Discover and read the best of Twitter Threads about #वाचलेलं

Most recents (17)

न्यूटनची जयंती किती धूमधडाक्यात साजरी होते माहित नाही..

न्यूटनचं नाव एखाद्या विद्यापीठालाही दिलेलं नसावं, न्यूटनच्या नावाचं विमानतळही युरोपात कुठं दिसत नाही..

पण पुढच्या पिढ्यांसाठी न्यूटनचा वारसा रहावा यासाठी ते धडपड करतात. 🎯🎯
राजकीय आणि सामाजिक नेतेच सर्वकाही असण्याचा एक काळ असतो. एका मर्यादेनंतर मात्र वैज्ञानिक हेही तुमचे हिरो असावे वागतात, युरोपात ते खूप पूर्वी घडलं.

जर्मनी, फ्रान्स सारखे भारताच्या मोठ्या राज्यांपेक्षाही छोटे असलेले देश डझनावारी नोबेल पुरस्कार मिळवतात..
..आम्ही इतके अल्पसंतुष्ट की दुरून दुरून भारतीय वंशाच्या असलेल्या कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला तरी फुकाच्या अस्मितेचा डीजे लावून बेधुंद नाचत राहतो..
Read 4 tweets
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच राजकिय गोष्टी सांगितल्या जातात....!
1.अफजलखानाचा कोथळा
2.शाईस्तेखानाची बोटे
3.आग्राहून सुटका
पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे कार्य पण समजून घ्यायला हवे .👇👇
1.आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती" करणारे होते...!

2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे "लोकपालक" राजे होते...!
3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक" होते...!

4.विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक" होते...!
Read 7 tweets
रात्रीच पारिजात का फुलते, बहरते, त्यामागे एक अतिशय गोड प्रेमकथा आहे.
या कथेनुसार, राजकुमारी पारिजातक सूर्याच्या... होय भगवान सुर्य देवाच्या प्रेमात पडली. सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पुर्णपणे जाणीव होती. तरीही एका अटीवर तिच्याशी त्याने लग्न करण्याचे वचन दिले.
अट अशी होती की, काहीही झाले तरी तिने त्याच्याकडे कधीही पहायचे नाही. अट विचित्रच होती खरी...पण प्रेमात रममाण झालेल्या परीजातने याचा कधी विचारच केला नाही.
त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केले आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भरकन निघून गेला.
उन्हाळा येताच सुर्यदेवाची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली.... इतकी, की पारिजात त्याच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल. अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य पारिजातच्या दारात खाली उतरला आणि पारिजात भान हरपून त्याच्याकडे पाहातच राहिली. वचनभंगामुळे तो प्रचंड क्रोधीत झाला
Read 10 tweets
तुमच्या अंत्यसंस्कारानंतर सहसा काय होते हे तुम्हाला माहीत आहे का?

काही तासांत रडण्याचा आवाज पूर्णपणे बंद होईल.

नातेवाईकांसाठी हॉटेलमधून जेवण मागवण्यात कुटुंब गुंतून जाईल.

नातवंडे धावत-खेळत राहतील.

झोपायला जाण्यापूर्वी काही पुरुष तुमच्याबद्दल काही अपमानजनक टिप्पणी करतील!
एक नातेवाईक तुमच्या मुलीशी फोनवर बोलेल की तो आणीबाणीच्या कारणास्तव वैयक्तिकरित्या येऊ शकत नाही.

दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणात काही नातेवाईक कमी होतील, तर काहीजण भाजीत पुरेसे मीठ नसल्याची तक्रार करतील.

जमाव हळूहळू पांगू लागेल..

येत्या काही दिवसात
तुम्ही मेला आहात हे माहीत
नसताना काही कॉल तुमच्या फोनवर येऊ शकतात.

तुमची जागा घेण्यासाठी तुमचे कार्यालय किंवा दुकान त्वरीत कोणीतरी शोधून काढेल.

दोन आठवड्यांत तुमचा मुलगा आणि मुलगी त्यांची आणीबाणीची रजा संपल्यानंतर कामावर परत जातील.

महिनाअखेरीस तुमचा जोडीदारही कॉमेडी शो पाहून हसायला लागेल.
Read 8 tweets
तो सध्या काय करतो ?
हे काय विचारणं झालं, तो फुल्ल बिझी असतो .
सकाळी नऊला उठतो, कडक पाण्यानी आंघोळ करतो देव्हार्यातल्या देवांच्या पाया पडतो, हातात तांब्याचं कडं घालतो , कडक ओपन शर्ट आणी मळकी जीन घालतो घरातला नाष्टा त्याला चालत नाय. त्याला चौकातल्या अन्नाची मिसळ लागती .
ईकडुन १०० ची नोट घेतो, येवढ्यात काय होनार? आजुन एका नोटेसाठी हुज्जत घालतो , गाडीत ५० च पॕट्रोल टाकतो
मग थाटात एक पौष्टिक तर्रीवाली मिसळ चार पाव खातो. मग चौकात येऊन गन्या, आंड्या, र्हावल्याला फोन लावतो .ते आल्यावर भाऊंच्या आॕफीसमधे जाऊन पेपर मधल्या कालच्या टोळी राड्याच्या,
राॕबरीच्या , देशातल्या कुठल्याशा भागातल्या हिंदू मुस्लीम दंग्याच्या, बलात्काराच्या बातम्या वाचतो. भाऊच्या भागातल्या लोकांची आधारकार्ड,दवाखाना चिठ्ठीची कामं करतो, इकडं तिकडं टाइमपास करुन दुपारी जेवायला घरी येतो. त्या घरच्या भाज्या आवडत नाय. मग चिडचीड करतो.पंखा लाऊन छान ताणुन देतो.
Read 9 tweets
भाजप नेत्यांच्या, कार्यकर्त्याच्या मनात, छत्रपती शिवाजी महाराजांचा काय स्थान आहे, हे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित भाई शहा यांच भाषण ऐका!

कर्नाटक मध्ये महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. पण, त्याचे सूत्रधार महाराष्ट्रात सत्तेची चव चाखत आहेत.

कारण;
★ कर्नाटक मध्ये झालेल्या पुतळ्याची विटंबना काँग्रेस कार्यकर्त्याने केली.

★ तो कार्यकर्ता, काँग्रेसचा जिहादी आमदार जमीर अहमद याचा कट्टर समर्थक.

★ काळ फासण्याचं टायमिंग देखील अचूक निवडलं आहे. कारण, कर्नाटक सरकारने धर्मांतर विरोधी कायद्याचा ड्राफ्ट तयार केला.
★ महत्वाचा मुद्दा असा की, बेळगाव मध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन भरते.

★ याच हिवाळी अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा कर्नाटक सरकार मांडणार आहे.

★ या कायद्याला विरोध तेथील काँग्रेस व स्थानिक कन्नड संघटना, व मिशनरी करत आहेत.

★ तो कायदा विधिमंडळ मध्ये आणू नये, यासाठी
Read 8 tweets
नम्रता

क्रिकेटपटू राहुल द्रविडला बंगळुरू विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले, जे राहुल द्रविडने कृपापूर्वक परत केले. पदवी तर परत दिलीच, पण अप्रतिम भाषणही केले; तो म्हणाला, "माझी पत्नी डॉक्टर आहे, तिने ही पदवी मिळवण्यासाठी अगणित, निद्रानाश रात्र आणि दिवस घालवले आहेत."
"माझी आई कला शाखेची प्राध्यापिका आहे, तिने पदवीसाठी चिकाटीने पन्नास वर्षे वाट पाहिली. मी क्रिकेट खेळण्यासाठी खूप मेहनत केली, पण माझा इतका अभ्यास झाला नाही, मग मी ही पदवी कशी स्वीकारू?"
1952 मध्ये इस्रायली सरकारने आईन्स्टाईन यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. आईनस्टाईन नम्रपणे
म्हणाले, “मी भौतिकशास्त्राचा अननुभवी विद्यार्थी आहे. मला राज्याचा कारभार आणि प्रशासन काय समजते !!!”
ग्रिगोरी पेरेलमन, रशियन जगप्रसिद्ध गणितज्ञ यांनी 2006 मध्ये फील्ड पदके आणि गणिताच्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाच्या समतुल्य मानली जाणारी मोठी रक्कम परत केली. ते म्हणाले,
Read 6 tweets
डॉ. अब्दुल कलाम यांना पायलट बनायचे होते..

त्यासाठी कुणीही मार्गदर्शक नसल्यामुळे त्यांनी बी.एस्.सी. ला एडमीशन घेतली.

नंतर फायनल ईयरला त्यांना कळले की, पायलट बनायचे असेल तर ईंजीनीयरींग मधील 'एयरोनॉटीकल ईंजीनीयरींग' ला प्रवेश घ्यावा लागतो!

1/7 #म #रिम
मार्गदर्शक नसल्यामुळे आयुष्यातील तीन वर्ष वाया घालवीले असे त्यांना वाटले.. खुप रडले..

परंतु याच बीएससी फीजीक्सने त्यांचे जीवन घडविले!

नंतर एयरोनाॅटीकल ईंजीनीयर ची पदवी घेतली, त्यावर्षी संपुर्ण भारतातुन केवळ आठ मुलं ही पदवी घेऊ शकले !.. त्यात डॉ कलाम टॉपर होते!
2/7
त्याकाळी फक्त 'एअर ईंडीया' हीच पायलटच्या जागा भरायची.
त्यावर्षी त्यांना सात जागा भरायच्या होत्या.. अर्ज आठ! डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम टॉपर..ईंटरव्यु होऊन सीलेक्शन झाले!

डॉ. कलाम सोडुन सर्व उमेदवारांना नौकरी मिळाली..

डॉ. कलाम यांची "ऊंची" कमी आहे, या कारणामुळे त्यांना नाकारले.
3/7
Read 7 tweets
कृष्ण उठत, कृष्ण चलत, कृष्ण शाम-भोर है।
कृष्ण बुद्धि,कृष्ण चित्त,कृष्ण मन विभोर है॥

कृष्ण रात्रि,कृष्ण दिवस,कृष्ण स्वप्न-शयन है।
कृष्ण काल,कृष्ण कला,कृष्ण मास-अयन है॥

कृष्ण शब्द, कृष्ण अर्थ, कृष्ण ही परमार्थ है।
कृष्ण कर्म, कृष्ण भाग्य, कृष्ण ही पुरुषार्थ है॥
+
कृष्ण स्नेह, कृष्ण राग, कृष्ण ही अनुराग है।
कृष्ण कली, कृष्ण कुसुम, कृष्ण ही पराग है॥

कृष्ण भोग, कृष्ण त्याग, कृष्ण तत्व-ज्ञान है।
कृष्ण भक्ति, कृष्ण प्रेम, कृष्ण ही विज्ञान है॥

कृष्ण स्वर्ग, कृष्ण मोक्ष, कृष्ण परम साध्य है।
कृष्ण जीव,कृष्ण ब्रह्म, कृष्ण ही आराध्य है !!
+
*॥ ॐनमो भगवते वासुदेवाय॥*

#आष्टमी #जन्माष्टमी #कृष्ण_जन्माष्टमी
#Janmashtami जय श्रीकृष्ण!
Read 4 tweets
वडिलांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे आणि ज्ञानाप्रमाणे आपल्याला वाढवले. दुसऱ्याना दोष देताना आपण आपली जबाबदारी टाळत असतो. लहानपणी आपल्याला जशी वाईट वागणूक त्यांनी दिली, तशीच त्यानासुद्धा त्यांच्या लहानपणी मिळाली होती. ते आपल्यासारखेच सतत घाबरलेले आणि दडपणाखाली असायचे, ते सुद्धा असेच
तुमच्यासारखे असहाय्य असायचे, ते जे शिकले तेच त्यांनी तुम्हाला शिकवलं. तुमच्या आई - वडिलांच्या लहानपणीची तुम्हाला कितपत माहिती आहे विशेषतः वयाच्या दहाव्या वर्षाच्या आधीची ? शक्य असेल, तर अजूनही विचार किंवा शोधून काढा. ते जर शोधून काढलं, तर ते तुमच्याशी असं का वागले तुम्हाला
समजेल आणि तुम्हाला त्यांची दया येईल. तुम्हाला नाही शोधून काढता आलं, नाही विचारता आलं, तर त्यांचं बालपण कसं गेलं असेल, ते कोणत्या वातावरणात मोठे झाले असतील, याची कल्पना करा. हे तुम्हाला तुमच्या मुक्ततेसाठी आवश्यक आहे. त्यांना मुक्त केल्याशिवाय तुम्ही मुक्त होऊ शकत नाही.
Read 4 tweets
राज्य सरकारांना मांडीवर घेतलं का?

एखादा दुसरा अपवाद वगळता जिथे जिथे भाजपेतर सरकार आहे त्या सर्व राज्यांनी राजकारण करून विट आणला आहे. आठ दिवसापूर्वी, "केंद्र राज्याला ऑक्सिजन पुरवते म्हणजे मेहरबानी नाही करत. महाराष्ट्र सरकार केंद्राच्या तिजोरीत खणाणा महसूल जमा करते आहे." असं
संजय राऊत म्हणाले तर ४ दिवसापूर्वी आम्ही केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहोत असे टोपेंनी म्हणायचे आणि बघा आमची भूमिका किती असे जनतेला दाखवून जनतेला टोपी घालण्याचा प्रयत्न करायचा.

अनिल देशमुखांच्या घरी छापे पडले तर तो राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा डाव असतो.आणि तुम्ही कंगनाच्या
ऑफिसची केलेली तोडफोड कायदेशीर असते. सीबीआय सकाळी सातला देशमुखांच्या घरी जाते ते चुकीचे आणि तुम्ही अर्णब रात्री अकरा वाजता अटक करायला जाता हे बरोबर. बडवे सुप्रीम कोर्टाने केंद्राची लाज काढली असे सांगत आहेत. मग राज्यांना काय मांडीवर घेतले काय? कि राज्य सरकारांवर फुले उधळली?
Read 8 tweets
#थ्रेड
#ग्रामपंचायत_निवडणूक

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था सांभाळते.
#सरपंच, #उपसरपंच, #ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला #ग्रामपंचायत म्हणतात.

👇
#ग्रामपंचायत बद्दल थोडक्यात माहिती 👇

कायदा - १९५८ (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम) कलम ५ मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये ६०० लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या ठरते :
६०० ते १५०० - ७ सभासद
१५०१ ते ३००० - ९ सभासद
३००१ ते ४५०० - ११ सभासद
४५०१ ते ६००० - १३ सभासद
६००१ ते ७५०० - १५ सभासद
७५०१ त्यापेक्षा जास्त - १७ सभासद असता
निवडणूक - राज्य निवडणूक आयोग ही निवडणुक पार पाडते 👇
Read 11 tweets
जीडीपी : जीडीपी (Gross Domestic Product)
म्हणजे एका विशिष्ट कालावधीत देशांतर्गत उत्पादन झालेल्या सर्व तयार वस्तू आणि सेवांचे आर्थिक मूल्य असते. देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोजमाप जीडीपीद्वारे केले जाते. कृषि, उद्योग आणि सेवा हे जीडीपीचे तीन प्रमुख घटक आहेत.(1/n)
जीडीपी दर हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे संकेत असते. जीडीपी उंचावला तर देशाच्या आर्थिक विकासाचा दर उंचावतो आणि तो घटला तर देशाची आर्थिक स्थिती खालावते. दर तिमाहीला जीडीपी आकडेवारी प्रसिध्द केली जाते. (2/n)
निगेटिव्ह जीडीपी : सध्या आपण ‘निगेटिव्ह जीडीपी’ हा शब्द वारंवार ऐकत आहोत. कोरोना संकटात देशावर ‘निगेटिव्ह जीडीपी’चं सावट आहे असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. कोरोना उद्रेकामुळे बाजारपेठांमधील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. (3/n)
Read 16 tweets
आज भारताच्या इतिहासातील Milestone ठरलेल्या,ज्या खटल्याने सगळ्या देशाला अप्रत्यक्षपणे दाखवुन दिले की'संविधानाच्या वर कोणतच सरकार नाही'त्या खटल्याचे जनक 'केशवानंद भारती' यांचे निधन झाले.भारतीच्या मनीध्यानी नसताना एका देवदुतामुळे ते रात्रीत(६८ दिवसात🙏) स्टार झाले #म #मराठी #धागा
सुरूवातीपासून सांगायचे म्हणले तर धागा खुप मोठा होईल परंतु थोडस introduce करावच लागेल.'केशवानंद भारती विरूद्ध केरळ राज्य'(१९७३) ह्या केसचा अप्रत्यक्ष पाया त्याच्या अगोदर होऊन गेलेल्या गोलकनाथ खटल्यामध्ये बांधला गेला होता(१९६७).गोलकनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की
सरकार मुलभूत हक्कांमध्ये घटनादुरुस्ती करू शकत नाही.ज्यामुळे कलम १३ आणि कलम ३६८च्या वापरावर निर्बंध आले.
*माहितीसाठी सांगतो की घटनेच्या भाग ३ मध्ये कलम १४ ते ३२ हे मुलभूत हक्क आहेत.
*कलम १३:- मुलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे
*कलम ३६८:- संसदेचा
Read 17 tweets
माणसं कमावण्याची जबरदस्त नशा असते वयाच्या एका टप्प्यापर्यंत. आपल्यापैकी अनेकांना ती असते. माणसं जोडणं ही छानच गोष्ट, अनेकांसाठी ती एक अभिमानाची बाब असते. जरूर असावी. चांगला स्वभाव आणि उत्तम चारित्र्य याच्या जोरावर अनेक माणसं जोडावीत, जपावीत.
पण हे करताना ही जपलेली माणसं आपल्यालाही 'जपत' आहेत ना हे बघणं फार महत्त्वाचं असतं. अनेकदा आपल्याला वाटून जातं, अरे बापरे...! ही अमुक इतकी 'भारी' व्यक्ती आपल्यासोबत संपर्क ठेवून आहे. म्हणजे किती छान!
त्या संपर्कामागे विशुद्ध भाव आहे ना, की पुढे जाऊन आपला 'स्टेपणी' म्हणून उपयोग केला जाणार आहे हे बघायला हवं. अशा अनेक अनुभवांतून आपण जात असतो, त्यामुळे 'हुरळून' जाणं टाळायला हवं.
Read 15 tweets
देव माना किंवा मानू नका, त्याने फारसा फरक पडत नाही, पण...

१. आपल्यासारखाच इतरांनाही आपले स्वतंत्र मत असण्याचा हक्क आहे, हे ध्यानात ठेवा... याला समता (equality) म्हणतात.

२. आपल्या मताचा इतरांना उपद्रव होणार नाही याची काळजी घ्या... याला सभ्यता (civility) म्हणतात.@Rutuja0304
३. दुसर्‍याचा मताचा आदर करा आणि आपले मत दुसर्‍याला पटवून देताना ते त्याच्यावर जबरदस्तीने लादले जाणार नाही याची काळजी घ्या... याला सहिष्णुता (tolerance) म्हणतात.
४. अनेक मतमतांतरे असली तरीही किमान मानवी मुल्यांच्या पायावर समाज सामंजस्याने राहू शकतो व विकास साधू शकतो, यावर विश्वास ठेवा... याला बंधुभाव (brotherhood) म्हणतात.

वरचे सर्व मुद्दे समजून उमजून वर्तन केले तरच मानवी समाज स्वातंत्र्यात व सुखसमाधानात राहू शकेल.
Read 5 tweets
#खेळाडूपणा
#थ्रेड
एका शर्यतीत, केनियाचे प्रतिनिधित्व करणारा #धावपटू हाबेल मुताई शर्यतीच्या अंतिम रेषेपासून काही फूट अंतरावर होता, परंतु तो गोंधळून गेला आणि त्याने शर्यत पूर्ण केली असा वाटून धावणे सोडून दिले. स्पॅनिश धावपटू इव्हान फर्नांडिज त्याच्या पाठीमागे होता आणि काय घडत आहे Image
हे लक्षात येताच त्याने हाबेलकडे #धावणे चालू ठेवण्यासाठी ओरडण्यास सुरवात केली, परंतु हाबेलला #स्पॅनिश येत नाही आणि त्याला समजले नाही. म्हणून इव्हान ने अंतिम रेषेजवळ येताच त्याला पुढे ढकलले आणि त्याला #जिंकू दिले.
नंतर एका पत्रकाराने इव्हानला विचारले, "की तू असे का केले?" इव्हानने उत्तर दिले "माझे #स्वप्न आहे की एखाद्या दिवशी आपण अश्या जगात राहू जिकडे लोक आपल्या फायद्यापेक्षा जे बरोबर असेल ते करतील. मी त्याला जिंकू दिले नाही, तो #जिंकणार होता.
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!