Discover and read the best of Twitter Threads about #आवडलेलं

Most recents (5)

Jun 1st 2023
पत्रिका न काढता, कुंडली न बनवता, ती न पाहताही आयुष्यात यशस्वी होता येतं याचा धडधडीत पुरावा म्हणजे १ जून जन्मतारीख असलेली कर्तृत्ववान माणसं..!

तारीख, वेळ, दिवस, वार, हे सर्व माणसानं मोजण्यासाठी बनवलेली एककं आहेत.
जसं किलो, मीटर, फूट ही जशी एककं., Image
तसलंच हेसुद्धा एक एकक ही साधी सोपी गोष्ट समजून घेतली की, यश त्या गोष्टींवर अवलंबून नसतं, तर यश माणसाच्या कर्तृत्वावर, कर्मावर ठरतं हे मान्य करायला लागतं..!

पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून अलिप्त ठेवलेल्या समाजाला शिक्षणाची कवाडं समाजसुधारकांनी उघडली,
गावोगावी शाळा काढल्या आणि अशा शाळांमध्ये जाणारी अडाणी आईबापाची लेकरं, जन्म तारीख विचारली तर ह्यो जन्मला तवा संक्रांत ४ दिसांवर होती, दिवाळी तोंडावर होती, तवाच्या साली दुष्काळ पडला होता बघा अशी उत्तरे मिळत.

गुरुजींनीच मग शाळेसाठी म्हणून १ जून १९६५, ६६, ६७, ६८...अशा तारखा टाकल्या.
Read 8 tweets
Mar 3rd 2023
न्यूटनची जयंती किती धूमधडाक्यात साजरी होते माहित नाही..

न्यूटनचं नाव एखाद्या विद्यापीठालाही दिलेलं नसावं, न्यूटनच्या नावाचं विमानतळही युरोपात कुठं दिसत नाही..

पण पुढच्या पिढ्यांसाठी न्यूटनचा वारसा रहावा यासाठी ते धडपड करतात. 🎯🎯
राजकीय आणि सामाजिक नेतेच सर्वकाही असण्याचा एक काळ असतो. एका मर्यादेनंतर मात्र वैज्ञानिक हेही तुमचे हिरो असावे वागतात, युरोपात ते खूप पूर्वी घडलं.

जर्मनी, फ्रान्स सारखे भारताच्या मोठ्या राज्यांपेक्षाही छोटे असलेले देश डझनावारी नोबेल पुरस्कार मिळवतात..
..आम्ही इतके अल्पसंतुष्ट की दुरून दुरून भारतीय वंशाच्या असलेल्या कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला तरी फुकाच्या अस्मितेचा डीजे लावून बेधुंद नाचत राहतो..
Read 4 tweets
Apr 11th 2022
बायको म्हणजे कोण???
बायको ह्या शब्दाला जर फोडले तर “बा” म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम पणे उभी राहणारी “य” म्हणजे येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणारी आणि “को” म्हणजे कोणासाठीहि नाही तर फक्त आणि फक्त नवऱ्यासाठी जगणारी!
सुख दुःखात साथ देणारी म्हणून तिला बायको असं म्हंटलं जात मैत्रिणीला सहज समजून घेतलं जातं पण बायकोला मैत्रिण बनवलं तर आयुष्य किती सुंदर होईल शेवटी नवऱ्यापेक्षा अधिक जवळचा मित्र तिच्यासाठी कोण असेल बाहेर मैत्री आणी मैत्रिणी शोधण्यापेक्षा बायको मध्येच
मैत्रीण सापडली तर तिला आणखी काय हवं प्रत्येक नवऱ्याला वाटत बायकोसाठी खूप काही करावं लागतं पण सत्य परिस्थिती अशी असते तिला लागते नवऱ्याची साथ हातात भक्कम हात समजून घेणार हृदय इतकं प्रेम कि तिला माहेरच्या लोकांची आठवण हि ना यावी
Read 7 tweets
Nov 14th 2021
डॉ. अब्दुल कलाम यांना पायलट बनायचे होते..

त्यासाठी कुणीही मार्गदर्शक नसल्यामुळे त्यांनी बी.एस्.सी. ला एडमीशन घेतली.

नंतर फायनल ईयरला त्यांना कळले की, पायलट बनायचे असेल तर ईंजीनीयरींग मधील 'एयरोनॉटीकल ईंजीनीयरींग' ला प्रवेश घ्यावा लागतो!

1/7 #म #रिम
मार्गदर्शक नसल्यामुळे आयुष्यातील तीन वर्ष वाया घालवीले असे त्यांना वाटले.. खुप रडले..

परंतु याच बीएससी फीजीक्सने त्यांचे जीवन घडविले!

नंतर एयरोनाॅटीकल ईंजीनीयर ची पदवी घेतली, त्यावर्षी संपुर्ण भारतातुन केवळ आठ मुलं ही पदवी घेऊ शकले !.. त्यात डॉ कलाम टॉपर होते!
2/7
त्याकाळी फक्त 'एअर ईंडीया' हीच पायलटच्या जागा भरायची.
त्यावर्षी त्यांना सात जागा भरायच्या होत्या.. अर्ज आठ! डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम टॉपर..ईंटरव्यु होऊन सीलेक्शन झाले!

डॉ. कलाम सोडुन सर्व उमेदवारांना नौकरी मिळाली..

डॉ. कलाम यांची "ऊंची" कमी आहे, या कारणामुळे त्यांना नाकारले.
3/7
Read 7 tweets
Sep 3rd 2020
#आवडलेलं #वाचनीय
वाटा तुझ्या माझ्या : नरहर कुरुंदकर

एका उद्धवस्त उपाशी देशाचा पंतप्रधान म्हणून नेहरुंच्या पंतप्रधानकीचा जन्म झाला. लोक नेहरुंना मारखाऊ म्हणतात, पडखाऊ म्हणतात. त्यांचं राजकारण आत्मघातकी आणि शेळपट म्हणतात, पण लोक विसरतात ते हे की स्वातंत्र्य मिळालं तेव्हा +👇
या देशात रेशनिंग होती आणि माणशी ३०० ग्रॅम प्रतिदिवस अन्नच दिले जाई. ४९ साली अमेरिकेने थोडा ताण दिल्याबरोबर रेशन माणशी २२५ ग्रॅम पर्यंत खाली आलं. देशातले धान्य उत्पादन ३८ दशलक्ष टन एवढंच होतं. लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणापेक्षा जास्त अन्नधान्य वाढीचा वेग निर्माण केला नाही तर +👇
हा देशही टिकु शकत नाही, इथली लोकशाही ही टिकू शकत नाही. आणि चीनकडून होणारा अपमान तर सोडाच, पण श्रीलंकेनं एखाद्या वेळी उद्धटपणे आपला अपमान केला, तर त्याचा प्रतिकारही करणे शक्य होत नाही.पाकिस्तानच्या डरकाळ्यांच्या मागे पश्चिम पंजाबचा गहू आणि कापूस आणि आजच्या बांगलादेशमधले ताग आणि👇
Read 13 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!