Discover and read the best of Twitter Threads about #कामगार_दिन

Most recents (1)

#कामगार_दिन- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे

एकजुटीचा नेता
एकजुटीचा नेता । झाला कामगार तैय्यार
बदलाया रे दुनिया सारी दुमदुमली ललकार
सदा लढे मरणाशी ज्याला नच ठावे शांती
रक्त आटवून जगास नटवून जगण्याची भ्रांती
उठला खवळून झुंज झुंजण्याला
वादळ उठवून बांध फोडण्याला..👇 Image
निश्चय झाला पाय उचलला
चालू लागला करण्या नवा प्रहार ॥
मध्ययुगाची जीर्ण हाडे ही निरंकुश राजे
देशी धनवंतांचे साथी परकी साम्राज्ये
फाडुनिया बुरखा उघड जगा दावू
जागवून रंका समरांगणि जाऊ
आता अपुला, हा शेवटचा उगारलेला वार नाही चुकणार
शेतकरी अन् दलित जनाला घेऊनिया पाठी
लोकशाही क्रांतीच्या अपुल्या एक ब्रीदासाठी
कोटी करी ज्याने ध्वजा लाल धरिली
मेघासम आता फळी धरून आपुली
पुढे चालला, रणी गर्जला, करुनी आपुला पोलादी निर्धार
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!