Discover and read the best of Twitter Threads about #जयभीम

Most recents (24)

#ThanksPhuleAmbedkar
#bhimjayanti2023
#भीमजयंती2023
#10days_to_go

पँथरनामा आणि नामांतर आंदोलन: आंबेडकरोत्तर दलित चळवळ

आज कधी पण जेव्हा दलित पँथर चळवळी बद्दल ऐकतो किंवा वाचायला घेतो तेव्हा अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी येतं 1/n Image
मराठवाडा विद्यापीठा’ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव झाला आणि दुसर्‍याच दिवशी मराठवाडा पेटला. अनेक गावांतील बौद्ध समाजाच्या वस्तीवर हल्ले करण्यात आले. नांदेड मधील अशा उदध्वस्त झालेल्या लोकांना शहराबाहेर तात्पुरता निवारा देण्यात आला होता. 2/n
तिथल्या शेड मध्ये दोन दिवसापूर्वी जन्मलेले बाळ त्याची आई होती शेडमध्ये बाबसाहेबांचा फोटो होता तेव्हा reporting करताना एक पत्रकार बाळाला घेतलेल्या आजीला तिथे शेडवर डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र बाभळीच्या काट्याने लावले होते. भीती नाही वाटत?’ 3/n
Read 7 tweets
बुद्ध मत में भविष्यवाणी ओर भाग्यवाद सम्बंधित पाखंड :-

उपरोक्त चित्र लाफिंग बुद्ध का है ,,जिसे ये बुद्ध लोग ये मानते है कि घर में रखने से सुख समर्धि और शांति प्राप्त होती है …अब भला बिना पुरुषार्थ के एक जड़ से सुख शांति कैसे मिल सकती है
1/6
#नमोबुद्धाय #जयभीम #Buddha #Buddhism Image
2/6
ये बात तो यही बुद्ध जानते होंगे

… इनता ही नही ये बुद्ध किसी भी व्यक्ति की भविष्यवाणी भी कर देते थे ..पुब्बकम्मपिलोतिक बुद्ध अपदान में बुद्ध ओर उनसे पूर्व के २४ और साथ के ३ और आगे आने वाले बुद्ध के बारे में ..उनके जीवन परिचय के बारे में है …

#नमोबुद्धाय #जयभीम #Buddha
3/6
इसी के बुद्धपकिण्णक कण्ड के अनुसार गौतम बुद्ध आने वाले बुद्ध मेतेर्य बुद्ध की भविष्यवाणी करते है .. (१) सरुची नाम के तपस्वी के लिए पनोमदस्सी भगवान ने भविष्य वाणी की कि यह अपने अंतिम जीवन में सारिया नाम की ब्राह्मणी की कोख से पैदा होकर सारीपुत्त नाम वाला होकर
#नमोबुद्धाय
Read 6 tweets
बुद्ध मत में अन्धविश्वास

अक्सर बुद्ध मत के समर्थक ओर नास्तिक अम्बेडकरवादी सनातन धर्म पर अंधविश्वास का आरोप लगाते है ,ओर खुद को अंधविश्वास रहित बताते बताते नही थकते है ..लेकिन हद तो तब कर देते है जब वेदों पर भी अंधविश्वास का आरोप लगाते है
#नमोबुद्धाय #जयभीम #Buddha #Buddhism
1/15 Image
2/15
..यहाँ हम बुद्ध मत में वर्णित विभिन्न तरह के अंधविश्वास ,काल्पनिक बातें और आडम्बर के बारे में बतायेंगे ..बुद्धो में हीनयान,महायान ,सिध्यान ,वज्रयान नाम के कई सम्प्रदाय है इन सभी में अंधविश्वास आपको मिल जायेगा … बुद्धो में भूत ,पिशाच के बारे में अंध विश्वास :-

#जयभीम
3/15
एक समय की बात है कि मुर्रा नाम की एक भूतनी ने भेष बदल कर बुद्ध से प्रेम का इकरार किया लेकिन बुद्ध ने मना कर दिया ,,उसने नृत्य ,श्रृंगार ,रूप आदि से बुद्ध को लुभाने की खूब कोसिस की लेकिन बुद्ध ने उसकी एक न मानी ..तब क्रोधित मुर्रा भूतनी ने बुद्ध पर आक्रमण किया

#Buddhism
Read 17 tweets
आज फेसबुक उघडलं फक्त बघण्यासाठी की ज्यांना रामनवमीच्या यात्रांचा काही त्रास नाही झाला त्यांना नक्कीच दांडेकर पुल या भागात होणाऱ्या लाईट शो आणि गाणी, मिरवणूक याचा त्रास झालं की नाही...
या अशाच लोकांमुळे त्या तसल्या चेहऱ्याच्या पुस्तकाचा वीट आला...
+
अपेक्षे प्रमाणे लोकांना त्रास झाला आहेच, खरं सांगायचं तर मला पण नाही पटत जेव्हा DJ लावून दारू पिऊन लोक अशा दिवशी झिंगतात
पण हे फक्त या दिवशी होत का? २४-४८ तास जास्त वेळ चालणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुकीत काय होत? नवरात्री मध्ये गरबा काय २ डेसिबल volume ठेवून खेळतात का?
+
मग याच रस्त्यावर दांडेकर पुल ते आंबील ओढा पर्यंत जेव्हा अशा मिरवणुकांकडे नाक मुरडून बघायचं पण याच रस्त्यावर जेव्हा गणपती मंडळ त्यांचे मांडव, नवरात्र उत्सव असतो तेव्हा नाही असा outrage बघायला मिळत...
तिथे गेले काही वर्ष राम नवमी सुद्धा अशीच साजरी होते हे दिसत नाही???
+
Read 11 tweets
साधारणतः कोणत्याही गावात एसटी स्थानकासमोर निळ्या कोटात असणारा ज्यांचा पुतळा कायम हातात पुस्तकं घेतल्यामुळे लक्षात येतो ते #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर नक्की कोण? मग यांना राजकारणी, समाजसेवक, अर्थतज्ज्ञ, कामगार कैवारी, कायदेपंडित की लेखक.. काय म्हणून बघावं आपण ?
गांधी विरुद्द आंबेडकर वाद असेल किंवा आंबेडकर जिन्ना राजकीय मैत्री. या सगळ्यात मुरलेला राजकारणी आहे. फक्त समाजसेवक म्हणून छोट्या साच्यात बसवणं शक्य नाही आणि फक्त दलीत नेता म्हणावा तर इतर क्षेत्रात सर्व भारतीयांसाठी केलेलं प्रचंड काम दुर्लक्षित करता येणार नाही.
हिंदू धर्माची चिकिस्ता ते रुपयाचं मूल्य इतक्या वेगवेगळ्या विषयांवर केलेलं अप्रतिम लिखाण हे डॉ आंबेडकरांची पुढच्या पिढीला दिलेली परिवर्तनाची शिदोरी आहे. जमेल तितकी घ्यावी. आंबेडकरांच्या तसबिरीपेक्षा त्यांची पुस्तकं वाटावी इतकी त्यात वैचारिक धगधग आहे.
Read 5 tweets
अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला काय दिलं?

१. कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सेवा
२. कामगार राज्य विमा (ESI)
३. कामाचे १२ तासावरून ८ तास
४. कामगार संघटनेची मान्यता
५. भर पगारी सुट्या
६. महागाई भत्ता
७. कायदेशीर संपाचा अधिकार
८. आरोग्य विमा
९. कामगार कल्याण निधी ( lebour welfare fund
१०. निर्वाह निधी (provident fund)
११. पालकत्वाचा अधिकार
१२. घटस्फोटाचा अधिकार
१३. प्रसूती पगारी रजा
१४. स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार
१५. स्त्री-पुरुष समान काम व समान वेतन अधिकार
१६. वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना समान अधिकार
१७. महिला कामगार सरंक्षण कायदा (women labour protection act)
१८. मतदानाचा अधिकार
१९. भारतीय सांख्यिकीक कायदा ( indian statistical law)
२०. तांत्रिक प्रशिक्षण योजना (technical training scheme)
२१. मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समिती (central technical power board)
Read 5 tweets
#ThanksPhuleAmbedkar
इथे कलाकार मंडळी हातात फ्लेक्स घेवून सिनेमा पाहायला सिनेमा गृहात या.. रस्त्यावर उतरून सांगत होते त्याच वेळी केसावर फुगे सारखं गाणं कोणतीही जाहिरात न करता कोणताच सेलेब्रिटी नाही त्या गाण्यात तरी लाखो करोडो views भेटले.
फिल्म इंडस्ट्री,कला क्षेत्रात ला
जातीयवाद थांबला पाहिजे त्याशिवाय चांगला कंटेंट येणार नाही तोच तोच साचलेला रटाळ पणा येईल. इथ बहुजन वर्ग आहे त्याची लोककला, त्याचे प्रश्न तो दिसला तर काहीतरी नाविन्य येईल फिल्म मध्ये. आशा आहे नवीन प्रयोग होत राहतील.गायक शिंदे, वामनदादा कर्डक, कडूबाई खरात असे कलाकार छोट्या पडद्यावर
व्यापून जात आहेत.सोनी,झी सारखे चॅनल सुद्धा आता tv वर भीम जयंती चे कार्यक्रम भीम जलसा, बोला #जयभीम असे कार्यक्रम घेत आहे.ही स्पेस वाढली पाहिजे आणि हे शक्य आहे फक्त आणि फक्त बहुजन वर्ग जागृत झाला तरच. डिमांड वाढल की सप्लाय वाढतो.अगोदर हे कार्यक्रम होत नसत आता का होत आहेत
Read 5 tweets
भारत के अधिकांश समाचार पत्र पत्रिकाएं जाति विशेष के कल्याण में तन मन से लगे रहते हैं, यही नहीं वे भारत के अछूतों के विरुद्ध अहितकारी प्रलाप भी करते रहते हैं,
दीनमित्र,जागरूप,डेक्कन रैयत,विजयी मराठा,ज्ञान प्रकाश,इंदू प्रकाश तथा सुबोध पत्रिका तक में कभी कभी थोड़ा बहुत ही विचार 1/4
विमर्श होता था,बाकी जगह ब्राम्हणेत्तर जातियों के ही विचार विमर्श की लिए होती थी,भारत में अश्पृश्यता की भयंकरता तो देखिए-डा.बाबासाहब अम्बेडकर नें मूकनायक के प्रकाशन सम्बन्धी विज्ञापन लोकमान्य तिलक के समाचार पत्र केसरी में छापनें के लिए बाकायदा फीस देकर दिया लेकिन लोकमान्य तिलक 1/2
नें बाबासाहब का वह विज्ञापन छापा नहीं था,इसलिए 31 जनवरी सन 1920 को "मूकनायक" नामक समाचार पत्र का संपादन शुरू किया,ऐसे ब्राम्हणेत्तर को भला किस प्रकार लोकमान्य कहा जा सकता है,जो अपनें अखबार तक में जगह देनें के लिए तैयार नहीं हो,दरअसल यह मनुवादी वर्ण व्यवस्था की अश्पृश्यता 1/3
Read 4 tweets
📌⓫ परराष्ट्रीय धोरण आणि देशाचा सन्मान....

डाॅ. आंबेडकरांनी राजीनामा दिल्यानंतर 10आॅक्टों 1951 रोजी आपल्या राजीनाम्याची कारणे सभागृहात मांडण्यासाठी ते उपस्थित झाले होते. परंतु त्यांना त्यांचे म्हणने मांडू दिले गले नाही.
[1/n]

#ThanksDrAmbedkar
@LetsReadIndia
@MarathiBrain
म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचा त्याग करुन बाहेर पडले.
डाॅ. आंबेडकरांनी एक पत्रक काढून आपल्या राजीनाम्याची कारणे त्यांत मांडली होती. त्यात अनेक कारणाबरोबरच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्वाचे कारण होते.

#ThanksDrAmbedkar
[2]
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हा राजीनामा प्रस्तुत करत असताना म्हणतात की, मला खरी चिंता आहे ती देशाच्या परराष्ट्र धोरणाची. 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा आपल्या बद्दल वाईट विचार करणारा किंवा आपले वाईट चिंतनारा एकही देश नव्हता.

#ThanksDrAmbedkar
[3]
Read 23 tweets
दिनकरराव जवळकर आणि र. धो कर्वेंच्या वादग्रस्त खटल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढवलेल्या तिसर्‍या खटल्याबाबत खूपच कमी जणांना ठाऊक आहे. तर खटला चालला होता फिलीप स्प्रॅट या ब्रिटिश लेखकावर! फिलीप स्प्रॅट ( २६ सप्टेंबर १९०२ - ८ मार्च १९७१ ) हा ब्रिटिश लेखक होता. (1/11) Image
फिलीप हा कम्युनिस्ट होता, फिलीपला ब्रिटिश आर्म ऑफ कम्युनिस्ट इंटरनॅशनल ने भारत आणि मॉस्को येथे कम्युनिझमचा प्रचार प्रसार करण्यासाठी पाठवलं होतं. फिलीप हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक मनबेंद्रनाथ रॉय यांचे मित्र आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सभासद होते. (2/11)
भारतीय कम्युनिस्ट चळवळीत चैतन्य उत्पन्न करण्यासाठी ते भारतात आले. फिलीप स्प्रॅट यांनी 'इंडिया अँड चायना' या मथळ्याखाली 'नॅशनल हेरॉल्ड' मधुन लेख लिहीण्याचं कार्य केलं. या लेखांचं संपादन 'क्रांती' या नियतकालिकाचे संपादक श्री मिरजकर यांनी प्रसिद्ध केलं होतं. (3/11)
Read 11 tweets
📍 ओबीसी आणि आदिवासींसाठी योगदान :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करणारे हिंदुत्ववादी खोडसाळपणे असे सांगतात की त्यांनी आदिवासींसाठी काहीच केले नाही. केले ते फक्त स्वत:च्या जातीसाठी. आदिवासींचा बुद्धीभेद करण्यासाठी त्यांचे एखादे वाक्य संदर्भापासून
#ThanksDrAmbedkar #JaiBhim
तोडून विकृत करून समोर ठेवले जाते. आणि अफवा तंत्र वापरून ही कुजबूज गॅंग विष पसरवित राहते.

तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदिवासींसाठीचे मौलिक योगदान काय होते, आहे याची वस्तुस्थिती आपण पुराव्यांनिशी बघूयात.

१] " अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट " हा ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांचा
सर्वश्रेष्ठ ग्रंथ. मास्टरपिस. १९३६ सालच्या या पुस्तकात बाबासाहेबांनी संपुर्ण एक प्रकरण आदिवासींच्या समस्या, वेदन, दु:ख आणि ते दूर करण्याचे मार्ग यावर लिहिलेले आहे. त्यात ते म्हणतात, " भारतीय आदिवासींना आज दु:खाच्या, गुलामीच्या अंधार्‍या गुहेत जनावराचे जीवन जगायला भाग पाडण्यात
Read 15 tweets
📌 ➍ स्त्रीयांचे पुनरूत्थान......

"समाजातील स्त्रीची कितपत प्रगती झाली आहे त्यावरून मी त्या संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा आलेख ठरवतो."
~ डॉ. बा. आंबेडकर

#ThanksDrAmbedkar
#थ्रेड #Thread
@LetsReadIndia
@MarathiBrain
@MarathiRT
@TUSHARKHARE14
[1/n]
महामानव डॉ. बा. आंबेडकरांनी २०जुलै १९४२ रोजी नागपूर येथे आयोजित 'ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वीमेन्स कॉन्फरन्स'मध्ये महिलांना उद्देशून केलेल्या भाषणातील वरील ओळी म्हणजे या महामानवाच्या महिलांच्या सर्वांगीण प्रगतीविषयक दृष्टिकोनाचा परिचय देतात.

#ThanksDrAmbedkar
[2]
“भारतीय स्त्रीला कायदेशीरदृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनवणारे बाबा”

एक स्त्री म्हणून मला माझ्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या आणि माझ्या हक्काना कायदेशीररीत्या संरक्षण देणाऱ्या या महामानवास प्रत्येक स्त्रीने आवर्जून म्हणावंच
#ThanksDrAmbedkar
[3]
Read 23 tweets
📍 पाणी ऊर्जा धोरण आणि नियोजन :-एकेकाळी दामोदर नदी बिहार राज्यावरील मोठे संकट होते. दर दोन-चार वर्षांनी नदीला महापूर येई आणि लाखो लोकांचे जीवन आणि वित्त नष्ट होत असे. सन १८५९ पासून या नदीला आलेल्या मोठ्या पुरांच्या बारा नोंदी करण्यात आल्या होत्या.
#ThanksDrAmbedkar
@MyselfViraj Image
१७ जुलै १९४३ मध्ये या नदीला असाच मोठा पूर आला आणि त्यावेळेला त्याने सर्व रेकॉर्ड मोडले. अपरिमित हानी झाली. ११ हजार घरे वाहून गेली. लाखो लोक बेघर झाले. बंगालमध्ये अन्नधान्य पोहोचणे कठीण झाले. त्यातच दुसऱ्या महायुद्धाची धुमश्चक्री चालू असल्याने कलकत्त्यापर्यंत बॉम्बवर्षाव होत होते
. पुन्हा बंगालमध्ये दुष्काळाने कहर केला. पंचवीस हजार लोक मरण पावले आणि म्हणून इंग्रज सरकारने दामोदर नदीला कायमचा अटकाव घालणारी योजना राबविण्याचा विचार सुरू केला.

दामोदर प्रकल्प पूर्ण करण्याचे काम कोणावर सोपवावे याचा ब्रिटिशांना प्रश्न पडला. पण शेवटी व्हाइसरॉय कौन्सिलचे सभासद
Read 15 tweets
📍स्वतंत्र मजूर पक्ष (Independent Labour Party) ची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑगस्ट इ.स. १९३६ साली केली.या पक्षाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. या पक्षाचा जाहीरनामा 'टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी दैनिकात प्रथम प्रकाशित करण्यात आला होता.दलित वर्ग
#ThanksDrAmbedkar Image
कर्मचारी परिषद १२,१३ फेब्रुवारी १९३८ ला मनमाड येथे झाली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले होते, 'ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत.'
‘कोणत्याही समाजात त्या देशातील सर्वसामान्य जनतेचा जीवनमार्ग हा राजकीय परिस्थितीने
घडविलेला असतो. राजकीय सत्ता जनतेच्या आकांक्षांना मूर्त रूप देत असते. ती ज्यांच्या हातात असते त्यांना आपल्या आशा- आकांक्षांना मूर्त रूप देण्याची संधी प्राप्त होते. सत्ता त्यांचीच बटीक बनत असते.' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले. “या देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व भांडवलदार,
Read 20 tweets
#ThanksDrAmbedkar

B R Ambedkar laid the foundation for workers’ rights, social security in India

International Labour Day is celebrated on May 1 to honour workers. Labour has an undeniable role in shaping the nation’s fortune. Since the times immemorial,
the working class has struggled and sacrificed for greater causes — first for Independence and then building the nation brick by brick.

The proposed change in work culture through adaptability, efficiency, inclusiveness, opportunity and universalism will
open up more avenues for workers to build New India.

Many leaders have been a beacon for workers and B R Ambedkar was one among them. As the representative of the Depressed Classes in the Round Table Conference, Ambedkar forcefully pleaded for living wages,
Read 17 tweets
📌➋ कामगार संघटन आणि संघर्ष....

पुर्वी समग्र भारतातील कामगारांची स्थिती अत्यंत निराशाजनक होती. मालक- भांडवलदार वर्ग दुर्बल,असंघटित कामगारांना वाट्टेल तसा राबवित. कामगार संघटनासुद्धा मालकधार्जिन्या असल्यामुळे कामगारांचे अस्तित्व गोठवून टाकले
#ThanksDrAmbedkar
@LetsReadIndia
1/n
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कामगारांबद्दल आस्था होती. जिव्हाळा होता. कामगारांनी स्वाभिमानशून्यतेचे जीवन कंठणे नाकारले पाहिजे. प्रतिकार केला तरच शोषणाचे उच्चाटन होईल. अन्यथा गुलामीचे जीवन जगावे लागेल, असे त्यांचे स्पष्ट मत होते.
2/n
#ThanksDrAmbedkar
#जयभीम
आंबेडकरांनी १५ऑगस्ट १९३६ ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.पक्षाचे धोरण स्वष्ट करण्यासाठी कर्मचारी परिषद १२,१३फेब्रु १९३८ला मनमाड येथे झाली. त्यावेळी त्यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले होते, ‘ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत.’
3/n
#ThanksDrAmbedkar
Read 14 tweets
📌➀ घटना आणि देशाचं भवितव्य..

25 नोव्हें1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत शेवटचं ऐतिहासिक भाषण दिलं होतं
त्यात त्यांनी जी चेतावणी दिली होती, जे इशारे केले होते ते स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेकदा सत्य ठरलेत आणि आजही ते सत्य ठरत आहेत
1/n

#ThanksDrAmbedkar
#जयभीम
लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी फक्त एकच गोष्ट पुरेशी आहे ती म्हणजे महामानवाच्या विचारांवर विचार करणे, त्यांचा अंमल करणे कारण त्यांनी त्या भाषणात जे विचार, ज्या गोष्टीं मांडल्या त्या आजही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.
2/n

#ThanksDrAmbedkar
#जयभीम
डाॅ.बा.आंबेडकरांच्या भाषणातील लोकशाहीविषयी महत्त्वाचे मुद्दे👇

घटना राबविणारे वाईट वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही उत्कृष्ट असली तरी ती वाईट ठरणार त्याप्रमाणे घटना राबविणारे चांगल्या वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारकच ठरेल.
3/n
#ThanksDrAmbedkar
Read 14 tweets
"आरक्षण" आणि "भ्रष्टाचार" संपविण्यासाठी प्रायव्हेटाझेशन नावाचं भूत भारत सरकारने आणलेलं आहे.(यातून भ्रष्टाचार जरी नाही संपला तरी, "आरक्षण" संपावं हा महत्त्वाचा आणि मुख्य मुद्दा आहे.)
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सरकारने ज्या सरकारी कंपन्या निर्माण केल्या.
1/16
त्या लोकांच्या गरजपूर्ततेसाठी त्यांच्या सुविधापूर्ततेसाठी "सेवाभाव" हा उद्देश ठेवून निर्माण केल्या. आणि दुसरीकडे शासन आणि प्रशासन सुव्यवस्थित चालावी यासाठी सरकारी कार्यालये निर्माण केली. त्या सरकारी कार्यालयाच्या मुख्य उद्देश आहे "गोपनीयता ".

2/16
आणि प्रायव्हेट सेक्टर मुळे "सेवाभाव" आणि "गोपनीयता" या दोन्ही गोष्टींचा भंग होणारचं आहे. "सेवाभाव" ची जागा "नफा" घेणार आणि "गोपनीयतेची" जागा "असुरक्षितता" घेणार.
प्रायव्हेट सेक्टर चे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करेल आणि जे आपल्याला सुख सुविधा देईल
3/16
Read 17 tweets
ट्विटरवर @ReallySwara स्वरा भास्कर च्या एका ट्विटने एका नवीन वादाला जन्म दिला आहे.आंबेडकरवादी कोणाला म्हणायचे ? हाच एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ! "आंबेडकरवाद" याची व्याख्या काय आहे ? आंबेडकरी समाजाला काय सांगायचे आहे ? त्याचा नेहमी विपर्यास केला जातो. 😑 का ?
1/17
हा सगळा घोळ आहे तो फक्त दृष्टिकोनाचा.बोलण्याच्या पद्धतीचा.सांगण्याच्या पद्धतीचा.आंबेडकरवादी, लोकांना काय सांगू इच्छितात आणि लोक त्याचा काय अर्थ काढत आहेत. एक तर आंबेडकरवादी लोक समजावीण्यात कमी पडत आहेत. एक तर लोकांना कढत नाही किंवा कळल्यावर ही न कळण्याच ढोंग करत आहेत.

2/17
किंवा आंबेडकरवादी लोकांनाच आंबेडकरवाद मुळात कळला नाही ? यापैकी काहीही होऊ शकत.आंबेडकर वाद म्हणजे काय ? तर सर्वात सोपी भाषेत म्हणजे तर "अंधश्रद्धेला दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून जग अथवा परिस्थिती पाहणे" याला आंबेडकर वाद आपण म्हणू शकतो. अथवा यालाच आंबेडकर वाद म्हणतात.

3/17
Read 18 tweets
शूरवीरांचा, क्रांतिकारी लोकांचा, क्रांतिकारक सत्य घटनांचा आपण इतिहास लपवून ठेवूच शकत नाही, तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने समोर आल्याशिवाय राहत नाही. दोन वर्षांपूर्वी भीमा कोरेगाव येथे क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांवर जी अमानुष दगडफेक केली गेली - ImageImageImageImage
त्यामुळे संपूर्ण जगभरात भीमा-कोरेगावचा क्रांतिकारी इतिहास पोहोचायला मोठी मदतच झाली आहे. आणि त्यामुळेच फुले, शाहू, आंबेडकरी क्रांतीचा, भारताचा बौद्ध संस्कृतीचा सत्य इतिहास आजपर्यंत लपवून ठेवणाऱ्या,
चुकीचा इतिहास सांगणाऱ्या नकली इतिहासकारांची आता गोची होतांना आपणास दिसून येत आहे. भारताला स्वतंत्र होऊन सत्तर वर्षं झालेली आहेत आणि आज पहिल्यांदा दूरदर्शनवर सह्याद्री वाहिनीने भीमा-कोरेगाव येथील क्रांतिस्तंभाचा अभिवादन सोहळा थेट प्रक्षेपित केला आहे.
Read 8 tweets
'जयभीम' हा संविधानाचे शिल्पकार डॉ भीमराव आंबेडकर म्हणजेच जागतिक कीर्तीचे विद्वान, घटनाकार, कायदेतज्ज्ञ, खऱ्या अर्थाने भारताचे राष्ट्रपिता महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष आहे. मतिमंद जातीवादी आणि बाबासाहेबांचा आत्यंतिक द्वेष करणारे, Image
त्यांना एकाच जातीत बांधण्याचा कुटील प्रयत्न करणारेच 'जयभीम' या क्रांतिकारी घोषणेला जातीवादी संबोधून वेळोवेळी बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात.
त्यांच्या किंचित बुद्धीचा हा मनुवादी हलका अविष्कार बघून बहुजन समाजात हास्याचा गडगडाट होतो आणि त्यांच्या अल्प बुद्धीबद्दल हळहळ व्यक्त केली जाते.

सर्व भारतीयांना क्रांतिकारी #जयभीम 🙏

#जयभीम #नमो_बुद्धाय
Read 3 tweets
मी तथाकथित उच्च जातीचा पोरगा अगदी मराठा वगैरे. त्यात परत काही तश्याच कमी अधिक उंचीच्या उपजाती. कागदावर ही लावतो अगदी जन्मल्यापासून पण आजकाल लाज वाटतेय याची. का?

फक्त आंबेडकर कळाले,वाचले, आत्मसात केले, अन् आचरणात आणले म्हणुन ...
नाही अजिबात नाही .....सांगतो👇
#म
#AmbedkarJayanti
जन्म झाला माणूस म्हणून पण लगेच पुरुषी वंशाचा दिवा झालो.

नाव ठेवलं गेलं अन् आडनाव लावलं की एका धर्माचा झालो.

शाळेत जायला लागलो की नावापुढे जात आली.

थोडफार शिक्षण घेतलं की उपजात कळायला लागली.
#बाबासाहेब_आंबेडकर
त्यातच अंगाने मोठं झालो तेंव्हा मित्र, समाज , घरातील माणसं यांकडून काही गोष्टी कळायला लागल्या .
जसं की.... हा भीमाचा, हा महाराचा, तो मांगवाड्यातला, ते खालच्या जातीचे.......

काही गोष्टी कानावर पडून त्याबद्दल मत तयार झालं.
जसं की.... काय लावलाय तसला महार मांगी तमाशा...
#जयभीम
Read 10 tweets
#Thread
बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं.... - post by @smntknnr5109 👇

#jaibhim #जयभीम #अंबेडकरजयंती #Ambedkarjayanti
गावगाड्याबद्दल वाटणारं अप्रूप मला दिवसेंदिवस कमी होत गेलं. गावगाडा गोंडस दिसत असला तरी तो असंख्य लोकांच्या रक्तावर पोसलेला आहे हे लक्षात येत गेलं. शोषणाच्या संस्कृतीचे शेवटचे अवशेष गावगाड्यानेच जपले. शहरं त्या मानाने लय दिलदार असतात.
गावाबद्दल उगं रोमँटिक लिहणारे कवी आणि लेखक लोकं तद्दन भामटे असतात. कारण गावगाडा मांडताना ते आम्हा पाटलांच्या घरांमध्ये देवळीत ठेवलेला फुटक्या बाळीचा कप, आणि सालगडी माणसांची वेगळी ताटं आणि ग्लास कधीच मांडत नाहीत.
Read 18 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!