Discover and read the best of Twitter Threads about #mayurthelonewolf

Most recents (24)

स्त्रियांनी बाहेर पुरुषांप्रमाणे काम करू नये या मताचा मी अजिबात नाही उलट स्त्रियांनी आजच्या जमान्यामध्ये स्वावलंबीच असावे हे माझे आग्रही मत असते. परंतु हे मत बनण्यामागे समाज कारणीभूत आहे. समाजाने सगळ्यांच्याच अपेक्षा बदलवून ठेवलेले आहेत.
काही दशकांपूर्वी जवळपास सर्व घरांमध्ये पुरुष काम करायचे व स्त्रिया घर सांभाळायच्या. त्यावेळेला मोठे घर किंवा फॉरेन ट्रिप या अपेक्षा देखील नव्हत्या. आता सामाजिक बदलानुसार स्त्रिया नोकरी करायला लागल्या व त्यानंतर नवरा व बायको दोन्ही कमवायला लागले त्यामुळे आपसूक सुरुवातीला काही
कुटुंबांमध्ये भरपूर पैसा येऊ लागला. ज्या ठिकाणी एकाच माणसाचे उत्पन्न येत होते तेथे दोन माणसांचे उत्पन्न येऊ लागले. हळूहळू काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढली. नवरा बायको दोन्ही काम करत आहेत अशा कुटुंबांची संख्या वाढली. त्यामुळे सामाजिक परिस्थिती ही पूर्ण बदलली.
Read 14 tweets
कॉम्प्युटर किंवा मोबाईल आणि आपण यात बरेच साम्य आहे.
आपल्या शरीर म्हणजेच एका प्रकारे कम्प्युटरचे हार्डवेअर.
आपला मेंदू व त्याचे विविध भाग म्हणजे एका प्रकारे कम्प्युटरचा प्रोसेसर व मेमरी.
योगशास्त्रानुसार आपले चार देह आहेत.
स्थूल
सूक्ष्म
कारण
आणि महाकारण
यामध्ये स्थूल देह व कम्प्युटरचे हार्डवेअर या गोष्टी अगदी सहजपणे समजून येऊ शकतात.
सूक्ष्म देह म्हणजे आपल्या मनाच्या जाणीवेवर चाललेल्या गोष्टी. मग ते स्वप्न असो किंवा कोणत्याही भावना.
कॉम्प्युटर मध्ये आपण याला ऑपरेटिंग सिस्टीम म्हणू शकतो.
कॉम्प्युटरचे कितीही भाग एकत्र आणले त्यात प्रोसेसर असला मेमरी असली व त्याला पॉवर सप्लाय दिलेला असला तरी देखील त्यावर काम करणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा त्यावर कोणतीतरी ऑपरेटिंग सिस्टीम असेल. ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय कोणतेही सॉफ्टवेअर तेथे लोड होऊ शकत नाही.
Read 17 tweets
रिलेशन/ लग्नामध्ये होणाऱ्या सर्वसामान्य अडचणी:

एकमेकावर प्रेम करणारे लोक काही वर्षातच त्रासलेले असतात. त्रासलेले दिसतात. लोक एकमेकावर प्रेम करतात परंतु त्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या गोष्टीबाबत कधी विचार करत नाही. त्याचा कधीही अभ्यास देखील करत नाहीत.
माझ्या बायकोला किंवा नवऱ्याला मी चांगलाच ओळखतो अगदी पाच वर्षापासून वगैरे असे वाटत असते लोकांना. परंतु पूर्णपणे चुकीची समजूत आहे ती.

मुळातच स्त्रिया आणि पुरुष हे पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या.
सुरुवातीला प्रेमाच्या काळात भावनेने एकमेका साठी काय करू आणि काय नाही असे भेटलेले प्रेमवीर काही काळाने विझून जातात. कारण एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण होत नसतात.
Read 38 tweets
त्रिकाळ
(ही निव्वळ काल्पनिक भयकथा आहे. कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीचा आणि घटनांचा याच्याशी कोठेही संबंध नाही)
भाग 1
कोकणा मधील एक गाव. तसे तुरळक वस्तीचे. भर पावसाळ्याचे दिवस होते. आधीच पुर येऊन गेलेला. यावेळचा पूर तसा भयानक होता. आजूबाजूच्या वस्त्यांमधील लोक वाहून गेले होते
बाजूच्या गावांमध्ये प्रचंड मोठी दरड कोसळली होती. भर रात्री. अख्खीच्या अख्खी कुटुंब पूर्ण डोंगराखाली गाडली गेली. आजूबाजूचे सर्व गावे व त्यामधील लोक निसर्गाच्या अशा प्रकारच्या रूपाला भेदरून गेले होते.
एकंदरीतच स्मशान शांतता होती. एकप्रकारची काळी विकृत सावली पडली होती.
या गावामधील रम्या तसा हुशार मुलगा आणि धाडसी देखील. दहावी मध्ये होता तो.  फारशी कोणाची फिकीर नाही. त्याच्या घरी कधी पुराचे पाणी शिरत नसे. यावर्षी त्यानेदेखील स्वतःच्या घरात पाच फूट पाणी अनुभवले होते.
Read 26 tweets
तुला कल्पना नाहीये की मी तुला भेटवस्तू देण्यासाठी काय काय नाही शोधले
कोणतीच गोष्ट बरोबर वाटत नव्हती भेटवस्तू म्हणून.
कारण
सोन्याच्या खाणीला सोन्याचा कण देऊन काय उपयोग?
आणि समुद्राला पाण्याचा थेंब देऊन काय उपयोग?
मी असेही म्हणू शकत नाही की माझं हृदय आणि आत्मा मी तुला देईन
कारण ते आधीच तुझं झालेल आहे
म्हणून मी तुझ्यासाठी आरसा आणलेला आहे.
त्यामध्ये स्वतःला बघ, मीच दिसेन.

रुमी....
हा अनुवाद आहे माझ्या एका आवडत्या कवितेचा. अर्थात ती कविता देखील इंग्लिशमध्ये अनुवाद केलेली आहे पर्शियन लैंग्वेज मधून. इंग्लिश मध्ये ही कविता वाचताना खूप छान वाटते. मराठीतले भाषांतर तेवढे खास वाटत नाही. खालील आहे इंग्लिश भाषांतर पर्शियन भाषेतून केलेले. किंवा मला जमले नाही नीट.
Read 24 tweets
प्रसंग 1:
तुम्ही एका पर्वतावरील कड्यावर उभे आहात. पुढे अत्यंत कठीण असा रस्ता आहे. जेथे तुमच्या उजव्या बाजूला दरी आहे , डावीकडे दगडाची प्रचंड मोठी भिंत आणि रस्ता जेमतेम अर्ध्या फुटाचा.
आणि तुम्ही पुढे जायचा निर्णय घेता.
प्रसंग 2:
तुम्ही जंगलात उभे आहात. तुमच्या समोर वाघ आला. तुम्ही पळून न जाता वाघावर हल्ला करून स्वतःचा बचाव करण्याचा निर्णय घेता.
प्रसंग 3:
तुमचे तुमच्या मित्राबरोबर प्रचंड भांडण झाले. मारामारी झाली. आणि तुम्ही त्या मित्राची कधीही न बोलण्याचा निर्णय घेतला
हे तिन्ही प्रसंग स्वप्नातले आहेत.

आता तुम्ही या स्वप्नात कितीही निर्णय स्वतःच्या इच्छेनें घेतलेले आहेत असे तुम्हाला वाटत असेल तरी खरंच तसे आहे का?

कारण स्वप्नात डोंगर, दरी, पायवाट, वाघ, जंगल ही प्रत्येक गोष्ट मनाने तयार केलेली आहे.
Read 12 tweets
Nandu's sanctuary:

दरवर्षीप्रमाणे 2020 मध्ये देखील देखील जंगलात जाण्याचे ठरवले. जंगलातला अनुभव हा वेगळाच असतो. परंतु त्या वर्षी जे काही बघितले ते मात्र अफाट आणि कल्पनेच्या बाहेर होते. लिहायचे म्हटले तर किती मोठे लिहावे लागेल याची कल्पना नाही.
बाकी जंगलांमध्ये आपल्याला गाड्या फिरवतात व ठराविक जागां पाशी जाऊन आपल्याला प्राणी दिसतात किंवा पक्षी दिसतात व त्याचा आनंद आपण घेत असतो व फोटो काढत असतो. परंतु चिपळूण जवळ कोकणातील ही जागा मात्र बाकी जंगल सफारी या कल्पनेच्या पूर्णपणे वेगळी व अत्यंत जबरदस्त आहे.
या ठिकाणी जाण्याचे आम्हाला अभिजीत (माझा भाऊ) ने सुचवले होते वर्षभरापूर्वीच. परंतु त्याचा विचार मात्र आम्ही आत्ता या वर्षी केला. जवळपास 40 एकर चे हे जंगल खाजगी मालकीचे आहे. निशिकांत तांबे म्हणजेच नंदू आणि तांबे परिवार यांनी हे जंगल अशा प्रकारे समृद्ध केले आहे की त्याला तोड नाही.
Read 40 tweets
सांख्य शास्त्रात पुरुष आणि प्रकृती आहे.
पुरुष हा शांत, फारसे काही न करणारा घरच्या प्रमुखासारखा.
प्रकृती म्हणजे लग्न घरात घरातील स्त्री कशी सगळीकडे फिरून सगळे बघत असते तशी. पण कोणतेही महत्वाचा निर्णय असेल की ती मुख्य पुरुषाकडे जाऊन फक्त समत्ती मागते.
तो देतो. मग पुढचे काम तींसुरू करते.

जग तसेच चालू असते असे सांख्य शास्त्राचे दृष्टिकोन.
परमेश्वर म्हणजे निराकार अनादी असा पुरुष. जो स्वतःहून कुठेच हस्तक्षेप करीत नाही.
माया म्हणजेच प्रकृती. जिच्यामुळे जग चालते.
अद्वैत वेदांत थोडासा वेगळा.
पण त्यात असतो तो ब्र म्ह न. जो म्हणजेच आपण सर्व.

द्वैत वादी लोकांसाठी शिव, विष्णु हे पुरुष रुपी.

परंतु मला अद्वैत वेदांत जास्त भावतो. त्यामुळे प्रत्येक जिवंत, निर्जीव , स्त्री पुरुष, प्राणी, डोळ्यांनी दिसणाऱ्या ,
Read 7 tweets
डिप्रेशन वरील अत्यंत जालीम व पूर्ण प्रभावी उपाय: अद्वैत वेदांत...

ज्याच्या बुद्धीला अद्वैत वेदांत थोडा जरी कळला असेल त्याच्या मनात कधी डिप्रेशन किंवा असले निगेटिव्ह विचार येणे शक्य नाही. आले तरीदेखील स्वतःहूनच त्यांना पळवून लावायची ताकद स्वतःच्या आत आपोआप आलेली असते.
आजपर्यंत मी अनेक पोस्ट टाकल्या अद्वैत वेदांत यावर. परंतु असले कसले तत्वज्ञान किंवा उगाचच जड जड विषयांवर काय हा माणूस लिहित असतो असेदेखील बऱ्याच लोकांना वाटत असते. उगीचच डोक्याच्या वर चे विषय आणि अद्वैत वेदांत सारखे जड नावे बघून नव्वद टक्के लोक या गोष्टी वाचत नाहीत.
परवा मी टाकलेल्या लोकांच्या पोस्ट बद्दल अनेकांच्या कमेंट्स आल्या..तू किती माणुसकी नसलेला किंवा निष्ठूर आहेस वगैरे वगैरे. त्यातील बऱ्याच जणांनी मी लिहिलेल्या आद्वैत वेदांताच्या पोस्टवर कधीही काहीही लिहायचा प्रयत्न केला नाही किंवा त्या वाचल्या देखील आहेत की नाहीत माहित नाही.
Read 27 tweets
आपल्या सध्याच्या सनातन धर्मात दुफळी का आहे याचे कारण शोधायचा प्रयत्न करत होतो.
खरे तर सनातन धर्म म्हणजे सर्वव्यापी.
याच ठिकाणी एकमेकाच्या मतांना आव्हान देणारी दर्शनांची निर्मिती झाली. प्रत्यक्षात कोणी किती दर्शने वाचली आहेत हे मला माहीत नाही. परंतु मुल सनातन धर्मात किती पद्धती
आणि प्रकार आहेत हे देखील लोकांना माहीत आहे की नाही याबद्दल मला कल्पना नाही. परंतु केवळ आपल्या बायो मध्ये सनातनी असे नाव लावले की काम झाले असे प्रत्येकाला वाटते. सनातन धर्म याचे प्रमुख साहित्य मानले जाते ते म्हणजे वेद.
या वेदांना धरूनच अनेक दर्शनाची निर्मिती झाली.
तर वेदांना धरुन असणाऱ्या साहित्याला आपल्या भारतात वैदिक अशी मान्यता मिळते. परंतु जे वेदांना मानत नाहीत त्यांना देखील आपल्याकडे तेव्हढीच मान्यता आहे. असे महान आहे भारतीय तत्त्वज्ञान आणि अध्यात्म.
Read 19 tweets
A stolen life: Jaycee dugard...
The girl who was kidnapped for 18 years.

हे पुस्तक वाचले तर पुढे काही दिवस झोप येणार नाही किंवा प्रचंड अस्वस्थ असाल.
खऱ्या घटनेवर आधारित पुस्तक माझ्या हातात तीन वर्षांपूर्वी पडले. जगामधील सगळ्यात मोठी म्हणजे अठरा वर्ष किडन्याप केल्या गेलेल्या Image
मुलीने लिहिलेले पुस्तक आहे हे.

Jaycee dugard नावाची एक सुंदर छोटी अकरा वर्षाची मुलगी शाळेमध्ये जात असताना तिला एका व्यक्तीने किडनॅप केलेले. त्यानंतर ते 18 वर्ष त्या माणसाच्या ताब्यात होती. तिचा अकरा वर्षाचा असताना
चा फोटो या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती आहे. वय वर्ष 29 झाल्यावर तिची सुटका झाली आणि ती देखील अत्यंत आश्चर्यकारक आणि आपल्याला विचार करायला लावणाऱ्या पद्धतीमुळे.

तो माणूस आणि त्याची बायको या दोनच व्यक्ती जेसी क्या आयुष्यात होत्या त्या 18 वर्षात. तो माणूस प्रचंड
Read 24 tweets
ओम
या शब्दाला आपल्याकडे प्रचंड महत्त्व आहे. याचा अर्थ विविध प्रकारे सांगण्यात येतो. परंतु एक उपनिषद खास या शब्दासाठी तयार केले गेले आहे ते म्हणजे मांडक्योपनिषद.
अ ऊ म या तीन अक्षरांचा व त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा अर्थ या उपनिषदात सांगण्यात आला आहे.
तर हे उपनिषद काय सांगते? केवळ 12 श्लोक असलेले हे उपनिषद्. यामध्ये कोणत्याही दैवतांची चर्चा नाही, आपण रोज जे काही अनुभवतो त्या गोष्टींचा आधार घेऊन ब्रह्म म्हणजेच परमेश्वर काय आहे तो सांगण्याचा प्रयत्न यात आहे. अद्वैत वेदांत किंवा उपनिषदांची खासियत हीच.
रोजच्या रोज आपण जे काही अनुभवतो त्याचा आधार घेऊन बुद्धीच्या द्वारे त्याच्या खोलात शिरून त्याचा नक्की अर्थ काय हे समजून घेणे.
तर मांडक्योपनिषद हे सांगते आपल्या तीन अवस्था ज्या आपण रोज अनुभवतो
1. जागृतावस्था: आपण रोज दिवसभरात जे काही करत असतो ते म्हणजे जागृत अवस्था
2. स्वप्नावस्था:
Read 20 tweets
एक अथांग समुद्र. यामध्ये असंख्य लाटा.

एक नवीन छोटीशी लाट या समुद्रा मध्ये तयार झाली. तिला पण बेबी लाट म्हणू.

इकडे तिकडे बघून इतके मजा वाटली तिला. छोटे बुडबुडे कायम इकडे तिकडे येत होते. फेस असलेले पाणी. त्या छोट्या बुडबुडे बघून लाटेला वाटू लागले मी
बघा किती मोठी तुमच्यापेक्षा. एवढ्यात कैक मोठ्या लाटा देखील दिसल्या मग थोडीशी हिरमुसली. हळूहळू ही पण मोठी होत होती.

तेवढ्यात तीचे लक्ष किनार्‍यावर गेले. तेथे अनेक लाटा जाऊन जमिनीवर आपटत होत्या किंवा दगडांवर
आपटत होत्या आणि फुटून नष्ट होत होत्या.

तेवढ्यात तिला शेजारी एक मोठी लाट दिसली..

बेबी लाट: काय हो या लाटा किनाऱ्यावर जाऊन मरतात का?

मोठी लाट: हो कोणतीही लाट किनाऱ्या वर जाऊन आपटून फुटून नष्ट होऊन जाते.
Read 15 tweets
बरेच लोक स्थळ जुळवणे, लग्नामध्ये मध्यस्थी करणे वगैरे वगैरे काम करत बघितलेले आहे. बसल्या बसल्या कुंडल्या जुळवत बसणे. व आपण दोघांचे लग्न जुळवून किती मोठे काम केले आहे असे अत्यंत मानभावीपणाने समजतात आणि सांगतात.
त्यांच्याकडूनच इन्स्पिरेशन घेऊन एकटे, single, bachelor राहण्याची इच्छा असणाऱ्या मुलामुलींसाठी सल्ला *केंद्र किंवा *कोर्स उघडले पाहिजे असे वाटायला लागले आहे 😒😒😒🤣🤣
या कोर्समध्ये खालील गोष्टींचा समावेश करावा असे वाटते.

श्रींच्या कृपेने..
1. एकटे राहणे फायद्याचे कसे आहे हे त्या इच्छुक मुलाला आणि मुलीला किती समजले आहे हे बघून ते पूर्णपणे मनावर बिंबवणे.😁
2.आजूबाजूच्या लोकांना व्यवस्थित उत्तरे देऊन त्यांची तोंडे बंद कशी करावी याचे प्रशिक्षण.
Read 7 tweets
आज जंगली महाराज रस्त्यावर थांबलो आणि एका हॉटेल मध्ये जाऊ लागलो. एवढाच दोन मॅनेजमेंट वगैरे करणाऱ्या मुली असतात, ज्या काही survey वगैरे करतात अश्या मुलींनी मला थांबवले. काहीतरी गळ्यात मारणार असे वाटत होते तेव्हाच त्यांनी सुरुवातीला सांगितले की आम्ही काहीही विकायला आलेलो नाही
त्यानंतर त्याने बरीच मोठी कहाणी सांगून त्यानंतर एक पुस्तक दाखवून त्यामध्ये बरेच फोटो दाखवून एकंदरीत हे सांगायचा प्रयत्न केला की भारतात एकूण किती मुलांचा जन्म झाल्यानंतर लवकर मृत्यू होतो. UNICEF त्यावर कसे काम करत आहे व त्याद्वारे तुम्ही कसे पैसे डोनेट करू शकता जेणेकरून
त्या मुलांचे आयुष्य वाचले जाऊ शकते. वगैरे वगैरे

त्या वेळेला माझ्या मनात विचार आला तो हा

1. UNICEF सारखे संघटना इतकी प्रचंड मोठी आहे व तिला इतका मोठा फायनान्स देखील मिळत असतो तरी देखील रस्त्यावर जाऊन भीक मागायची गरज काय?
Read 8 tweets
लहानपणी आजी घरात नेहमी सांगायची ही नकारार्थी बोलायचं नाही किंवा वाईट बोलायचं नाही कारण वास्तुपुरुष कोणत्याही गोष्टीला तथास्तु म्हणत असतो. त्यामुळे घरात नेहमी चांगले व सकारात्मक बोलावे.
सहा एक वर्षांपूर्वी सहजच काही पुस्तके वाचायला घेतली. लॉ ऑफ अट्रॅक्शन चे फ्याड लय वाढत असलेले बघून अंतर्मनावर भरपूर काम केलेला डॉक्टर जोसेफ मर्फी याची बरेच ची पुस्तके वाचून काढली. पॉवर ऑफ सबकॉन्शस माइंड हे त्यांचे सर्वात गाजलेले पुस्तक.
प्रत्येक माणसाने खरोखर एकदा वाचावे कारण त्याचा नक्कीच फायदा प्रत्येकाला होईल.
त्या म्हणण्याप्रमाणे दोन मने आपल्याला असतात एक बहिर्मन आणि एक अंतर्मन..

बहिर्मन म्हणजे मेंदू व त्याचा कार्यभाग डिसिजन घेण्याची क्षमता वगैरे वगैरे. परंतु अंतर्मन म्हणजेच सब कॉन्शियस माइंड
Read 19 tweets
दोन दिवसापूर्वी एक लेख वाचला. त्यामध्ये स्त्रीचे आईमध्ये रूपांतर कसे होते किंवा स्त्रीला त्यातून कशा पद्धतीने जावे लागते याबद्दल. त्यामध्ये किती ती कष्ट व वेदना असतात व त्याच प्रमाणे त्यात वात्सल्य व प्रेम या गोष्टी कश्या असतात वगैरे वगैरे. पुरुषांसाठी मात्र या गोष्टी पूर्ण
वेगळ्या असतात..बाजू छान मांडली होती.

पण माझा मुद्दाच वेगळा आहे यावर.....अर्थात माझा विषय मूळ विषयाला सोडून काहीतरी भलताच असतो यात वाद नाही. सवय आहे ती कशी जाणार...
परंतु हे सगळे वाचताना माझ्या मनात हा प्रश्न आला की मुलांना जन्म देण्याचे धाडस कुठून येते लोकांकडे? अर्थात हे मी थट्टेने किंवा टीका करण्यासाठी बोलत नाहीये तर मला खरोखर त्याचे नवलही वाटते आणि जिज्ञासा देखील.
Read 23 tweets
गुमनामी बाबा - 4
#नेताजी #gumanami #subhash_bose

नेताजी यांच्या विमान अपघातातील मृत्यूची बातमी देशांमध्ये पोहोचली होती. सर्व देशावर दुःखाची छाया पसरली होती. काही लोकांमध्ये शंका-कुशंका नेताजींचा मृत्यू या बाबत उलट सुलट चर्चा चालू होत्या.
परंतु त्यावर कोणताही राजकीय विचार किंवा ॲक्शन अशी गोष्ट नव्हती कारण नेताजींचा मृत्यू झालेला आहे हे मान्य करण्यात आले होते.

सर्वात पहिल्यांदा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूवर काम करण्यास अमेरिकेने चालू केले. कारण नेताजींच्या मृत्युचा एकही स्पष्ट पुरावा कोणा समोरच नव्हता
त्यांचे मृत शरीर कोणाच्याही हाती लागले नाही किंवा त्यांच्या मृत शरीराचा फोटो कुठेही नव्हता किंवा त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल कोठेही नव्हता. अशाप्रकारे डायरेक्ट लिंक असलेला कोणताच पुरावा त्याबाबत उपलब्ध झाला नाही त्यामुळे अमेरिका व इंग्लंड या बाबत साशंक होती. नेताजींचा मृत्यू
Read 40 tweets
गुमनामी बाबा : ३
#नेताजी
#gumnamibaba

हे लेख लिहिणे यामागे कोणावरही टीका किंवा कोणावरही आक्षेप घेणे हा उद्देश नाहीये तर सत्य काय होते हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न आहे. स्वतंत्र भारताचे पहिले सरकार स्थापन करणारे, पहिली आर्मी स्थापन करणारे, पहिले चलन काढणारे, पहिला ध्वज असलेले
असलेले सरकार म्हणजे नेताजी.
नेताजी सुभाष चंद्र बोस त्यांच्या गूढ मृत्यूबाबत आपण पर्याय निवडून काढले तर ते 3 निघतात.
1. विमान दुर्घटना (सरकारी मान्यता )
2. रशियामधील मृत्यू
3. गुमनामी बाबा
आपण आता जे 3 ऑप्शन आहेत ते क्रमाक्रमाने बघणार आहोत. त्यातील पहिली शक्यता व ज्याला सरकारने
मान्यता दिलेली आहे ते version बघू.

ते म्हणजे नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात झाला.

अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकून दुसरे महायुद्ध संपवले होते. येत्या काही दिवसात जपानच्या शरणागतीची तयारी चालू होती. सिंगापूर मध्ये हेड क्वार्टर्स किंवा हेड ऑफिस असलेल्या INA मध्ये देखील
Read 27 tweets
सत्य भयकथा:अमावस्येच्या मुहूर्तावर❤️

कोलवा बीच, ते हॉटेल आणि ती खोली.......

मी:

माझी चौथीची परीक्षा संपली. मे महिन्याच्या सुट्ट्या चालू झाल्या. आई बाबा म्हणाले होते कुठेतरी फिरायला जायचे आहे. कोठे ते काहीच सांगितले नव्हते मला. सुट्टी
लागल्यावर तीन-चार दिवसांनीच सकाळी सहा वाजताच आंबेसेटर दाराशी आली. बाबांच मित्राची गाडी होते व तोच ते गाडी चालवणार होता.

आम्ही निघालो. मी विचारत होतो कुठे जातोय. आई म्हणाली, "आपण गोव्याला फिरायला चाललो आहोत."
मी असला खुश झालो. पण आधी का मला सांगितले नाही म्हणून वादही घातला.

गोव्याला आम्ही साधारण संध्याकाळी सहाला वगैरे पोहोचलो. मला आता सगळी नावे आठवत नाहीत. परंतु एका मस्त हॉटेलमध्ये बाबा आणि बाबांचा मित्र असे
Read 55 tweets
लग्नाची उत्पत्ती.

बऱ्याच जणांसाठी हा लेख म्हणजे अत्यंत जहाल जळजळीत असे रसायन असू शकेल त्यामुळे वाचायच्या आधीच विचार करा.

उत्क्रांतीवाद या वरती केलेले बरेच पेपर आणि डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत.
त्याचप्रमाणे ज्यांना वैद्यकशास्त्र कळते किंवा स्त्री आणि पुरुष यांच्या शरीर व मन काय पद्धतीने बनले आहे हे कळते या लोकांशी देखील तुम्ही या विषयी प्रामाणिकपणे बोलून बघा. याची देखील गरज नाही जर का तुम्ही खरोखर स्वतःच्या आत मध्ये खोलवर शिरून गोष्टी बघू शकतात तर....
मुळामध्ये सेक्स हे गोष्ट अति प्रचंड महत्त्व देऊन उदात्त केले गेलेली गोष्ट आहे. खरेतर एक सर्वसाधारण शारीरिक गरज इतकेच त्याचे महत्त्व असायला हवे. परंतु ते कोणाबरोबर केले गेले तर पवित्र कोणाबरोबर केले गेले तर अपवित्र याबद्दल हजारो वर्षे आपल्या डोक्यामध्ये गोष्टी कोंबण्यात आलेले आहेत
Read 36 tweets
ध्यान

गेल्या काही महिन्यांमध्ये ध्यानाविषयी काहीतरी लिही असे बऱ्याच जणांनी सांगितले परंतु मी अशा विषयावर लिहिण्यास पात्र आहे का हे मला माहीत नव्हते. आणि अर्थातच अजूनही मी त्याला पात्र नाही हे मला ठाऊक आहे. मी स्वतः हल्ली काहीच करत नाही त्यामुळे मला या विषयावर लिहिण्याचा
किंवा बोलण्याचा काय हक्क. तरीदेखील अनुभवी संत आणि आत्मसाक्षात्कार लोकांनी जे काही सांगितले आहे ते केवळ एक पोपटपंची करणारा या नात्याने लिहिण्याचा प्रयत्न करतो. खरेतर ज्या पद्धतीने शरीर कसे कमवावे हे केवळ एखाद्या मल्लाने किंवा पैलवानाने लिहिले पाहिजे व त्या गोष्टीला मी पूर्णपणे
छेद देत आहे त्याबद्दल क्षमस्व. या लिखाणामध्ये माझी स्वतःची कणभर देखील पात्रता नाहीये हे लक्षात सुरुवातीलाच घ्यावे.

असो तर,

आपण बऱ्याच वेळेला ध्यानाला बसणे किंवा ध्यान लावणे किंवा मेडिटेशन करणे या गोष्टी ऐकत असतो
Read 38 tweets
गुमनामी बाबा-२
#netaji
#नेताजी
1985 साल:
उत्तर प्रदेशमधील गुफ्तार घाट येथे फक्त मोजक्या माणसांच्या उपस्थिती मध्ये एक अंतिम संस्कार चालू होता. हा घाट भगवान श्रीराम यांच्या समाधी साठी देखील प्रसिद्ध आहे. भगवान श्रीराम यांनी या घाटाला जवळच जलसमाधी घेतली असे मानले जाते, त्यामुळे या
प्रभु श्रीराम यांचे मंदिर आहे व या जागेला धार्मिक दृष्ट्या एक महत्त्वदेखील आहे.

तो एरिया मिलिटरीच्या अंडर असल्यामुळे कोणत्याही परमिशन शिवाय पटापट हे अंतिम संस्कार उरकले गेले. कोणालाही याबद्दल माहित नव्हते व हे अचानक झालेले अंतिम संस्कारां नंतर
व्यक्तीची खोली उघडण्यात आली. आणि त्यानंतर जो काही गजहब आणि गोंधळ उडाला.

सात हजार पेक्षा जास्त गोष्टी त्या बंद खोली मधून घेण्यात आल्या. त्याचे एक छोटेसे सॅम्पल मी खाली फोटो मध्ये देणार आहे. त्यामध्ये हजारो पत्र व कागदपत्रे, मिलिट्री मध्ये वापरल्या जाणाऱ्या दुर्बिणी, गोल भिंगाचे
Read 31 tweets
शेवटचा दिन गोकुळी चा

त्या संध्याकाळी तो एकटाच नदीच्या किनारी जाऊन झाडाला टेकून बसला होता. नेहमी मित्रांच्यात प्रचंड खेळणारा व दिवसभर दंगा करणारा तो शांतपणे कसलातरी गहन विचार करत होता. प्रचंड मोठ्या घडामोडी होणार होत्या त्याच्या केवळ एका निर्णयामुळे.
गेल्या काही दिवसातील घडलेल्या प्रसंगामुळे व एकूणच लहानपणापासून घडत आलेल्या गोष्टी यामुळे आपण नक्कीच वेगळे आहोत याची जाणीव त्याला होती. परंतु त्यावर त्याने कधी विचार केलेला नव्हता. आपले सवंगडी आपल्या गावातील लोक यांच्या प्रचंड प्रेमामुळे त्याला बहुदा हा विचार करण्यासाठी वेळच
मिळाला नव्हता. आपण केवळ त्यांच्यासाठी आहोत हेच भावना त्याच्या मनामध्ये होती.

परंतु आज वेळच अशी आलेली होती. त्याच्या एका निर्णयामुळे त्याचे स्वतःचे व आजुबाजू ला असणाऱ्या लोकांचे आयुष्य बदलणार होते कायमचे.
Read 16 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!