Discover and read the best of Twitter Threads about #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३

Most recents (4)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना धमक्या आल्या. अंबानी हॉस्पिटलला धमकी आली. मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आली. तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धमक्या आल्या आहेत. धमक्या देणाऱ्यांना जरब बसेल, अशी कारवाई सरकारकडून झाली पाहिजे आणि हे सत्र थांबलं पाहिजे.
कोकणातल्या रिफायनरीच्या विरोधात लिखाण करणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांची भरदिवसा हत्या करण्यात आली. हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. याचा तपास झाला पाहिजे आणि केवळ हल्लेखोर आंबेरकर नाही तर त्याच्या पाठीमागचा मास्टरमाईंड सापडला पाहिजे. कठोर शिक्षा झाली पाहिजे.

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न शिंदे गटानं केले.त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्याची शिक्षा संजय कदमांना काय दिली? लगेच ‘ए.सी.बी.’ची नोटीस दिली. ‘फोडा नाही तर झोडा’ ही सत्ताधाऱ्यांची निती जास्त काळ टिकणार नाही.
Read 17 tweets
नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यानं राज्यातला शेतकरी त्रस्त आहे, हाताला काम नसल्यानं तरुण बेरोजगार आहे, महागाईनं सामान्य जनता त्रस्त आहे.
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३

bit.ly/3JHJrVp
राज्यातल्या महिला,मुली सुरक्षित नाही,दिवसाढवळ्या तलवारी,कोयते नाचवले जात आहेत,गोळीबार करुन दिवसाढवळ्या माणसं मारली जात आहेत,राजकारणासाठी विरोधकांची मुस्कटदाबी सुरु आहे,ही राज्याची स्थिती आहे.सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडली जाताहेत.
राज्यात डबल इंजिनचं सरकार आलं,विकासाचा वेग डबल होईल,म्हणून सांगितलं गेलं.मात्र राज्याच्या विकासाचा वेग डबल होण्याऐवजी गुन्ह्यांचा वेग डबल झाला आहे.राज्यात केवळ सत्ताधारी सुरक्षित आहेत. सरकारकडून कणखर भूमिका न घेता केवळ सत्ता टिकविण्यासाठी तडजोडी सुरु आहेत.#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
Read 25 tweets
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी पुणे हे राज्याचे ग्रोथ इंजिन आहे. राज्याच्या विकासासाठी मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक,औरंगाबाद,नागपूर या शहरांचा समतोल विकास होण्याची गरज आहे.गेल्या काही दिवसात राज्यातील पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पांची कामं रखडली आहेत.

bit.ly/42BWyju
पुण्यात सुरु झालेली मेट्रो नागरिकांसाठी काही कामाची नाही. पुणे मेट्रोचा उपयोग शाळकरी मुलांच्या सहलीसाठी, वाढदिवस साजरे करण्यासाठी, जादूचे प्रयोग करण्यासाठी होत असून पुणे मेट्रोसह रिंग रोडच्या कामाला गती द्यावी.

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
राज्यातल्या जनतेची सहनशीलता संपली असून सत्ताधाऱ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागेल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबई व इतर शहरांसोबत पुण्याच्या विकासावर आम्ही जास्त लक्ष केंद्रीत केलं होतं.

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
Read 18 tweets
राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री बैठकीत व्यस्त असल्यामुळे विधानसभेत आज प्रश्न क्रमांक दोन राखून ठेवण्याची नामुष्की आली आहे. या गोष्टी सभागृहात वारंवार घडत आहेत. सभागृहाच्या प्रथा, परंपरा पायदळी तुडवण्याचं काम सुरू आहे.

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
मंत्र्यांच्या अनुपस्थितीनं प्रश्न राखून ठेवण्याचं समर्थन करता येणार नाही. विधिमंडळाच्या इतिहासात मंत्री बैठकीत व्यस्त असल्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न राखून ठेवल्याचं यापूर्वी एकही उदाहरण नाही.

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
त्यामुळे विधिमंडळ सुरु असताना विधिमंडळाच्या कामकाजालाच सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे, सभागृहात चुकीचे पायंडे पडता कामा नये. सभागृहाच्या सार्वभौमत्वावर घाला घालू नका.

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!