Discover and read the best of Twitter Threads about #Doc_Talks

Most recents (3)

स्वर्गाच्या खिडकीतून तीन चेहरे,
बघत होते डोकावून...
पृथ्वीवरील संवाद ऐकत होते,
तीघे ही कान देऊन....

दरसालची चौदा-चार आज,
निराळीच भासत होती....
खालचं दृष्य बघून ही तीनही चेहरे,
समाधानाने हसत होती....
लाऊडस्पीकरवर कर्णकर्कश
आवाजात सुरू नव्हती गाणी.
की नव्हती कुठे मंडप, पताका
आणि निळ्या गुलालाची गोणी...

सुंदर सुबक मखरामध्ये
बाबासाहेबांची मुर्ती शोभिवंत
त्यावर एकच पुष्पहार ज्यात शोभे
गुलाब मोगरा आणि जास्वंद
एक बुक स्टॉल ज्यात बाबासाहेबांचे
पुस्तकं होते मांडलेले
यावेळी नव्हते दिसत कुठेच
मादक द्रव्य सांडलेले

दुजा बाजूला येऊन थांबलेली
गाडी रक्तदानाची
उस्फुर्त तरुणाईस होती
जाणीव जीवनदानाची
Read 5 tweets
त्यांच्या लेखणीने त्यांना काय नाही दिलं?
नाव,पैसा,प्रसिद्धी,इभ्रत...
पण नशिबाचे चक्र असे फिरले की ना पैसा उरला ना इभ्रत आणि महत्वाचं म्हणजे ना एकुलता एक मुलगा उरला,ना सून!
एकाकी आयुष्य आलं वाट्याला
इश्वरी कृपा म्हणून त्यांची नात तेवढी सोबत आहे!
"संतोष आनंद" हे ते दुर्दैवी कलाकार!
इक प्यार का नगमा है...
मेघा रे मेघा रे...
तेरा साथ है जो मुझे क्या कमी है...
मोहब्बत है क्या चीज...

सारखी कितीतरी अर्थपूर्ण आणि सुपरहिट गाणी लिहिणारा,त्याकाळी नावाजलेला, दोन फिल्मफेअर आणि प्रतिष्ठित यश भारती अवॉर्ड्स जिंकणारा...
एकेकाळी प्रसिद्धीच्या, आप्त मित्रांच्या वलयात रहाणारा गीतकार..! सगळं ठीक होतं.. एकुलता एक मुलगा, सून आणि एक गोड नात.. पण मुलगा कसल्याशा फ्रॉडमध्ये अडकला की अडकवला गेला आणि अडकतच गेला.
फ्रॉड वाढत वाढत २५० करोडपर्यंत गेला, खूप प्रयत्न केले वर निघायचे पण त्या दलदलीत अधिकच रुतत गेला!
Read 13 tweets
#शिवजयंती२०२१
#Threadकर✍️
#थ्रेड

"अय आम्या....आरं ते डिजेवालं ऐकंचना ना लेका.... " संत्या धावत आला अन् धापा टाकतच सांगू लागला...
काय म्हणतोय काय सुक्कळीचा..?? तोंडातील माव्याची पिंक टाकत आम्या जणू डाफरलाच....
"ते म्हणतंय, आर्डर हाय दुसरी, जमणार न्हाई म्हून" इती संत्या...
आता मात्र आम्याचा पारा जाम चढला, स्वगतच बोलत असल्यासारखा म्हणतो, "च्यायची गां... आपल्या दैवताची जयंती हाय बोल्ला न्हाईस व्हय तु तेला.?"
"बोल्लो ना दादा पण औंदा लै भाव खायलंय ते बेणं, म्हाराज म्हणून कव्हर फुकट वाजवू म्हणतंय, लोकं पैसं द्यायलेत, तुम्ही बी देवा, मंग येतू म्हणतंय."
चौकातल्या छ.शिवाजी महाराज पुतळ्यासमोर चाललेला हा संवाद तिथंच चहाच्या टपरी समोर बसलेले एक गृहस्थ कान लावून ऐकत होते.
वर पुतळ्याच्या चौथर्यावर एक पोरगं फतकल मारून बसलं होतं आणि वर्षभरापासून कपडा न लागलेला महाराजांचा पुतळ्यावरील पक्ष्यांनी केलेली घाण साफ करण्याचा प्रयत्न करत होतं.
Read 21 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!