Discover and read the best of Twitter Threads about #विलिक्षण_निरीक्षण

Most recents (13)

Nov 25th 2022
स. न. वि. वि.

काळजावर दगड ठेवून हे पत्र लिहीत आहे. गेले काही दिवस मी गुपचूप निरीक्षण केलंय. तुम्हाला माझा कंटाळा आलाय. माझ्यापासून सुटका व्हावी म्हणून तुम्ही अनेक परक्यांशी सल्लामसलत करताहात. मला कायमची घालवण्याचे बेत रचताहात. तुमच्या चोरून चाललेल्या हालचाली मला समजत नाहीत असं
का वाटतं तुम्हाला?

पंचवीस - तीस वर्षांपूर्वीचे दिवस आठवतात? आपली ओळखदेख नव्हती. पण तुम्हाला नोकरी लागली. तुमच्या आईवडिलांनी तुमचे दोनाचे चार हात केले. संसार सुरु झाला. आणि अवघ्या दीड दोन वर्षात ती जादू झाली. कधीही कुठेही आपण फिरायला गेलो आणि तुमचे मित्र, नातलग भेटले की
आपल्याकडे निरखून बघत आणि कौतुकाने म्हणत, “बेट्या, लग्न मानवलं बरं का तुला.” तुम्ही देखील मनापासून हसून होकार द्यायचा.

तुम्हाला प्रमोशन मिळालं. तुम्ही सुटाबुटात फिरू लागला. तुमचे विविध रंगी नेकटाय खूप आवडायचे. तुमचं लक्ष नसताना त्या नेकटायचं टोक गालांवरून फिरवताना अगदी मोरपीस
Read 6 tweets
Sep 3rd 2022
*2 सप्टेंबर* च्या मध्यरात्री सर्व राक्षस लोकांची Emergency मिटींग झाली आणि आपल्यातला एक जण पृथ्वीवर जाणार असं ठराव संमत झाला.
मग काय *3 सप्टेंबर* ला पृथ्वीवर विजेचा⛈⛈कडकडाट झाला, सुनामीआली ,१० १२ जण मेले आणि निसर्गाची बरीच हानी झाली.
आफ्रिकेत ‍‍‍जन्म घेता घेता ऐन टाईमला
महाराष्ट्रातील *बारामती* येथे भाऊंचा जन्म झाला.
जन्मा पासूनच फोटो काढण्याचा ♀‍♀ शोकीन असलेले, जन्मल्या जन्मल्या नर्स जवळचा मोबाईल घेऊन सेल्फि काढणारे.

कोणी सेल्फी काढत असला कि वेड वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या
तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चष्मा   घालणारे *बारामती* वर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर  माणूस. #रॉयलभाऊ #जाळ आणि #धुररर सोबतच काढणारे *श्री श्री श्री संकेत जगताप* यांना वाढदिवसाच्या ..१ ढेपीचे पोत , २ कंटेनर ,३ टमटम  ,5 छोटा हत्ती
Read 4 tweets
Aug 22nd 2022
एकदा एका पार्टीत एका गृहस्थाशी ओळख झाली. संभाषण करण्यासाठी मी म्हटलं, “घ्या, चिकन छान आहे”….. गृहस्थ: “एकदा खाल्लं होतं, मजा नाही आली म्हणून परत हात नाही लावला”…. मी: “बरं, मग फिश टिक्का घ्या” गृहस्थ: “खूप पूर्वी एकदा खाल्लं होतं, मजा नाही आली म्हणून परत हात नाही लावला”…..
मी: “बरं, बरं, मग व्हिस्की तरी घ्या”, मी हेका सोडायला तयार नव्हतो. गृहस्थ: काॅलेजमध्ये असताना “एकदा घेतली होती, मजा नाही आली म्हणून परत हात नाही लावला”. आयला, आता या गृहस्थाचं काय करावं असा विचार करत होतो तेवढ्यात त्याची बायको आली. सोबत एक २० वर्षांचा तरुण होता.
ती:“हा आमचा
मुलगा”…..मी: “एकुलता एक असेल ना”?
ती: “अय्या, तुम्हाला कसं कळलं”?

आमच्याच #विलिक्षण_निरीक्षण या ग्रंथातून साभार प्रस्तुत
Read 3 tweets
Aug 19th 2022
#स्टोव्ह

स्टोव्ह मध्ये राॅकेल भरायला नरसाळे, पत्र्याची नळी असलेला पंप,पुढे काही वर्षांनी प्लॅस्टिकचा फुग्याचा व काॅक असलेला पंप आल्यावरचा आनंद विसरणे शक्य आहे का?

जमिनीवर थोडेफार सांडलेल्या राॅकेलचा वास अजूनही चांगला आठवतो आहे.

स्वयंपाक करताना अन्नाला राॅकेलचा वास येऊ नये Image
म्हणून घेतलेली काळजी..

आईचे आपल्या कुटुंबावर किती प्रेम आहे, हे आता जाणवते.

स्टोव्ह पेटवण्यासाठी काकडा व तो बुडवण्यासाठी "बिटको काला दंत मंजन" च्या छोट्या रिकाम्या झालेल्या काचेच्या बाटलीत राॅकेल भरून ठेवायचे.

काडेपेटी व ती ठेवण्यासाठी हिंगाची रिकामी झालेली पत्र्याची डबी असा
सगळा थाट असायचा.

पीन करणे एक कौशल्याचे काम होते. हात अगदी सरळ धरून. पीन वाकडी होणार नाही याची काळजी घ्यावी लागत असे जर पीन निपलमधे तुटली तर सगळाच खोळंबा व्हायचा. त्याकरीता निप्पल पाना, सायकलची तार, कातडी वायसर इत्यादी हत्यारे घरीच ठेवलेली असायची.

स्टोव्हची टाकी गळत असेल तर
Read 5 tweets
Apr 13th 2022
**एक चित्त थरारक गोष्ट**

नवीन लग्नाला आठवडा उलटला नाही तोच तिला त्याच्यात फरक जाणवू लागला...

आठ दिवसांत तिला नजरेच्या आड होऊ न देणारा तिचा नवरा आता दिवसातून अर्धा अर्धा तास बाहेर जायचा किंवा बाथरूम मध्ये कोंडून घ्यायचा.

++
तिला वाटलं की हा कोणासोबत मोबाईल वर बोलत असेल किंवा चॅटिंग करत असेल मात्र दोन- तीन वेळा तो बिना मोबाईल चा बाथरूम मध्ये गेला त्यामुळे तो गैरसमज दूर झाला.

तिने त्याला खूप वेळेस विचारलं मात्र त्याने नेहमी हसण्यावारी नेलं. घरी विचारलं तेव्हा

++
त्याच्या आई बाबांनी सांगितलं की तो अधून मधून असंच वागतो म्हणून...

शेवटी उद्या या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचाच असं ठरवून ती झोपली.

सकाळी झोपेतून उठताच तो कोणीतरी संमोहित केल्याप्रमाणे तो घरातून बाहेर पडला.

दरवाजा ओढून घेतल्याचा आवाज होतच हिने

++
Read 8 tweets
Apr 12th 2022
काल डॉक्टरांशी माझ्या तब्येतीविषयी बोलत बसलो होतो. माझा जॉब , शिप्ट , रिपोर्टिंग , पगार , कामाचे स्वरूप इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मला पुढील सल्ले दिले :
.
.
.
१) भरपूर चाला.
२) कोल्ड्रिंक्स कमी करा.
३) दारू अजिबात नको .
४) भरपूर पाणी प्या.

++
५) जवळ जायचे असेल तर रिक्षा करू नका .
६) बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद करा.
७) घरीसुध्दा तेलकट , तुपकट खाऊ नका .
८) मांस, मासे इत्यादी वर्ज्य करा.
९) एक दिवसाच्या सहली करा , त्यापेक्षा मोठ्या नकोत .
.
.
.
.
.
.
.मी होकार दिला व घाबरत-घाबरत विचारले :

++
डॉक्टर मला नक्की झालय तरी काय .. .???
.
.
तेव्हा डॉक्टर म्हणाले :
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झालेलं काहीच नाही.
“तुमचा पगारच कमी आहे”

😂😂😂🤭😄

आमच्याच #विलिक्षण_निरीक्षण या ग्रंथातून साभार प्रस्तुत
Read 4 tweets
Apr 11th 2022
नवऱ्याची ढेरी वाढण्यात, बायकोचाच असतो हात
तीच म्हणते थोडाच उरलाय, घेऊन टाका भात😀

पिठलं उरो, पोळी उरो बायकोच आग्रह करते
पुरणाच्या पोळीवर तुपाची धार धरते😝

बोन्ड वाढते, भजे वाढते मस्त भाज्या करते
दोन्ही वेळेस यांचे पोट तडसावणी भरते😝

++
अन्न पूर्णब्रह्म म्हणून तो ही खात राहतो
बायकोचं मन मोडत नाही म्हणून जाड होतो😜

ज्याची बायको सुगरण असते त्यालाच ढेरी येते
लोकं उगीच नावं ठेवतात लक्ष द्यायचे नसते 😜

साधी फोडणी दिली तरी खमंग स्वयंपाक होतो
त्याच बाईच्या नशिबात ढेरीवाला असतो😛

++
जिथं जाईल तिथं लोकं आग्रह करत राहतात
स्वभाव, हुशारी सोडून ढेरी कडेच पाहतात😀

बरेचजण सल्ला देतात थोडा व्यायाम करत जा
सकाळी उठून थोडं तरी ग्राऊंडवर पळत जा 😏😀

योगासनं, प्राणायाम का करत नाही ?
पहाटे उठून डोंगरावर का चढत नाही ?😀

++
Read 7 tweets
Apr 10th 2022
राम म्हणजे काय ?

उगीचच झोपतो त्याला,
‘आ राम’ म्हणतात.

घेतलेले माघारी देत नाही त्याला ‘ह राम’ म्हणतात.

झोपलेला परत कधी उठतच नाही त्याला ‘हे राम’ म्हणतात.

मित्रा सारखा वागतो म्हणून ‘सखाराम’ म्हणतात.

जो राजालाही आदर्श होऊन राहतो त्याला ‘राजाराम’ म्हणतात.

++
हृदयीचे जाणतो म्हणून त्याला ‘आत्माराम’ म्हणतात.

एक पत्नी व्रताप्रमाणे वागतो त्याला ‘सिताराम’ म्हणतात.

भगवंत ज्यांचे पाय पूजतो त्यांना ‘तुकाराम’ म्हणतात.

प्रसंगी हाती शस्त्र वा शास्त्र धरुन अन्यायाशी लढतो त्याला ‘परशुराम’ म्हणतात.

++
जो अखंडपणे भगवंताचा दास होऊन रहातो, त्याला ‘रामदास’ म्हणतात.

हल्लीच्या युगात जो पहाटे उठवतो त्याला ‘आलाराम’ म्हणतात.

जो सेवाव्रताने वागतो त्याला ‘सेवाराम’ म्हणतात.

जो प्रसादाचा गोड मेवा बनवतो त्याला ‘मेवाराम’ म्हणतात.

आणि हे ज्यांना कळलं..
त्यांच्यासाठी ‘राम राम’ म्हणतात.

++
Read 5 tweets
Apr 9th 2022
आम्ही अजूनही शिकतोय

आधीच्या पिढीकडून पैसे वाचवायला शिकलो;
नंतरच्या पिढीकडून पैसा वापरायला शिकतोय.

आधीच्या पिढीकडून सहवासाने नाती जपायला शिकलो;
नंतरच्या पिढीकडून डिजिटली नवीन नाती जोडायला शिकतोय.

आधीच्या पिढीकडून मन मारून जगायला शिकलो;
नंतरच्या पिढीकडून मन भरून जगायला शिकतोय.
+
आधीच्या पिढीने, Use and use more मधली उपयुक्तता शिकवली;
नंतरच्या पिढीकडून Use and throw मधली नावीन्याची गंमत अनुभवायला शिकतोय.

आईकडून पिकनिकलाही घरच्या पोळीभाजीची लज्जत अनुभवायला शिकलो;
मुलांकडून घरात असतानाही पिकनिक एंजॉय करायला शिकलोय.
++
आधीच्या पिढीबरोबर निरांजन लावून दिवा उजळून वाढदिवस साजरा केला;
नंतरच्या पिढीबरोबर मेणबत्ती विझवून अंधार करून वाढदिवस साजरा करायला लागलो.

आधीच्या पिढीने बिंबवले, घरचेच लोणी सर्वात उत्तम;
नंतरची पिढी पटवून देत आहे, अमूल बटरला पर्याय नाही‌.
++
Read 5 tweets
Mar 30th 2022
#विलिक्षण_निरीक्षण या ग्रंथातून साभार प्रस्तुत

नास्तिक मेळावा कार्यक्रम पत्रिका

सत्र पहिले : (दिवा विझवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाईल.)

अ) प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व उपस्थितांना हळदी म्हणून गुद्दा व कुंकू म्हणून बुक्का प्रदान करण्यात येईल
ब) नास्तिकांच्या जाहिरनाम्याचे सामूहिक रुदन
क) एकमेकांच्या फेक अकाउंटचा परिचय (व गरज भासल्यास वाभाडे)

साडे नऊ वाजता : अल्पोपहार- चहा पाव ( प्रायोजक -फादर दिब्रिटो )
सत्र दुसरे : मनोगत

अ) 'संघ एक कीड' (वक्ते - ज्येष्ठ विधिज्ञ श्री गं.ड. लेले )
ब) 'प्रेषित व नास्तिकांचा बंधुभाव' ( वक्ते- मौलाना सैफ हसरे )
क) 'हिंसा एक नाईलाज-भगतसिंग' (वक्ते- ज्येष्ठ कवी वरावरा राव)
ड) 'प्रेषित एक दिव्यदर्शन' या साने गुरुजींच्या लेखाचे सामूहिक अभिवाचन
Read 13 tweets
Mar 28th 2022
जोशींना त्याचा बालपणीचा मित्र अनेक वर्षांनंतर भेटला.

.

वहीनींशी ओळख वगैरे झाल्यानंतर मित्राने विचारले, 🤔

“तुमचे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ..?"

जोशी म्हणाले, “आमचे रिव्हेंज मॅरेज ..!!!”

.

मित्र: (आश्चर्याने)🤔 "रिव्हेंज मॅरेज ? हे काय नवीन?"

++
जोशी : "एकदा मी बसने जात होतो, ही माझ्याकडे येऊन म्हणाली,

"ओ मिस्टर उठा ! ही सीट स्त्रियांसाठी राखीव आहे."

मग मी म्हणालो “अहो मग काय झाले ? मी पण स्त्रियांसाठीच राखीव आहे ..!

मला ‘मिस्टर’ म्हणतेस आणि माझ्या वर अशी चिडतेस कशाला...!”

.

बस मध्ये एकच हशा पिकला!😂😂😂

++
मित्र : "मग काय झाले?”

.

जोशी : "मग काय, ही संतापून म्हणाली, “याचा सूड घेईन..!”

आणि...

तिने माझ्याशी लग्न केले !!"

आमच्याच #विलिक्षण_निरीक्षण या ग्रंथातून साभार प्रस्तुत
Read 4 tweets
Mar 9th 2022
मुलगा 🧒 :- बाबा एक शंका आहे.

बाबा👨 :- विचार

मुलगा🧒 :- “त्रेत्रा युगात” प्रल्हादाने वडिलांचे ऐकले नाही, पण तो महान मानला गेला !

“सत् युगात” रामांनी वडीलांचे ऐकले अन तो देव मानला गेला..

++
मला कन्फ्युजन आहे की . .

मी 🧒 तुमचं 👨ऐकू की नको ऐकू ?

वडील 👨 :- बेटा हे “कलीयुग”आहे..

यात तु 🧒 आणि मी 👨 दोघांनीही आपल्या भल्यासाठी तुझ्या आईचेच🧑‍🦰 ऐकले पाहीजे

😜😜😜😝😝😝😂😂😂😂

आमच्याच #विलिक्षण_निरीक्षण या ग्रंथातून साभार प्रस्तुत
Read 3 tweets
Mar 5th 2022
Believe it Or Not! 🤪

निरनिराळ्या लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी.....

१) जिवलग मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट- ती तुझ्याकडेच बघतेय

२) बस कंडक्टर ने सांगितलेली खोटी गोष्ट- मागची गाडी रिकामी आहे, त्यात बसा

++
३) आईबाबांनी सांगितलेली खोटी गोष्ट- फक्त दहावीपर्यंत अभ्यास कर, नंतर मज्जाच मज्जा

४) सर्वांनीच सांगितलेली खोटी गोष्ट- घर, गाडी आपण एकदाच घेतो, त्यामुळे पैशाचा विचार करू नको

६) नव्याने नोकरीला लागलेल्या मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट- पगार कमी आहे, पण शिकायला खूप मिळतं

++
७) बॉसने प्रमोशन नाकारताना सांगितलेली खोटी गोष्ट- मी तुझ्यासाठी खूप भांडलो, पण काही उपयोग झाला नाही

८) मुलगी बघायला गेल्यावर सासरच्यांनी सांगितलेली खोटी गोष्ट- पोहे मुलीनेच बनवलेत

९) मुलाने लग्नाआधी मुलीला सांगितलेली खोटी गोष्ट- मी Occasionally ड्रिंक्स घेतो

++
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!