Discover and read the best of Twitter Threads about #पुस्तक

Most recents (4)

अयोध्यापती श्री रामचंद्र की जय 🙏
अस म्हटल की पहिली आठवते ती अयोध्या आणि प्रभू रामचंद्र पण तुम्हाला माहिती आहे का
प्रभूराम वनवासात होते ते तब्बल १० वर्ष ते आपल्या महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास होते,त्यांचा हाच महाराष्ट्रातील प्रवास अनुभवायचा असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचा
🧵१/३ Image
हे पुस्तक लिहिलं आहे श्री. मोरेश्वर कुंटे आणि सौ. विजया कुंटे यांनी, मंदिर कोषासाठी त्यांनी महाराष्ट्र भर प्रवास केला आणि या १७ वर्षांच्या प्रवासादरम्यान त्यांना प्रभू रामचंद्र यांच्या महाराष्ट्रातील वस्तव्याबद्दल वेगवेगळी माहिती मिळत गेली, हीच माहिती एकत्र पुस्तकरूपात आली👇 Image
हे पुस्तक वाचायची इच्छा असेल, प्रभू रामचंद्राच्या महाराष्ट्रातील प्रवास अनुभवायचा असेल तर नक्कीच ऑर्डर साठी फॉर्म भरा👇
surveyheart.com/form/6448fa09c…
विक्रेते : विनायक चिटणीस तुम्हालाकॉल करतील.
पुस्तक मूल्य ₹.१०० + करियर ₹.३० आहे याची नोंद घ्यावी.
#मराठी #पुस्तक #माहिती #जयश्रीराम
Read 4 tweets
स्वराज्य म्हणजे परकीय सत्तेच्या राजकीय दास्यापासून मुक्तता एवढाच मर्यादित अर्थ शिवाजी महाराजांच्या स्वराज्यास प्राप्त होत नाही; तर परकीय सत्तेप्रमाणेच स्वकीय जुलमी लोकांपासूनही मुक्तता‚ हाही अर्थ स्वराज्यात अभिप्रेत होता!
त्याचबरोबर स्वराज्यात स्वधर्म व स्वसंस्कृती यांचे संरक्षण व संवर्धन झाले पाहिजे‚ असाही त्यांचा आग्रह होता. या दृष्टिकोनातून महाराजांच्या स्वराज्याच्या कार्याकडे पाहिले की‚ त्यांच्या ऐतिहासिक कार्याची महत्ता द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही.
केवळ प्रशासन‚ लष्कर‚ आरमार‚ दुर्ग‚ व्यापार‚ उद्योग या क्षेत्रांतच शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात नवे युग सुरू केले असे नाही‚ तर धर्म व भाषा यासारख्या सामाजिक क्षेत्रांतही नवे पायंडे पाडले‚ नवे दंडक निर्माण केले.
Read 6 tweets
काही महिन्यांपूर्वी अत्यंत अभ्यासपुर्ण मराठी पुस्तक वाचनात आले.

मी अगदी ॲाफीसमधेच थांबून एका बैठकीत संध्याकाळी ७ ते ११.३० वाजेपर्यंत त्याचा फडशा पाडला. पुढचे काही दिवस त्या पुस्तकातील भाग पुन्हा पुन्हा वाचला. त्या लेखकाबद्दल खूप आदर तयार झाला.

#SundayThread #पुस्तक #वाचन
१/१४ ImageImage
काहीही करून त्यांना भेटायचे आणि त्यांना धन्यवाद सांगायचे हे मनोमन ठरवलं.

खरं सांगायच तर मागच्या पाचएक वर्षात माझ्या वाचनात मराठी पुस्तक फार मोजकी येताहेत, आणि त्यात मला नक्कीच सुधारणा करायच्या आहेत. मला ते पुस्तक वाचून अजून काही मराठी पुस्तकं वाचायची प्रेरणाही मिळाली होती.
२/१४
दरम्यान मी त्यांची अजून एक पुस्तक वाचून काढले. लेखकाचा एकंदर आवाका मोठा होताच शिवाय त्यांचे कष्टही त्या लिखाणातून दिसत होते. मी काही जवळच्या मित्रांकडून त्या लेखकाचा नंबर मिळवायचा प्रयत्न करत होतो पण यश मिळत नव्हते.

असेच काही दिवस गेले, मी ही कामात बिझी झालो होतो. एक दिवस
३/१४
Read 14 tweets
आज बंगलोरहुन येताना सहज पुस्तकाच्या दुकानात डोकावलो तर हे पुस्तक दिसले,48 तासात नवाव्यवसाय-आयडीया ते लाॅंच,हे सर्व १ विंकएंडमधे.

आणि मला एकदम हसु फुटले आणि विचार करायला लागलो,कसंकाय सुचेल-टिकेल हे 🤔

लोकांना कस सर्व फटाफट पाहीजे,लेखक आणि #पुस्तक प्रकाशकांनीपण हे पुरते ओळखलेय 👇 Image
मग काय एकदम भन्नाट शिर्षक,आकर्षक कव्हर आणि मार्केडींगचे सर्व फंडे वापरून मस्त कॅचलाईन्स -

इंस्टंट फुड,
इंस्टंट यश,

एका आठवड्यात हमखास दहा किलो वजन कमी,

दोन तासात फाडफाड इंग्रजी शिका,

१००० रूपये गुंतवा आणि तीन महीन्यात करोडपती व्हा,

तीन महिन्यांचा कोर्स आणि १ लाखाची नोकरी👇
घर,गाडी, बंगला सगळं सगळं कस काही तासात काही दिवसात!

आयुष्य इतके सोपे नक्कीच नाही, फुकट काही नसते,पुरेपुर किंमत वसुल झाल्याशिवाय यश अशक्यच.

कष्ट,खुप कष्ट,शिकत राहण्याची तयारी आणि कायम अलर्ट असाल तरच मुर्ख बनणार नाही.

नाहीतर विद्येच्या नावाखाली पुस्तकवाले पण गंडवायला तयार झालेत.
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!