Discover and read the best of Twitter Threads about #लालपरी

Most recents (5)

सह्याद्रीच्या कुशीत वळण घेत लालपरीने विसावा घेतला. थोडी दमलेली दिसली. जेवण झालं व पुन्हा नव्या जोमाने धावू लागली. कोकणचा #प्रवास भलताच वळणदार. #कोकणी माणसाच्या सरळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध! आजूबाजूला मागे पडणाऱ्या घरात डोकावून पाहता आलं असतं तर? विश्वाचे आर्त समजले असते!
#लालपरी ImageImage
#प्रवासी गाड्या ज्या जेवणाच्या अड्ड्यांवर थांबतात तिथे जेवण चांगलेच मिळते! कारण इथल्या जेवणाला अनोळखी लोकांच्या गप्पांची जोड असते. कोणी दिवसभर या हाटेलात बसला/ बसली तर काही वर्षे पुरेल इतके साहित्य, विषय आणि पात्रे मिळतील. आज अस्खलित #सातारी बोली ऐकायला मिळाली! 🤗
#प्रवास #अनुभव
#सह्याद्री.. महाराष्ट्रासारख्या राकट देशाला शोभून दिसणारी आणि स्वतः देखील साक्षात कालीमातेसारखी रौद्र सह्याद्री पर्वतरांग! त्यांच्या घनदाट जंगलात वसलेल्या संसारातून प्रवास करणारी ही #लालपरी!

सह्याद्रीला पाहून एकच वाक्य मनात येते, "असो हिमालय तुमचा, अमुचा केवळ माझा सह्यकडा!" ImageImageImageImage
Read 9 tweets
लालपरी! 🤩 🚌

आयुष्यात पहिल्यांदा ड्रायव्हर काकांच्या शेजारच्या खुर्चीत बसून प्रवास 🤗 तो ही तिकिटाचे पूर्ण पैसे भरून!

पुरुष असूनही माझ्या आरक्षित जागेवरून मला उठवलं नाही, या सवलतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो 🙏 माझी तरी दुवा नक्की मिळेल!

असो, प्रवास सुरू 🛣️

#प्रवास #लालपरी #म ImageImageImage
पायाशी असणाऱ्या या बोळकांड्यातून हवा येत राहाते.. पण खिडक्या असूनही ते तिथे का आहे? हा प्रश्न गेला अर्धा तास मेंदू कुरतडत आहे 🙄😄

#प्रश्न #निरीक्षण #असे_का ? Image
घाटातला प्रवास आणि वय यांचा काहीही संबंध नाही! अशा प्रवासात आम्ही अजूनही लहान मुलासारखे इकडे तिकडे बघत बसतो 😁🤗

#प्रवास #लहानपण #मराठी ImageImageImage
Read 14 tweets
एसटीची लालपरी हे पहिलं क्लास कास्ट तोडणारं मेटाफर आहे. माझ्यासाठी जास्त रोमॅंटिक. पहिलं खेडं- तालुका- ते- जिल्हा असं स्थलातंर आणि त्याला लागून आलेल्या सगळ्या व्यक्तीगत बदलाच्या व विकासाच्या शक्यता एसटी भोवती फिरत राहतात. एसटी म्हणजे आपल्यासाठीचं पहिला टेलिफोन, पहिला कॅाईन बॅाक्स, Image
पहिला मोबाईल, पहिली वरात, पहिला जिओ, पहिलं फोर जी, पहिली तालुक्याची मैत्रिण आहे. एसटी महामंडळाची इमेज काढून टाकली तर पन्नास टक्के आठवणी कमी होतील. फुटाणे ते संत्रा गोळी ते उसाचा रस,कुमार सानु ते गोडी शेव, उसनी गायछाप ते पुण्यनगरी पेपरातलं कोडं.. एसटी महामंडळं एक परिसंस्था एक इको
सिस्टम आहे. आपण त्याचा भाग होतो हे रोमॅंटिक आहे. चालक-कन्डक्टर त्यांचा खाकी ड्रेस रूबाबात टिकला पाहिजे.....दोरीला लटकवलेली घंटी वाजली पाहिजे... मुलगा लहान आहे त्याचे तिकीट काढणार नाही या साठी कंडक्टर दादाशी दोन ते तीन किलोमीटर तंडणारी आई किंवा आज्जी पण त्यांनी लाख युक्तिवाद केला
Read 4 tweets
लालपरी वाचवा हे बरोबर, पण लालपरीच्या गळ्यात फास अडकवला कुणी ?
By @AmarJadhao

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या येत आहेत. आजपर्यंत तब्बल 35 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समजतंय.
देशातलं सर्वात मोठं प्रवासी वाहतूक महामंडळ असलेलं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आज तोट्यात आहे, कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे,सरकारने महामंडळ विलीन करवून परिवहन खात्यामार्फत एसटी चालवावी असं सप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
महामंडळावर कर्जाचा बोजा मोठा आहे, कोरोनाच्या काळात वाहतुकच बंद असल्याने एसटीचं उत्पन्न थांबलं, शाळा आणि ऑफिसेस सुरू नसल्याने प्रवासी आताही कमीच आहेत. मात्र दीड वर्षे बंद राहिल्यानं एसटी ऑक्सिजन वर येईल इतकी वाईट परिस्थिती ही सततच्या अंशतः खाजगीकरणामुळे ओढावली आहे.
Read 18 tweets
आमची लाल परी♥️♥️😊👍...
ज्याप्रमाणे बिस्कीटांमध्ये जगभरातल्या नामांकित कंपन्या उभ्या असताना पारले जीची सर कुणाला येणार नाही,दात घासण्यासाठी वेगवेगळ्या पेस्ट असुनसुद्धा दुकानात जाऊन पेस्ट मागताना पहिला न कळतपणे कोलगेटचा उल्लेख करून त्यानंतर आपल्याला हवी ती पेस्ट आपण घेतो अगदी Image
त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या नसानसांत (खेड्यांमध्ये) पोचलेल्या एस.टी.च आहे.. दुर्दैवाने,दंगल झाली की सगळ्यात पहिला हिची तोडफोड आवर्जून केली जाते,आज एस.टी.महामंडळ अस्तित्वाची लढाई लढत आहे कारण लोकांना कमीत कमी कालावधीत इच्छित स्थळी जाण्याची गडबड असते व त्यामुळे private गाड्यांचा
वापर भरमसाठ वाढलाय, "जाऊदे ५० ज्यादा पण कुठ हीच्या नादाला लागता, १० ठिकाणी थांबती ही"...पण शेवटी आज हा लाल डबाच लोकांच्या गैरसोयीचा फायदा न उचलता मोफत त्यांना गावी पोचवतोय..एस.टी. च आणि महाराष्ट्रातल्या जनसामान्यांचे नाते न तुटणारं आहे🙏🙏😊 #लालपरी #एस_टी #महामंडळ #म #मराठी #रिम
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!