Discover and read the best of Twitter Threads about #महाराष्ट्र_दिन

Most recents (5)

#महाराष्ट्र_दिन - अण्णाभाऊ साठे

कंबर बांधून ऊठ घाव झेलाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
महाराष्ट्र मंदिरापुढती, पाजळे याशीची ज्योती
सुवर्ण धरा खालती, निल अंबर भरले वरती
गड पुढे पोवाडे गाती, भूषवी तिला महारथी
तो अरबी सागर लागे जयाचे पाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया.👇 Image
ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची
घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची
संतांची, शाहीरांची । त्यागाच्या तलवारीची
स्मरून धुरंधर आता त्या शिवराया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ॥
👇
पहा पर्व पातले आजचे । संयुक्त महाराष्ट्राचे
साकार स्वप्न करण्याचे । करी कंकण बांधून साचे
पर्वत उलथून यत्नाचे । सांधू या खंड की त्याचे
या सत्यास्तव मैदानि शिंग फुंकाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ॥
👇
Read 4 tweets
या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे ॥

महाराष्ट्र...

संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमि...

शिवभूपतींच्या अद्वितीय कार्याची साक्षी असलेली भूमि...

धर्मवीर शंभूराजेंच्या बलिदानाने कृतार्थ झालेली भूमि...

१/३
पुण्यश्लोक शाहूछत्रपतींच्या अजातशत्रू राजकारण अनुभवलेली भूमि...

शहामतपनाह बाजीरावांच्या पराक्रमाने गौरवांकित झालेली भूमि...

मराठ्यांच्या वीरतेनी तृप्त झालेली भूमि...

दिल्लीचे तख्त राखणारी ही भूमि...

मोगल आणि इंग्रज यांचा बंड मोडून काढणारी ही भूमि...

२/३
असंख्य क्रांतिकारकांकडून क्रांति घडवणारी ही भूमि...

समाजात सुधारक निर्माण करणारी ही भूमि...

टिळक, सावरकर, आंबेडकर यांच्यात राष्ट्रवादाची मशाल पेटवणारी ही भूमि...

अशा या भूमिला मी त्रिवार वंदन करतो🙏🏼

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐

#महाराष्ट्र_दिन

३/३
Read 3 tweets
अगोदरच्या काळात बाबा बुवा लोक काहीतरी हातचालाखी करून त्याला चमत्कार दाखवून सर्वांसमोर विज्ञानाचा खून करायचे व लोक त्यांना देव समजून त्यांचा उधोउधो करायचे. तसे काही बाबा आजही बघायला भेटतात. म्हणून तर ट्रेन, बस, सार्वजनिक ठिकाणे या भोंदूबाबांच्या जाहिरातींनी गजबजून गेलेले दिसतात.
पण जसं जसं विज्ञान प्रगत होत गेलं तसा लोकांचा विज्ञानावर विश्वास वाढत गेला व या बाबांनी पण आपला पवित्रा बदलता घेतला. आजकाल हे बाबा लोक विज्ञानाने बनवलेल्या साधनांचा विज्ञानाची कत्तल करण्यासाठी सर्रास वापर करताना दिसतात.
काही जुन्या ग्रंथात, संस्कृतीत विज्ञान कसं प्रगत होत याबद्दल
अफवा पसरवतात, तर काही विज्ञानाची तोडमरोड करून आपला प्रॉपगंडा पसरवतात. यात त्यांचं महत्वाचं शस्त्र असत ते म्हणजे छद्मविज्ञान. छद्मविज्ञान हे वरून वरून विद्यानासारखच भासतं कारण यात हे लोक विज्ञानातील शब्द जसे की dimension, intensity, frequency,etc वापरताना दिसतात. काहीच शहानिशा
Read 6 tweets
साल २००२- पहिल्यांदा विदेशातील नोकरीची ॲाफर- स्पष्ट नकार

२००४-ट्रेनिंग निमित्ताने युरोपला जाण्याची संधी,गेलो ही,शिकलो.
तिथेच स्थायिक होण्याचीही ॲाफर पण परत नकार!

२००६-परत एकदा दुबईचे वास्तव्य आणि व्यवसायाची संधी- परत सुसंकृतपणे नकार

२००७- पुन्हा एकदा युरोपची👇 #म #मराठी १/४ +
आणि भरगच्च पगाराची ॲाफर आणि नेहमीसारखा नकार!

महाराष्ट्र आणि माझ्या मुंबईची मजाच वेगळी!

आज ती प्रत्येक कंपनी आमची ग्राहक आहे ज्यांनी विदेशातील नोकरी ॲाफर केली.

संधी अजुनही खुप येतात आणि येतील पण महाराष्ट्रात काम करण्यासारखे सुख आणि इथल्या मातीचे,भाषेचे ऋण आयुष्यभर २/४ #म #मराठी
फेडायचे म्हटले तरी फिटणार नाहीत.

मला खरचं #मुंबई सोडवत नाही ❤️

या मातीत जो आपलेपणाचा सुगंध जाणवतो तो जगात कुठेच जाणवत नाही.

त्या तमाम वीररत्नांना,हुतात्म्यांना साष्टांग दंडवत ज्यांच्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. ३/४

जयमहाराष्ट्र

🙏

#महाराष्ट्र_दिन #म #मराठी
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!