Discover and read the best of Twitter Threads about #शिक्षण

Most recents (6)

माझ्या वडिलांना वाचवा. मुलीचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

समाजमाध्यमांवर असंख्य व्हिडीओ बघायला मिळतात. मी फार बघत नाही पण हा व्हिडीओ नजरेस पडला आणि शीर्षक वाचून प्ले केला. एक मुलगी रडत रडत मुख्यमंत्र्यांशी फोनवरून बोलतेय. (१/६)
#म #रीम #समाजमाध्यम #लग्नव्यवथा #समाजभान #आत्मभान
विषय काय तर तिच्या लग्नासाठी वडिलांनी एका सावकाराकडून १०लाख रुपये घेतले होते.
साहजिकच सावकाराने या मुलीच्या वडिलांकडून २एकर शेत लिहून घेतलं. आता ती मुलगी म्हणतेय की माझ्या वडिलांनी दहा लाख परत दिलेत पण तो सावकार शेत परत वडिलांच्या नावावर करायला तयार नाही. आता पुढे वाचा. (२/६)
तिचं लग्न झालं १०लाख रुपये खर्चून आणि तिच्या नवऱ्याने तिला परत माहेरी आणून सोडलंय.आता ती मुलगी म्हणतेय की मी शिकलेली आहे.मी काय करू? माझे वडील आत्महत्या करतील वगैरे वगैरे.ओके.

तर बाई तुझे वडील थोडी थोडकी नाही तर १०लाखाची रक्कम कर्जाऊ घेत होते तेही आपलं शेत त्या सावकाराच्या (३/६)
Read 6 tweets
सावित्रीबाई आणि सरस्वती.

गेल्या काही वर्षात देवांना देव्हारयातून थेट व्यवहारात म्हणजे मोकळच बोलायचं झाल तर थेट राजकारणातच आणले. रामाला तर स्टार प्रचारक केले आहे, हमुमानाची चालीसा आता एका पक्षाच्या अजेंड्यात असतो, म्हणजे देवाला स्वतःचे मंदिर बांधता येत नसल्याने रामाने एका
पक्षासोबत युती केली, तुम्ही माझ मंदिर बांधा आणि माझा खुशाल वापर करा, मुळात भिल्लीनीचे बोर खाणारा राम दलितांना अंतर देणाऱ्या मानसिकतेचा प्रचारक कसा, स्वतः वानर असलेला हनुमंत हिंदुत्ववादी व्हावा, जिवंतपणी योगीचे मंदिर व्हावे मोदींना अवतारी मानावे, यावर कुणाला आक्षेप नसतो
मात्र काल परवा भुजबळ म्हटले कि सावित्रीबाई, महात्मा फुले, आंबेडकर शाहू कर्मवीरांचे फोटो लावा आणि नंतर सरस्वतीचे पहा, मुळात देव सर्वांचा असतो हे मान्य झाले तर सावित्री सरस्वतीची वारस ठरते कारण लेकींना तिने शिकवले. मग आता आपल्या लेकीचा शाळेत फोटो लावला म्हणून कुठल्या आईला दुख होईल
Read 10 tweets
#फर्स्ट_क्लास मिळवूनही
ज्याला #सातबारा आणि #8अ मधला फरक कळत नाही,
ज्याला बँकेच्या डिपोझिट आणि विड्रॉल स्लीपमधला फरक कळत नाही,
ज्याला लाईट बिलातील देयक रक्कम शोधताना प्रचंड गडबडायला होतं,
ज्याला लिफाफ्यावर टू आणि फ्रॉम खाली नक्की कुणाचं नाव टाकावं हे बिलकुल कळत नाही,
जे आजही कंम्प्युटर बंद करताना खाली वर दाबायचे बटनच वापरतात,
जे आजही रिचार्ज मारणे याला ब्यालन्स टाकणे म्हणतात,
ज्यांना बँक पासबुकावर #व्याजाचा आकडाच सापडत नाही,
ज्यांना टू व्हिलरच्या पेट्रोल टाकीच्या ऑन ऑफ आणि #रिजर्व्हची भानगड कळत नाही,
असे उच्चशिक्षित एकीकडे-

आणि त्या तुलनेत-
#तलाठयाला त्याच्या घरी गाठून सातबारा घेणारे,
घरातला फ्यूज उडताच #वायरमनची वाट न बघणारे,
बंद पडलेल्या गाडीला फार किका न मारता टाकी फुंकायला घेणारे,
मापातले #लाईटबीलही तालुक्याला जावून कमी करुन घेणारे,
बँकेतल्या शिपायाला नमस्कार करुन कर्ज मंजूर करुन घेणारे,
Read 5 tweets
आपल्याकडे शिक्षण ही एक लक्झरी होती. त्याची लक्षणं आपल्याला मिथके, पुराणे इत्यादिमधून दिसत राहतात. म्हणजे कर्णाला जातीमुळे नाकारणारे परशुराम असोत किंवा एकलव्याला न लाभलेले द्रोणाचार्य असोत... आपल्याकडची अमुक गोष्ट दुसऱ्याने शिकू नये याची इतकी काळजी लागलेली असे की देवाची स्तोत्रे
लिहिताना देखील "हे अपात्राला शिकवेल तो नरकात सडेल" वगैरे त्यात सांगून ठेवलेलं असे !! त्यात मग गुरूने शाप दिला तर शिकलेलं डोज्यातून नाहीसं होतं वगैरे कथा आल्या... मग त्यात पुढे आम्ही कसे गुरूच्या घरी पाणी भरू, पाय चेपू म्हणणारे कलाकारही आले.
खरंतर खरं शिक्षण ते असतं जे शिकवणाऱ्याला शिव्या दिल्या तरी तुमच्याजवळ कायम राहतं! कृतज्ञ असणे हा शिकलेलं लक्षात राहण्याशी असंबंधित विषय आहे. गुरू गुरू करून आपल्याकडे शिक्षणाचे पुरोहित डोक्यावर घेतले गेले. याच कारणासाठी गुरुचे नांव घेताना कानाला हात वगैरे लावणाऱ्या लोकांबद्दल मला
Read 6 tweets
शाळा बंद पण शिक्षण आहे !!!!

आताच्या #कोविड 19 संक्रमण कालावधीत आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासमाला उपक्रम तसेच दिक्षा ऍपच्या साह्याने राज्यात विध्यार्थ्यांसाठी 'शाळा बंद.. पण शिक्षण आहे' ही शैक्षणिक चळवळ उभी केली आहे.
1/6
हा #शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम असला तरी यातून सर्व साध्य होईल का ? हा प्रश्न निर्माण होतो.ज्याप्रकारे लॉकडाउन करण्यापूर्वी ऊसतोड मजूर, गरीब असंघटित कामगार आणि शेतकऱ्यांचा विचार केला नाही तसेच ही शैक्षणिक चळवळ उभी करतांना या गरिबांच्या पाल्यांचा विचार
2/6
न करताच ही चळवळ उभी केली गेली ही निंदनीय बाब.. या उपक्रमातून बोटावर मोजण्याइतक्याच विद्यार्थ्यांना फायदा होणार बाकीच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी ह्या चळवळीचा फायदा होणारच नाही.
आज त्या गरिबांना एकवेळ जेवायला कसे मिळेल हा महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला
3/6
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!