरी शोधून काढेल.

दोन आठवड्यांत तुमचा मुलगा आणि मुलगी त्यांची आणीबाणीची रजा संपल्यानंतर कामावर परत जातील.

महिनाअखेरीस तुमचा जोडीदारही कॉमेडी शो पाहून हसायला लागेल.
Read 8 tweets
गावाकडे अजुनी साधेच एक घर आहे माझे
तिथेही आता रात्र झाली असेल
मात्र अद्यापही तिथला अंधार फितूर झाला नसेल

ओसरीवरच्या गप्पा जारी असतील
पारावरची लगबग मंदावली असेल

खेळत असतील फुफाट्यात पोरं गल्लीबोळातली
माळवदावरती बसुनी असतील आठवणींचे उदास पक्षी
देवळाच्या पायऱ्यांपाशी असतील
काही जख्ख वृद्धा
तर काही वाहत असतील सरपणाची, माळव्याची ओझी

स्वयंपाकघरातल्या कालवणांचा गंध पसरला असेल वाऱ्यावर
निजली असेल गोठ्यातली गाय वासराला चाटून झाल्यावर
बारीक आवाजात सुरु असतील गप्पा बायकांच्या
विषय तोच असला तरी जिवंतपणा असेल बोलण्यात त्यांच्या

जीर्ण दगडी वाडे काही झुकले
असतील
निष्पर्ण नसूनही झाडे काही वाकली असतील

संथ चालत असतील थकलेली शिसवी माणसं काठी धरून
वाटेने येणाऱ्यास अडवून हालहवाल विचारत असतील, हात फिरवत खांद्यावरून

पानाची चंची उघडली जात असेल
देठ खुडून चुना लावताना जुन्याच गप्पांना रंग चढत असेल
बोलता बोलता विषय निघत असेल
Read 5 tweets
|| #Threadकर

हिंदू महासभा आणि सावरकर या दोहोंचाही गांधीजींशी आलेला संबंध आणि त्यांचं स्वरूप स्पष्टपणे समजून घेणेही तितकंच आवश्यक आहे.स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म १९८३ मधला.गांधीजीहुन १४ वर्षांनी लहान होते. #म #रिम #मराठी (१)
पण आपल्या जहाल वक्तव्यांनी आणि कृतीशील कामाने विद्यार्थी दशेत त्यांचं नाव महाराष्ट्रात सर्वत्र झालं.सशस्त्र लढ्याचे पाईक असे "रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले?" असे म्हणणारे सावरकर यांची स्वातंत्र्य लढ्यात उतरण्याचा काळ हा मवाळ चळवळीचा काळ.(२)
बॅरिस्टर बनायला इंग्लंडला गेलेले सावरकर यांनी इंडिया हाऊस एकर्थी आपल्या ताब्यात घेऊन सशस्त्र लढ्याचा अस्त्र शस्त्र खाना बनून टाकला. धिंग्रा ने वायली ची हत्या करताना वापरलेली पिस्तूल सावरकरांच्या याच शस्त्रखान्यातील. हा सशस्त्र उत्साह अगदीच गांधीजींना मान्य नव्हता.(३)
Read 18 tweets
महत्त्व "व्यवहार पाठां" चे

ब्रिटनमध्ये काही वर्षांपूर्वी एका तीन-साडेतीन वर्षाच्या मुलीच्या समोर तिची गरोदर आई घरातील जिण्यावरून पडली आणि बेशुद्ध झाली. या तीन वर्षाच्या कोवळ्या जिवाने क्षणाचाही विलंब न करता ऍम्ब्युलन्सला फोन केला

#म #मराठी #रिम Image
आणि तिच्या या फोनमुळे फक्त आईचाच नाही तर पोटातील बाळाचाही जीव वाचला. ऍम्ब्युलन्सला फोन करून ती मुलगी अनेक मिनिटे त्यांच्याबरोबर बोलत होती तिचे बोलणे संपते न संपते तोपर्यंत ऍम्ब्युलन्स दारात हजार झाली होती.
जगातील अतिशय गर्दीचे शहर असलेल्या लंडनमध्ये सुद्धा एखाद्या अपघातानंतर सरासरी आठव्या मिनिटाला ऍम्ब्युलन्स हजर होते. संपूर्ण ब्रिटनमध्ये या मुलीच्या प्रसंगावधनाचे आणि धाडसाचे कौतुक झाले आणि या एका फोन कॉल मुळे ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अनेक सुधारणा केल्या.
Read 25 tweets
अप्रतिम गीत संरचना... ❤️

सुटताना हात, विझताना वात
वाटे आता तो काळही परतून यावा
घडले जे सारे, ते उधाण वारे
फिरुनी पुन्हा तो नवासा डाव मांडावा
खोडून कालच्या खुणा
जगायचे आहे पुन्हा
अधुरे स्वप्न साजिरे पुरे करायचे मना

#काकण
#म #मराठी #रिम
पुसुनी आसावे आता
नवी लिहायची कथा
नवासा द्यायचाय अर्थ जीवना
तुझ्या सावलीत माझे क्षण क्षण
अन पूर्ण आज झाले काकण!

भेटीला आणी ती जुनी कहाणी
आठवू दोघे पुन्हा
लाटांची गाणी ती माझी निशाणी
जपली आहेस ना
बेरंग झालेले आयुष्य सारे
रंगवू थोडे जरा
पहाट सारली नि रातीही गेल्या
वाट पाहण्यात त्या
माझ्या जगातून आले मी परतून
जायचे आहे पुन्हा
प्रेमात हरले मी तुझे आयुष्य
आहे हा माझा गुन्हा

चल झाली वेळ
आटोपून खेळ
सोडून हात सारा प्रवास हा एकट्याचा
दिले शब्द शब्द जे जे
पुरे केले ते ते
आहे सुखात तरी हि मनात हि व्यथा का
खोडून कालच्या खुणा
जगायचे आहे पुन्हा
Read 4 tweets
#Threadकर

पुण्यातल्या पाषाण रस्त्यावर वृंदावन गृहरचना सोसायटीमध्ये अगदी डोंगराच्या बाजूला निसर्गाच्या कुशीत निवांत ठिकाणी लपलेला एक टुमदार बंगला आहे. त्या बंगल्याचं नाव आहे ‘सांख्य’. अध्यात्मातील सांख्य तत्त्वज्ञानाशी जवळीक साधणारे हे आगळेवेगळे नाव असणाऱ्या (१/११)
#म #मराठी #रिम
या बंगल्याचे मालक कोणी साधुसंत वा बुवामहाराज नाहीत, तर ते आहेत अभिमानाने भारताची मान ताठ ठेवणारे, ‘परम’ या महासंगणकाची निर्मिती करणारे संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर!
विदर्भातल्या मूर्तिजापूर तालुक्यातलं मुरांबा गाव हे भटकरांचं मूळ गाव. वडील स्काउटचे संघटक तर आई मुख्याध्यापिका. (२/११)
आईची आईसुद्धा करंजगावाला. आजोबा सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते. थोरला भाऊ अविनाश आणि डॉ. विजय भटकर या दोघांचं शिक्षण झालं ते करंजगावला. विजय भटकर साडेसात वर्षांचे असताना तोंडी परीक्षा देऊन त्यांनी एकदम चौथीत प्रवेश मिळविला. (३/११)
Read 12 tweets
स्वराज्य म्हणजे परकीय सत्तेच्या राजकीय दास्यापासून मुक्तता एवढाच मर्यादित अर्थ शिवाजी महाराजांच्या स्वराज्यास प्राप्त होत नाही; तर परकीय सत्तेप्रमाणेच स्वकीय जुलमी लोकांपासूनही मुक्तता‚ हाही अर्थ स्वराज्यात अभिप्रेत होता!
त्याचबरोबर स्वराज्यात स्वधर्म व स्वसंस्कृती यांचे संरक्षण व संवर्धन झाले पाहिजे‚ असाही त्यांचा आग्रह होता. या दृष्टिकोनातून महाराजांच्या स्वराज्याच्या कार्याकडे पाहिले की‚ त्यांच्या ऐतिहासिक कार्याची महत्ता द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही.
केवळ प्रशासन‚ लष्कर‚ आरमार‚ दुर्ग‚ व्यापार‚ उद्योग या क्षेत्रांतच शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात नवे युग सुरू केले असे नाही‚ तर धर्म व भाषा यासारख्या सामाजिक क्षेत्रांतही नवे पायंडे पाडले‚ नवे दंडक निर्माण केले.
Read 6 tweets
तथाकथित महान कार्य करणारे जगप्रसिद्ध शिक्षक स्वतः ला डॉकटर म्हणवणारे @ranjitdisale याची उत्तरे देतील का?
@VarshaEGaikwad @DilipSwami_IAS @nilzalte @RahulAsks @kamblesandeep12 @Archanagsanap2 @Ind_teacher @Mha_Teacher
#म #रिम #मराठी #शिक्षण_व्यवस्था
(१/३)
loksatta.com/mumbai/teacher…
( शिक्षणाधिकारी म्हणतात त्याप्रमाणे ) जर गैरहजर राहून , नियमभंग करुन 'ते' यश शिक्षक श्री रणजितसिंह डिसले यांनी मिळवले असेल किंवा आणखी कांही ते मिळवू पाहत असतील तर त्याचे समर्थन करत येणार नाहीच , सुरळीत प्रशासनासाठी तो घातक ट्रेंड आहे .
उद्या प्रत्येक अधिकारी/कर्मचारी तसा
(२/३)
वागू लागू लागला तर बेबंदशाही माजेल.
नियमभंग करुन मग माध्यमांना असं हाताशी धरुन ईप्सित संधी करुन घेणं पूर्णपणे अयोग्य आहे ; याला स्वत:च्या पायावर स्वत:च धोंडा मारुन घेणं म्हणतात !
-प्रविण बर्दापूरकर
@Dev_Fadnavis
@Yours_Pawan @Vidarbha_P @pras501 @SangramD_BJP @samadhanautade1
Read 5 tweets
डॉ. अब्दुल कलाम यांना पायलट बनायचे होते..

त्यासाठी कुणीही मार्गदर्शक नसल्यामुळे त्यांनी बी.एस्.सी. ला एडमीशन घेतली.

नंतर फायनल ईयरला त्यांना कळले की, पायलट बनायचे असेल तर ईंजीनीयरींग मधील 'एयरोनॉटीकल ईंजीनीयरींग' ला प्रवेश घ्यावा लागतो!

1/7 #म #रिम
मार्गदर्शक नसल्यामुळे आयुष्यातील तीन वर्ष वाया घालवीले असे त्यांना वाटले.. खुप रडले..

परंतु याच बीएससी फीजीक्सने त्यांचे जीवन घडविले!

नंतर एयरोनाॅटीकल ईंजीनीयर ची पदवी घेतली, त्यावर्षी संपुर्ण भारतातुन केवळ आठ मुलं ही पदवी घेऊ शकले !.. त्यात डॉ कलाम टॉपर होते!
2/7
त्याकाळी फक्त 'एअर ईंडीया' हीच पायलटच्या जागा भरायची.
त्यावर्षी त्यांना सात जागा भरायच्या होत्या.. अर्ज आठ! डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम टॉपर..ईंटरव्यु होऊन सीलेक्शन झाले!

डॉ. कलाम सोडुन सर्व उमेदवारांना नौकरी मिळाली..

डॉ. कलाम यांची "ऊंची" कमी आहे, या कारणामुळे त्यांना नाकारले.
3/7
Read 7 tweets
तो दीड वर्षांचा असताना त्याच्या आईने आणखी एका मुलाला जन्म दिला, दुर्दैवाने तो तीनच महिन्यांत गेला. त्यानंतर दोन वर्षांनी त्याला एक बहीण मिळाली; पण तीसुद्धा चार महिन्यांत गेली. पुढे अडीच वर्षांनंतर त्याच्या आईने चौथ्या मुलाला जन्म दिला; पण वर्ष होण्याच्या आत तेसुद्धा देवाघरी गेले.
भावंडांशी खेळण्याच्या वयात त्याने एकापाठोपाठ एक तीन भावंडं गमावली. त्या वेळी तोही लहान असल्याने त्यांचं जाणं त्याला समजण्याच्या पलीकडे होतं. त्यात घरातलं दु:खी वातावरण, ताण, आईचं रडणं यांमुळे तो जास्तच एकटा पडला आणि चिडचिडा झाला. यातून हळूहळू तो खूप हट्टी झाला.
तो तीन वर्षांचा होईपर्यंत बोलत नव्हता. अगदी क्वचित एखादं अक्षर उच्चारायचा. त्यामुळे ‘आपला एकुलता एक मुलगा मुका तर नाही ना’ अशी भीती त्याच्या आईला वाटायला लागली होती. म्हणून त्याच्या आईच्या वडिलांनी त्याला अक्षरं शिकवायचं ठरवलं. त्यासाठी ‘अक्षर अभ्यासम’ हा विधी करावा लागणार होता.
Read 14 tweets
प्रत्येकाने वाचावी अशी तहसीलदार समाधान गायकवाड यांची फेसबुक पोस्ट,
"आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सुवर्ण दिवस,
ज्या माणसाला आयुष्यभर तहसील कार्यालयाचे खेटे मारत असताना तेथील शिपाई सुद्धा नीट बोलला नाही.
#म #मराठी #रिम
@HashTagMarathi
@MarathiRT
@MarathiBrain
त्या माणसाच्या कष्टाने मी तहसीलदार, उपजिल्हाधिकारी झालो व त्या माणसाला आज तहसीलदार कार्यालयात दिव्याच्या गाडीतून घेऊन जाणं व तहसीलदारच्या खुर्चीवर बसवणं हे माझ्या आयुष्यातील एक सुवर्ण क्षण होता."
@wankhedeprafull
@Phanase_Patil
@Godfath52464383
तो माणूस म्हणजे माझे वडील,"अण्णा" त्यांचं खुर्चीवर बसताना भावुक होताना आलेले आनंदाश्रू मी आयुष्यभर विसरू शकणार नाही." माझ्या वडिलांचा प्रवास:-एक सालगडी ते उपजिल्हाधिकाऱ्याचा बाप..…अण्णा तुम्ही आहात म्हणून मी आहे... जिंकलंय आपण अण्णा"
@hemant_athalye @Hindsagar @ImLB17
Read 3 tweets
समाजमाध्यमं वापरताय तर सावधान!! 🛑

तीन वर्षांपूर्वीची घटना...
साल २०१९ च्या उन्हाळ्यात दक्षिण कोरियामधील आणीबाणी क्रमांकावर (Emergency Number) एक फोन कॉल आला. हा फोन कॉल केला होता दक्षिण कोरियाच्या एका विद्यापीठात पत्रकारिता शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा. (१/२७)
#म #मराठी #रिम
या विद्यार्थ्यांनी पोलिसांना एका गंभीर गुन्ह्याची माहिती दिली की; टेलिग्राम वर एक ग्रुप आहे, जो क्रूर सेक्स नेटवर्कींग चालवतो. हा ग्रुप १८ वर्षांखालील मुलींना व महिलांना अमानविय आणि विकृत सेक्स करण्यासाठी भाग पाडून त्याचे अश्लील चित्रफिती बनवून आॅनलाईन मानवी तस्करी (२/२७)
सारख्या घटनांना चालना देत होता. टेलिग्रामवरिल युजर्स कडून पैसे घेऊन हा ग्रुप त्यांना मुलींचे अश्लील व्हिडिओ विकत असे. पोलिसांनी या प्रकाराचा छडा लावला आणि २३ मार्च २०२० साली पोलिसांनी गुन्हेगाराची ओळख प्रसार माध्यमांद्वारे सार्वजनिक केली. (३/२७)
Read 29 tweets
एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !

१/n #म #रिम
एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा होते निर्माण शक्यता
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !

२/n #मराठीकविता
एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या जत्रा
कोणीतरी स्वत:चे ओझे, स्वत:च्याच पायावर
सांभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !

३/n
Read 6 tweets
भारतीय समाजसुधारनेतील अगाध सामर्थ्याचा ओजस्वी महापुरूष म्हणून जर कोणाला म्हंटलं पाहीजे तर ते आहेत लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज!! यांच्या कार्याविषयी जितकं बोलावं तितकं कमीच! भारतवर्षातील समाजव्यवस्थेत समानता आणण्यात राजर्षी शाहूंचा सिंहाचा वाटा आहे.
(१/११)

#म #मराठी #रिम
जो लोकांमध्ये नांदला आणि तळागाळातील लोकांना सहजतेने ज्याने वर आणलं, म्हणूनच तो लोकराजा होऊ शकला.

आरक्षणाचे जनक, स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, ब्राह्मणशाहीविरूद्ध प्रचंड बंड पुकारणे, शिक्षणाचा अधिकार सर्व समाजघटकात पोहोचवणे,
(२/११)
आंतरजातीय विवाहाची सुरूवात आपल्याच बहिणीचा विवाह आंतरजातीय पद्धतीने घडवून आणून लोकांना त्याकरिता प्रोत्साहित करणारा एकमेव राजा म्हणून राजर्षींकडे पाहीलं जातं.
(३/११)
Read 11 tweets
#Threadकर
#AmbedkarJayanti

आज एका कायदेतज्ञाची जयंती आपण साजरी करीत आहोत. वेळोवेळी सामाजिक न्यायासाठी वारंवार आपली भूमिका निर्विवादपणे मांडणाऱ्या आणि समतेवर आधारित देशाचं भविष्य पाहणाऱ्या महामानवाचं स्वप्न अजून तरी पूर्ण झालेलं दिसत नाही.
1/14
#म #रिम
न्यायाची प्रकर्षाने बाजू मांडणाऱ्या भिमरावांचं कायदेतज्ञाच्या रूपाचं दर्शन आपल्याला १९२६ सालच्या दिनकरराव जवळकर खटला, १९२७ सालचा फिलीप स्प्रॅट या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याचा खटला आणि १९३४ सालचा रघुनाथ धोंडो कर्वेंचा खटला असो तीनही वादग्रस्त खटल्यांमधून आंबेडकर यांनी…
2/14
...न्यायाची विद्रोही भुमिका घेतलेली दिसून येते. कायदा आणि वकिली हा त्यांचा आवडीचा विषय होता. न्यायालयीन कामकाजांबद्दल पाहणी करण्याची पण त्यांना विलक्षण आवड होती. २३ जुलै १९५० रोजी त्यांनी औरंगाबाद सेशन्स कोर्टाला भेट दिली होती.
3/14
Read 14 tweets
आयुष्याच्या ताटात प्रेम फक्त एक लोणचं आहे.. चवदार व चटपटीत.. इतर सुखदुखःच्या सर्व चवींपेक्षा वेगळ.. आयुष्याची चव नक्कीच वाढवत.. पण लोणच्याने पोट मात्र भरत नाही.. १/२

#मराठी #म #रिम @vapurzaa
त्यामुळ ताटात लोणचं नाही याच शोक करत बसण्यापेक्षा, कष्टाची भाकर, सुखाचा भात, समाधानाचा सार, सुखदुखःच्या चटण्या व मैत्रीच लिंबू खाऊन तृप्ततेचा ढेकर द्यायला शिका.. २/२ ✍

#शुभसकाळ 😊
#मराठी #म #रिम @vapurzaa
याचा अर्थ असा नव्हे की प्रेमाच लोणच वाईचट.. अजिबात नाही, याउलट जेवढ जुनं तेवढ मुरलेलं.. मिळाल तर आनंद घ्या पण नाही मिळाल तर शोक करत बसू नका.. ऐवढच काय ते.. !
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!