Discover and read the best of Twitter Threads about #thanksphuleambedkar

Most recents (24)

#ThanksPhuleAmbedkar

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कायम अस्पृश्यांचे प्रश्न, कामगारांच्या समस्या, स्त्रियांचे स्वातंत्र्य, शेतकऱ्यांचे प्रश्न, मानवी हक्क, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, पत्रकारिता यांसह जगाच्या पाठीवर असा कोणताच विषय नाही की ज्यात बाबासाहेबांचे योगदान नाही.
बाबासाहेबांनी त्यांच्या अभ्यासाचा उपयोग स्वतःच्या उत्कर्षासाठी न करता भारतातील अस्पृश्य, शोषित व वंचितांच्या लढ्यासाठी आणि उद्धारासाठी केला. या प्रोमोथियम लढ्यासाठी त्यांनी शिक्षणाचे सुवर्ण कण वेचले. प्रत्येक विषयाच्या गाभ्याला स्पर्श करून Image
बाबासाहेबांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला व तेवढ्याच उमेदीने प्रत्येक विषयाला न्यायभावना दिली.
बाबासाहेबांची पत्रकारिता म्हणजे मानवमुक्तीचा
धगधगता अंगार होती!
Read 3 tweets
#पत्रकार #आंबेडकर

महात्मा जोतिराव फुले आणि टिळकांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी त्यांची मैत्री होती. टिळक-आगरकरांना पहिला तुरूंगवास झाला तेव्हा त्यांना जामिन द्यायला त्यांचा एकही सनातनी कार्यकर्ता पुढे आला नाही.
अशावेळी महात्मा फुल्यांनी रातोरात रामशेट बापूशेट उरवणे ह्या सत्यशोधक समाजाच्या कोषाध्यक्षांमार फत त्यावेळच्या दहा हजार रूपयांच्या जामिनाची व्यवस्था करवली. त्यावेळी सोन्याचा भाव एका तोळ्याला पंचवीस रूपये होता,
ते तुरूंगातून सुटल्यावर त्यांचे जाहीर सत्कार फुल्यांनी घडवून आणले. त्यांना मानपत्रे दिली. हे सारेच टिळकांनी केसरीत ठळकपणे छापलेही, मात्र महात्मा फुले वारल्यावर त्यांच्या निधनाची एका ओळीचीही बातमी त्यांनी दिली नाही.
Read 6 tweets
#Barrister_Ambedkar

कल्याण ! मध्य रेल्वेवरील एक अतिशय महत्वाचे जंक्शन ! मुंबईला उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे एक महत्वाचे स्थानक! कोणतीही लांब पल्ल्याची गाडी सामान्यपणे कल्याणला थांबतेच थांबते !
पण कल्याणला एक गाडी अजिबात थांबत नाही, ती म्हणजे 'दक्षिणेची राणी'' डेक्कन क्वीन'! मुंबईहून पुण्याला धावणारी ही गाडी कल्याणला थांबत नाही Image
त्याचे कारण असे आहे की कल्याण नगरपालिकेच्या हद्दीतून रेल्वे धावत होती ह्याबद्दल रेल्वे काही कर कल्याण नगरपालिकेला देऊ लागत असे. पण पुढे काही वर्षे रेल्वेने तो कर नगरपालिकेला दिला नाही. त्यामुळे संतापलेल्या कल्याण नगरपालिकेने रेल्वेला कोर्टात खेचले. Image
Read 6 tweets
#ThanksPhuleAmbedkar
#bhimjayanti2023
#भीमजयंती2023
#8days_to_go

विषय: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल संविधान आणि त्याची होत असलेली अंमलबजावणी

संविधान हे लोकांच्या अभ्यासातून संशोधनातून 2वर्ष11महिने18 दिवसाच्या मेहनतीतून तयार झालंय संविधानाने सर्वांना तारल आहे 1/n
डॉ बाबासाहेब 1954 मध्ये आकाशवाणी केन्द्र वर बोलताना म्हटले होते बुद्धांनी भारतात राजकीय सामाजिक धार्मिक क्रांतीची मशाल रोवली स्वतंत्र समता बंधुत्व हे बुद्धाच्या शिकवणुकीतून घेतले आहे

संविधानाचा उद्देश न्याय स्वतंत्र समता बंधुता प्रस्थापित करणे आहे ह्या लोकांच्या आकांशा आहेत 2/n
पण ह्या मूल्याप्रमाणे आपण वाटचाल करतोय का तर नाही..
उपहासान म्हटलं जातं भारतीय न्याय व्यवस्था मासेमारी करणाऱ्या कोळयाच्या जाळ्यासारखी आहे यात लहान मासे सापडतात आणि मोठे मासे ते जाळे तोडून निघून जातात गरिबांना न्यायासाठी न्यायालयाच्या चकरा माराव्या लागतात मोठे लोक सुटून जातात 3/n
Read 7 tweets
#ThanksPhuleAmbedkar
#bhimjayanti2023
#भीमजयंती2023
#9days_to_go

विषय: तुमच्या दृष्टीकोनातले बाबासाहेब

#बा_भीमा
कधी कधी मनात विचार येतो बाबासाहेब नसते तर.. काय अवस्था झाली असती आमची
आज आम्ही जो पण श्वास घेतो आणि सुखाची भाकरी ती फक्त बाबासाहेबांमुळे 1/n
काल घरात बसणाऱ्या स्त्रिया स्वतःच्या हिंमतीवर जी प्रगती करत आहेत या सर्व स्त्रियांचा पाठीराखा बाबासाहेब आहेत
गावाबाहेर फेकलेले लोक मोठ्या हुद्द्यांवर आहेत ह्या मुक्या समजला बोलायला शिकवणारा मूकनायक म्हणजे बाबासाहेब 2/n
महाराज सयाजीगायकवाड यांनी म्हटल्या प्रमाणे बाबासाहेब हेच दलितांचे मुक्तीदाता आहेत आज आम्हला बुद्धानशी ओळख करवून देणारे बाबसाहेबच

तुम्ही बघितलेल्या प्रबुद्ध भारताचं स्वप्न आम्ही पूर्ण करू
Love You ❤️
Read 4 tweets
देशात जेव्हा स्वातंत्र्य संग्राम सुरु होत पण स्वातंत्र्य झाल्यावर देश कसा असेल कोणीच विचार करत नव्हत. इंग्रजाकडून सत्ता आपल्याकडे याव इतकच ध्येय होत. पण स्वातंत्र्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहचायला हव हे ध्येय एकट्या बाबासाहेबांच होत. त्यासाठी बाबासाहेब

#ThanksPhuleAmbedkar
जिवाची पण पर्वा करायचे नाहीत. सायमन कमिशन च्या वेळी असेल किंवा पुणे कराराची वेळ असेल सगळा देश बाबासाहेबांच्या विरोधात होते पण बाबासाहेब स्वतःच्या जिवाची कसलीच पर्वा करत नव्हते. 65 वर्षाच आयुष्य पण सामाजीक क्षेत्रात उतरल्यानंतर स्वतःसाठी एक मिनीटपण जगले नसतील. कोणता बाप स्वतःच्या
मुलांसाठी इतके कष्ट घेणार नाही त्याच्यापेक्षा लाखपटीने बाबासाहेबांनी समाजासाठी घेतले आहेत. स्वतःचे पोटचे मुल मरताना पण थोड सुद्धा न डगमगणारे बाबासाहेब आमच्या साठी आमच्या जिवापेक्षा खुप जास्त आहेत. या जगात कोणीही कोणावरही प्रेम दाखवताना खोट वाटेल पण बाबासाहेबांवर आमच्या लोकांच
Read 4 tweets
( 3 पॅंथरनामा, नामांतर आंदोलन आंबेडकरोत्तर दलित चळवळ )

गावकुसाबाहेरील निश्चल वस्तीत
तू येऊन गरजलास
सारी वस्ती खडबडली
धूळ झटकीत सावध झाली
तुझ्या हाती होता धगधगता हिलाल
हादरून गेले होते सगळे काळोखाचे दलाल..
--साहित्यकार अर्जुन डांगळे. (1)

#ThanksPhuleAmbedkar📍
"दलित" तसेच "अस्पृश्य" म्हणून ज्यांना संबोधित केले गेले, व बाकी सर्व मानवांना मिळणारे समान अधिकार देखील ज्यांना नाकारले गेले.

अशा वर्गसमूहाला माणसात आणण्याचा पहिला प्रयत्न केला ते व्यक्ती म्हणजे महात्मा फुले. त्याच बरोबर छत्रपती शाहू महाराज, सयाजीराजे गायकवाड, गोपाळबाबा (2)
वलंगकर, शिवराम कांबळे यांनी देखील अमानुष व्यवस्था बदलण्याचा आटोकाठ प्रयत्न केला. तसेच या चळवळीला व्यापक रूप देऊन ज्यांनी मानवमुक्तीच्या लढ्याला गतिमान केले ते व्यक्तिमत्त्व म्हणजे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी आपल्या गुरूंच्या सत्कार्याची माहिती, (3)
Read 12 tweets
#ThanksPhuleAmbedkar
#bhimjayanti2023
#भीमजयंती2023
#10days_to_go

पँथरनामा आणि नामांतर आंदोलन: आंबेडकरोत्तर दलित चळवळ

आज कधी पण जेव्हा दलित पँथर चळवळी बद्दल ऐकतो किंवा वाचायला घेतो तेव्हा अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी येतं 1/n Image
मराठवाडा विद्यापीठा’ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव झाला आणि दुसर्‍याच दिवशी मराठवाडा पेटला. अनेक गावांतील बौद्ध समाजाच्या वस्तीवर हल्ले करण्यात आले. नांदेड मधील अशा उदध्वस्त झालेल्या लोकांना शहराबाहेर तात्पुरता निवारा देण्यात आला होता. 2/n
तिथल्या शेड मध्ये दोन दिवसापूर्वी जन्मलेले बाळ त्याची आई होती शेडमध्ये बाबसाहेबांचा फोटो होता तेव्हा reporting करताना एक पत्रकार बाळाला घेतलेल्या आजीला तिथे शेडवर डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र बाभळीच्या काट्याने लावले होते. भीती नाही वाटत?’ 3/n
Read 7 tweets
स्वातंत्र्यला 25 वर्ष झाली होती. पेरूमल कमिटीचा अहवाल आला होता. मागासवर्गीय लोकांवर अन्यायाच्या मालिकेने परिसीमा गाठली होती. तत्कालीन सरकार अन्याय करणार्या लोकांना पाठिशी घालत होते. इतक होत असताना चळवळीतील तरूणांमध्ये रोष निर्माण होण स्वाभाविक होत.

#ThanksPhuleAmbedkar
याच रोषाच रुपांतर दलित पँथर मध्ये झाल. 1972 ला नामदेव ढसाळ, जवी पवार, असे अविनाश महात्तेकर, राजा ढाले या तरूणांनी दलित पँथरची स्थापना केली. हे तरून आक्रमक साहित्य लिहत होते व तितक्याच आक्रमकपणे रस्तावर पण उतरत होते. थेट इंदिरा गांधी सारख्या पंतप्रधानाला रस्ता बदलायला लावणारे हे
पँथर होते. 70 च दशक एकीकडे पडद्यावर अभिताभ अँग्री यंग मॅनची भुमिका साकारत होता तर दुसरीकडे पँथर खऱ्या आयुष्यात जगत होते. पोलीसांनी एखाद्या ठिकाणी सभा घेण्यास बंदी घातले तरी त्या ठिकाणी सभा घेणे असेल किंवा पोलीसांना गुगांरा देत फक्त न्यायालयात हजर असणे असेल. जितक रस्तावर आंदोलन
Read 4 tweets
(संविधान आणि त्याची नैतिक मूल्य जपणे आजच्या काळाची गरज.)

वर्षानुवर्षे गुलामगिरी त जीवण कंठणाऱ्या समाजाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या घटनात्मक राजकीय आणि सामाजिक विचारात टाकलेली भर ही (1)

#ThanksPhuleAmbedkar📍
नि:संशय मोलाची आहे.

देशाच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे हे प्रत्येकाने आपले परमकर्तव्य मानले पाहिजे, असा संदेश देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या व निर्माण केलेल्या नव्या समाजव्यवस्थेचे रक्षण व पालन करण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले (2)
घटना समितीतील अखेरचे भाषण हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.

राष्ट्राच्या भवितव्यासंबंधी आपले मत व्यक्त करताना बाबासाहेब म्हणतात,

"भारत २६ जानेवारी १९५० ला स्वतंत्र होईल. या स्वातंत्र्याचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य रक्षण करील की पुन्हा गमावून बसेल, हा माझ्या मनात पहिला प्रश्न (3)
Read 17 tweets
कोणत्याही देशातील नागरिकांच्या सुकर आयुष्य आणि विकासाची चावी संविधान असते. शेकडो भाषा, जाती, परंपरा यांच्यात सुमध्य साधत सर्वांना स्वातंत्र्य देत सर्वांचा विकास करण्याची हमी संविधान देतो.नागरिकांसाठी न्यायव्यवस्था,स्टेट काम केल पाहीजे हाच मुळ हेतू संविधानाचा

#ThanksPhuleAmbedkar
आहे. पण आजच्या काळात संविधाच्या नैतिकतेला सुरुंग लावण्याच काम स्टेट करत आहे. देशात नागरिकांच स्वातंत्र्य धर्मसंस्थेच्या अधिपत्याखाली आणणाच्य काम स्टेट करत आहे. संविधानाने धर्म निवडण्याच स्वातंत्र्य दिल आहे पण धर्मांतर बंदीचा कायदा आणायचा विचार करत आहे. आंतरजातीय लग्न याविरोधात
कायदा करण्याणा विचार करणे हे पण संविधान नैतिकतेच्या विरोधात आहे. आज मूकसंमती देणार्या लोकांनी या गोष्टीचा विचार करावा की आज या स्वातंत्र्यावर गदा आणत असतील तर उद्या तुम्हाला धर्मसंस्थेचे गुलाम करतील. आणि एकजातीय संस्था बनवण्यात येईल. संविधानाची नैतीकता देशात एकता टिकवून
Read 4 tweets
( जातीअंताच्या चळवळीचा समग्र प्रवास महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर )

असंख्य भारतीय समाज सुधारकांना आजही प्रेरणा देणारे, आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे भारतीय सामाजिक क्रांतीचे उद्गाते क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले, आजही-- (1/18)

#ThanksPhuleAmbedkar📍 Image
कित्येक सामाजिक क्रांतीकारकांमध्ये तसेच समाजसुधारकांमध्ये महात्मा फुलेंचे नाव हे सूर्याच्या किरणांप्रमाणे तितक्याच प्रखरतेने व तेजाने आजही चमकत आहे,

याला कारणही तसेच आहे. जेंव्हा 19 व्या शतकामध्ये "मानवमुक्तीची चळवळ" जोर धरू लागली तेव्हा तत्कालीन समाज सुधारकांनी जातीयता (2/18)
नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांच्या या कृतीचा भारतीय जनमानसात सखोल असा कोणताच परिणाम झाला नाही.

कारण अस्पृश्यतेचे मूळ असणारा चातुर्वरण्यांचा सिद्धांत व त्यातून निर्माण झालेली सामाजिक विषमता व त्या आधारित जातीभेद नष्ट करणे, हे त्या समाजसुधारकांचे मुख्य (3/18) Image
Read 19 tweets
Satyashodhak Samaj (Truth-seekers' Society) was a social reform society founded by Jyotiba Phule in Pune.
It was a lighting flame of the non-Brahmin movement in Western India. It espoused a mission of education and increased social rights

#ThanksPhuleAmbedkar
and political access for underprivileged groups, focused especially on women, peasants, and Dalits.
The Samaj argues that priestly dominance is not an inherent trait; rather, the varnas were manufactured in a strategic move meant to establish and protect priestly social standing.
The Samaj insisted that, in order to reclaim their social standing, low caste groups should oppose priests as middleman between men and god in religious rituals and ceremonies.
The Samaj also advocated for social changes that went against prevalent traditions,
Read 5 tweets
आज दिनांक १ एप्रिल २०२३
उपक्रम क्रमांक १
जाती अंताच्या चळवळीचा समग्र प्रवास म. फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

तसा जातीभेद खुप अगोदर पासूनच आहे.जातीभेद करु नका माणसा सोबत माणसा सारख वागा, सांगणारे पण होऊन गेले पण हे सगळ होऊन जातीच्या आगीत होरपळन बंद झालच नव्हत.
जातीची नस शिक्षणात आहे हे जोतीबांनी ओळखल होत.म्हणुन त्यांनी शुद्र अतिशुद्रास शिक्षण द्यायला सुरूवात केली.
पिण्यासाठी पाण्याची स्वतःची विहीर उपलब्ध करुन देणे असेल किंवा आंतरजातीय विवाहाच संरक्षण करने असेल त्यासाठी जोतीबांनी नेहमीच प्रयत्न केले.
जातीभेदाच कारण असणाऱ्या भटशाहीवर थेट हल्ला करत होते.
१८७३ ला जोतीबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. जातीच श्रेष्ठत्व नष्ट करण्यासाठीच त्यांनी स्थापना केली होती.
आधुनिक भारताच्या इतिहासात जातीअंताची सुरवात केली होती.
नंतर जोतीबाच निधन झालं पण त्यांची ती लढाई सुरुच होती.
Read 6 tweets
मुलींच्या शाळा सुरळीतपणे चालू लागल्यानंतर ज्योतिरावांच्या नजरेस दुसन्या ज्या अनेक गोष्टी आल्या, त्यापैकी अस्पृश्यांच्या शिक्षण प्रसारास प्राधान्य देऊन त्या गोष्टीकडे लक्ष पुरवायचे असे त्यांनी ठरविले व त्या दिशेने प्रयत्न करावयास त्यांनी सुरुवात केली.
आपल्या देशातील सहा, सात करोड लोक विद्येच्या अभावी हजारो वर्षांपासून आपली माणुसकी गमावून बसले असून, ते धार्मिक गुलागिरीच्या घोर नरकात पडले आहेत आणि - त्यामुळेच हिंद राष्ट्र लुळे बनले असून याचा सारखा हास होत आहे, ही गोष्ट जोतिरावांच्या नजरेस चांगली येऊन चुकली.
या वर्गात विद्येचा प्रसार झाल्याशिवाय त्यांची अस्पृश्यता दूर होणार नाही; आणि विद्येखेरीज ते आपली उन्नती करून घेऊन राष्ट्रातील वरिष्ठ वर्गात तादात्म्य पावणार नाहीत, असे त्यांना नेहमी वाटत असे.
Read 23 tweets
#ThanksPhuleAmbedkar
फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काय बदल झाला पाहिजे आजच्या काळानुसार!
सर्वप्रथम चळवळ म्हणजे काय जर समजून घेतलं तर काय बदल करावे लागतील हे समजून जाईल. चळवळ म्हणजे लोकांच्या,समूहाच्या प्रश्नावर अनेक लोकांनी एकत्र येऊन केलेलं आंदोलन. कामगार चळवळ, शेतकरी चळवळ
अशा अनेक चळवळी आपण ऐकतो पाहतो.यात सगळ्यात जर साम्य असेल तर लोकांचा सहभाग, लोक सहभाग हा महत्वाचा.फुले शाहू आंबेडकर चळवळीला परत गरज आहे ती शोषित वर्गाने एकत्र येण्याची.( provided त्या वर्गाला जाणीव हवी
के ते शोषित आहेत).फुले शाहू आंबेडकर यांचा काळात त्यांना अनेक ब्राह्मण,ब्रह्मनेतर लोकांनी मदत व सहकार्य केलं होतं.त्यांनतर परत एकदा समाजात फाटाफूट पडलेली दिसते.तसेच अगोदर शेतकरी, कामगार जे बांधले गेले होते चळवळीशी ते एक एक बाहेर पडत गेले किंवा स्वतचं नवीन सुरू केली चळवळ.
Read 10 tweets
आपण चळवळ चालवतो कुठलाही व्यवसाय अथवा व्यापार चालवत नाही तर त्या मध्ये आपणास नुकसान आणि तोटा याची शाश्वती नाही म्हणून गांभीर्य ओळखून कार्य केले पाहिजे
आपण राष्ट्रीय स्तरावरील चळवळीचा कणा आधार होणे आवश्यक आहे चळवळ उभी करायची असेल तर जबाबदारी पेलयाची ताकत ठेवा.
चळवळ ही सत्ता भोगण्यासाठी नसुन खस्ता खाण्यासाठी असते.
फुले शाहू आंबेडकर चळवळचा यौध्दा होताना स्वतःला विचारांनी शुध्द केल्या शिवाय अशुध्द चळवळीतील साफसफाई करता येणार नाही.
चळवळीचा वारसा आपला राष्ट्रीय स्तरावरील असला पाहिजे.
आजची लढाई आपली अस्तित्वाची जाणीव करून देत आहे काही लोक..
धर्म पंथ जात पात यांत गुंतलेले आहेत.
देशात बेरोजगारी साथीचे रोग आर्थिक विषमता अन्याय अत्याचार बेजबाबदार सरकार प्रशासन शैक्षणिक बाजार लोकसेवा चे खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण आणि लोक सुविधा ठेकेदारी कंत्राटीकरण आणि महागाई या प्रश्नावर संघर्ष करावा लागणार आहे ही शोकांतिका आहे.
Read 4 tweets
- सोमनाथ कन्नर लिहितो #Thread
#ThanksPhuleAmbedkar

महात्मा फुले झोपताना आपल्या बिछान्याखाली दांडपट्टा ठेवत असत. तो काळ दीडशे वर्षांपूर्वीचा आहे. बुरसटलेल्या रुढीवादाला अधिकृत पर्यायी व्यवस्था नसताना सनातनी आणि कट्टरतावाद्यांविरोधात त्यांनी शड्डू ठोकणं धाडसी काम होतं.
कारण फुल्यांना अपेक्षित असलेल्या व्यवस्थेचं फळ तोपर्यंत कुणी चाखलेलं नव्हतं. त्यामुळं पाठिंब्याची शक्यता शून्य होती. पण फुल्यांच्या आक्रमक भूमिकेमुळेच अनुनासिक बोलणाऱ्या पुणेरी पगड्यांची कढी पातळ होत होती. ती जरब दाखवली नसती तर फुल्यांवर केव्हाच हराळ उगवली असती.
आणि आज आपल्याला लघुशंकेवेळी कानात जानवं गुतवण्याचे वैज्ञानीक फायदे सांगत फिरावं लागलं असतं.

आज फुलेंच्या किंवा शाहूंच्या विचारांना विरोध करणाऱ्यांची स्वतःची आई, बहीण, मुलगी फुलेंच्या त्यागाचा शिक्षणाद्वारे प्रत्यक्ष फायदा आणि स्वतंत्र उपभोगत आहेत.
Read 9 tweets
#ThanksPhuleAmbedkar
इथे कलाकार मंडळी हातात फ्लेक्स घेवून सिनेमा पाहायला सिनेमा गृहात या.. रस्त्यावर उतरून सांगत होते त्याच वेळी केसावर फुगे सारखं गाणं कोणतीही जाहिरात न करता कोणताच सेलेब्रिटी नाही त्या गाण्यात तरी लाखो करोडो views भेटले.
फिल्म इंडस्ट्री,कला क्षेत्रात ला
जातीयवाद थांबला पाहिजे त्याशिवाय चांगला कंटेंट येणार नाही तोच तोच साचलेला रटाळ पणा येईल. इथ बहुजन वर्ग आहे त्याची लोककला, त्याचे प्रश्न तो दिसला तर काहीतरी नाविन्य येईल फिल्म मध्ये. आशा आहे नवीन प्रयोग होत राहतील.गायक शिंदे, वामनदादा कर्डक, कडूबाई खरात असे कलाकार छोट्या पडद्यावर
व्यापून जात आहेत.सोनी,झी सारखे चॅनल सुद्धा आता tv वर भीम जयंती चे कार्यक्रम भीम जलसा, बोला #जयभीम असे कार्यक्रम घेत आहे.ही स्पेस वाढली पाहिजे आणि हे शक्य आहे फक्त आणि फक्त बहुजन वर्ग जागृत झाला तरच. डिमांड वाढल की सप्लाय वाढतो.अगोदर हे कार्यक्रम होत नसत आता का होत आहेत
Read 5 tweets
फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुरोगामी आहे का??

आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, शहरामध्ये किंवा राज्यामध्ये आपण रोजच जातीवर आधारीत किंवा जातीमुळे झालेला गोर-गरिबांवर अन्याय पहात असतो. ह्या सगळ्याला जबाबदार आहे तो फक्त आणी फक्त सवर्ण समाज जो वर्ण व्यवस्थेला मानणारा आहे.
या निमित्ताने होत असलेल्या वादातून राज्यात ब्राह्मण विरुद्ध बहुजन किंवा इतर अशी विभागणी पुन्हा केली जाऊ लागली आहे. ब्राह्मणविरोधक म्हणजे पुरोगामी असा विचार रुजतो आहे. फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांना हे पुरोगामित्व अपेक्षित होते का?या महापुरुषांची नावे घेणाऱ्या आजच्या
पुरोगाम्यांचा वर्तनव्यवहार, त्यांचे विचार-आचार खरोखरच पुरोगामी या संज्ञेस पात्र आहेत काय?

महाराष्ट्राला पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असा वैचारिक वाद नवा नाही. जे सनातनी विचारांचे आहेत, ते प्रतिगामी आणि जे प्रगत विचारांचे आहेत ते पुरोगामी अशी या वादाची किंवा संघर्षांची सरळ वैचारिक
Read 28 tweets
डॉ बाबासाहेब आंबेडकर - सामाजिक क्रांती, परिवर्तनाची नांदी.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचे चक्र भारतात गतिमान केले. त्यानिमित्त तीन प्रमुख संज्ञांचा विचार करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे. 'समाज', 'क्रांती' आणि 'परिवर्तन'....
समाज ही संज्ञा लॅटिन भाषेतील 'सोशियस' म्हणजे
सहचर, सवंगडी यामधून घेतलेली आहे. समाज हा शब्द उच्चारला तरी त्याचा अर्थबोध होतो. स म्हणजे सर्व; संपूर्ण, मा म्हणजे मानव; माणूस, ज म्हणजे जमात; जाती आणि म्हणून 'समाज' म्हणजे सर्व मानव जमात होय. वेगळ्य़ा शब्दांत संपूर्ण मानव जातिसमूहाचे रूप 'समाज'. 'व्हॉइस ऑफ अमेरिका' या केंद्रावर
भाषण देताना डॉ. आंबेडकर म्हणाले होते, समाज म्हणजे परस्परपूरक अशा मानवाचा संघ होय. ते सर्व परस्परांच्या उपयोगी पडणे, हे कर्तव्य मानतात व त्याचप्रमाणो वागतात, अशा एकात्म लोकांचा संघ म्हणजे समाज. क्रांती म्हणजे आमूलाग्र बदल, परिवर्तन, चक्राकार फिरणे होय. क्रांतिकारक बदल म्हणजेच
Read 13 tweets
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक योगदान.

१४ एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. देशातील कोट्यवधी दीनदुबळ्यांसाठी तसेच देशासाठी हा दिवस फार आनंददायी आहे. या दिवशी दिवसभर मोठ्या उत्साहाने खेड्यापाड्यांपासून ते दिल्लीपर्यंत, अगदी
जगभर म्हणलं तरी चालेल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. डॉ. आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी म्हणजे एम.ए. पदवीसाठी २५ जुलै १९१३ रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश केला. प्रो. सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली जून १९१५ मध्ये एम.ए.ची पदवी संपादन केली.
ऑक्‍टोबर १९१६ मध्ये इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स अँड पॉलिटिकल सायन्स येथे एम.एस.सी. इकॉनॉमिक्‍समध्ये प्रवेश केला. प्रो. कॅनन आणि सेडनी वेब यांच्या मार्गदर्शनाखाली १९२० मध्ये पदवी संपादन केली. पुढे १९२२-२३ मध्ये युनिव्हर्सिटी इन बॉन जर्मनीमध्ये डी.एस.सी. पदवीचा अभ्यास
Read 11 tweets
सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतिबा फुले.

मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसुन तो गुणाने श्रेष्ठ ठरतो. ईश्वर एक असुन तो सर्वव्यापी निर्विकार, निर्गुण व सत्यरूप आहे. सर्व मनुष्य व मनुष्येत्तर प्राणी त्याची लेकरे आहेत. हा वास्तव विचार सन १८व्या शतकात निर्भीडपणे मांडून सामाजिक,
शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतुन समस्त मानवाला बाहेर काढण्याचं काम करणारे आणि सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. महात्मा ज्योतीराव फुले यांचा जन्म शेतकरी, भाजीपाला व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या पोटी ता.
११ एप्रिल १८२७ रोजी झाला. त्या दिवशी जोतिबाची यात्रा होती म्हणून गोविंदराव आणि चिमणाबाई यांनी तेजस्वी आणि ओजस्वी असलेल्या पुत्राचे नाव जोतिबा असे ठेवले. काही लोकांच्या जीवनात जन्मापासूनच अडचणी आणि संकटे दार ठोठावतच असतात. जोतिबांच्या बाबतीतही असेच काही घडले होते. त्यांच्या आई
Read 25 tweets
स्त्रियांची गुलामगिरी नष्ट करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

पिता रक्षति कौमार्य, पति रक्षति योवने, पुत्र रक्षति वार्धक्य, न स्त्री स्वातंत्र्यम अहरती. या मनू वचनाला स्त्रीने कधीच मागे टाकले आहे. स्त्रियांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा कोणीच विचार करत नव्हते. सर्वप्रथम राष्ट्रपिता
महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विचार केला. त्यांना शिक्षण देऊन सक्षम बनवण्यास हातभार लावला. विश्‍वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना गुरु मानतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाच धागा पुढे नेला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा
स्त्रियांच्या संघटनेवर खूप विश्‍वास होता. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्‍वास ठेवणारा मी माणूस आहे. त्यांना जर विश्‍वासात घेतले तर समाजाची सुधारणा करण्यासाठी त्या काय काय करू शकतात हे मी जाणतो. सामाजिक दोष नाहीसे करण्याची त्यांनी फार मोठी सेवा
Read 32 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!