Discover and read the best of Twitter Threads about #वारी

Most recents (2)

देवळात गेलो होतो मधे
तिथं विठ्ठल काही दिसेना
रखमाय शेजारी
नुसती वीट

मी म्हणालो ऱ्हायलं
रखमाय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायच

पायावर ठेवलेलं डोकं
काढून घेतलं
आपल्यालाच पुढं मागं
लागेल म्हणून

आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठं गेला
दिसत नाही
#पुस्तकवारी 1/1 Image
रख्माय म्हणाली
कुठं गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला

मी परत पाह्यलं
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथं
कोणीही नाही

म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूच मला जरा
कमीच दिसत

दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडं जरा
होत नाही

#पुस्तकवारी #वारी #तुकाराम 2/2
कधी येतो कधी जातो
कुठं जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले

आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधी कसं कुणी
सांगितलं नाही

आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
अठ्ठावीस युगाचं
एकटेपण
#पुस्तकवारी 3/3
Read 4 tweets
आषाढी एकादशी निमित्ताने मागील वर्षाचा(2019) अनुभव येते मांडत आहे. सोसायटीत वारकरी यावे सगळ्या सभासदांना त्यांची सेवा करण्याचा आनंद मिळावा यासाठी मी व माझा मित्र प्रयत्न करत होतो.
#वारी_पंढरीची #वारी
आधी सोसायटी ग्रुप मध्ये विचारले कि कुणाच्या गावातील वारकरी दिंडी घेऊन आले आहेत काय, तर फक्त दोन सभासदांचे प्रतिसाद आले. त्यातले कोल्हापूर भागातील सभासदाला आम्ही संपर्क करून त्या भागातील दिंडीला आणायचे ठरवले.
. प्राथमिक माहिती वरून ५० ते ६० वारकरी असतील असे कळले. मग आम्ही फक्त ५० तो ६० वारकरी येतील याची योजना केली गेली. सिक्युरिटी कडे एक बॉक्स(दान पेटी म्हणून) दिला सभासदांना कळवले कि इच्छुक लोकांनी त्या बॉक्स मध्ये स्वइच्छेने देणगी टाकावी.
Read 16 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!