Discover and read the best of Twitter Threads about #नियोजन

Most recents (4)

मध्यमवर्गीय कुटुंबाचे #आर्थिक_नियोजन कसे असते?

मी पाहिलेले काही #अनुभव मी इथे सांगत आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण, पती व पत्नी आपले आर्थिक जीवन सुधारावे म्हणून खूप प्रयत्न करतात. उच्च शिक्षण घेऊन 3, 5 वर्षात चांगल्या मोठ्या पगारची नोकरीही मिळवतात
1)
#Thread
2) पण, तरीही त्यांना आर्थिक स्वातंत्र्य ( #Financial_Freedom ) प्राप्त नाही करता येत. अगोदरच त्यांच्या लग्नात खूप खर्च झालेला असतो. खर्च येवढा असतो की , तो जर कोठे गुंतवला असता तर काही वर्षात त्यांना कॅश मध्ये स्वता:साठी घर घेता आले असते.
3) जेवढा पगार जास्त तेवढी त्यांची जीवनशैली ( #Lifestyle ) उच्च असते. जेव्हा खर्चाची वेळ येते तेव्हा ते सगळे केलेली मेहनत विसरून आयुष्य जगायला सुरवात करतात आणि काही काळाने म्हणजे लग्नाच्या एक दोन वर्षांनंतर नंतर एक हप्त्यावर
Read 11 tweets
#आर्थिक_स्वातंत्र्य म्हणजे काय ?

खर्‍या अर्थाने जीवनाला आनंद देणारा मार्ग म्हणजे ‘’आर्थिक स्वातंत्र्य’’ आज आपण पाहू ‘’आर्थिक स्वातंत्र्य’’ म्हणजे काय इंग्लिश मध्ये त्याला #Financial_Freedom असे म्हणतात.

#Thread

1)
2) आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे अगदी सोप्या भाषेत मनासारखे आयुष्य जगणे. कोणावरही पैश्यासाठी अवलंबून न राहता आनंदाने आयुष्य जगणे होय. वाटेल तेव्हा खायचे , वाटेल तेव्हा बाहेर फिरायला जायचे, कुटुंबासाठी फक्त रविवारी वेळ न देता दररोज वेळ देणे,
3) तुमचे राहिलेले स्वप्न पूर्ण करणे, 9 ते 5 चे जेल सोडून आपल्या ईच्छा पूर्ण करणे ,तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि अजून बरेच काही म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य होय. तुम्ही कल्पना पण नाही करू शकत की आर्थिक स्वातंत्र्यअनुभवण्याचा आनंद काय असतो.
Read 18 tweets
#बेरोजगार आहात? स्वतःचा #व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहात? व्यवसाय काय करावा हे सुचत नाहीये? नवीन कल्पना शोधत आहात? मग हे नक्की वाचा :

व्यवसाय म्हणजे मोठी रिस्क, व्यवसाय म्हणजे २४X७ ची नोकरी हे आपण ऐकलेच असेल.
👇
खूप सारे नवीन व्यवसाय, नवीन #स्टार्टअप्स चालू झालेले आपण पाहिले असतील. ७०% नवीन व्यवसाय एका वर्षात बंद पडतात हेही ऐकलं असेल. नवीन व्यवसाय उभारताना रिस्क कमी करण्यासाठी, चांगली कल्पना शोधण्यासाठी आणि व्यवसाय उभारण्यासाठी या काही टिप्स -
👇
१. व्यवसाय करायचा असेल तर पहिल्यांदा ग्राहकाची #गरज ओळखायला शिका. आपला ग्राहक कोण असावा हे ठरवा, त्यानुसार त्यांच्या गरजा त्यांचे प्रश्न काय आहेत हे समजून घ्या. एकदा का तुम्हाला ग्राहकाच्या गरजा समजल्या की त्या आपण कशा पूर्ण करू शकतो याचा विचार करा.
👇
Read 12 tweets
#आर्थिकसाक्षरता ही फक्त आपण कमवायला लागल्यावरच शिकावी असे नाही, खरे तर हा शिक्षणपद्धतीचाच विषय असावा.

यातील महत्वाचा टप्पा - #बचत

बचतीचे खरे प्रशिक्षण मला खरे तर माझ्या हाॅस्टेलच्या आयुष्यात मिळाले. अतिशय तुटपुंजी रक्कम मिळूनही खुप आनंदात रहायला शिकलो.

#म #मराठी १/४
#बचत ही आपण पैसे न कमविता खर्च कमी करूनही करू शकतो.

वडिलांची शिस्त होती, महिन्यातून एकदाच पैसे मिळतील आणि त्यातच सर्व भागवायचे, खरे तर आमच्यापैकी कित्येकांना ते ही सुख नव्हते, कधीकधी दुसऱ्यांची मदत करत तर कधी त्यांची मदत घेऊन ते अविस्मरणीय आणि अतिशय मौजमजेचे दिवस गेलेत. #म २/४
या काळात काटकसर शिकलो,कामाला लागल्यावर सर्वप्रथम येणाऱ्या पैशांचे नियोजन केले होते,कारण वडील द्यायचे त्याच्यापेक्षा खुप पैसे मला मिळत होते.

आजही मला लख्खपणे आठवते बाबांनी अन् मी नियुक्तीपत्र मिळाल्यादिवशीच बचतीचे नियोजन केले होते.

तसेच #नियोजन मला आजही ऊपयोगी पडते.

#बचत #म ३/४
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!