Discover and read the best of Twitter Threads about #स्वातंत्र्यवीरसावरकर

Most recents (17)

#सावरकरांचे_विचार
भाग २२
श्री पु गोखलेंनी तात्यारावांना एकदा प्रश्न केला की, "तात्या तुमचे वय आणि ही क्षीण प्रकृती पाहता जो जंबिया जवळ ठेवता त्याचा कितपत उपयोग करू शकाल - प्रसंग पडलाच तर?"

ते नजर रोखून श्रीपुंकडे पाहात क्षणभर रस्त्यातच थांबले, आणि चटकन उसळून म्हणाले -

१/८
"मी क्षीण झालो आहे, थकलो आहे, माझे वयही होत आलेले आहे, हे तुला वाटते ते अगदी खरे आहे. इथे कोणी माझ्यावर हल्ला करील असाही संभव जवळजवळ नाहीच. पण हा सर्व आपण काही गृहीत कृत्ये धरून काढलेला निष्कर्ष आहे.

२/८
आपला निष्कर्ष बरोबर येत राहिला आणि आपण शस्त्रधारी राहिलो तरी नुकसान काही होणार नाही.
पण आपला तर्क चुकला तर?
स्वामी श्रद्धानंदांचा तर्क असाच चुकला होता. अब्दुल रशीदने या हिंदूचा अंदाज चुकणार हा अंदाज बरोबर केला होता.

३/८
Read 8 tweets
#आत्मार्पण
तात्या दररोज रात्री निजताना योगविषयक श्लोक म्हणत. त्या वेळी ते आपले दोन्ही हात प्रथम टाळूवर ठेवून मग कपाळ, छाती, पोट यांवर ठेवीत ठेवीत पायांवरून पावलांकडे सावकाश नेत असत.

ते श्लोक पुटपुटत असल्याने ते श्लोक कोणते हे सांगणे कठीण होते; पण ते सदर कृती ३ वेळा करीत.

१/११ Image
हा प्रकार मी लागोपाठ ३-४ दिवस पाहिला. कुतूहल तर निर्माण झाले होते, पण तात्यांना मी हेतुतःच काही विचारले नाही. कदाचित त्यांनी हा परिपाठ बंद केला असता, अशी मला भीती वाटली.

मात्र कुतुहलाने त्या वेळी कामावर असलेल्या शुश्रूषांकडे मी चौकशी केली होती. त्यांनीही तेच सांगितले.

२/११ Image
तेव्हा माझी निश्चिती झाली की, योगविषयक श्लोक ते म्हणत असावेत व त्यातील अर्थाप्रमाणे ते डोक्यापासून हात ठेवत ठेवत पावलांपर्यंत नेत असावेत.

१९ फेब्रुवारी १९६६ ला अमावास्या होती. त्या संध्याकाळपासून त्यांची तगमग होत होती. जीव आत ओढला जात होता.

३/११ Image
Read 11 tweets
#सावरकरांच्या_आठवणी
भाग ३०

लोकमान्य टिळकांचे देहावसान झाल्याची दुःखद बातमी अंदमानात येऊन पोहोचली.

सावरकरांनी "हा राष्ट्रीय शोकदिन आहे. म्हणून आपणा सर्वांनी आज उपवास पाळावा" अशी सूचना करताच केवळ राजबंद्यांनीच नव्हे, तर इतर कैद्यांनीही सावरकरांच्या या सूचनेला दुजोरा दिला.

१/६
त्या दिवशी सेल्युलर जेल मध्ये कुणीच जेवलं नाही.

दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांच्या दृष्टीस पडणार नाही अशी काळजी घेऊन शोकसभा घेण्यात आली. सावरकरांनी कैद्यांना टिळकांचे मोठेपण स्पष्ट करून सांगितले.

अधिकाऱ्यांना मागाहून हे सारे कळले. त्यांना आश्चर्य वाटले.

२/६
९ वर्षांपूर्वी या कारागृहात कुणालाही टिळकांचे नावदेखील माहीत नव्हते. आणि आज सामान्यातला सामान्य कैदीही 'टिळक महाराज अमर रहे' चा घोष करत होता.

राजबंद्यांनी सावरकरांना विचारले, "तुमचा आणि लोकमान्यांचा परिचय होता?"

३/६
Read 7 tweets
#स्वातंत्र्यवीरसावरकर

इथे पुण्यात येरवडा तुरुंगात रँड आणि आयर्स्ट यांचा 'कट करून हत्या' प्रकरणी दामोदर हरी चाफेकर यांना फाशीची शिक्षा झाली आणि तिथे भगूरला अवघ्या साडे चौदा वर्षाचा विनायक त्या बातमीने मात्र प्रचंड अस्वस्थ झाला.
काय करावं, काही सुचेना त्याला !
(१/५)
रात्र उलटून चालली होती.
'काय करावं ?' या विचाराने विनायक नुसता तळमळत होता.

लहानपणापासूनच 'मातृभूमीसाठी कोणताही त्याग करण्याचा' विचार जोपासणाऱ्या विनायकाला चाफेकरांच्या हौतात्म्यातून आपलं जगण्याचं उद्दिष्ट गवसलं.
(२/५)
आणि त्या रात्री आपल्या देवघरातल्या #अष्टभुजा देवीच्या मूर्ती समोर उभा राहून बाल विनायकाने जी शपथ घेतली ती शेवटच्या श्वासापर्यंत पाळली.

"माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीन, चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवरायांसारखा विजयी होऊन -

(३/५)
Read 5 tweets
#सावरकरांच्या_आठवणी
भाग २२ : #मास्टरतारासिंग_आणि_स्वातंत्र्यवीरसावरकर

अकाली दलाचे माजी अध्यक्ष, तसेच गुरुव्दाराप्रबंधक समितीचे माजी अध्यक्ष आणि शिखांचे पुढारी मास्टर तारासिंग हे काँग्रेसचे कट्टर विरोधक होते. काँग्रेसचे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे धोरण त्यांना पटत नव्हते.

(१/८) ImageImage
त्यांचा नि अकाली दलाचा काँग्रेसला ठाम विरोध होता.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आणि त्यांच्या पंजाबच्या दौऱ्यात आणि दिल्लीत त्यांच्या तेथील मुक्कामात भेटी होत, चर्चा होत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेली #हिंदू या शब्दाची व्याख्या मास्टर तारासिंगांना पटत असे.

(२/८)
त्या व्याख्येप्रमाणे शीख हे हिंदूच आहेत, असे ते मान्य करीत. हिंदुराष्ट्रात समाधानाने राहण्यास शिखांची सिद्धता आहे. उभयतातील या समान ध्येयांमुळे हिंदूसभेचे आणि अकाली दलाचे ध्येय व धोरण प्रामुख्याने हिंदू-मुस्लिम प्रश्नावर समान होते.

(३/८)
Read 8 tweets
#सावरकरांच्या_आठवणी
भाग २० : #आत्मर्पणाचा_विचार

"माझ्या आठवणीप्रमाणे आपल्या आत्मर्पणाची प्रकट चर्चा तात्यांनी श्री.धनंजय कीर यांच्यापाशी केली होती.

१९६३ नोव्हेंबरमध्ये केव्हातरी संध्याकाळी खाली अंगणातून फेरी मारून झाल्यावर त्यांच्यापाशी तात्यांनी ही चर्चा केली.

(१/४)
कुमारील भट्ट, जगद्गुरू आद्य शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत रामदास यांच्याप्रमाणे आपणास आत्मार्पण करावे असे का वाटते, याविषयी सांगताना तात्या म्हणाले :
'वरील संतांना आपले जीवितकार्य पूर्ण झाले, आता कर्तव्य काही उरले नाही, अशी कर्तव्यपूर्ततेची भावना प्रबळ झाली -

(२/४)
- तशीच माझीही भावना झाली असल्याने मलाही त्यांच्याप्रमाणेच आत्मर्पणाचा मार्ग अनुसरावा असे वाटत आहे. माझा हा विचार पक्का होत आहे.'

हे सांगताना तात्यांचा स्वर रुद्ध झाला, कंठ दाटून आला. तेव्हा मला आता बोलणे अशक्य झाले आहे, असे सांगून तात्यांनी श्री.धनंजय कीर यांचा निरोप घेतला."
३/४
Read 4 tweets
#सावरकरद्वेषींची_खरडपट्टी

#गुलाम मानसिकतेत जन्मलेल्या नि स्वार्थासाठी कणाहीन नेतृत्वाचा उदो उदो करणाऱ्या कर्तृत्वशून्य, निर्बुद्ध #सावरकरद्वेषी किड्यांची, सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी #भाषाप्रभू पु.भा.भावे यांनी आपल्या अग्रलेखातून केलेली खरडपट्टी आजही तेवढीच लागू पडते.

(१/८)
पु.भा.भावे लिहितात :
"भ्रष्टबुद्धी असलेल्याने सावरकरांस हिणविणे म्हणजे कर्दमांतील गांडुळाने फणीधरासमोर वळवळ करणे होय, जनान्यातील कंचुकीने अनेक समरप्रसंग गाजवणारऱ्या शुरांस युद्ध शास्त्रावर धडे देणे होय, दरिद्री खर्डेघाशाने कालिदासाच्या प्रतिभेसमोर वाकुल्या दाखवणे होय.

(२/८)
स्वतःच्या बायका परक्या घरी लोटावयास जे धैर्य लागते त्याच जातीचे धैर्य सावरकरांसारख्या नरशार्दुलावर भीरूतेचा आरोप करावयास लागते.

चोरट्या प्रणयाच्या अंधारऱ्या खोलीने अंदमानातिल तुरूंगाच्या अंधारकोठडीस खिजवावे, -
(३/८)
Read 8 tweets
#सावरकरांचे_विचार
भाग १६

" 'नाही, नाही, राष्ट्रे कधीही मरत नाहीत, परमेश्वर गांजलेल्यांचा कैवारी आहे. त्याने मनुष्याला स्वातंत्र्यात राहण्यासाठी उत्पन्न केले आहे. तुम्ही मनांत आणा की तुमचा देश स्वतंत्र झालाच!' याहून अधिक उत्साहक असा दुसरा कोणाचा #राष्ट्रमंत्र आहे ?

(१/८)
'एकदा मनुष्याने असा निश्चय केला की मी स्वातंत्र्य, स्वदेश व मानव्य यावर भक्ती करतो, की मग त्याने स्वातंत्र्यासाठी, स्वदेशासाठी व मानव्यासाठी लढलेच पाहिजे, अखंड लढले पाहिजे, सर्व आयुष्यभर लढले पाहिजे, शक्य त्या त्या शस्त्राने लढले पाहिजे, -

#स्वातंत्र्यवीरसावरकर
(२/८)
- तिरस्कारापासून तो मरणापर्यंत सर्व संकटे तुच्छ मानली पाहिजेत, द्वेषाला नि निंदेला तोंड दिले पाहिजे, दुसऱ्या कोणत्याही फलाची आकांक्षा न करता फक्त कर्तव्य म्हणून त्याने तत्पर झाले पाहिजे !' याहून अधिक दिव्य असा दुसरा कोणता #राष्ट्रमंत्र आहे ?

#स्वातंत्र्यवीरसावरकर

(३/८)
Read 8 tweets
#सावरकरांचे_विचार
भाग १५

सन १९५२ मध्ये पुण्यात #अभिनवभारत सांगता समारंभानिमित्त #स्वातंत्र्यवीरसावरकर आले असता त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याचे कसबा पेठेतील तरुण मित्रमंडळाने योजले होते.

(१/५) Image
या समारंभाला सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कै.ग.वि.केतकरही उपस्थित होते.

त्या दाटीवाटीच्या समारंभातील भाषणात संदेश देताना सावरकर म्हणाले होते :
“हिंदूच्या हितार्थ झटणारे आपण #हिंदुत्वनिष्ठ आधीच मूठभर ! -

(२/५) Image
- अशा आपणा सर्वांनी समान कार्यक्रमावर एकत्र न येता, जर पक्षभेद किंवा दुय्यम मतभेदास्तव स्वतंत्रपणे कार्य करीत राहिलो तर हिंदुहिताचे, #हिंदुत्वरक्षणाचे ध्येय कधीच साधले जाणार नाही. कारण आपल्या या विघटन वृत्तीचा लाभ राष्ट्रविघातक कारवाया करणाऱ्या अन्यधर्मीयांना होतो.

(३/५) Image
Read 5 tweets
#अखंडभारत
"भारताच्या फळणीविरोधी आंदोलनात मी आघाडीवर होतो. परंतु शेवटी १९४७ मध्ये आपल्या मातृभूमीचे दोन तुकडे झाले. अशा प्रकारे पाकिस्तान अस्तित्वात आले तरी ती हानी भरून निघावी अशी घटना घडली, ती म्हणजे परकीय दास्यातून हिंदुस्थानचा फार मोठा भाग मुक्त करण्यात आपणाला यश मिळाले.
(१/६)
भारताच्या स्वातंत्र्याचे जे युद्ध आमच्या पिढीने सतत लढविले आणि ज्यामध्ये एक सैनिक म्हणून गेली पन्नास वर्षे मी दिलेली लढत, भोगलेले कष्ट नि केलेला त्याग आमच्या पिढीतील अन्य कोणाही देशभक्तापेक्षा उणा नाही. ते युद्ध मुक्त शेवटी आम्ही जिंकले !

#AkhandBharat
(२/६)
मुक्त आणि स्वतंत्र भारतीय राज्य जन्मास आले. माझा देश मुक्त झालेला पाहण्यास मी जगलो हे मी माझे मोठे भाग्यच समजतो.यातही काही संशय नाही की माझ्या कार्यातील एक भाग अपुरा राहिला.परंतु 'सिंधू पासून सागरापर्यंत पसरलेली ही आमची मातृभूमी पुन्हा अखंड करण्याचे ध्येय आम्ही सोडले नव्हते'.
३/६
Read 6 tweets
त्या साहसी उडीला आज ११० वर्ष पूर्ण !
तो दिवस होता ७ जुलै १९१० !

फ्रान्समधल्या मार्सेलिस बंदरावर हिंदुस्थानास निघालेली 'मोरिया' बोट काही काळासाठी स्थिरावली होती.

त्या बोटीत साखळदंडात कैद होते #स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.
इंग्रजांचे अतिशय #डेंजरस् कैदी !

(१/१८)
कारण लंडनला, शत्रूच्या घरातच जाऊन सावरकरांनी तेथील भारतीय क्रांतिकारकांच्या सहाय्यानं #अभिनव_भारत या आपल्या क्रांतिकारी संघटनेचं जाळं विणलं होतं.
पिस्तुलं जमविली होती, बॉम्ब बनविण्याचं प्रशिक्षण मिळवलं होतं.
अगदी भारतात सुद्धा ते तंत्र आणि बॉम्ब पाठविले होते.

(२/१८)
भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा सावरकरांचा प्रयत्न होता कारण भारतीयांच्या इच्छेनुसारच आम्ही त्यांच्यावर राज्य करीत आहोत असा अपप्रचार ब्रिटिश करत होते.

सावरकरांच्या ब्रिटिशविरोधी कारवायांमुळे त्यांना अटक करण्याची संधीच ब्रिटिश शोधत होते.
(३/१८)
Read 19 tweets
स्वा. सावरकरांनी स्वत:च्या बायकोचा घेतलेला निरोप...

तीस वर्षांचा नवरा तुरूंगाच्या पलीकडे उभा आहे, जो पुढल्याच जन्मी बहुतेक भेटणार. आणि दाराच्या अलीकडे ही सव्वीस वर्षांची मुलगी उभी आहे, जिचा मुलगा ही आता ह्या सगळ्या गडबडीत वारला. ह्या दोघांनी एकत्र येऊन काय बोलावं..
(1/n)
आणि जगामध्ये काहीतरी पेरल्याशिवाय काही उगवत नाहीच, वर ज्वारीचं कणीसच्या कणीस उभं रहावं, असं जर वाटतं असेल तर एका कणसाच्या दाण्याला जमिनीत गाडून घ्यावं लागतं. तो शेतात, मातीत मिळतो तेव्हा पुढचं धान्य येतं; (2/n)
मग हिंदुस्थानात पुढची चांगली घर निर्माण होण्यासाठी आपलं घर पेरायला नको का! कुठल्या तरी घरानं मातीत गेल्याशिवाय पुढचं चांगलं कसं उगवणार.

माई, कल्पना करा.. की आपण आपल्या हातानं आपली चूल बोळकी फोडून टाकली. ...(3/n)
Read 8 tweets
#अकरणान्मन्दकरणंश्रेयः

"सगळी मोठी कामे 'मोठी' म्हणून हातून घडत नाहीत; लहान कामे, त्यांनी ते काय व्हावयाचे म्हणून केली जात नाहीत, अशी जी आजकाल सार्वजनिक शिथिलता आलेली आहे ती आपण सर्वांनी सोडून दिली पाहिजे.मोठी कामे झाली तर उत्तमच. एका घावासरशी दोन तुकडे होतील.

#VeerSavarkar
१/३ #स्वातंत्र्यवीरसावरकर
पण तसे जोपर्यंत अलौकिक सामर्थ्य नि शक्ति राष्ट्रात उत्पन्न होत नाही तोपर्यंत ते सामर्थ्य उत्पन्न व्हावे म्हणूनच राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परिस्थितीत जी लहान सहान कामे उरकता येतील ती तरी उरकून घेतली पाहिजेत.

#स्वातंत्र्यवीरसावरकर
#VeerSavarkar

२/३ #स्वातंत्र्यवीरसावरकर
जोवर कर्तृत्वाचे मेघ ईश्वरी दयेच्या वायूवर आरूढ होऊन नि आकाशात चढून येऊन ही सर्वतप्त पृथ्वी 'धाराधर शतांनी' भिजवून चिंब, शीतल करीत नाहीत नि वापी कप-तडाग् पाण्याने तुडुंब भरवीत नाहीत तोपर्यंत थेंब थेंब का होईना पण तळे साचविले पाहिजे !"

#स्वातंत्र्यवीरसावरकर
#VeerSavarkar

३/३ #स्वातंत्र्यवीरसावरकर
Read 3 tweets
"विनायक दामोदर सावरकर" नेमके कोण होते? ते समाजसुधारक होते का? हो होते. ते द्रष्टे होते का? हो होते. ते हिंदुत्ववादी होते का तर होते. ते विज्ञाननिष्ठ होते का? तर तेही होते. तसेच ते साहित्यिक होते का? याचेही उत्तर होच. #veersavarkarjayanti #स्वातंत्र्यवीरसावरकर #सावरकरजयंती + Image
त्यामुळे अशा अनेक गुणांनी संपन्न असलेल्या सावरकरांच्या एका अंगाबाबत आज इथे लिहिणार आहे. ते म्हणजे साहित्यिक #सावरकर
सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांनी दिली. म्हणजे ज्योतीने तेजाची आरती म्हणतो त्याप्रमाणे एका साहित्यिकाने दुस-या साहित्यिकाचा +
केलेला तो गौरव होता. आपल्या स्वातंत्र्य चळवळीसाठी सावरकरांनी आपल्या लेखणीचा वापर केला आणि साहित्यातून देशभक्तीची केलेली सेवा म्हणजेच सावरकरांचे साहित्य. सावरकरांनी १८५७चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ लिहिला . त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की,१८५७ हे बंड नसून हा एक + #वीर_सावरकर
Read 8 tweets
#समाजसुधारक_सावरकर
भाग ९: सनातनी-सुधारक रस्सीखेच !

त्या कडक स्पृश्याअस्पृश्यतेच्या काळात रत्नागिरीत सावरकरांनी जे जात्युच्छेदक कार्य केलं त्याचा परिणाम असा झाला की सावरकरांनी प्रचारिलेल्या अस्पृश्योद्धाराच्या किमान गोष्टी तरी समाजाच्या अंगवळणी पडू लागल्या होत्या.

(१/११) Image
म्हणजे परधर्मीयांना आपण आपल्या घरात जेथ वर येऊ देतो तेथवर अस्पृश्य बांधवांना सवर्ण हिंदूंनी येऊ द्यावे, सर्व सार्वजनिक ठिकाणी स्पृश्यास्पृश्य भेद पाळला जाऊ नये, मंदिराच्या पायरी पर्यंत तरी अस्पृश्य बांधवांना मज्जाव नसावा इ. सवयी सवर्ण समाज अंगीकारू लागला होता.

#सावरकर
(२/११)
पण कोणत्याही बाबतीत अल्पसंतुष्ट न राहता सतत गतिमान राहणं हेच तात्यारावांच्या कोणत्याही आंदोलनाचा मुख्य भाग असल्याने मंदिरातील पायरी नंतर आता तात्यारावांनी 'सभामंडप आंदोलन' सुरू केले.

यामध्ये स्पृश्यास्पृश्यांचे संमिश्र मेळे मंदिराच्या सभामंडपात जाण्यास काहीच हरकत नाही-

(३/११)
Read 11 tweets
सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांनी एक तर सावरकर न वाचता केवळ 'कुणाच्यातरी ओंजळीने पाणी प्यावे' तसे वरवरच्या टिकेवरून स्फूर्ती घेतली असावी अथवा आपल्या अंतस्थ हेतूस साध्य करण्याच्या प्रयत्नांतून सोयीनुसार #सावरकर वाचले असावेत.

ज्यांना 'सावरकरांनी माफीपत्रच लिहिले' असेच रेच -

(१/१३)
लागले असतील त्यांनी सप्टेंबर १९१४ साली अंदमानच्या कोठडीतून सावरकरांनी इंग्रज सरकारास लिहिलेले 'ते' पत्र डोळे आणि मेंदू उघडा ठेऊन अवश्य वाचावे.

हे संपूर्ण पत्र सावरकर वाङमयाच्या २ऱ्या खंडात पृष्ठक्रमांक १९४ ते १९६ वर आहे.

संपूर्ण पत्रातील केवळ एकाच परिच्छेदाचा दाखला देऊन -
(२/६)
आपल्यातील काही 'बुद्धिवंत' त्यास क्षमायाचना म्हणतात परंतु त्याच पत्रातील शेवटची काही वाक्ये सोयीस्कररित्या लपविली जातात कारण त्यामुळे या 'बुद्धिवंतांचे' कारस्थान उघडे पडते.

आता तर्काच्या कसोट्यांवर माफीपत्राची सत्यता पडताळायची झाल्यास या 'बुद्धिवंतांस' पहिला प्रश्न -

(३/१३)
Read 14 tweets
#समाजसुधारक_सावरकर
भाग १ : अखिल हिंदु गणेशोत्सवाची सुरुवात

श्री पतितपावन मंदिराचा कोनशिला समारंभ झाल्याने स्वा. सावरकरांना आपल्या मताप्रमाणे समाजक्रांतीचे कार्य बिनदिक्कत करण्यासाठी स्वतंत्र्य व्यासपीठच प्राप्त झाले.

दरवर्षी गावातील विठ्ठल मंदिरात सार्वजनिक गणेशोत्सव -

(१/५)
साजरा होत असे.
परंतु स्वा. सावरकरांच्या समाजक्रांतीचा धसका घेतलेल्या त्यावेळच्या गणेशोत्सव कार्यकारी मंडळातील सनातन्यांनी बहुमत करून अस्पृश्यांना सभामंडपात प्रवेश देण्यास स्पष्ट नकार दिला.

तेव्हा सावरकरांनी या सार्वजनिक गणेशोत्सवात अस्पृश्यांसह सर्व हिंदु बांधवांस सहभागी-

(२/५)
होता यावे यासाठी तो विठ्ठल मंदिराबाहेर मंडप उभारून तेथे करावा असे सुचविले व त्यासाठी स्वतः सर्व खर्च करण्याची तयारी दर्शवली.

पण त्यासाठीही सनातन्यांनी नकार दिला.

त्यावेळी निरुपाय म्हणून स्वा. सावरकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्या कार्यकारी मंडळाच्या सभासदस्यत्वाचा -

(३/५)
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!