Discover and read the best of Twitter Threads about #नागपूर

Most recents (4)

१ मे १९६० ला #महाराष्ट्र स्थापन झाल्यावर राज्याचे सुसंघटित व्यवस्थापन राबविण्यासाठी वेगवेगळे विभाग करण्यात आले.ह्या थ्रेडमध्ये आपण त्याबद्दल व राज्यातील सर्वात मोठा सर्वात लहान जिल्हा,नागरी प्रशासन-ग्रामीण प्रशासन ह्याबद्दलही माहिती घेऊया..
#म #मराठी #धागा #महाराष्ट्र Image
(अ) महाराष्ट्रात एकुण ६ प्रशासकीय विभाग आहेत.
(१)नागपूर
(२)अमरावती
(३)औरंगाबाद
(४)नाशिक
(५)पुणे
(६)कोकण
*'औरंगाबाद' विभागात सर्वात जास्त जिल्हे(८) असुन सर्वात जास्त म्हणजे एकुण ७६ तालुके आहेत.
*'कोकण' विभागाची सगळ्यात जास्त लोकसंख्या असली तरी सगळ्यात कमी तालुके 'कोकण'मध्ये आहेत. Image
*'पुणे','नाशिक' व 'अमरावती'मध्ये सर्वात कमी (५) जिल्हे आहेत.

(ब) महाराष्ट्रात एकुण ५ प्रादेशिक विभाग आहेत.
(१)कोकण (मुंबई)
(२)पश्चिम महाराष्ट्र (पुणे)
(३)खानदेश (जळगाव)
(४)मराठवाडा (औरंगाबाद)
(५)विदर्भ (नागपूर)
आज महाराष्ट्रात ३६ जिल्हे,३५८ तालुके,५३४ शहरे व ४३,६६५ खेडी आहेत. Image
Read 13 tweets
#नागपूर #विधिमंडळअधिवेशन
शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९’ची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात घोषणा. सप्टेंबर २०१९ पर्यंत या योजनेंतर्गत प्रतिशेतकरी दोन लाख रुपये या कमाल मर्यादेपर्यंत लाभ मिळणार
विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील अंतिम आठवडा प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली या कर्जमुक्ती योजनेची घोषणा.
शेतकऱ्यांनी मार्च २०१५ नंतर उचल केलेल्या पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकी शासनाच्या वतीने भरुन त्यांना कर्जमुक्त करण्यात येईल. याच कालावधीमध्ये उचल केलेले पीक पुनर्गठित कर्जाची मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकीची रक्कम सुध्दा या योजनेसाठी पात्र
Read 29 tweets
#नागपूर #विधीमंडळअधिवेशन
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा मुख्यमंत्री श्री. उद्वव ठाकरे यांनी विधानसभेत मांडला प्रस्ताव
#नागपूर #विधीमंडळअधिवेशन
महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्यामुळे अभिमानाने ऊर भरून आले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे न्यायवस्थेला नवचैत्यन्य मिळेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत व्यक्त केली भावना.
#नागपूर #विधीमंडळअधिवेशन
मूळचे नागपूरचे असलेले शरद बोबडे यांचे अभिनंदन नागपूरच्याच अधिवेशनात करता आले हा दुर्मिळ योगायोग. सध्या सुरु असलेला शरद ऋतू म्हणजे नवचैत्यन्याचा ऋतू, सरन्यायाधीश बोबडेंच्या रूपाने न्यायव्यवस्थेला नवचैत्यन्य येईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Read 5 tweets
#नागपूर येथे उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी येथे चहापानानंतर मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू... Image
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेस मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यासह कॅबिनेटमंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ, डॉ. नितीन राऊत आदी मान्यवर उपस्थित Image
मुख्यमंत्री म्हणून प्रथमच नागपुरात आलो आहे. मुंबईतील अधिवेशन झाले, मुख्यमंत्री म्हणून नव्या सरकारची कारकीर्दीची सुरुवात उद्यापासून होत आहे. जनतेच्या पाठबळावर हे सरकार आलं आहे. त्याच्या आशीर्वादाने जनतेच्या अशा आकांक्षा पूर्ण करेल - मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!