CMO Maharashtra Profile picture
मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of Maharashtra

Dec 16, 2019, 5 tweets

#नागपूर #विधीमंडळअधिवेशन
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा मुख्यमंत्री श्री. उद्वव ठाकरे यांनी विधानसभेत मांडला प्रस्ताव

#नागपूर #विधीमंडळअधिवेशन
महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्यामुळे अभिमानाने ऊर भरून आले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे न्यायवस्थेला नवचैत्यन्य मिळेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत व्यक्त केली भावना.

#नागपूर #विधीमंडळअधिवेशन
मूळचे नागपूरचे असलेले शरद बोबडे यांचे अभिनंदन नागपूरच्याच अधिवेशनात करता आले हा दुर्मिळ योगायोग. सध्या सुरु असलेला शरद ऋतू म्हणजे नवचैत्यन्याचा ऋतू, सरन्यायाधीश बोबडेंच्या रूपाने न्यायव्यवस्थेला नवचैत्यन्य येईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

#नागपूर #विधीमंडळअधिवेशन
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्या. बोबडे यांनी प्रयत्न केले आहेत. सरन्यायाधीशपदाच्या कारकिर्दीत ते अन्नदात्याला नवचैतन्य मिळवून देतील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

#नागपूर #विधीमंडळअधिवेशन
बोबडे कुटुंबाचे नागपूरमधील निवासस्थान म्हणजे कायद्याचं झाड, त्यामाध्यमातून अनेक निष्णात कायदेतज्ज्ञ तयार झालेत. रामशास्त्री बाण्याने ते न्यायदान केल्याशिवाय राहणार नाही,अशी खात्री, महाराष्ट्राच्या या सुपुत्राचे मी अभिनंदन करतो -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling