Discover and read the best of Twitter Threads about #वाचन

Most recents (6)

मी माझ्या आतापर्यंतच्या थोड्या वाचनावरून
पुस्तके सुचवली आहेत📚:

कथा - निळासांवळा (जी.ए कुलकर्णी)
धिंड (शंकर पाटील)

कादंबरी - ययाति (खांडेकर)
मृत्युंजय (शिवाजी सावंत)

काव्यसंग्रह - सलाम (पाडगावकर)
अनाहत (गुरु ठाकूर)

ललित - अपूर्वाई (पुलं)
निसर्ग वाचन (मारुती चित्तमपल्ली)
1/5👇
वैचारिक - मनात (अच्युत गोडबोले)
शेतकरी, ग्राहक आणि महागाईचे त्रैराशिक (महेश सरलष्कर)

प्रेरणादायी -  एक होता कार्व्हर (वीणा गवाणकर)
महानायक (विश्वास पाटील)

प्रवासवर्णन - रोमराज्य (मीनाप्रभू)
जावे त्यांच्या देशा (पुलं)

आत्मचरित्र - प्रकाशवाटा (प्रकाश आमटे)
उपरा (लक्ष्मण माने)
👇
सेल्फ हेल्प - यश तुमच्या हातात (शिव खेरा)
तुमच्या आमच्या लेकी (डॉ. लिली जोशी)

माहितीपर साहित्य - ऐका तेलियाने (गिरीश कुबेर)
कामगारांचे मानसिक आरोग्य (डॉ. वृषाली राऊत)

ग्रामीण साहित्य - बारोमास (सदानंद देशमुख)
पांगिरा (विश्वास पाटील)

3/5👇
Read 5 tweets
काही महिन्यांपूर्वी अत्यंत अभ्यासपुर्ण मराठी पुस्तक वाचनात आले.

मी अगदी ॲाफीसमधेच थांबून एका बैठकीत संध्याकाळी ७ ते ११.३० वाजेपर्यंत त्याचा फडशा पाडला. पुढचे काही दिवस त्या पुस्तकातील भाग पुन्हा पुन्हा वाचला. त्या लेखकाबद्दल खूप आदर तयार झाला.

#SundayThread #पुस्तक #वाचन
१/१४ ImageImage
काहीही करून त्यांना भेटायचे आणि त्यांना धन्यवाद सांगायचे हे मनोमन ठरवलं.

खरं सांगायच तर मागच्या पाचएक वर्षात माझ्या वाचनात मराठी पुस्तक फार मोजकी येताहेत, आणि त्यात मला नक्कीच सुधारणा करायच्या आहेत. मला ते पुस्तक वाचून अजून काही मराठी पुस्तकं वाचायची प्रेरणाही मिळाली होती.
२/१४
दरम्यान मी त्यांची अजून एक पुस्तक वाचून काढले. लेखकाचा एकंदर आवाका मोठा होताच शिवाय त्यांचे कष्टही त्या लिखाणातून दिसत होते. मी काही जवळच्या मित्रांकडून त्या लेखकाचा नंबर मिळवायचा प्रयत्न करत होतो पण यश मिळत नव्हते.

असेच काही दिवस गेले, मी ही कामात बिझी झालो होतो. एक दिवस
३/१४
Read 14 tweets
#वाचन #म #धागा

“शिवाजी महाराज सिडनीच्या लायब्ररीमध्ये”

ह्या आठवड्यात घडलेली एक अतिशय सुखद घटना:

काम संपल्यावर संध्याकाळी वाचायला पुस्तकं आणावीत म्हणून सिडनी मधल्या एका जगप्रसिद्ध वाचनालयात गेलो होतो. नवीन आलेल्या पुस्तकांविषयी ग्रंथपालासोबत गप्पा मारताना त्यांना विचारले
1/9👇
आंतरराष्ट्रीय विभागात वाचण्यासारखे काय आहे?
तर त्यांनी ३-४ ग्रीक आणि इतर युरोपीय पुस्तकांविषयी सांगितले आणि मग म्हणाले,

भारतातल्या एका महान राजाविषयी नुकतेच एक पुस्तक आम्ही आमच्या संग्रहात समाविष्ट केले आहे - “द ग्रेटेस्ट किंग शिवाजी”.

मी जागेवर उडीच मारली!👇2/9
आणि गप्पा आवरत्या घेऊन दुसऱ्या मजल्यावरच्या आंतरराष्ट्रीय पुस्तकांच्या विभागाकडे वळलो.

तिथे हाती लागलं हे हिंदी भाषेतलं डॉ. हेमंतराजे गायकवाड लिखित "शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट" हे अनोखं पुस्तक..

तुकाराम महाराज म्हणतात तसं 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अशीच अवस्था झाली माझी..
👇 3/9
Read 9 tweets
@LetsReadIndia
#वाचन
आजच #कृष्णायन ही पुस्तक वाचली.
"माणूस होऊन जगलेल्या, ईश्वराची भावकथा!"
हे लेखिकेने (काजल ओझा वैद्य) एका वाक्यात केलेलं वर्णन आहे.
देव सुद्धा जेव्हा माणसाचा जन्म घेतात तेव्हा त्यांना ही सगळेच सुख-दुःख भोगावे लागतात मग ती त्यांची इच्छा असो वा नसो.
असं म्हणतात की मृत्यूच्यावेळी आपल्याला आपण केलेल्या सर्वच गोष्टी आठवत राहतात आणि त्याच बरोबर काही ठराविक माणसांना भेटायची इच्छा पण असतेच आणि हेच सगळं श्रीकृष्णाच्या बाबतीत पण होतंय.
त्याला पण भेट आणि मुक्ती हवीये राधा, रूक्मिणी आणि द्रोपदी कडून.
प्रेयसी, पत्नी आणि सखी या तिन्ही नात्यांना पुरेपूर न्याय दिला होता कृष्णानं.
म्हणूनच आज सुद्धा तिघींना समान महत्व आहे. मनुष्याचा जन्म घेतल्यामुळे मृत्यूच्या वेळेस होणारे सगळे त्रास कृष्णाला सहन करावे लागताते आणि सामान्य माणसासारखं त्यालाही वाटतंय की आपण कुठे चुकलो तर नाही ना.
Read 5 tweets
पर्वणीच!

टिव्हीवरील सकस #माझाकट्टा पहायला मिळाला!

दागिने नसतील तरी चालतील पण आम्हाला पुस्तके पाहिजेच असतात.

आमची प्रत्येकाची लायब्ररी वेगळी आहे.

कमविलेला पैसा समाजाचा आहे.

Books are my dearest friends!

हिशोब कवडीचा,दान लाखाचा!

पुणेकर ज्ञानी पण खडूस!

#मराठी @abpmajhatv 1/2
Enough is Enough, Sometime one should stop!

सुधाताई -बालपण मिळाले , Greatest habit VOT is Reading habit मिळाले आता ते मुलांना मिळत नाही.

सर्वात शेवटी सर्वाधिक आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांनी या मुलाखतीतून दिलेले आर्थिक साक्षरतेवरील अमुल्य ज्ञान!

#वाचन #प्रेरणा #माझाकट्टा
धन्यवाद @abpmajhatv @rajivkhandekar @abhiasks @dnyanada24 @nilzalte @bharatias आणि सुधा मुर्तींना तर दंडवत 🙏
Read 5 tweets
मराठी बालसाहित्य हे खरेतर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि हे कटू सत्य जर आपण स्वीकारले तरच पुढे काही सकारात्मक होऊ शकेल.

आजही इंग्रजीमधे विपुल बालसाहित्य ऊपलब्ध आहे आणि नवे तयार होतेय.

मुलांवर लहानपणीच वाचनाचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे, आपल्याकडे मोबाईल,
टिव्ही कार्टून्स, टॅब, सिनेमा, राजकारणचर्चा आणि जन्मापासूनच फक्त स्पर्धा मग पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर अनेक पुस्तकांपासून लहान मुलं वंचितच राहतात.

जगात भारत महासत्ता तेंव्हाच बनेल जेंव्हा आपली लहान पिढी सकस वाचन करेल, ज्ञानी बनेल.

बालसाहित्यावर चर्चा मुक्तपणे चर्चा व्हावी
त्यात भर पडावी आणि आपल्या मुलाबाळांना त्यामुळे वाचनाची गोडी लागावी.

आता ऊपलब्ध असणाऱ्या मराठी बालसाहित्याच्या पुस्तकांची खरचं वानवा जाणवतेय हे मात्र नक्की !

@LetsReadIndia #LetsReadFoundation #LetsRead #वाचन #मराठी #बालसाहित्य
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!