Discover and read the best of Twitter Threads about #Threadकर

Most recents (24)

#थ्रेड #Threadकर
जेव्हा जेव्हा राज्यकर्ते मदमस्त होतात, सामान्य लोकांना, शेतकऱ्यांना, मजूर-कामगारांना पिळतात,
स्वतः मेजवान्या मारतात नको ते पोपटपंची खेळ दाखवतात व जनतेला उपाशी ठेवतात, स्वार्थी श्रीमंतांशी व ढोंगी धर्मगुरू, बाबा, महाराज लोकांशी लागेबांधे करतात;१
@MarathiDeadpool
तेव्हा अशा राज्याकर्त्यांची कधीतरी ससेहोलपट होते व सारा देश लयास जातो... हा आतापर्यंतचा इतिहासाचा अनुभव आहे. सिंगापूर चे माजी अध्यक्ष "ली कुवान" म्हणाले होते; "राष्ट्र मोठे असो वा छोटे, एकधर्मीय असो वा बहुधर्मीय -२

@rohan_mutha @DrVidyaDeshmukh @realkunal7
जगातल्या सर्व राष्ट्राची प्रगती व तेथील सर्व लोकांचे
भवितव्य एका गोष्टीवर अवलंबुन असते ते म्हणजे सिंहासन"..! त्या सिंहासनावर जो बसलाय त्याच्यावर जनतेचा अंकुश आहे का? सिंहासनाला पायऱ्या आहेत का? सिंगापूर ला PM पदावर येण्यासाठी फक्त लोकप्रियता हा निकष नाही.३

@shailesh_090789
Read 12 tweets
#इतिहास_शिवरायांचा
#शिवकालीन_दिनविशेष
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
#Threadकर

🚩१६ जानेवारी १६६०🚩
अफजलखान वधानंतर पन्हाळगड, कोल्हापूर प्रांत हरलेल्या आदिलशहाने मराठ्यांवर दुसरी मोहीम उघडली. रुस्तुम झमान, फाझल खान छत्रपती शिवरायांवर चालून आले असता
त्यांचा पराभव होऊन त्यांनी पुन्हा विजापूरची वाट धरली.

🚩१६ जानेवारी १६६६🚩
पन्हाळगड जिंकण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डाव 'नेताजी पालकर' वेळेवर न आल्याने फसला. १००० मावळे कापले गेले आणि मराठ्यांचा पराभव झाला. नेताजी पालकरांना छत्रपती शिवरायांनी बडतर्फ केले आणि
त्या जागी कुडतोजी गुजरांना 'प्रतापराव' ही पदवी देऊन सरनौबत बनवले.

🚩१६ जानेवारी १६६८🚩
इंग्लंडच्या राजाने १६ जानेवारी १६६८ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहून ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी परवानगी दयावी म्हणून विनंती केली. उत्तरादाखल २ ऑगस्ट १६६८ रोजी महाराजांनी
Read 12 tweets
#थ्रेड
प्रगतीचा संबंध विचारांशी व सकारात्मक कृतीशी आहे,तो केवळ संपत्ती नाही, हे आपण विसरतो.
केवळ धनप्राप्ती झाली म्हणजे आयुष्याचे ध्येय प्राप्त झाले असे समजणे हे जीवनाबद्दल अतिशय संकुचित विचार करण्यासारखे आहे. बहुतांशं लोकं धनसंचय वाढविण्यातच समाधान मानतात.परंतु ते समाधान कधीच+
मिळत नाही. संपत्ती व महत्वकांक्षा यांना मर्यादा नसतात हे आपण विसरलो, तर आपण त्यांच्यामागे सैरावैरा धावत सुटतो, आपली दिशा विसरतो. जेव्हा समाजातील बहुतांश लोकं सकारात्मक विचार करणं सोडून संपत्ती व लालसेमागे धावतात, तेव्हा त्यांच्या हातात तर काहीच येतं नाही व सारा समाज दिशाहीन होतो
स्वातंत्र्य मिळून आज 70वर्ष पेक्षा जास्त कालावधी झाला. LPG धोरण स्वीकारून 25+ वर्ष होतीलतरीही आपले गणित कुठं चुकतय? जनतेला योग्य दिशा देण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले आहेत का? शासकीय त्रुटी, कमतरता,निष्क्रियता, जनतेच्या दबावाचा अभाव असे घटक याला कारणीभूत आहेत का?
Read 15 tweets
#इतिहास_शिवरायांचा
#शिवकालीन_दिनविशेष
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
#Threadकर

🚩१५ जानेवारी १६५६🚩
महाराजांनी छापा घालुन जावळी काबीज केली.
महाराजांच्या बळापुढे चंद्रराव मोरे यांचे बळ अपुरे पडू लागले. चतुर्बेट संभाजी कावजी कोंढालकर यांच्या हाती पडले. जोहोरखोरेही रघुनाथपंतांनी Image
काबीज केले. हणुमंतराव मोरे या धुमश्चक्रीत मारला गेला. तर प्रतापराव मोरे निसटून विजापूरला पळून गेला. सिवथर खोरेही महाराजांनी जिंकले. इथल्या बाबाजीराऊ या मोरे यांचा कारभारी याला कैद करून महाराजांनी त्याचे डोळे काढले. खासा चंद्रराव व मुरारबाजी यांनी जावळी बराच वेळ लढविली. पण अखेर
चंद्ररावास माघार घ्यावी लागली. तो आपल्या बायकामुलांसह रायरी किल्ल्यावर लपून बसला. जावळी महाराजांनी सर केली. जावळीवर महाराजांचे निशाण लागले तो दिवस होता.

🚩१५ जानेवारी १६८१🚩
राज्याभिषेकाचे तुलादान विधी!
राज्याभिषेकाचे तुलादान विधी पार पडले. त्याजबरोबर विधीवत करावयाचे अनेक विधी
Read 16 tweets
छत्रपती शिवाजी महाराज हे रत्न ज्या विद्यापीठातून निपजलं.. ते चालतं बोलतं कुल म्हणजे राजमाता जिजाऊ आई.
राजमाता जिजाऊ म्हणजे वात्सल्य, मांगल्य आणि पावित्र्य यांच्या त्रिवेणी संगमातून साकारलेली आई.

जयंतीचा झिंग उतरायला वेळ लागतो म्हणून लेट लेखन प्रपंच.

#थ्रेड #म
स्वराज्याची संकल्पना ही काही पोरखेळ करून मांडलेला भातुकलीचा खेळ न्हवे..छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या आगोदर राजमतेच्या उदरात ते स्वप्न अंकुरलं होतं.. म्हणूनच छत्रपती आबासाहेब छत्रपती झाले..म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज जितके मोठे आहेत त्याहून मोठ्या राजमाता जिजाऊ आहेत.
राजमातेच्या आयुष्यात आलेले तिन्ही महापराक्रमी पुरुष वादळी आयुष्य जगले..पण त्या वादळामागील बळ हे जिजाऊ आईच्या त्यागातून आलं. वादळं कधी एकटी येत नसतात..जीवघेणी भयाण शांतता सोबतीला असते त्यांच्या..राजमातेच्या आयुष्यात अशी अनेक वादळे येऊन धडकली पण न डगमगता तिनं दोन दोन छत्रपती घडवले.
Read 18 tweets
'आपले देव आता जुने झालेत, आपल्याला नवा देव, नवा वेद आणि नवा धर्म हवा आहे. कारण, आपल्याला नवा भारत घडवायचा आहे.' -स्वामी विवेकानंद
विज्ञान तंत्रज्ञानाने विपुलता येईल.पण मानवी सृजनशीलता हद्दपार होऊ नये.अन्यथा मानव आत्मकेंद्रि बनून समाजरचना मोडीत निघेल...
#थ्रेड #म
आइन्स्टाइनवाणीच्याही आगोदर विवेकानंद म्हणाले होते. 'धर्म विज्ञानाशिवाय आंधळा आहे आणि विज्ञान धर्माशिवाय पांगळ आहे.' विज्ञान 'का?' हे सांगेल आणि धर्म 'कशासाठी?' हे शिकवेल. विवेकानंदांना अपेक्षित असलेला धर्म फार वेगळा आहे. धर्माच्याआधारे त्यातील अपप्रवृत्तीवर घणाघात त्यांनी केला.
राजर्षी शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाअगोदर दहा वर्षे विवेकानंद म्हणाले होते.'आमच्या वेदांनी शूद्रांना वेदाध्ययन अधिकार नाही असं कुठंच म्हणलं नाही.ती व्यास आणि शंकराचार्यांनी खेळी केलेली आहे.'
पृथ्वीपासून मैलो दूर असलेले गोळे आमच्यावर अनिष्ट शक्ती टाकतात कसे?हा प्रश्नच आहे.
Read 12 tweets
#इतिहास_शिवरायांचा
#शिवकालीन_दिनविशेष
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
#Threadकर

🚩९ जानेवारी १६३३🚩
पहांटे भंडाऱ्याच्या होंगरावर प्रसिद्ध सत्पुरुष तुकारामबोवा यांना स्वप्नांत गुरुपदेश झाला.
हा गुरुपदेश होण्यापूर्वी तुकारामाची मानसिक व्यथा पाहण्यासारखी आहे. शके १५२० मध्ये
एकनाथमहाराज समाधिस्थ झाल्यावर दहाच वर्षांनी तुकोबांचा जन्म देहू येथे झाला. त्यांच्या घरामध्ये भगवद्भक्ति पहिल्यापासूनच असून वडील बोल्होबा यांची पंढरीची वारी अखंडपणे चालू होती. घरी थोडी शेती, व्यापारधंदा व सावकारी होती. या कुटुंबांत वयाची तेरा वर्षे तुकोबांनी आनंदांत घालवली.
त्यानंतर त्यांचे लग्न झाले. पहिली बायको दमेकरी निघाली म्हणून दुसरे लग्न केले. बोल्होबांनी सर्व संप्तार तुकोबांच्या गळ्यांत टाकला. तुकाराम- बोवांनीहि आरंभाच्या काळांत चोखपणे संसार केला. पण त्यानंतर एका- मागून एक दुःखाचे डोंगर कोसळले. वयाच्या सतराव्या वर्षी वडील निवर्तले.
Read 27 tweets
आत्ता गेल्या आठवड्यातली गोष्ट..एक मित्र आहे , NRI आहे..इंजिनिअरिंग करायला लंडन ला गेला तिथंच नोकरी मिळाली. सहज भेटायला आलेला..ये म्हणलं बेत करू..बोलता बोलता सहज विषय निघाला..शेती आणि शेतकरी आंदोलन वगैरे..
'शेतीसाठी आता जमीन नाही लागत रे..' या एका वाक्याने मी आवाक झालो. #थ्रेड #म
नाही..म्हणजे हायड्रोपोनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग हे असलं सगळं शिकून, प्रात्यक्षिक करून बसलो होतो मी.. पण त्याच्या बोलण्यातील ठामपणा आता जरा जास्तच आवेगला होता.. आणि आपल्या भारतातील सध्याची परिस्थिती बघून तर मला फारच काळजी वाटली..भारतीय शेतकऱ्यांची.
आता जमिनिशिवाय शेती म्हणजे जमिनीवरच्या शेतकऱ्यांना टफ फाईटच ना..आगोदर देशोधडीला लागलेला शेतकरी या फाईटने गारदच व्हायचा..हे गारद होणं टाळायचं असेल तर शेतकऱ्यांनी आता मूळ प्रवाह सोडून तंत्रस्नेही व्हायला हवं.
चर्चा जरा इंटरेस्टिंग वाटली..विषय वाढवला मी.. शेतकऱ्यांनी काय करावं पुढं?
Read 12 tweets
'No race can prosper till it learns there is as much dignity in tilling a field as in writing a poem.'

शेतीचं आणि शेतकऱ्यांचं महत्व या शब्दात सांगितलं होतं बुकर टी वॉशिंग्टनी.

'जय जवान जय किसान' हा आपला आवडता खेळ..जवान आणि किसान यांची अवस्था बरी म्हणावी अशीही नाही. #थ्रेड #म
भारतीय समाज कमालीचा भावनिक प्राणी..अगदी पहिल्यापासून.. याच भावनिकतेतून त्याने ज्याला ज्याला राजा किंवा देव/देवी संबोधलं त्याची वाताहत त्यानेच मन लावून केली..
इतिहास गवाह है..!
त्याने अखंड निसर्गाशी देवत्वाचं नातं जोडलं, पुढे निसर्ग कोपला हे ही त्यानेच ठरवलं..
यथावकाश स्त्रीला देवी मानण्याचे सत्कार्य त्याने उभारले.. आज जगाच्या पाठीवर धर्मांधळ्या मुस्लिम देशांनंतर भारतभूमीत स्त्रीस जास्तीत जास्त बेअब्रू केलं जातं. ही वस्तुस्थिती आहे.
Read 14 tweets
शेतकऱ्यांना हमीभाव आणि बाजार समितीसाठी नवीन कायदा करणे हा तोडगा निघू शकतो.पण सरकार फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवून आला दिवस ढकलत आहे.दुसरीकडे आंदोलकात फूट पाडणे किंवा आंदोलनाचा जनाधार संपवणेसाठी सरकार प्रयत्नात आहे.केंद्राचे महाराष्ट्रातील ऊस पॅकेज हे त्याचे उदाहरण. #थ्रेड #म
दुसरीकडे फेसबुक सारख्या भाट समाजमाध्यमांस हाताशी धरून वेगळाच द्वेष भारतीय समाजात पसरवण्याचे काम सुरुय. शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवणे आणि त्याचा प्रचार-प्रसार करणे हे त्याचं उदाहरण..
चर्चा आणि शास्त्रशुद्धता याबाबत सदर सरकारचा वकुब हा अतिशय गंभीर आहे. हे 2014 पासून देश पहातच आहे.
आपल्या देशातील संविधानिक संस्थांची जी काही मोडतोड झालीय त्याबद्दल कुठेही वाच्यता होणार नाही याची दखल सरकारने मीडियाला हाताशी धरून घेतलेलीच आहे.. आज जागतिक बाजारात इंधन दर कमी असूनही आपण त्यासाठी पेट्रोलला 90₹/लिटर तर डिझेलला 80 ₹/लिटर मोजत आहोत.
Read 10 tweets
#थ्रेड
#ग्रामपंचायत_निवडणूक

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था सांभाळते.
#सरपंच, #उपसरपंच, #ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला #ग्रामपंचायत म्हणतात.

👇
#ग्रामपंचायत बद्दल थोडक्यात माहिती 👇

कायदा - १९५८ (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम) कलम ५ मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये ६०० लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या ठरते :
६०० ते १५०० - ७ सभासद
१५०१ ते ३००० - ९ सभासद
३००१ ते ४५०० - ११ सभासद
४५०१ ते ६००० - १३ सभासद
६००१ ते ७५०० - १५ सभासद
७५०१ त्यापेक्षा जास्त - १७ सभासद असता
निवडणूक - राज्य निवडणूक आयोग ही निवडणुक पार पाडते 👇
Read 11 tweets
थंडीची चाहुल लागली की विशेषत: उत्तर कोकणातील खवय्यांना वेध लागतात ते "पोपटी पार्टी"चे. विशेषत: रायगड जिल्ह्यात खास थंडीच्या दिवसांत रात्री उशीरा ह्या पोपटीच्या पार्ट्या रंगतात. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही लोकांसाठी पोपटी लावता येते हे विशेष. घरापासून दूर शेतामध्ये (1)
मित्रमंडळीच्या सहवासात गप्पा-टप्पा करीत हा कार्यक्रम चालू होतो.खास थंडीच्या दिवसांमध्ये साधारणत: डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यांमध्ये हा कार्यक्रम सर्रास चालू असतो. काळोख्या थंडी पडलेल्या रात्रीत पोपटीचा शेकत शेकत गरमा गरम आस्वाद घेतला जातो. पोपटी करण्यासाठी लागणार्‍या साहित्या(2)
मधले लागणारे साहित्य म्हणजे मातीच मडक. हे मडक गरजेप्रमाणे छोटे मोठे घेतात.मडके आतुन स्वच्छ धुवुन पुसुन घेतात.
साहित्य :
वालाच्या ताज्या शेंगा, चिकन(मोठे तुकडे), एक डझन अंडी, अर्धा किलो बटाटे, कांदे-वांगी (आवडीनुसार), सारणासाठी मसाला, जाडे मीठ, चवीपुरता ओवा आणि मध्यम आकाराचं(3)
Read 8 tweets
"या देशाचे संविधानकर्ते इतिहासात कोणासमोर झुकले नाहीत, वर्तमानात आम्हीही उद्योगसम्राटांसमोर झुकू हे शक्य नाही." अमेरिकेत रिपब्लिकनचे सिसिलिन बोलत होते.
जगातल्या चार बड्या उद्योगपतींना अक्षरशः 'घेण्याचा' कार्यक्रम सुरू होता.
हे भांडवलशाही देशात होत होतं.
#मानवाधिकार #थ्रेड #म
एरवी ते चार उद्योगमहारथी साधे शिंकले जरी तरी जागतिक बाजारास थंड ताप येईल. ते काही अघटित बोलले तर जागतिक बाजार अंथरून धरेल..एवढी ताकद त्या चौघांकडे.
पण त्यादिवशीच्या कार्यक्रमात ते स्वतःस कपाळकरंटे बनवून..कपाळावरील घाम टिपण्यात व्यस्त होते. तोंडात मूग होते ते निराळच..
ते चौघे.टिम कुक, सुंदर पिचाई,जेफ बेझोस आणि मार्क झुकेरबर्ग, त्यांचे उद्योग अनुक्रमे ऍपल, गुगल, अमेझॉन, फेसबुक.
या चारांनी आपल्या ताकदीचा वापर प्रतिस्पर्ध्याला संपवणे आणि स्वतःची मोनोपॉली तयार करण्यासाठी केला का? याची यथासांग चौकशी सुरू होती.अमेरिका प्रतिनिधीगृहाच्या उपसमिती समोर.
Read 13 tweets
'दिवस-रात्र, वेळ काळ न बघता तिच्यावर बलात्कार होत होता. शारिरीक मानसिक अत्याचार होत होते. पण एक क्षणही तिला तिचे जीवन संपवून टाकावेसे वाटले नाही. हे अनुभवसुद्धा आयुष्याचा एक भाग आहेत, असेच समजून ती घेत होती.'(१)
घटना आहे इराक मधील कोचो या गावातील. याहिदी लोकांचे वास्तव्य असणारे डोंगरदरीत वसलेले गाव, कधीही कोणाच्याही अध्यात मध्यात नसणारे. ३ आॅगस्ट २०१४ रोजी या गावावर आयसिस या अतिरेकी संघटनेने हल्ला केला. याहीदी लोकांचे समुळ उच्चाटन करण्याचा उद्देश यामागे होता. हजारो निष्पाप लोकांचे(२)
मुडदे पाडण्यात आले. या गावात एक शेतकरी कुटुंब होते नादिया मुराद या तरूणीचे. तेव्हा ती २१ वर्षांची होती. या हल्ल्यात नादियाच्या नऊ भावांपैकी सहा भाऊ जागच्या जागी मारले गेले. नादिया आणि तिच्या दोन बहिनींसोबत गावातील हजारो महिला आणि मुलांना गुलाम म्हणून कैद करण्यात आले.(३)
Read 12 tweets
'मी म्हणेल तीच पूर्वदिशा' हा अहं एकदा का मनाने घेतला. की,माणसास काळ,वेळ आणि दशदिशा यांचे भान रहात नाही.
कृषी बिलावरून सुरू असलेले भाजप आणि त्याच्या धुरीणांचे(?)राजकारण हे त्या अहं चे सर्वोत्तम अवसानघातकी उदाहरण.
पक्ष म्हणून त्यांचे जे काही होईल ते होईल.पण काळ सोकावतोय. #थ्रेड #म
राजकारण आणि क्रिकेट पाठोपाठ आता कृषी क्षेत्रात ही लोकसंख्येएवढे तज्ञ तयार झालेत. त्यामुळे सध्याच्या कृषी बिलांचा यथेच्छ आर्थिक खिस पडला आहेच.. ही बिलं योग्य की अयोग्य हा वादाचा मुद्दा आहेच.. त्याहून वादाचा मुद्दा आहे ती ज्या प्रकारे पारित केली गेली.
सध्याच्या सरकारने ती ज्या प्रकारे आणली.त्यास पारित म्हणणं चुकीचंच.ती बिलं भारतीयांवर लादली म्हणणं योग्य होईल. कारण या सरकारचा हुकूमशाहीचा कंड आणि तत्पर बहुमताचा माज.
एकुणातच या सरकारचा 2014 पासूनचा आलेख पाहिल्यास सत्तेचा अमरपट्टा घेऊन आल्यासारखं वर्तन अगदी गल्ली ते दिल्ली झालं.
Read 13 tweets
आज ५ डिसेंबर- "जागतिक मृदा दिन"
संयुक्त राष्ट्रातर्फे हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. थायलंडचे दिवंगत राजे भूमीबोल अदुल्यदेव यांचा ५ डिसेंबर हा जन्मदिन. त्यांनी मृदा संवर्धन, अन्नसुरक्षा आणि शाश्वत विकासासाठी केलेल्या कामाचे स्मरण म्हणजे आजचा दिन होय.
मृदा, माती, धरती, पृथ्वी सारी तिचीच रूपं. तिच्याच उदरातून आपण अंकुर फुटून बाहेर यायचं. बहरायचं, फुलायचं, फळायचं आणि कार्यभाग संपला की तिच्याच पोटात विसावायचं. जन्म देणारी तिच आणि कवेत घेणारीही तिच....माती!
"लहान मुल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मुर्ती घडते." संस्कार शिकवणारी, जगायला प्रेरणा देणारी, पोटाला भाकर देणारी, वृक्षांना आधार देणारी, प्राणीमात्रांना आसरा देणारी. साय्रा विश्वाचा भार सोसुनही कधी तक्रार न करणारी....माती!
Read 7 tweets
हडप्पा संस्कृती( सिंधू संस्कृती):- प्राचीन भारतातील सभ्यता😇👇👇👇

आधुनिक युगात वावरताना आपण स्वत:ला धन्य मानतो की आपला जन्म सोयीसुविधांनीयुक्त अशा कालखंडात झाला आहे. आजच्या जगाकडे पाहिले की आपण नक्की प्रगतशील आहोत की अधोगतीच्या मार्गाकडे वाटचाल करतोय हा प्रश्न पडावा.👇
कारण आज जात, धर्म, वंश, लिंग, उच्च-नीच, इ. बाबत साय्रा जगात जो सावळागोंधळ सुरु आहे त्यातून आपल्यासमोर जी भीषण वास्तविकता उभी आहे ते पाहता आपल्या पुर्वजांनी आपणांस दिलेली सभ्यता हरवून गेलीय हे लक्षात येते. आपले पुर्वज म्हणजे साधारणत: अश्मयुगीन कालखंड संपल्यावर म्हणजे आजपासून 👇
सुमारे पाच हजार वर्षापुर्वी भारतीय उपखंडात एक नागरी संस्कृती उदयास आली होती. जवळपास दोन हजार वर्ष अस्तित्वात असलेल्या या संस्कृतीचा शोध १९२१ साली रेल्वे रुळाचे बांधकाम चालू असताना लागला. आधुनिक हडप्पा सध्याच्या पाकिस्तानातील पश्चिम पंजाबात वसलेले आहे.👇
Read 9 tweets
#मुंबई_बॉम्बस्फोट
📌
#शिकवण
#अनुभव

25 नोव्हेंबर 2008 ,
इयत्ता आठवीत होतो
दोन दिवसांपूर्वीच तालुका स्तरीय कब्बडी स्पर्धेत आमच्या टीम ने दोन राऊंड जिंकले होते ,
मांगील 2 वर्षाची मेहनत होती यंदा जिल्हास्तर गाठायचच होत , ह्या जिद्दीने आम्ही खेळत होतो .
👇
मी त्या टीम चा कॅप्टन होतो , आज आम्ही मित्र जमून उद्या कसं खेळायचा कोण आणि केव्हा रेड करेल अशी सर्व ठरवून घेत होतो,
व नेहमी प्रमाणे संध्याकाळी सर्व उद्याच आयोजन करून घरी गेलो,
तसच आठच्या सुमारास जेवण व उद्याच्या स्पर्धेची तयारी करून ठेवली,
👇
सकाळी मला 6 वाजेच्या बस ने टीम सोबत बाजूच्या रेल्वे स्टेशन च्या गावी जायचं होत म्हणून लवकरच झोपलो , रात्री तेच मॅच बद्दल विचार करत करत एकदम झोप आली , तितक्यात आई ने सकाळ झाली म्हणून उठवलं , लगेच घाईघाईत तयार झालो , आई ने टिफीन रेडी करून दिलेला आणि निघालो ,
👇
Read 14 tweets
"शिवाजी महाराज आम्हांस समजले का?" तर याच उत्तर "नक्कीच नाही समजले."
आम्ही मोठेपणा मिरवतोय तो महाराजांचं नाव घेऊन.... मग आम्ही राजांना वापरायला सुरुवात केली...राजकारण करायचयं घे राजांचं नाव, समाजकारण करायचयं घे राजांचं नाव, मोठमोठे कार्यक्रम करून धांगडधिंगा करायचाय घे राजांचं नाव
,इ. येथे आक्षेप महाराजांच्या नावाला नाही, तर बय्राच ठिकाणी या गोष्टी किळसवाण्या पद्धतीने समोर येतात. तेव्हा प्रश्न पडतो..."महाराज आम्हांला समजले का?"...आज समाजातील जातीय तेढ, स्त्रियांवरील अत्याचार, खालच्या पातळीवर केले जाणारे गलिच्छ राजकारण, न्यायव्यवस्थेचा उडालेला बोजवारा...
महारांजांचा इतिहास आपल्या सर्वांना तोंडपाठ...असावाचं तो. आपलं भाग्य ऐवढं थोर की राजांच्या स्वराज्यात आपण जन्माला आलो. आज जगाच्या बाजारपेठेत माझ्या राजांचा इतिहास अनेक ठिकाणी कौशल्य व्यवस्थापनाचे धडे म्हणून अभ्यासला जातोय. गरज आहे ती आपण कधी महाराजांना आपल्या आचरणात उतरवणार?...
Read 6 tweets
काल देव स्वप्नात आला होता..!

नेहमीचंच त्याचं गाऱ्हाणं...देवपणाची भीती वाटायला लागलीय म्हणत होता..
फक्त चोच द्यायचं काम माझं आहे..चारा ज्याचा त्याने शोधायचा असतो.. असंही काहीतरी पुटपुटत बसला होता..❤ #थ्रेड #म
मी हसत म्हणलं..भक्तांच्या मांदियाळीत पुरता फसलायस गड्या तू..
मग खजील होत म्हणाला..माझ्या जागी कधीतरी बसून बघ..मी काय भोगतोय तुला कळेल..

मी म्हणलं झालंय काय?
आता मी कुठे राहू? चार सहा महिने मंदिरात निवांत होतो..
मी म्हणलं..तो प्रश्न तू निर्माण केलायस तुझं तू निस्तार.
यावर हसत देव म्हणाला..हे तुझं बरंय.भक्तांच्या दाढेला मला एकट्याला देतोयस तू.

मी- मी तुला मागेच म्हणलं होतं ना..तू काय या दगडांच्या राजकारणात अडकू नको म्हणून..पण तू ऐकलं का त्यावेळी?

मी अडकलो न्हवतो..मला अडकवलं होतं.. भक्तांनी.

भक्तही तुला अडकवतात तर मग सोडून दे तू देवपण.
Read 6 tweets
महाराष्ट्रात विधानपरिषद ‌पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका जाहीर झाल्या असुन येत्या १ डिसेंबर ला मतदान होईल!
खालील धाग्यात
१)विधानपरिषदेची स्थापना
२) विधानपरिषदेची रचना
३)एकुण किती राज्यात वि.प.असुन उमेदवार पात्रता
४)पदवीधर व शिक्षक मतदार पात्रता
५)मतदान पद्धत
#म #threadकर Image
महाराष्ट्रातील जी विधानपरिषद आहे तसा तिचा इतिहास हा स्वातंत्रपुर्व काळातील आहे.विधानपरिषद अथवा परिषदेसारखी सामाईक संरचना असलेली परिषद 'इंडियन कौन्सिल ॲक्ट-१८६१' नुसार बाॅंम्बे प्रांतात स्थापन करण्यात झाली.
टीप:-त्यावेळी मुंबईला बाॅंम्बे म्हणायचे.
१९३५ ला जो कायदा आला @irajratna
त्यानुसार राज्यात जुलै १९३७ ला विधानपरिषद अस्तित्वात आली.स्थापनेनंतर जी पहिली बैठक झाली ती पुणेमध्ये कौन्सिल हॉल ला २० जुलै,१९३७ ला घेतल्या गेली.दुपारी २ वाजता ही बैठक पार पडली.१९५५ पर्यंत परिषदेचे जे पावसाळी अधिवेशन होते ते पुण्यातच भरायचे..पण ज्यावेळीस 'नागपुर करार' झाला Image
Read 13 tweets
आजच्या थ्रेडमध्ये चीन ने जॅक मा यांच्या ॲंटग्रुप IPO‌ बद्दल जी कठोर पाऊलं उचलली आहेत त्याबद्दल लिहीलं आहे..
थ्रेडमध्ये
१)IPO,FPO आणि त्याची ऐतिहासिक किंमत
२)ॲंट ग्रुप,सौदी अरामको व अली पे
४)IPO suspend करण्यामागे नक्की कारणं काय असु शकतात इ..
#म #मराठी #रिम #threadकर #alibaba Image
तुम्हाला मुळात चीनचे असणारे व जगातील इ-काॅमर्स क्षेत्रातील महाबलाढ्य नाव म्हणजेच 'जॅक मा' माहित असतीलच!!
तर विषय असा आहे की त्यांची #alibaba नावाची इ-काॅमर्स कंपनी आहे.इ-काॅमर्स कंपनी म्हणजे भारतात जशी ॲमेझोन आहे अगदी तशीच ती चीनमध्ये आहे..पण तिच्यासोबत जॅक मा यांची Image
आणखी एक कंपनी आहे.तिच नाव आहे #ANTGROUP..या ॲंटग्रुपचे जे IPO बाजारात येणार होते त्यावर चीनने बंदी घातली आहे.प्रथम आपण IPO(Initial Public Offering)म्हणजे काय समजुन घेऊ.
जेव्हा एखाद्या कंपनीला बाजारात विस्तार करायचा असेल तेव्हा तिला पैसा लागतो..त्यावेळीस ती एकतर बॅंकेकडुन पैसे घेऊ Image
Read 12 tweets
आजच्या या थ्रेडमध्ये #Tata कंपनी व #Apple कंपनीबद्दल माहिती सांगितली आहे..tata ने ॲपल मोबाईलचे ठराविक पार्ट बनविण्यासाठी पुढाकार घेतला असुन टाटा तमिळनाडूमध्ये प्रकल्प चालु करणार आहे..खालील धाग्यात
1)डील बद्दल..
2)#Titan चा सहभाग
3) तमिळनाडूच का?
इ..

जाणुन घेऊ
#म #रिम #threadकर
टाटा कंपनीने ॲपल कंपनीच्या मोबाईलचे ठराविक भाग बनवण्याचा निर्णय घेतला असुन हा एक ऐतिहासिक निर्णय आहे.यासाठी टाटा ग्रुपने तमिळनाडू मधील चेन्नई जवळील 'होसुर' गाव ज्याला ब्रिटीश 'little England' म्हणायचे या गावात जवळपास ५००० करोड रुपयांचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकल्पासाठी टाटा ने #TATA_electronics नावाने नवीन कंपनी चालु केली असुन #TIDCO(Tamilnadu Industrial Development Corporation) या तमिळनाडूच्या सरकारी कंपनीने टाटाला होसुरमध्ये जवळपास ५०० एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे.या प्रकल्पाची किंमत ५००० करोड असली तरी भविष्यात ती ८००० करोड
Read 14 tweets
आता लवकरच अमेरिकेचे अधिकृत राष्ट्राध्यक्ष घोषित होतील..मी काल ट्रंप आणि बिडेन यांच्यामधील प्राथमिक फरक सांगितला होता..त्या धाग्याची लिंक खाली आहेच! आज आपण त्या दोघांचा भारताप्रती नक्की काय दृष्टिकोन आहे याबद्दल जाणुन घेऊया..
#म #मराठी #रिम #USAElections2020 #Trump2020 #Biden2020
१)अमेरिकेतील भारतीय कायम डेमोक्रॅटिक पक्षाला समर्थन देतात ज्याचे उमेदवार सध्या #Biden आहेत.पण ह्यावेळीस #corona पार्श्र्वभूमीवर #trump यांनी चीनला ज्याप्रकारे धारेवर धरले..त्यात कोरोनाला सरळ सरळ चीनी वायरस संबोधणे अथवा ट्रेड वाॅर इ. यामुळे भारतीय ट्रंपच्या बाजुने झुकलेले असावेत
दुसरीकडे बिडेन पाकिस्तान च्या बाजुने कृती करत असल्याचे दिसुन आले ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानला ६०० मिलीयन$ ची मदत घोषित केली जी मदत ट्रंपनी आर्ध्यावरच आणलीय.पाकिस्तानच्या मते त्यांना ते पैसे दहशतवाद व आतंकवाद विरोधात वापरायचेत पण वस्तुस्थिती आपणा सर्वांनाच माहीती आहे🙏🙏
Read 17 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!