Discover and read the best of Twitter Threads about #शिवजयंती

Most recents (7)

#शिवजयंती
शिवजन्माच्या आसपास ब्राम्हण सरदार मुरार जगदेवने पुण्याची लूट करत कसबापेठेत गाढवाचा नांगर फिरवून अपशकून केला.

पण याच ठिकाणी जिजामातेने पुन्हा पुणे वसवत शिवबाच्या बालमनावर अंधश्रध्देविरुद्ध पहिला संस्कार घडवला.

म्हणूनच पंचांगाशिवाय स्वकर्तृत्वावर शककर्ते छ्त्रपती घडले.
शिवरायांचे कार्य हे धर्म वाचवण्यासाठी होतं असं वाटत असेल तर प्रबोधनकारांनी म्हणल्याप्रमाणे स्वतःला न वाचवू शकणाऱ्या ३३ कोटी देवांची फलटणच बाद ठरली म्हणायची.
स्वराज्य निर्मिती ही पोध्यापुराणातून नाही तर तलवारीच्या पात्यातून बुद्धीच्या जोरावर झाली होती.
फुलेंनी शोधलेल्या समाधीवरची
फुलं लाथाळणाऱ्या वृत्ती तिथी-तारखेचा घोळ घालत संभ्रम निर्माण करतात.

सर्वधर्मीय राजांच्या अत्याचाराविरुद्ध स्वराज्य निर्माण करणाऱ्याला राजाला देवत्व देवून कर्तुत्व झाकाळण्याचा प्रयत्न करतात.

या दैदिप्यमान इतिहासाला भाकड कथा, आरत्या अन् मंदिरात बसवून देव्हाऱ्यात पोट भरणार कोण ?
Read 3 tweets
#शिवजयंती
1.शिवाजी महाराजांच जितकं appropriation इथल्या ब्राह्मणवादाने केलंय तितक कुठल्याही महापूरुषाच केलं नाही।
आजवर इतिहासात, साहित्यात, अभ्यासक्रमात, चित्रपटात मुस्लिमांविरुद्ध लढून स्वराज्य उभारल इतकंच अधोरेखित केलंय, मुस्लिम शासकांविरुद्ध लढा हा सत्ता हस्तांतरणाचा राजकीय
2. लढा होता तो धर्म लढा कधीच नव्हता, ह्याच लढ्याबरोबर महाराज इथल्या ब्राम्हणवादा विरुद्ध एक समांतर लढा आयुष्यभर लढले ह्या वास्तवाला आपसूक बाजूला सारल जात।

सोळा वर्षाचा शिवा रायरीच्या मंदिरात अठरापगड जातींचे मावळे जमवून स्वराज्याची प्रतिज्ञा घेतो तो ब्राम्हवादाच्या मुळावर घातलेला
3. पहिला घाव, मनुस्मृती ने लादलेली राज्य करण्याची क्षत्रियांची मक्तेदारी तोडून इथला बहुजन हा शासक होऊ शकतो हे स्वप्न प्रत्येकाच्या डोळ्यात तरळायला लागलं होतं

ज्या काळात ब्राम्हणवादाने स्त्रियांना केवळ प्रतारणा आणि उपभोगाची वस्तू बनवून अतिशूद्रांच्या पंक्तीत बसवल होत त्यावेळेस
Read 9 tweets
#Thread 🧵

#शिवजन्मोत्सव 🧡🚩

गडावर एका सुरक्षित खोलींत बाळंतपणाची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. त्या खोलीला आंतून पांढरा चुनकळीचा रंग देण्यांत आला होता. भिंतीवर कुंकवाने ठिकठिकाणी स्वस्तिके व शुभचिन्हे रेखण्यात आली होती.

@the_mahrattas @ShefVaidya @MulaMutha

१/१२
दाराला व झरोक्यांना पडदे लावण्यांत आले होते. दाराच्या दोन्ही बाजूंना मंगल देवतांची चित्रे काढण्यांत आली होती.

खोलीत सतत तेवते दीप ठेवण्यात आले होते. पाण्याने भरलेले कलश आणि इतर जरूर त्या त्या वस्तूंचा व औषधांचा संच तयार ठेवलेला होता.

२/१२
खोलीत पांढऱ्या मोहऱ्या टाकण्यात आल्या होत्या.

आता दाटली होती उत्कंठा!

फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट झाली. आकाशांतल्या चांदण्या हळूहळू विरघळू लागल्या. प्रभेचे तीक्ष्ण बाण सोडीत व अंधाराचा विध्वंस उडवीत उषा आणि प्रत्युषा क्षितिजावर आल्या.

३/१२
Read 13 tweets
शिवाजी महाराजांवर हिंदी, राजस्थानी, तमिळ आणि बंगाली भाषांमध्ये पण काही सुंदर पण अप्रसिद्ध स्तुतिकाव्य आहेत.

हिंदी राष्ट्रकवी मैथैलीशरण गुप्त (१८वे शतक) हे त्यांच्या 'भारत-भारती' ह्या काव्यकृतीमध्ये शिवाजी महाराजांचे यथायोग्य वर्णन करतात :

बस 'सिंह' कह देना अलम!

#म #शिवजयंती Image
मात-भूमि भक्ति-सक्ति अविचल साहस की,
सहित प्रमाण प्रतिपादि छिति छाजी है  !
राना मूल-मंत्र जो स्वतंत्रता प्रकास किजो,
ताकी महाभास कियो सरजा सिवाजी है !!

जगन्नाथदास 'रत्नाकर (वीराष्टक, छत्रपति शिवाजी, छन्द १) Image
डॉ श्रीधर भास्कर वर्णेकर ह्या संस्कृत साहित्यकार विद्वानाने शिवाजी महाराजांवर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते "श्रीशिवराज्योदयम्" नावाचे महाकाव्य लिहिले आहे. Image
Read 13 tweets
#Thread 🧵

सबंध महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून वयाच्या सतराव्या वर्षी स्वराज्याचा श्रीगणेशा केला. व एकाच वेळी दक्षिणेतील शाह्यांशी आणि मोगलांशी तसेच युरोपमधून आलेल्या इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीज या सर्वांशी…

१/८
…एकाच आघाडीवर संघर्ष केला, आणि त्यांना त्यात यशही येत गेले.

वेगवेगळ्या साम्राज्यांच्या आणि मुसलमानी शाह्यांच्या सत्तांतरामुळे महाराष्ट्रात जो राजकीय अस्थिरपणा आला होता त्याला योग्य वळणावर नेण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि मराठा साम्राज्याची पायाभरणी केली.

२/८
याच गोष्टीमुळे इतर राजांच्या तुलनेत महाराजांचे वेगळेपण दिसून येते.

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराजाचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी शिवरायांचा वारसा चालवत मोगलांशी विश्रांती न घेता सलग ९ वर्षे अविरत लढा दिला.

३/८
Read 8 tweets
प्रस्तुत धागा कॉ. गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकातील एका प्रकरणाचा सारांश आहे..
🚩
#शिवजयंती अष्टावधानी जाणत्या राजेंची..
#LetsReadIndia
@LetsReadIndia
#धागा
(१/९)
👇
शिवराय रयतेबद्दल खुप जागरुक असत.. त्या काळी सारख्या लढाया होत.. पायदळ व घोडदळ हे सैन्य सारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे मोहिमेसाठी फिरत असे.. उभ्या पिकातून घोडदळ सुसाट जाई.. वर्षभर राबून रक्ताचा घाम करुन हातातोंडाशी आलेले पिक बघता बघता भुईसपाट होई..(२/९)
ज्याच्या राज्यात राहतो तेच सैन्य असे करीत असे, मग तक्रार कुणाकडे करणार? अन् दाद कुणाकडे माघणार?.. स्वतःच्या नशिबाला दोष देत घरातल्या घरात रडत बसण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता..असे बेगुमान वागण्याची मुभा होती त्या काळात..(३/९)
Read 9 tweets
स्वराज्य म्हणजे परकीय सत्तेच्या राजकीय दास्यापासून मुक्तता एवढाच मर्यादित अर्थ शिवाजी महाराजांच्या स्वराज्यास प्राप्त होत नाही; तर परकीय सत्तेप्रमाणेच स्वकीय जुलमी लोकांपासूनही मुक्तता‚ हाही अर्थ स्वराज्यात अभिप्रेत होता!
त्याचबरोबर स्वराज्यात स्वधर्म व स्वसंस्कृती यांचे संरक्षण व संवर्धन झाले पाहिजे‚ असाही त्यांचा आग्रह होता. या दृष्टिकोनातून महाराजांच्या स्वराज्याच्या कार्याकडे पाहिले की‚ त्यांच्या ऐतिहासिक कार्याची महत्ता द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही.
केवळ प्रशासन‚ लष्कर‚ आरमार‚ दुर्ग‚ व्यापार‚ उद्योग या क्षेत्रांतच शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात नवे युग सुरू केले असे नाही‚ तर धर्म व भाषा यासारख्या सामाजिक क्षेत्रांतही नवे पायंडे पाडले‚ नवे दंडक निर्माण केले.
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!