Discover and read the best of Twitter Threads about #irmarathi

Most recents (6)

लडाख LAC वर disengagement वर बोलण्या आणखी सुरूच आहेत. काल चायनीज LAC साइडवर moldo येथे 5वी कॉर्प कमांडर लेव्हलची बोलणी झाली. आतापर्यंत भारत-चीनमध्ये लडाख LACवर भारताकडून परराष्ट्रमंत्री जयशंकर, NSA अजित डोवाल, स्पेशल envoy representative, कॉर्प कमांडर्स आणि चीनकडून समांतर लेव्हल
च्या लोकांशी बोलणी झाली आहे.
◆ आतापर्यंत disengagement ची परिस्थिती:
गलवान मध्ये थोडीफार पीछेहाट झाली आहे पण पूर्णपणे म्हणजे एप्रिलच्या स्टेटस क्वोप्रमाणे नाही.
पंगोंग लेक भागात PLAची संख्या कमी झाली असली तरी आणखी फिंगर 4 ते 5 मध्ये चीन बिलकुल मागे हटलेला नाही.
डेपसांग प्लेन भागात बिलकुल पीछेहाट झाली नाही.इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार डेपसांगमध्ये चीन 16-17किमी आत आहे. येथे बॉटलनेक एरियात भारतीय सैन्याला पेट्रोलिंग करण्यात PLAकडून अडवणूक होत आहे.
काल झालेल्या कमांडर लेव्हल बोलणीमध्ये भारताकडून पंगोंगच्या फिंगर एरियातील disengagement
Read 7 tweets
मागच्या आठवड्यात कच्या तेलाच्या किंमतीवरून सौदी अरब आणि रशियामध्ये मतभेद झाले आणि सौदी अरबने आक्रमक स्टँड घेत मार्केटमध्ये गरजेपेक्षा अधिक तेल आणायचं ठरवलं तेही दरात सूट देऊन..(discounts on prices)
या घटनेचा परिणाम असा झाला की जगभरातील मार्केट क्रॅश होऊ लागले. (1)
जगाची ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी तेलाचा सगळ्यात मोठा वाटा आहे. तेलाची किंमत कमी होणे हे निर्यात, व्यापार, रिफाईन करणाऱ्या सगळ्यांना भयंकर नुकसानकारक आहे. तेच तेलाची आयात करणाऱ्यांना याचा फायदा उठवता येऊ शकतो. (2)
तेलजगतात सगळ्यात मोठे आयातदार देश आहेत चीन, अमेरिका, भारत आणि युरोप. भारत तिसरा मोठा आयातदार देश आहे. आपण पूर्ण ऊर्जेच्या गरजेचे 84% कच्चे तेल आयात करतो.
तेलाचे उत्पादक आणि निर्यातदार देशांत ओपेक देश सामील आहेत.
(यासाठी @prathameshpurud ने ओपेक वर लिहलेली थ्रेड फॉलो करा) (3)
Read 19 tweets
अफगाणिस्तान विषयी मला वैयक्तिक आकर्षण आहे. मैलांवर पसरलेली खडकाळ आणि डोंगराळ जमीन जी वाळवंटाने घेरलेली आहे. पण जमीन मात्र नद्यांनी परिपूर्ण! अगदी राजधानीही डोंगररांगांच्या पुढ्यात वसलेलं शहर.. देश म्हणून एक होण्याअगोदर या जमिनीने भरपूर आक्रमणं झेलली आहेत. ब्रिटिशांनी सोव्हिएत (1)
या भागात घुसू नयेत म्हणून स्वतःच तीन वेळा आक्रमण केले तिन्हीवेळा अफगाणीनी त्यांना हाकलून लावला, करार झाले. अफगाणिस्तान देश म्हणून मान्यता मिळाली. भारताशी सीमा लागत नसली तरी भारताशी चांगले संबंध असल्याने तिथल्या जनतेत भारताबद्दल कधीच आकस नव्हता. पण दोघे एक होण्यामागे पाकिस्तान (2)
बद्दल असलेलं हाडवैर कारणीभूत आहे. भारत पाकमधील वैर आपल्याला ठाऊक आहे. अफगाणिस्तानचेही पाकिस्तान बद्दल मत कधीच चांगले नव्हते. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मध्ये असलेली सीमारेषा दुरान्त लाईन अफगाण्यांनी कधीच मानली नाही. शिवाय पाकिस्तानला यूएन सदस्यत्व देण्यालाही अफगाण्यांनी विरोध (3)
Read 24 tweets
आज तालिबान-US मध्ये शांतता करार झाला आहे.
यामागे मोठा इतिहास आहे..
◆अमेरिका अफगाणिस्तानमध्ये का उतरला?
◆सोव्हिएतविरुद्ध अफगाणी मुजाहिद्दीन का लढत होते?
◆अमेरिकेने तालिबान निर्मितीसाठी जमीन कसून तयार केली त्याची सुरुवात कशी झाली?
या प्रश्नांची थोडक्यात ओळख करून घेऊया..
भाग १
सोव्हिएत विरुद्ध लढणाऱ्या अफगाणी बंडखोरांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव/प्रोजेक्ट हा CIA च्या इतिहासातील सगळ्यात दीर्घकालीन आणि खर्चिक प्रोजेक्ट होता. याचे दूरगामी परिणाम जागतिक राजकारणात झाले आणि आजही होत आहेत. अफगाणिस्तान मधल्या कारवायांसाठी CIAच्या मदतीने पाकिस्तानमध्ये
लष्करी प्रशिक्षण देणारी केंद्रं अमेरिकी मदतीनेच उभारली गेली होती. यातून बाहेर पडणारे अतिरेकी हे नुसतेच लढायला तयार नसत तर त्यांच्यावर कट्टर इस्लामीकरणाचे संस्कारही झालेले असायचे. त्यामुळे अफगाण मध्ये सुरू असलेले युद्ध हे इस्लाम आणि इस्लामविरोधी सोव्हिएतमध्ये सुरू आहे असा विचार
Read 26 tweets
चिमणी करते चिव चिव कावळा करतो काव काव या अशाच वाक्यापासून आपल्यापैकी बहुतेक सर्वांची या शिक्षण क्षेत्रात सुरुवात झाली असावी .पण सद्याच्या परिस्थितीत ही सुरुवात बदललेली दिसते.ती नुसतीच बदललेली नाही तर पूर्णतः भाषाच बदलली आहे. ती झाली इंग्रजी..?ती का झाली?कशी झाली?
हे विवादास्पद प्रकरण बाजूला ठेऊन आजच्या मराठी भाषा दिनाच्या तुम्हला शुभेच्छा देऊन भाषा या विषयावर त्याहून मराठी या भाषेवर बोलू.
भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन असते . वर उल्लेख केल्याप्रमाणे हे प्राणी पशूपक्षी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विविध
प्रकारे आवाज काढतात ती भाषाच असते.आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आपण कधी डोळे वाटरतो कधी भुवया उंचावतो तर कधी मान हलवतो ही झाली हावभावची भाषा भाषा दोन प्रकारची असते १.स्वाभाविक/नैसर्गिक २.कृत्रिम/सांकेतिक.
हावभावाची भाषा ही कृत्रीम .
Read 12 tweets
इराण करार:

१९८०च्या दशकापासून इराण अण्वस्त्रांचा विकास करत आहे,असा आरोप केला जात होता. ७९ मध्ये इराणमध्ये मध्ये झालेली इस्लामिक क्रांती आणि त्यानंतर आलेलं कडवं शासन याचे अमेरिकेसोबत वाद सुरू झाले. इराणच्या शासनाने इराण कडेही अणुबॉम्ब असला पाहिजे अशी इच्छा बाळगण्यास सुरुवात केली.
ही महत्वकांक्षा बाळगणारे अयातुल्लाह खोमेनी पश्चिमी देशांचं वर्चस्व नाकारणारे होते. इराण गुप्तपणे अण्वस्त्रांचा विकास करत होता, अशी शंका आशियायी आणि पश्चिमी देशांना होती. म्हणून २००६ साली यूएन, अमेरीका, युरोपियन युनियन ने इराणवर आर्थिक निर्बंध टाकले.
इराणने आपला अण्वस्त्र विकासाचा कार्यक्रम त्वरित थांबवावा म्हणून हे निर्बंध लादले गेले. याचा परिणाम इराण च्या अर्थव्यवस्थेवर झाला. इराणी चलनाचे ४० टक्क्यांनी अवमूल्यन झाले.
२०११ मध्ये प्रतिदिवशी इराण मध्ये २२ लाख बॅरल तेलाचे उत्पादन होत होते, ते कमी होऊन ७ लाख बॅरल वर आले.
Read 19 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!