Discover and read the best of Twitter Threads about #vikaswaghamare

Most recents (15)

थ्रेड👇
परवा ओरिसात रेल्वे दुर्घटना घडली अन शरद पवार सवयीप्रमाणे राजकारण करायला पुढं आले, बोलता बोलता त्यांना स्व. लालबहाद्दूर शास्त्रींची आठवण आली, एकदा दुर्घटना घडली होती आणि शास्त्रींनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, आता याही दुर्घटनेनंतर+ Image
रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं पवार साहेब बोलून गेले. त्यात त्यांनी वापरलेला नैतिकता हा शब्द माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचार करायला लावत होता.

वयाने आणि राजकारणात जेष्ठ असलेले शरद पवार आज नैतिकतेचे धडे देत आहेत, मात्र त्यांच्या इतिहास काळात थोडं जायला हवं असं सतत+
वाटत होतं. 1993 साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाला, हे बॉम्बस्फोट तब्बल 12 ठिकाणी झाले मात्र धडधडीत खोटं बोलत शरद पवारांनी 13 ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचं सांगितलं, त्या स्फोटात तब्बल 257 जणांचा बळी गेला होता, तर शेकडो लोकं जखमी झाले होते, तेव्हा शरद पवार स्वतः मुख्यमंत्री होते+
Read 7 tweets
थ्रेड👇
ज्या पवारांनी पूर्ण आयुष्यभर दगाबाजीचे राजकारण केले त्यांच्याच मांडीवर बसण्याच्या मोहापायी उद्धव ठाकरेंनीसुद्धा देवेंद्र फडणवीसांसोबत दगाबाजीचे राजकारण केले. पण फडणवीस हे काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत,तुमचा एक तर माझे एकास लाख म्हणत योग्य वेळ येऊ दिली आणि उद्धव ठाकरेंना+
आयुष्यभर पुरेल आणि सल राहील अशी अद्दल घडवली. आजचा निवडणूक आयोगाचा निकाल हा जेवढा सच्चा शिवसैनिकांना आनंद देणारा आहे, त्याहीपेक्षा जास्त भाजपा भक्तांना आनंद देणारा आहे, कारण सत्तेसाठी पाठीत खंजीर खुपसलेल्या उद्धव ठाकरेंची उतरती कळा याची देही याची डोळा पाहायला मिळाली. आजची त्यांची+
पत्रकार परिषद पाहिली तर फक्त ढसाढसा रडायचे बाकी राहिलेले उद्धवजी पाहून एका निर्णयाचा परिणाम काय असतो याची प्रचिती आली. आणि त्यांची थोडी किवही वाटली.
ज्या दिवशी 2019 ला निकाल लागला तेव्हापासून संजय राऊतांच्या तोंडातून आमच्यासाठी दरवाजे मोकळे आहेत, आम्ही आमचा निर्णय घेऊ शकतो हे+
Read 9 tweets
अंधेरी पूर्वची पोटनिवडणुक लागलीय, भाजपने अजून आपले पत्ते ओपन केले नाहीत, मात्र देवेंद्रजी म्हणाले आहेत आम्ही भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना मिळून युतीमध्ये ही जागा लढवणार आहोत. मात्र ती जागा दोघांपैकी कुणाच्या वाट्याला सोडायची हे आम्ही अजून बैठक घेऊन ठरवू!
इकडे मात्र उद्धव+
ठाकरेंनी त्या जागेवर ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. ऋतुजा लटके या स्व. आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. त्या सध्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी असल्याने त्यांची निवडणूक लढविण्याची शक्यता धूसर आहे. कारण त्यांचा राजीनामा मंजूर न होता तांत्रिक गोष्टीत+
अडकला आहे, राजीनामा तीन महिने अगोदर द्यावा लागत असल्याचे कारण समोर येत असून जर राजीनामा मंजूर नाही झाला तर ऋतुजा लटके यांना निवडणूक लढवता येणार नाही.
इकडे उद्धव ठाकरे तर पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहत आहेत आणि तिकडे अंधेरीच्या उमेदवारीचा प्रश्न अजून सुटला +
Read 5 tweets
थ्रेड👇
आज देशाच्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामण यांच्या बारामती लोकसभेचा प्रवास दौरा जाहीर झाला. येत्या 16, 17 व 18 ऑगस्ट या तीन दिवशी निर्मलाजी स्वतः बारामती लोकसभेत तळ ठोकून असणार आहेत. याचाच अर्थ आता भाजपाने मिशन बारामती लोकसभा हातात घेतले आहे. लोकसभा निवडणुकांना अजून दोन+
वर्षे बाकी आहेत मात्र बारामतीच्या बुरुजांना हादरे बसायला सुरुवात झालीय.

सध्या केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री असलेल्या स्मृतीजी इराणी यांनीही 2014 च्या अगोदर अमेठीमध्ये काँग्रेसी गांधींच्या अस्ताची सुरुवात अशीच केली होती, 2014 ला स्मृतीजींना थोडक्यात विजयाने हुलकावणी दिली मात्र+
तरीही कामात सातत्य ठेवत त्यांनी 2019 ला थेट काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या राहुल गांधींना अस्मान दाखवत तब्बल 55 हजार मतांनी पराभवाची धूळ चारली आणि देशात कितीही मोठ्या घराणेशाहीचा पराभव करू शकतो हे स्पष्ट संदेश देत इतिहास निर्माण केला. भाजपासाठी 2019 ला अमेठी झाली, आता 2024 ला+
Read 9 tweets
गेले दोन - तीन दिवस झाले उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे टिझर येताहेत, ते पाहत असताना कमालीची कीव येते, इतक्या टुकार गप्पा आणि टोमणे केवळ तेच मारू शकतात. मुलाखत पाहणं सोडा, टिझरही पाहणं जीवावर येतंय. मात्र त्या टिझरमध्ये सर्वात जास्त भांडवल काय असेल तर ते त्यांच्या आजारपणाचं आहे.+
केवळ आजार, आजार आणि आजार या शिवाय त्यांनी वेगळं काही त्यात सांगितलं असेल असं मला वाटत नाही.
मला हे ऐकत असताना भाजपाचे गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहरजी पर्रीकर यांचा फोटो सतत डोळ्यासमोर येत होता. एका दुर्धर आजाराशी झुंज देत असताना आपण एका राज्याचे मुख्यमंत्री आहोत,+
आपल्यामुळे राज्याचे नुकसान होऊ नये हे लक्षात ठेवणारा आणि कर्तव्याशी इमान ठेऊन अक्षरशः शेवटच्या श्वासापर्यंत जीव ओतून काम करणारा दुसरा कोणताच नेता देशाने अनुभवला नाही. ना कधी त्यांनी त्या आजाराचं भांडवल केलं, ना त्यावर कधी चकार शब्द!
नाकाला नळी लावलेली असताना सभागृहात आलेला हा+
Read 6 tweets
थ्रेड👇
परवाच भाजपा- शिंदे युती सरकारने काही अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले, त्यातला एक म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना थेट मतदान करण्याचा अधिकार दिला. हा निर्णय घेतला त्यावेळी खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.+
खरंतर हा निर्णय 2017 मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि सुभाष (बापू) देशमुख हे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री असताना त्यांनी घेतला होता. मात्र त्यांनतर 2019 ला झालेल्या सत्ताबदलानंतर उद्धव ठाकरेंच्या महाआघाडी सरकारने तो निर्णय रद्द करत शेतकऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवलं होतं.+
मात्र पुन्हा देवेंद्रजींनी या निर्णयाला समोर आणत, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मतांचा अधिकार मिळवून दिला.

जो शेतकरी काळ्या मातीत राबतो, कष्ट करतो अन उत्पादन केलेला आपला माल बाजार समितीत आणतो त्याला बाजार समितीच्या कोणत्याच प्रक्रियेत घेतलं जात नव्हतं. ना त्याला योग्य बाजारभाव मिळत+
Read 14 tweets
मला दोन - तीन दिवसांपासून पिंजरा सिनेमाची आठवण येतेय, व्ही. शांताराम यांनी पिंजरा' ही एका तत्वनिष्ठ, ब्रह्मचारी आणि आदर्शवादी शिक्षकाची केवळ एका तमाशातील बाईच्या नादी लागून व मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतिक, आत्मिक आणि सामाजिक अध:पतनाची कथा चांगली रंगवलीय. ती+
पाहताना प्रेक्षकांचे मन हेलावते.

गुरुजी सुरुवातीला स्वतःला आदर्शवादी मास्तर समजत असतात, अशातच गावात तमाशा आल्यानंतर रागाने तमाशाचा तंबू पाडला जातो, त्यावेळी तमाशातील बाई मास्तरला शाप देते की,
"मास्तर, एक दिवस बोर्डावर तुणतुणं घेऊन नाय उभा केलं तर नावाची चंद्रकला नव्हं"

मग+
नंतर नंतर हे आदर्शवादी मास्तर त्या तमाशातील बाईच्या नादाला लागतात, प्रेमात पडतात, वाहत जातात आणि तमाशाच्या तंबूतच मुक्काम ठोकतात. आणि एक दिवस खरंच हातात तुणतुणं घ्यावं लागतं!😅

उद्धवजी इकडे राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर वर्षानुवर्षे टोकाची जहरी टीका करायचे, काँग्रेस आणि+
Read 5 tweets
महत्वाचा थ्रेड👇
आज सभागृहात देवेंद्रजी फडणवीस यांनी मावा आघाडी या अनैतिक सरकारच्या कारभाराची करुण कहाणी राज्याच्या आणि देशाच्या समोर ठेवली. आज देवेंद्रजी जे बोलले ते सभागृहात ऑन रेकॉर्ड बोलले आहेत. भाजपा नेत्यांना थांबवता येत नाही तर खोटे गुन्हे नोंद करून, मोक्का लावून आणि तेही+
खोटे गुन्हे लावत असताना तशा स्टोरी आणि कथानक उभं करण्यासाठी अनेक मोठे नेते काम करत आहेत. स्वतः सरकारी वकीलसुद्धा?

यातून निष्पन्न काय होणार तर नेत्यांना अटक होणार, मोठे गंभीर गुन्हे दाखल होणार, त्यात फसवले जाणार आणि मग हे गावभर बोंबलत फिरणार भाजपाचे नेते बघा काय करतात, पण+
देवेंद्रजींनी या आघाडीच्या भिकार मानसिकता असलेल्या नेत्यांच्या खोटेपणावर पाणी फेरले आहे, धुळ्याचे गोटे अण्णा असू द्या नाही तर मुक्ताई नगरचे लाथाभाऊ खडसे! यांचं वय झालं आहे, मार्गदर्शन करण्याच्या आणि आदर घ्यायच्या वयात यांनी माणुसकीची निचता गाठली आहे, CD च्या बाता करणारे लाथाभाऊ+
Read 8 tweets
नेत्याच्या वाट्याला देवपण येणं सोप्पं नसतं,आजही मराठवाड्याच्या कोणत्याही भागातली माणसं गाठ पडली अन राजकीय गप्पा निघाल्या तर मुंडे साहेबांची आठवण निघतेच! पण जी माणसं राजकीय चाकोरीच्या बाहेर आहेत, ज्यांना आपल्या कच्च्याबच्च्यासाठी कष्ट करावे लागतात ती माणसं डोळ्यात पाणी आणून मुंडे+ Image
साहेबांच्या आठवणी सांगतात, अनेकांच्या देव्हाऱ्यात मी मुंडे साहेब पाहिले आहेत. हे कमावणारा नेता विरळा आहे.

भाजपाचं राजकीय आणि पक्षीय अस्तित्व तसं नगण्य होतं तो संघर्षाचा काळ पायपीट करून, सायकलवर आणि सामान्य माणसांच्या गराड्यात झोकून देत धनदांडग्या प्रस्थापितांसोबत दोन हात करत+
सत्ताकाळापर्यंत केलेला प्रवास अद्वितीय आहेच, पण आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रेरणा देणारा आहे. गावगाड्यातल्या दुर्बल माणसाच्या खांद्यावर हात टाकत, त्याच्या डोळ्याचं पाणी पुसत आधार दिला, न्याय दिला, सत्ता त्यांच्यासाठी राबविली. बीड- अंबेजोगाईच्या मातीतून महाराष्ट्र+
Read 4 tweets
राज्यातल्या धुळे, नंदुरबार, अकोला, पालघर, वाशीम व नागपूर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. भारतीय जनता पार्टी मुसंडी मारत नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. प्रामुख्याने तीन पक्षांशी लढत असून आणि ते तिन्ही पक्ष सत्तेत असूनही भाजपा+
जिल्हा परिषदेत पुढेच आहे. मात्र भाजपाला राज्यात धोका देऊन सत्तेत असणारी शिवसेना मात्र या निकालात थेट तिसऱ्या/चौथ्या क्रमांकाचा फेकली गेलीय.यात पालघरला सेना खासदार राजेंद्र गावितांच्या मुलाचा पराभव करत जागा भाजपाने जिंकली आहे.ज्या पक्षाकडे मुख्यमंत्री पद आहे त्यांचे पतन होणे हे
+
त्यांच्या अपयशी कर्तृत्वाचे यशच म्हणावे लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सेनेला पाठीमागे टाकण्यात यश मिळवलं आहे.
नागपूरच्या बाबतीत भाजपाने राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांच्या काटोल मतदारसंघात 2 जिल्हा परिषदा ताब्यात घेतल्या आहेत, नागपुरात पंचायत समितीच्या जागाही भाजपाच्या वाढल्या+
Read 5 tweets
थ्रेड 👇
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी नुकतीच कोल्हापूर जिल्ह्यात प्रयाग चिखलीपासून ते नृसिंहवाडीपर्यंत पायी साधारण 97 किलोमीटरची पदयात्रा काढली, पूरग्रस्तांना मदत करा अन्यथा जलसमाधी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी ती स्थगित केली हा विषय निराळा...+
खरंतर राजू शेट्टी हे शेतकरी नेते आहेत, त्यांनी आत्तापर्यंत अनेकदा संघर्ष केला आहे, ते योगदान कोणी नाकारणार नाही, पण काही राजकीय गणितं बिघडली, विशेषत्वाने बारामतीशी जवळीक अंगलट आली हे खरंय. आणि त्यांच्या वाट्याला राजकीय पराभव आला. कदाचित ते पुन्हा योग्य मार्गावर येत आहेत.

पण+
त्यांनी मागच्या 5 दिवसात जी यात्रा काढली त्यात एक आग्रही मागणी होती की, "2019 च्या शासकीय परिपत्रकाप्रमाणे पूरग्रस्तांना मदत द्या."
मी अनेकदा 2019 च्या पूरग्रस्त मदतीसंदर्भात देवेंद्रजींवर टीका झालेली ऐकली, मात्र आज खुद्द राजू शेट्टींसारखा जाणता शेतकरी नेता देवेंद्रजींच्या GR चा+
Read 9 tweets
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीच्या केबिनमध्ये कधी कामानिमित्त गेलात तर विजयराज (दादा) डोंगरे यांच्या कामाची स्टाईल कळते, धडाकेबाज नेतृत्व आणि युवकांचा बुलंद आवाज म्हणून सोलापूर जिल्ह्यातली तरुण पोरं ज्यांच्याकडं आशेनं पाहताहेत ते विजयराज दादा एक वेगळं रसायन आहेत.+
मोहोळ तालुक्यातल्या कोणत्याही गावात गेलं की दादांचा हितचिंतक मिळणारच, इतकं काम या माणसानं उभं केलं, आष्टी उपसा सिंचनच्या माध्यमातून पाण्याची योजना मार्गी लावण्यात दादांचा मोठा वाटा आहे. मनामनात घर निर्माण करणारा हा झुंजार नेता.
राजकीय क्षेत्रात एकेकाळी यशाच्या शिखरावर असताना+
हितशत्रूंमुळे खरंतर अत्यंत वाईट काळही विजयराज दादांनी पाहिला, त्यातून तावून सुलाखून आणि नव्या उमेदीनं पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली अन थेट जिल्हा परिषदेत अर्थ व बांधकाम सभापती पदावर विराजमान झाले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात 5 वर्षे पूर्ण सभापतीपद सांभाळणारा एकमेव+
Read 6 tweets
थ्रेड👇
राज्यसभा खासदार शरद पवारांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार एकीकडे सभागृहात ऑन रेकॉर्ड सांगतात की, 31 जुलै 2021 पर्यंत एमपीएससीच्या सर्व जागा भरणार. पण वस्तुस्थिती पाहिली तर 31 जुलैपर्यंत यांनी काहीच निर्णय घेतला नाही. ना जागा भरल्या... ना प्रोसेस केली!

मग अजित दादांच्या+
या खोटारडेपणावर टीका व्हायला लागल्यावर, जाब विचारायला लागल्यावर त्यांचा बोलघेवडा पुतण्या आ. रोहित पवार दादांच्या मदतीला धावून आले. पण शेवटी तेही पवारच! त्यांनीही कशाचीही पर्वा न करता दिले खोटारडे ट्विट ठोकून..."त्यात लिहिलं की अजित पवार हे शब्द पाळणारे नेते आहेत वगैरे, त्यांनी+
एमपीएससीच्या जागा भरण्यासाठी राज्यपालांकडे 31 जुलै पूर्वीच यादी पाठवली आहे. वगैरे वगैरे...असं एक थोतांड ट्विट केलं. ( कदाचित अजित दादा शब्द पाळणारे वगैरे हे लिहीत असताना, सरकार आल्यावर 3 महिन्याच्या आत बारा कोरा करतो, नाही केला तर पवारांची औलाद सांगणार नाही, हे भाषण आ. रोहित+
Read 7 tweets
काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून 1999 साली राष्ट्रवादीचा जन्म झाला, शाहू - फुले- आंबेडकरांचे नाव घेऊन पुरोगामीत्वाची झुल पांघरत चालण्याला आज 22 वर्षे झालीत. मला राष्ट्रवादीबद्दल प्रेम, आस्था किंवा आपुलकी अजिबात नाही, कारण मी त्यांचा कार्यकर्ताही नाही अन हितचिंतकही नाही, पण या+
दगाबाज राष्ट्रवादीने इतक्या वर्षात मिळवलं काय? हे कोण सांगेल! कधी त्यांच्या कार्यकर्त्यांना तरी हे कळलंय का!वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा इतिहास कुणीही विसरणार नाही.
पण या 22 वर्षात काँग्रेसपासून फारकत घेत नेमकं काय सिद्ध केलं? आणि काँग्रेसपासून वेगळं होण्याचं कारण काय तर+
विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा म्हणे! असो...

नाही म्हणलं तरी शरद पवार यांनी राष्ट्रवादी स्थापन केली ती पंतप्रधान होण्यासाठीच. कारण काँग्रेसमध्ये राहिले असते तर पंतप्रधान पदासाठी नंबर लागणार नाही याची त्यांना पुरेपूर कल्पना असेल, इकडे राष्ट्रवादीची आपल्या 22 वर्षातली आजची स्थिती+
Read 8 tweets
भाजपा का कार्यकर्ता कभी हारता नही है,
वो केवल सीखता है, या जीतता हैं।🌷🧡
भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयीजी यांनी दिलेला हा मंत्र भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन अविरत चालणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने लक्षात ठेवायला हवा. आपण जिंकण्यासाठी राजकारणात नाही, सेवा, समर्पण+
आणि राष्ट्र प्रथम याच्या भोवती फिरणारे आपले राजकारण आहे.
राज्यात सर्वात जास्त 105 जागा जिंकून बॉस असलेला पक्ष आपलाच आहे, अभिमान वाटावा असे केंद्रात आणि राज्यात नेतृत्व आपलेच आहेत, आता राज्यात 3 पक्षांनी एकत्र येत भाजपाला विधानपरिषदसाठी पराभूत केलं असेल तर खचून जाऊ नका, कारण+
राज्याचे नेते श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या दमदार नेतृत्वात आपण निर्णायक मते घेतली आहेत. आता पुन्हा जोमाने काम करायचं, "गगन कहे विजय भव.." इथपर्यंत जाणार हे नक्की!
एकेकाळी 2 खासदार असणारा पक्ष 303 खासदारांपर्यंत प्रवास करतो तो पक्ष लोकनेते देवेंद्रजींच्या नेतृत्वात+
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!