Discover and read the best of Twitter Threads about #Threadकर

Most recents (24)

'और यहापे आपके साथ ये छोटासा प्रॅंक हुआ है' 🫡
आज शेअर मार्केटमध्ये अनावधानाने का होईना गुंतवणूकदारांसोबत prank झालेला आहे.
विषय असा आहे की आज मार्केटमध्ये अचानक बातमी आली 'Urja Global' नावाच्या जवळपास 650 करोड बाजार मुल्य असणार्या small cap कंपनीने 'Tesla' मध्ये गुंतवणूक केलीय Image
आणि काय धुर्रळा झाला 🔥
सगळे गुंतवणूकदार या कंपनीच्या शेअरची खरेदी करायला तुटुन पडले आणि आज २०% upper circuit मध्ये शेअर लाॅक झाला😍.
पण मुख्य विषय असा आहे की भारतातील एका छोट्याश्या कंपनीने मुळची अमेरिकेची पण जगविख्यात असणार्या टेस्ला कंपनीत कशी काय गुंतवणूक केली असा प्रश्न Image
सर्वांना पडला आणि तिथुन खरी गंमत बाहेर आली. भारतीय बाजारमधील महागुरू विजय केडिया यांनी याचा तपास लावला असता त्यांना समजले की ही टेस्ला अमेरिकेतील नसुन दिल्ली मधील टेस्ला पाॅवर इंडिया कंपनी आहे..😄
"I was thrilled to read the news about a listed Indian company "tied up" with Tesla Vijay Kedia (Indian Investor)
Read 5 tweets
आपण नशीबवान आहोत की भारतात जन्मलो जिथे #संविधान श्रेष्ठ आहे ❤️
संविधानच नसलेल्या इस्त्राईल देशात गेले ३ महिने झाले सामान्य जनता रस्त्यावर उतरलीय. नेमकं काय झालय हे आपण या थ्रेडमध्ये पाहु
१)इस्त्राईल पंतप्रधान नेतान्याहू यांचा कारनामा
२)जन आंदोलन व परिणाम
#वसुसेन #threadकर
याआधी आपणं कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ(जे लोकशाहीचे ३ स्तंभ म्हणुन ओळखले जातात)यांचा एखादा देश स्थिर ठेवण्यामागे काय योगदान आहे याबद्दल छोटासा आढावा घेऊ म्हणजे पुढील प्रकरण तुम्हाला समजुन येईल.
कार्यकारी मंडळ म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ. हे लोकं
कायद्याचे पालन करतात.(इस्त्राईलमध्ये बेंजामिन नेतान्याहू पंतप्रधान आहेत) हे जे कायदे आहेत ते कायदेमंडळात तयार करून मंजुर केले जातात.(इस्त्राईल कायदेमंडळाचे नाव 'Knesset' आहे) तर बनलेले कायदे योग्य-अयोग्य तपासण्याचे काम न्याय मंडळ करत असतं‌.
तर पंतप्रधान नेतान्याहू यांनी नेमका
Read 14 tweets
'हिंडनबर्ग..हिंडनबर्ग..हिंडनबर्ग'
नाम तो सुना ही होगा 🧐
आत्ताच ज्यांच्या रिपोर्टने #अदाणी ग्रुपमध्ये हाहाकार उडाला होता त्या संस्थेच्या रडारवर काल #ट्विटर चा संस्थापक जॅक डाॅर्सी आलाय!
या थ्रेडमध्ये
१)हिंडनबर्गचा आरोप
२)ब्लाॅक कंपनीची माहिती
३)परिणाम
पाहु
#threadकर #वसुसेन
तर विषय असा आहे की हिंडनबर्गने जॅक डाॅर्सीच्या 'ब्लाॅक'
1)या कंपनीवर जवळपास १ बिलियन डॉलर्सचा घोटाळा घातल्याचा आरोप केला आहे.
2)या कंपनीमध्ये असंख्य खोटी आणि बनावट खाती उघडण्यात आली असुन कंपनीने या कृत्याला कुठेही विरोध केलेला नाहीय.त्यांना या गोष्टीची माहिती होती तरी त्यांनी
हे होऊन दिलंय.
3)स्वताच्या कंपनीचा नफा वाढवुन दाखवलाय.जेणेकरून या कंपनीचा शेअर वाढेल आणि कंपनीला फायदा होईल.
4)कंपनीच्या पेमेंट ॲपवरून बर्याच अवैध्य कामांसाठी पैश्यांची देवाणघेवाण झालीय उदा. ड्रग्ज डिल्सचे पैसे, क्रिमिनल गोष्टींसाठीचे पेमेंट्स, एखाद्याचा खुनाच्या सुपारीचे पैसे😅
Read 10 tweets
अख्ख्या भारताच्या जीडीपीमध्ये ज्या राज्याचा वाटा जवळपास १५% आहे त्या राज्याची जी हालअपेष्ठा चालवलीय ते पाहुन दुःख होतय 🤕🙏
शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यावर फक्त आणि फक्त मागील सरकारला कमीपणा दाखवण्यासाठी मविआने मंजुर केलेले आणि नियोजित असणारे प्रकल्प
#threadकर #वसुसेन Image
रद्द करून नवीन प्रकल्प आणले ज्याचा 'नियोजित खर्चा'वर ६० हजार कोटींचा अतिरिक्त भार पडला आहे. Economic survey नुसार २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रावरील कर्ज ५.७२ लाख कोटी होते ते चालु आर्थिक वर्ष संपेपर्यंत ६.४९ लाख करोडपर्यंत जाईल.
सध्या महाराष्ट्रात देशातील सगळ्यात जास्त स्टार्ट अप्स Image
असुन आकडेवारी पाहता एकुण १६०१४ स्टार्ट अप्स आणि त्यात एकुण १.७ लाख कर्मचारी काम करतात.
काॅम्प्युटर साॅफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात महाराष्ट्रात मागील ९ महिन्यात ६३,८१९ कोटींची परकीय गुंतवणूक झालीय पण मागील वर्षीपेक्षा ही गुंतवणूक तब्बल १६% नी कमी आहे‌.
महाराष्ट्राच्या उभारणीत Image
Read 9 tweets
तिकड पाकिस्तानचा माजी पंतप्रधान इम्रान खान पळुन गेलाय तर इकडे 'खालिस्तान चळवळी' चा चेहरा बनण्याचा प्रयत्न करणारा अम्रितपाल पळुन गेलाय..
दोघं पण पंजाब मधुन पळुन गेले आहेत 😄
एक पंजाब पाकिस्तानातला तर एक पंजाब भारतातला!
#ImranKhan #AmritpalSingh
#threadकर #वसुसेन
इम्रान खानने पाकिस्तान चालवणार्यांचा अर्थात पाकिस्तानी सैन्याचा अपमान केल्यामुळे जवळपास १०००० हजार पोलिस त्याला अटक करण्यासाठी बाहेर पडले होते. पण या सगळ्यांच्या हातावर तुरी द्यायला तो यशस्वी झाला. शेवटी इस्लामाबाद कोर्टात जाऊन त्याने सांगितले की सैन्य माझ्यासोबत खुप वाईट
वर्तणुक करत आहे. तेव्हा कोर्टाने सांगितले की इम्रान खानच्या म्हणण्यात तथ्य असुन त्याला जरा मोकळा श्वास घेऊद्या 😄
एव्हढ मात्र खरय की जर तो सैन्याच्या तावडीत सापडलाच तर इम्रान खान संपूर्ण जगाला कधीच दिसणार नाही एव्हढं ते सैन्य बेक्कार आहे!
आधीच घाईकुतीला आलेल पाकिस्तान आता या
Read 4 tweets
आता हसाव का रडाव तेच समजं ना 😂😭
आपला देश भोंदू बाबांच्या तावडीत सापडलेला आहे यात काही शंकाच नाही पण आता अमेरिकेला पण चुना लावला गेलाय😂
हा चुना लावणारा दुसरा तिसरा कोणी नसुन 'स्वामी नित्यानंद बाबा' आहे.खालील थ्रेडमधी
१)नित्यानंद बाबाचा इतिहास
२)नेमकं प्रकरण
#वसुसेन #threadकर ImageImage
स्वामी नित्यानंदचा जन्म तमिळनाडू मध्ये झाला.तो स्वतःला 'स्वयंघोषित गुरू' मानतो, त्याच्या 'नित्यानंद ध्यानपीठम' नावाचे धार्मिक संस्था कार्यरत आहेत.वयाच्या १२ व्या वर्षी या बाबाला साक्षात्कार झाला अस याच म्हणणं असुन संपूर्ण भारतात त्याच्या ४७ संस्था चालु होत्या.
२०१० साली जेव्हा Image
नित्यानंद बाबाचे एका तमिळ अभिनेत्रीसोबत Sexual act चे विडियो वायरल झाले तेव्हा याने सगळ्यांना स्पष्टिकरण देताना सांगितले की तो फक्त शवासन करत होता आणि तो नपुंसक आहे.जेव्हा त्याची टेस्ट करण्यात आली तेव्हा तो 'नपुंसक' नसल्याचा रिपोर्ट CID ने कोर्टकडे जमा केला.
२०१८ साली नित्यानंदला Image
Read 13 tweets
आज आपण अश्या कंपनीबद्दल जाणुन घेणार आहोत जी बर्याच जणांना माहिती नसेल पण नफ्याच्या बाबतीत ती कंपनी जगातील 'दादा' कंपनी आहे. खासकरून ऑईल मधील!!
या कंपनीचे नाव 'सौदी अरामको'(Saudi Aramco) असुन या कंपनीचा 2022 मधील नफा हा तब्बल १६१ बिलियन डॉलर्स एव्हढा आहे😱
#threadकर #वसुसेन
त्यात नेमकं 'अरामको' च्या पथ्यावर रशिया-युक्रेन युद्ध चांगलच पडलय.तेलाच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती आणि अरामको ची तेल उपसायची क्षमता या सगळ्यामुळे ही कंपनी म्हणजे पैसे छापायचा कारखानाच झालाय. दिवसाला साधारण १.२ करोड बॅरल उपसायची ताकत ही कंपनी ठेवते.🔥
जाळनं धुर्र संगटच!!😅😄
म्हणजे विचार करा की अरामकोचा नफा मागील वर्षीपेक्षा तब्बल ४६% नी वाढला आहे!
आणखी सोप्या भाषेत म्हणल तर या कंपनीचा नफा एका बाजुला आणि अमेझाॅन, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि टेस्ला यांचा एकत्रित नफा एका बाजुला😄
आता तुम्हाला समजले असेल की अरामको ला मी सुरूवातीला 'दादा' कंपनी का म्हणलो ते!
Read 10 tweets
परवा आपण 'SVB bank' कशी कोसळली आणि त्याचे परिणाम याबद्दल वाचलं, जर वाचला नसेल तर तो थ्रेड मी शेवटी जोडलाच आहे. आज आपण डोनाल्ड ट्रंपचा विशेष जीव असणारी 'Signature Bank' बद्दल जाणुन घेऊ.
१)बॅंकची स्थापना
२) कार्यक्षेत्र, ठेवी रक्कम
३)नक्की काय घडले इ.
#वसुसेन #threadकर #CryptoNews
Signature Bank कोसळलीय म्हणजेच अमेरिकेच्या इतिहासातील ३री बॅंक बंद करण्याची वेळ आली आणि ते पण अस तस नाही तर रविवारच्या दिवशी(ज्या दिवशी सुट्टी असते) तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की अमेरिकेत बॅंकिंग सेक्टर नेमकं कोणत्या दिशेला चाललय!
Signature bank ही न्युयाॅर्कमध्ये असुन या बॅंकेचे जवळपास ४० क्लाईंट्स आहेत.या बॅंकेचे वय जास्त नाहीय. बॅंकची मे, २००१ रोजी स्थापन करण्यात आलीय. इथे बर्याच जणांना माहिती नसेल की SVB Bank बंद करण्यात आली त्यादिवशी Silvergate bank पण‌ बंद झाली. ही Silver gate bank #Cryptocurency
Read 16 tweets
आजच्या थ्रेडमध्ये आपण सध्या जगभरात Hot Topic असणार्या विषयाबद्दल जाणुन घेऊ. म्हणजेच अमेरिकेतील
१)'Silicon Valley Bank'(SV bank)
२)ती बुडण्यामागील कारणे
३)त्याचे परिणाम,ले ऑफ
सुरुवातीला सांगु इच्छितो की इथे बर्याच जणांना २००८ साली 'Lehman brothers bank' बुडाली
#threadकर #वसुसेन
तेव्हा त्याचे फक्त अमेरिकेवर नाही तर संपूर्ण जगावर काय परिणाम झाले हे माहिती आहेच, आपल्या भारतालापण त्याचा जोरदार फटका बसला पण पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग, अर्थमंत्री पी चिदंबरम इ. हुशार लोकांमुळे भारतीय अर्थव्यवस्था सावरली 😄
हा झाला इतिहास,पण आता कालच लेहमन ब्रदर्सनंतरच मोठ संकट
निर्माण झाल असुन शुक्रवारी (१० मार्च) रोजी SV bank बंद केली आहे आणि या बॅंकला विकत घेण्यासही कोणी तयार नाहीय. SV bank ही अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये स्थित असुन IT companies चा हब असलेल्या जगप्रसिद्ध 'सिलिकाॅन व्हॅली' मधील स्टार्ट अप्सना कर्ज देण्याचे काम करते. या बॅंकेची स्थापना
Read 22 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
नामदेव ढसाळ ( १५ फेब्रुवारी १९४९ - १५ जानेवारी २०१४ )  कविता ही त्यांच्या स्वतःच्या प्रातिभिक सामर्थ्याची साक्ष तर आहेच, पण त्याबरोबर ती तिच्या निर्मितीकाळाशी अभिन्नपणे निगडित आहे. काळाचे सर्व चढ-उतार तिने पाहिले आहेत, पचवले आहेत. ढसाळांच्या लेखनामागे 👇
डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा आणि कृतींचा पाया आहे,सातत्याने परिश्रम, अखंड चणचण आणि त्यासाठी करायची धावपळ, राजकीय आयुष्यातल्या उलथापालथी, दलित पॅन्थरचा उदयास्त, खासगी आयुष्यातले ताणतणाव हे सगळे पेलत, प्रदीर्घ काळ ‘मायस्थेनिया ग्राव्हिस’ या दुर्धर आजाराने ग्रासले असतानाही 👇
त्यांची कविता ताज्या दमाने उसळी घेताना दिसते. स्वतःला आणि भोवतालाला तपासत पुढे जाताना दिसते.ढसाळांच्या कवितेचा प्रभाव मराठी कवितेवर अटळच आहे.पण तो भारतीय भाषांतूनही आहे. जर्मन भूमीवर त्यांना कविता-वाचनासाठी निमंत्रित करण्यात आले (बर्लिन फेस्टिव्हल, जून २००१), त्यांची ही अविरत👇
Read 7 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
शरच्चंद्र चिरमुले ( १५ जानेवारी १९३१ - २७ मार्च १९९२ ) ‘कामरूपचा कलावंत’ ही  पहिली कथा ‘वाङ्मयशोभा’मध्ये (१९४९) प्रसिद्ध झाली.  १९६७ ला प्रकाशित झालेली, ‘श्री शिल्लक’ ही त्यांचा पहिला महत्त्वाचा कथा संग्रह. यानंतरच्या पाच कथासंग्रहाव्यतिरिक्त आत्मवृत्तात्मक 👇
आत्मवृत्तात्मक ‘वास्तुपुरुष’ आणि ललित निबंध ‘जीवितधागे’  हे लेखन केले. त्यांनी कथालेखनाची वेगळी व स्वतंत्र पायवाट निर्माण केली. नवकथेतून कथालेखनाला बळ घेतले, पण अंधानुकरण केले नाही. फार मोठी प्रायोगिकता आणली नसली, तरी कथाप्रवाहावर स्वतःच्या कथालेखनाचा स्वतंत्र ठसा उमटवला. 👇
कलावाद-जीवनवाद या वादचर्चेच्या अधीन न जाता कथाविषयक कलात्मक जाणिवेचे भान गांभीर्याने ठेवून चिरमुले यांच्या कथेने मराठी कथेला वैविध्यपूर्ण आणि समृद्ध बनविले आहे.  माणसाचे मन, त्याचे एकाकीपण, मृत्यू, मानवी जीवनातील रहस्यतत्त्व अशा आशयसूत्रांतून गंभीरपणे पाहणारे चिरमुले जीवनाकडे👇
Read 6 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
पं. महादेवशास्त्री जोशी  (१२ जानेवारी १९०६ – १२ डिसेंबर१९९२). भारतीय संस्कृतिकोशाचे व्यासंगी संपादक आणि मराठी लेखक.पारंपरिक पद्धतीने संस्कृत व्याकरण, काव्यशास्त्र तसेच ज्योतिष ह्या विषयांचे अध्ययन करून १९२६ साली ‘सत्तरी शिक्षण संस्था’ स्थापन करून त्यांनी 👇
शिक्षणप्रसारास वाहून घेतले. १९३४ मध्ये ‘राण्यांचे बंड’ ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर अनेक वर्षे त्यांनी सातत्याने कथालेखन केले. वेल विस्तार  हा पहिला कथासंग्रह १९४१ मध्ये प्रकाशित झाला. १९५७ पर्यंत त्यांचे एकूण दहा कथासंग्रह प्रसिद्ध झाले. खडकांतले पाझर , 👇
विराणी, घररिघी हे त्यांपैकी काही होत. त्यांच्या अनेक कथा गोमंतकीय जीवनाच्या पार्श्वभूमीवर आहेत. साधी, सोपी पण भावोत्कट भाषा आणि आकर्षक निवेदनशैली ही त्यांच्या कथालेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. जीवनाकडे पाहण्याचा एक प्रसन्न, सोज्वळ दृष्टिकोण त्यातून प्रत्ययास येतो. त्यांच्या 👇
Read 6 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
 अगाथा क्रिस्टी ( १५ सप्टेंबर १८९० - १२ जानेवारी १९७६ ) ही इंग्रजी भाषेत लिखाण करणारी लेखिका होत्या. जगभरातील रहस्यकथा प्रेमींना रहस्यात गुंगवणारी.पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं ते पहिलं महायुद्ध संपल्या संपल्या. तिथून पुढे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातलं जग 👇
तिच्या पुस्तकांतून व्यक्त होत राहिलं. अगाथा ज्या काळात या कथा लिहीत होती त्या काळातील जागतिक घडामोडींचे संदर्भ, अर्थातच ब्रिटिश आणि युरोपियन दृष्टिकोणातून यात सतत येत राहतात. किंबहुना तिच्या जगाविषयीच्या अनुभवांचं हे सार असतं. पुरातत्त्वशास्त्रज्ञ पतीमुळे अगाथाला मेसोपोटेमिया,👇
इजिप्त अशा पुरातत्त्वसमृद्ध भागांतलं वास्तव्य लाभलं आणि ते तिच्या कथांमधून उतरलं. १९३४ मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेल्या ‘मर्डर ऑन ओरिएण्ट एक्सप्रेस’मध्ये तर आशिया खंड ते युरोप खंड अशा रेल्वे प्रवासात त्या वेळचे अनेक देश, तिथल्या वृत्ती-प्रवृत्तींसह, सूक्ष्म राजकीय, प्रशासकीय 👇
Read 6 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
विष्णु सखाराम खांडेकर : (११ जानेवारी १८९८ - २ स‌प्टेंबर १९७६). प्रसिद्ध मराठी कथा-कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि स‌मीक्षक. खांडेकरांचे लेखन बहुविध स्वरूपाचे असून त्यात कादंबऱ्या, लघुकथासंग्रह, लघुनिबंधसंग्रह, रूपककथासंग्रह, १ नाटक ह्यांशिवाय काही चरित्रात्मक 👇
समीक्षात्मक ग्रंथ व संकीर्ण लेखसंग्रह ह्यांचा स‌मावेश होतो. तसेच त्यांनी मराठी, हिंदी व तेलुगू चित्रपटांसाठी एकूण १८ पटकथा लिहिलेल्या आहेत. तेजस्वी कल्पनाशक्ती आणि तल्लख विचारशक्ती या गुणांना शब्दप्रभुत्वाची जोड मिळाल्याने खांडेकरांची भाषाशैली आलंकारिक आणि सुभाषितात्मक ठरली. 👇
मराठी कादंबरीला तंत्रमंत्रदृष्ट्या प्रगल्भ व प्रभावी करण्याचे श्रेय  ना. सी. फडक्यांबरोबर खांडेकरांनाही दिले जाते. मराठी कथेला तर त्यांनी नानाविध प्रयोगांनी स‌मृद्ध व संपन्न केले. त्यांच्या बहुतेक साहित्यकृतींच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. अनेक कादंबऱ्यांचे भारतातील अन्य 👇
Read 7 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
निरंजन घाटे ( १० जानेवारी १९४६ ) मराठी भाषेतून विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार करण्यासाठी निरंजन घाटे यांनी सातत्याने ४० वर्षे लेखन केलेले आहे. घाटे यांनी मराठी वाचकांसाठी वैज्ञानिक संकल्पनांमधील क्लिष्ट आशय सोप्या आणि सुबोध मराठी भाषेत प्रकट करण्यासाठी 👇
लेख व विज्ञानकथाही लिहिल्या. देशी आणि परदेशी शास्रज्ञांची चरित्रे, त्यांना आलेल्या अडचणी, त्यांची अनन्यसाधारण व्यक्तिमत्वे, त्यांच्या वैज्ञानिक कामगिऱ्या त्यांनी उलगडून दाखविल्या आहेत. पर्यावरण, उत्क्रांती यांसंबंधीचे लेखन करून त्यांनी जनजागृतीचे कार्यही केलेले आहे. 👇
विज्ञान लेखनासाठी आवश्यक असणारी विशाल ग्रंथसंपदा त्यांनी मेहनतीने उभारलेली आहे. विज्ञान लेखनाप्रमाणे युद्धकथा, साहसकथा, हेरकथा आणि बालकुमार वाङ्मयनिर्मितीमध्ये रमतात.पुण्यातील मराठी विज्ञान परिषद, मराठी साहित्य परिषद आणि महात्मा फुले वस्तू संग्रहालय यांचे ते आजीव सदस्य आहेत. 👇
Read 6 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
गणेश हरि खरे (१०  जानेवारी  १९०१ -  ५ जून १९८५ ) महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इतिहास-संशोधक. इतिहासाचा सर्वांगीण अभ्यास आणि संशोधन करता यावे, म्हणून त्यांनी हिंदी, उर्दू, फार्सी, कन्नड, संस्कृत, इंग्रजी वगैरे भाषांचा सखोल अभ्यास केला; तसेच इतिहासाशी संबंधित अशा👇
नाणकशास्त्र, पुरातत्त्वविद्या, मूर्तिविज्ञान, पुरालेखविद्या यांचा अभ्यास केला. सर्व भारतभर प्रवास करून त्यांनी शेकडो ऐतिहासिक स्थळे तर पाहिलीच; पण नाणी, कागदपत्रे, पोथ्या व इतर ऐतिहासिक वस्तू जमा केल्या. सु. तीस इतिहासप्रसिद्ध घराण्यांचे कागद, २०,००० पोथ्या, ५,००० नाणी, 👇
८० चित्रे, ३० ताम्रशासने व २०० इतर वस्तू एवढे प्रचंड साहित्य त्यांनी जमा केले. या सर्वांचा उपयोग सामान्य विद्यार्थ्याला तसेच चिकित्सक संशोधकाला व्हावा, म्हणून त्यांवर त्यांनी सु. ४०० लेख आणि पन्नासहून अधिक लहान-मोठी पुस्तके लिहिली. दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने, 👇
Read 5 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
राजाराम भालचंद्र पाटणकर : (९ जानेवारी १९२७ - २४ मे  २००४ )सौंदर्यशास्त्र हा पाटणकरांच्या व्यासंगाचा व लेखनाचा खास विषय होय. क्रोचे व कांट यांच्या सौंदर्यशास्त्रीय विचारांचा चिकित्सक परिचय करून देणारे ग्रंथ ज्याप्रमाणे त्यांनी लिहिले त्याचप्रमाणे स्वतःची 👇
स्वतंत्र सौंदर्यमीमांसा विस्तृतपणे त्यांनी सौदर्यमीमांसा  या मौलिक ग्रंथात मांडली. साहित्यसमीक्षेच्या संकल्पनात्मक विवेचनाला त्यांची सौंदर्यमीमांसा अत्यंत उपयुक्त ठरते. पाटणकारंच्या सौंदर्यमीमांसेचे गुण व मर्यादा दाखवून देण्याचे कार्य प्रभाकर पाध्ये यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहून 👇
केले आहे. १९६९ साली इस्थेटिक्स अँड लिटररी क्रिटिसिझम  हे त्यांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यानंतर सौंदर्यमीमांसा , क्रोचेचे  सौंदर्यांशास्र : एक भाष्य व कांटची सौंदर्यमीमांसा ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली. यांपैकी सौदर्यमीमांसा हा ग्रंथ विशेष महत्त्वाचा असून त्यास 👇
Read 6 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
प्रभाकर ऊर्ध्वरेषे ( ९ जानेवारी १९१८ - १० जुलै १९८९ ) . ‘प्रतिभा’ आणि ‘किर्लोस्कर’ यांमधून लेखनास त्यांनी  सुरुवात झाली. १९४२ मध्ये ‘किर्लोस्कर’मधून ‘आम्ही हिंदू आहोत का?’ हा पहिला लेख लिहिला. ‘प्राध्यापकांनो, शिक्षक व्हा’ हा लेख त्या काळी गाजला होता. 👇
मार्क्सवादी विचारवंत, चांगल्यापैकी समीक्षक, पत्रकार, रशियन साहित्याचे अनुवादक अशीही त्यांची ओळख होती. अनेकविध चिनी व रशियन पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले. माओ, स्टालिन, पुश्कीन, गॉर्की यांच्या ग्रंथांचे तसेच रशियन आणि युक्रेनियन लोककथांचे अनुवाद त्यांनी केले. 👇
हरवलेले दिवस या आत्मचरित्रात मुंबई येथे कम्युनमध्ये राहताना तेथे आलेले अनुभव, कम्युनिस्टांची कार्यप्रणाली, त्यांची मुखपत्रे, त्यातील लेखनप्रक्रिया, स्वतःचा झालेला कोंडमारा, मानसिक त्रास, स्वतःचा भ्रमनिरास इत्यादी गोष्टींचे इत्थंभूत वर्णन व प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींचे 👇
Read 4 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
श्रीपाद  कृष्ण बेलवलकर : (१० डिसेंबर १८८० – ८ जानेवारी १९६७). थोर प्राच्यविद्यापंडित. संशोधनाच्या व लेखनाच्या क्षेत्रात बेलवलकरांनी बजावलेली कामगिरी मोठी आहे. गीता  व अभिज्ञानशाकुंतल  ह्या ग्रंथाची प्रमाणित आवृत्ती त्यांनी काढली, महाभारतातील भिष्मपर्व, व 👇
संपादन केले (भीष्मपर्व, १९५७ शांतिपर्व, १९५० ते ५३) दांडीच्या काव्यादर्शाची आवृत्ती काढून (१९२०) त्याचे इंग्रजी भाषांतरही प्रसिद्ध केले (१९२४). भारतीय तत्त्वज्ञानाच्या चिकित्सक इतिहासाची गुरुदेव डॉ.रा. द. रानडे ह्यांच्या सहकार्याने त्यांनी एक योजना आखली व तिच्यातील क्रिएटिव्ह 👇
पिरिअड हा वेद, ब्राह्मणे, उपनिषदे ह्यांच्याशी संबंधित असलेला दुसरा खंड लिहिला, संपादिला (१९२७). त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांत आणि संशोधनलेखांत माठरवृत्ति (१९२४), कॅनन्स ऑफ टेक्स्च्यूअल अँड हायर क्रिटिसिझम अप्लाइड  टू शाकुंतल (१९२५), वेदान्त फिलॉसफी (१९२९), बसु मलिक लेक्चर्स ऑन 👇
Read 6 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
प्रभा गणोरकर : ( ८ जानेवारी १९४५). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री, समीक्षक आणि संशोधिका. व्यतीत , विवर्त , व्यामोह  हे काव्यसंग्रह. बाळकृष्ण भगवंत बोरकर  हा समीक्षाग्रंथ तर बोरकरांची निवडक कविता  , गंगाधर गाडगीळ व्यक्ती आणि सृष्टी  , किनारे मनाचे, 👇
शांता शेळके यांची निवडक कविता ,आशा बगे यांच्या निवडक कथा  ही त्यांची संपादने आहेत. वाङमयीन संज्ञा संकल्पना कोश ,  संक्षिप्त मराठी वाड्ःमय कोश  भाग. १ आणि भाग २  ही त्यांची सहसंपादने आहेत एकेकीची  कथा , श्रावण बालकथा   याचे लेखन त्यांनी केले. तसेच त्यांनी  वर्तमानपत्रातून व 👇
नियतकालिकातून विपुल प्रमाणात पुस्तक परीक्षणे केली. विविध चर्चासत्रांतून निबंध वाचन केले. जगण्याच्या रुढ वर्तुळाबाहेर जाऊन जीवनानुभव घेणारी त्यांची कविता मानवी संबंधांचा शोध घेते. अस्तित्वशोध हे प्रभा गणोरकर यांच्या कवितेचे महत्त्वाचे आशयसूत्र आहे. समाजव्यवस्थेत स्त्री म्हणून 👇
Read 6 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
सरोजिनी बाबर : (७ जानेवारी १९२०‒२० एप्रिल २००८). मराठी लोकसाहित्याच्या संकलक-संपादक आणि अभ्यासक. त्यांची लोकसाहित्याची संपादने ग्रंथरूपाने प्रसिध्द आहेतच, पण समाजशिक्षणमालेची २७० संपादनेही त्यांच्या संपादनकार्यात समाविष्ट आहेत. समाजशिक्षणमाला ही त्यांचे वडील 👇
कृ. भा. बाबर यांनी सुरू केलेली पुस्तकमाला सर्वपरिचित आहे. शिक्षण, समाजकारण, लोकसाहित्य इत्यादी क्षेत्रांतली २८० लहानलहान पुस्तके या मालेद्वारे त्यांच्या वडिलांनी  प्रसिध्द केली. प्रारंभापासूनच वडिलांना त्यांच्या लेखनकामात साहाय्य करणाऱ्या सरोजिनीबाईंनी वडिलांच्या निधनांतर २७० 👇
पुस्तकांची मालेत भर घातली. याशिवाय मी पाहिलेले यशवंतराव आणि वसंतदादा पाटील गौरवग्रंथ या ग्रंथांची संपादने त्यांच्या नावे आहेत. कुमारवयीन मुलांसाठीही त्यांनी काही सहसंपादने केली होती.
कथा, कादंबऱ्या बालवाङ्मय इ. वाङ्मयप्रकारांचे त्यांनी स्वतंत्रपणे लेखन केले आहे. ७ कादंबऱ्या, 👇
Read 7 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
प्रा. प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे ( १६ जुलै १९४३ - ६ जानेवारी २०१० )हे मराठी भाषेमधील लेखक होते.प्राध्यापक, लेखक, मराठी भाषेतील साहित्यिक, दलित साहित्यिक म्हणून त्याची ख्याती देशभर आहे. "अस्मितादर्श" नावाच्या त्रैमासिकामधून त्यांच्या लिखाणाचा प्रारंभ झाला. 👇
'आठवणींचे पक्षी' हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्यातल्या समजूतदार भाषेने त्यांच्या दु:खाचे झाड गदगदून हलवून सोडले. सोनकांबळे यांनी सांगितलेली आयुष्याची वेदना झणझणीत आणि खरे तर संतप्त आक्रोशाची असली तरी दाह जाणवला तो शांत भाषेत.या आत्मचरित्राचे अकरा भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले.👇
याशिवाय "असं हे सगळं', "पोत आणि पदर' ही त्यांची ग्रंथसंपदा आहे.
'असं हे सगळं' हा ललित लेखांचा संग्रह आणि 'पोत आणि पदर' हा समीक्षा ग्रंथ अशी आणखी दोन पुस्तके त्यांच्या नावावर असली तरी सोनकांबळे यांची खरी ओळख आणि लेखक म्हणून ताकद एकवटली होती ती, 'आठवणींचे पक्षी' या आत्मकथनातच. 👇
Read 5 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
खलील जिब्रान ( ६ जानेवारी १८८३ - १० एप्रिल १९३१ ) हे लेबनॉनी-अमेरिकी कलावंत, अरबी भाषेतला कवी व लेखक होते. खलील जिब्रानने १९१८ पासून इंग्रजीत ग्रंथरचनेस प्रारंभ करून एकंदर नऊ इंग्रजी ग्रंथ लिहिले. त्यांच्या ग्रंथांची वीस भाषांत भाषांतरे झाली. 👇
आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या लेखनाची तुलना रवींद्रनाथ टागोरांशी (गीतांजली) केली गेली.
अरब जगतात जिब्रानला साहित्यिक व राजकीय बंडखोर मानले जाते. परंपरागत संप्रदायापासून फारकत घेणारी त्याची रोमांचक लेखन शैली, विशेषतः त्याच्या गद्यात्मक कविता आधुनिक अरब साहित्यातील 👇
प्रबोधनाच्या केंद्रस्थानी होत्या. लेबनॉनमध्ये आजही त्याला साहित्यिक हिरो मानले जाते.[२] इंग्रजी-भाषिक जगतात तो मुख्यतः १९२३ मधील ’द प्रॉफेट’ या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहे. काव्यात्म इंग्लिश गद्यात तात्त्विक निबंध असे अनोखे मिश्रण या छोटेखानी पुस्तकात आढळते. समीक्षकांच्या 👇
Read 5 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
विजय तेंडुलकर ( ६ जानेवारी १९२८ - १९ मे २००८ ) तेंडुलकरांची पहिली यशस्वी पटकथा म्हणजे ‘सामना’.एका साखरसम्राटाची ही कथा होती.तोपर्यंत मराठी साहित्यातही साखरसम्राटावर कादंबरी लिहिली गेली नव्हती.त्यापाठोपाठ ‘सिंहासन’ आणि ‘उंबरठा’ हे उत्कृष्ट मराठी चित्रपट लिहिले.👇
याच काळात श्याम बेनेगल यांच्यासाठी ‘निशांत’ व ‘मंथन’ हे दोन हिंदी चित्रपट लिहिले. ‘मंथन’साठी विजय तेंडुलकर यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले.‘मानवत खून खटल्यावर’ त्यांनी ‘आक्रीत’ हा चित्रपट लिहिला. फ्रान्सच्या नाण्टस महोत्सवामध्ये या चित्रपटालाही उत्कृष्ट 👇
चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. नंतर गोविंद निहलानींसाठी ‘आक्रोश’ लिहिला.नंतर अर्धसत्य. 'गृहस्थ' हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. (याचेच "कावळ्यांची शाळा' या नावाने त्यांनी १९६४ साली पुनर्लेखन केले) मात्र 'श्रीमंत' हे त्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक होते. सुरुवातीच्या नाटकांपासूनच👇
Read 8 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!