Discover and read the best of Twitter Threads about #भुतांच्या_गोष्टी

Most recents (5)

#भुतांच्या_गोष्टी
#बाळा_झोप_रे
आई माझंच नाव का गं 'शशिकांत 'ठेवलंय माझ्या मित्रांचे नाव बघ किती फॅशनेबल ठेवले आहेत! कुणालाच आवडत नाही माझं नाव !! सगळेजण मला शशी ग शशी म्हणून चिडवतात !!शशि ओरडला आणि मग त्याची आई अर्चना भानावर आली. तिला आठवलं की त्याच्या उजव्या हाताला आणि
1
डाव्या पायाला एक बोट जास्तीचे आहे!हळूहळू तिच्या सगळ्याच स्मृती चाळवल्या गेल्या! लहानपणी तो पाळण्यात फार रडायचा जिवाच्या आकांताने ओरडू लागायचा म्हणून उपाय म्हणून शेवटी त्याच्या आजोबांनी त्याच नाव कुळातल्या प्रथम पुरुषांच्या नावाने ठेवल्याने तो रडायचा थांबला पण पुढे जाऊन तेच नाव
2
इतके प्रश्न निर्माण करेल असं तिला वाटले नाही. तो तणतण करत निघून गेला अन् मोबाईलची रिंगटोनने ती भानावर आली. पलीकडून मधु आत्याचा आवाज आला. 'अहो वहिनी ऐकलं का रमा दादांचा फोन आला होता वाड्याच्या वाटण्या करायला घेऊ म्हणत होता तो ! सगळे हजर असतील दिवाळीच्या सुट्ट्यांच्या वेळी,
3
Read 25 tweets
त्रिकाळ
(ही निव्वळ काल्पनिक भयकथा आहे. कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीचा आणि घटनांचा याच्याशी कोठेही संबंध नाही)
भाग 1
कोकणा मधील एक गाव. तसे तुरळक वस्तीचे. भर पावसाळ्याचे दिवस होते. आधीच पुर येऊन गेलेला. यावेळचा पूर तसा भयानक होता. आजूबाजूच्या वस्त्यांमधील लोक वाहून गेले होते
बाजूच्या गावांमध्ये प्रचंड मोठी दरड कोसळली होती. भर रात्री. अख्खीच्या अख्खी कुटुंब पूर्ण डोंगराखाली गाडली गेली. आजूबाजूचे सर्व गावे व त्यामधील लोक निसर्गाच्या अशा प्रकारच्या रूपाला भेदरून गेले होते.
एकंदरीतच स्मशान शांतता होती. एकप्रकारची काळी विकृत सावली पडली होती.
या गावामधील रम्या तसा हुशार मुलगा आणि धाडसी देखील. दहावी मध्ये होता तो.  फारशी कोणाची फिकीर नाही. त्याच्या घरी कधी पुराचे पाणी शिरत नसे. यावर्षी त्यानेदेखील स्वतःच्या घरात पाच फूट पाणी अनुभवले होते.
Read 26 tweets
रात्री मुंबई झोपत नाही हे खरं असल्याची जाणीव मेधाला इथे आल्यानंतरच्या 2-3 दिवसातच झाली होती. चिकमगळूर जवळच्या तिच्या छोट्याशा गावात 7 वाजताच शुकशुकाट व्हायचा. 6 महिन्यांपूर्वी जेव्हा ती नोकरीसाठी मुंबईत आली तेव्हा या शहराच्या झगमगाटाने तिचे डोळे दिपून गेले होते.
आता मात्र हे सगळं सवयीचं झालं होतं. रात्री बेरात्री फेरफटका मारायला जाताना आपण अगदी एकटे नसल्याची जाणीव तिला सुखावणारी होती. सतत बहीण भावांच्या गराड्यात असलेल्या तिला एकटेपण खायला उठत असे.
आज पण असंच ऑफिसमधून निघायला रात्रीचे बारा वाजले तरी आजूबाजूला माणसं बघून तिला जरा बरं वाटलं. तिने रिक्षा पकडायला हात वर केलाच तेवढ्यात तिची नजर एका आजीवर पडली. हातात औषधांची पिशवी घेऊन आजी रस्त्याकडे थरथरत्या नजरेने बघत होती. बहुतेक आजींना रस्ता ओलांडता येत नसावा.
Read 9 tweets
#भुतांच्या_गोष्टी
रवी अन् त्याची बायको मधु हे नवीन लग्न झालेलं जोडपं नुकतंच नवीन घरात शिफ्ट झाले होते.
दोघंही जण एकमेकांना फार जपत, नवलाईचे दिवस त्यांचे छान चालले होते
अचानक एक दिवस रवीला घरी यायला उशीर होणार होता त्याने मधुला तसं कळवलही आणि कामात गढून गेला.
१/३
जरा वेळानं त्याने घडाळ्याकडे पाहिलं रात्रीचे ११ वाजले होते, त्याने घरी निघायची तयारी केली आणि पार्किंगमध्ये गाडीकडे चालत निघाला.
इकडे मधु जेवायची थांबली होती, रवीची बात बघून पार पेंगुळली होती तेवढ्यात बेल वाजली.
२/३
दरवाजा उघडला आणि रवीला बघून खुश झाली.
म्हणाली चल रवी फ्रेश हो आज किती उशीर केलास, तुझ्या आवडीची भरली वांगी आणि ठेचा केला आहे आज.
आलोच म्हणून रवी जे घरात गेला ते अर्धा तास झाला तरी जेवण्याच्या टेबलावर येईना.
मधुनी दोनदा आवाजही दिला.
तेवढ्यात फोनची रिंग वाजली.
३/४
Read 7 tweets
@RakyaDadoos_ #भुतांच्या_गोष्टी
लांजा अंदाजे रत्नागिरी पासून ४५ किमी वर असलेले कोकणातील एक टुमदार गाव. इथून जवळपास १२-१५ किमी अंतरावर अनंत वन सृष्टीने नटलेले एक खूपच सुंदर खेडे आहे गोळवशी. आज पर्यंत ह्या ठिकाणाला काही फारशी प्रसिद्धी लाभली नाही ना इथे मोबाइलला नेटवर्क
ना धड वीज पुरवठा फक्त ७ ते ८ तास वीज, एसटी सुद्धा दिवसाला केवळ तीनच फेऱ्या मारते - संध्याकाळी ५  किंवा ६ वाजता शेवटची. इथे उतरल्या वर तुमच्या स्वागताला असतात फक्त दाट वनराई, मातीच्या आणि दगडाच्या पायवाटा, पक्ष्यांच्या शिट्ट्या
मला काही कोकणातल्या मित्रां कडून समजले होते कि गोळवशी
मध्ये बायंगी नवा चे भूत विकत घेता येते आणि हे भूत आपल्याला व्यवसायात सुबत्ता देते. सहज उत्सुकता म्हणून मी ठरवले कि ह्या गावी जाऊन बघायचे कि काय प्रकार आहे. 
दादर वरून सकाळी जनशताब्दी पकडली आणि रत्नागिरी गाठली तेथून पुढे काळीपिवळी ने अंदाजे दुपारी १ च्या सुमारास लांजाला पोहोचलो
Read 17 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!