Discover and read the best of Twitter Threads about #आर्थिक_साक्षरता

Most recents (3)

आर्थिक व्यवहारात हल्ली #क्रेडीटकार्ड हा प्रकार फार लोकप्रिय आहे म्हणजे माझ्या पंचविशीत तर क्रेडीटकार्ड असणे म्हणजे खुप मोठे स्टेट्स सिंबाॅल होते.

त्याचे काही फायदे आहेतही पण माझ्या दृष्टीने ते स्वत:कडे कायम लोडेड रिव्हाॅल्वर ठेवण्यासारखेच असते.

चुकून/रागाने नियंत्रण सुटले👇 #म
कि धोका ठरलेला तसेच लोभाने क्रेडीट कार्ड वापरले कि कर्जाचा गुंता सुरू झालाच.

त्यामुळे सावधान!

तर मुद्दा हा कि क्रेडीट कार्ड म्हणजे आधूनिक सावकारीच, जोपर्यंत तुमची गरज भागतेय तोपर्यंत ठिक पण जर तुम्ही वेळेत ते पैसे भरले नाहीत तर २०/३०% व्याज ठरलेले; तसेच CIBIL रेटिंग खराब 👇 #म
आणि वसुलीसाठीचा तगादा मनाची, कुटूंबाची शांतता भंग करून टाकतो.

जर #आर्थिक_साक्षर व्हायचे असेल तर कोणत्या गोष्टी आपण टाळायला हव्यात हे कळणे फार गरजेचे आहे.त्यासाठी हे ऊदाहरण.

या अशा अनेक गोष्टींवर आपण बारकाईने विचार करून पावले टाकणे अत्यंत महत्वाचे.

क्रेडीटकार्ड म्हणजे 👇 #म
Read 4 tweets
आर्थिक साक्षरता - सर्वप्रथम विचार करायचा तो आत्ता/वर्तमानात तुमचे ऊत्पन्न किती आहे आणि त्यात आपला होणारा खर्च किती?

थोडक्यात आपलेच आपण बजेट मांडायचे!😉

यात तीन शक्यता असतात;

पहिली-आपला खर्च जास्त आणि ऊत्पन्न कमी;
दुसरी-आपला खर्च कमी आणि ऊत्पन्न जास्त👇

#आर्थिक_साक्षरता #म
तिसरी म्हणजे अगदीच सर्वत्र सहज दिसते - “इकडे आड तिकडे विहीर” जेमतेम ऊत्पन्न पण तेवढ्यातच ओढाताण करून भागवतात.

यातील प्रत्येक कुटूंब आर्थिकदृष्ट्या सजग झाले, Learning,Unlearing आणि Relearning यातून गेले,खर्च आणि ऊत्पन्नाचा मेळ लावला, आवश्यक, अनावश्यक खर्चाचा शोध घेऊन 👇

#म
ते सर्व एकत्र लिहा, नको तिथे कात्री लावा. ही सुरूवात केली की आपण पहिल्या इयत्तेत गेलो समजावे.

हा प्रकार आयुष्याच्या प्रवासात सर्वात महत्वाचा असतो. अगदी आपल्या शालेय शिक्षणापेक्षाही, म्हणुन आजच्या काळात त्यापासून अनभिज्ञ राहून जमणार नाही.

- क्रमश:

#आर्थिक_साक्षरता #मराठी #म
Read 3 tweets
आर्थिक साक्षरता हा खर तर व्यवहारज्ञानाचा एक महत्वाचा प्रकार आहे, जो आपल्या भारतात फार चर्चिला किंवा अभ्यासला जात नाही.

तो फक्त ठराविक समुदायांमधे मौखिक स्वरूपात एका पिढीतून दुसऱ्या पिढीत दिला जातोय.

काही हा तंतोतंत पाळतात ते श्रीमंत होतात जे विसरतात ते देशोधडीला लागतात. #म 👇
यावर ऊच्चशिक्षणात नक्कीच खुप चांगला अभ्यास आहे पण याचे तज्ञ, व्यावसायिक सल्लागार मंडळी दांडगी फी आकारतात;
जे रास्तही आहे.
कारण फुकटच्या सल्ल्याला लोक कधीच किंमत देत नाहीत.

दुसरा उपाय म्हणजे स्वत: या विषयांमधे खोल अभ्यास करून या विषयातील तज्ञांशी वेळोवेळी चर्चा करणे #म #आर्थिक
आर्थिक, वित्तीय गोष्टींचा दररोज मागोवा घेणे; आपण व्यावसायीक आहात कि नोकरी करता हे दुय्यम असते.

अगदी शाळेत असल्यासारखे एक एक टप्पा पार करणे (याला शाॅर्टकट नाही, तो वापरूही नये)

वेळ लागेल पण आर्थिक साक्षरता ही शिक्षणाइतकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक गरजेची आहे. #म #मराठी #Thread
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!