CMO Maharashtra Profile picture
मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of Maharashtra
j Profile picture omkar pardeshi Profile picture Girish Rao Profile picture Jigisha B Profile picture Rion Dmello Profile picture 11 subscribed
Feb 8, 2023 8 tweets 2 min read
ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष २०२२ चा #महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री श्री.शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिक्कामोर्तब केले. Image २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह,शाल आणि श्रीफळ असे #महाराष्ट्रभूषण पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
Feb 8, 2023 4 tweets 1 min read
मुंबईत २७ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ या कालावधीत महाराष्ट्र विधिमंडळाचे #अर्थसंकल्पीयअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात दि. ९ मार्च रोजी सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे घेण्यात आली.
Jan 12, 2023 5 tweets 3 min read
मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) आणि मार्ग २अ (टप्पा-२) चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारीला होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी गुंदवली स्थानक येथे भेट देऊन सुविधांची पाहणी केली. #मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग २ अ ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्हि. आर. श्रीनिवास, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आदी उपस्थित होते.
Jan 12, 2023 13 tweets 3 min read
मुख्यमंत्री @mieknathshinde हे शिष्टमंडळासमवेत डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. जवळपास २० उद्योगांसमवेत सुमारे १ लाख ४० हजार कोटींचे करार होणार असून आजपर्यंत डाव्होस येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच महाराष्ट्राचे सामंजस्य करार होत आहेत. पायाभूत सुविधा व इतर महत्वाच्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी जगभरातील मान्यवर, गुंतवणूकदार, तसेच उद्योगांच्या प्रमुखांशीही मुख्यमंत्री @mieknathshinde हे संवाद साधणार आहेत.
Jan 12, 2023 7 tweets 2 min read
मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल यांचेसह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना-समितींचे पदाधिकारी उपस्थित होते.
Jan 12, 2023 4 tweets 2 min read
मुंबईतील वाहतूक कोंडीतून सामान्य मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी मुंबईसाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाबाबत आज मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी आढावा घेतला. मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय अवलंबण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी आणि एकात्मिक वाहतूक प्रणाली यंत्रणा तयार करणाऱ्या तंत्रज्ञांनी बैठक घ्यावी आणि त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले.
Jan 11, 2023 4 tweets 3 min read
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या उपस्थितीत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या पॅकेज २ मधील सर्वात जास्त लांबीच्या (सुमारे १८० मीटर लांबीच्या आणि सुमारे २३०० मेट्रिक टन वजनाच्या) ऑर्थोोट्रॉपिक स्टिल डेकची उभारणी करण्यात आली. मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार राहुल शेवाळे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्रीनिवासन, अतिरिक्त आयुक्त गोविंदराज आदी उपस्थित होते.
Jan 11, 2023 13 tweets 4 min read
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची परिषद मुंबईत पार पडली. पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल उपस्थित होते. महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्याशिवाय सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा,आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्य
Jan 10, 2023 4 tweets 2 min read
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
#मंत्रिमंडळनिर्णय Image #मंत्रिमंडळनिर्णय

✅राज्य वेतन सुधारणा समिती ( बक्षी समिती) चा अहवाल खंड-२ स्वीकारला. अनेक पदांच्या वेतन त्रुटी दूर. अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ

✅महानगरपालिकांमध्ये नामनिर्देशित पालिका सदस्यांच्या संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय
Jan 10, 2023 9 tweets 3 min read
कणेरीमठ येथे होणाऱ्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या नियोजनाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत आढावा घेण्यात आला. कणेरीमठ (ता. करवीर) येथे २० ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान लोकोत्सव आयोजित कऱण्यात आला आहे. ImageImageImageImage पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश शिंदे, मुख्य सचिव मनु कूमार श्रीवास्तव, विविध विभागांचे सचिव, या लोकोत्सवाचे संकल्पक कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
Nov 18, 2022 14 tweets 5 min read
... @msrtcofficial ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक, दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्यात येणार. त्याशिवाय डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्या-टप्प्याने ‘एलएनजी’ मध्ये रुपांतर करण्यास मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी Image महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक असून स्वच्छता-टापटीपपणा ठेवून गाड्यांची निगा राखा आणि राज्यातील जनतेला दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले.
Nov 17, 2022 10 tweets 4 min read
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
#मंत्रिमंडळनिर्णय #मंत्रिमंडळनिर्णय

✅ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठीचे गौण खनिजाबाबत दंडनीय कारवाईचे आदेश रद्द

✅ कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मूल्याधारित, मालमत्ता दर न बदलण्याचा निर्णय
Nov 16, 2022 4 tweets 3 min read
इंदू मिल परिसरात #भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे काम सुरू असून या कामाची मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी स्मारकस्थळी भेट देऊन पाहणी केली. सामाजिक न्याय, एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. ImageImageImageImage पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री डॉ. बालाजी किणीकर, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर यांचेसह @MMRDAOfficial आयुक्त एस. व्ही आर. श्रीनिवासन, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी मान्यवर उपस्थित होते. Image
Nov 15, 2022 4 tweets 2 min read
गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले. गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करुन महत्त्वाच्या सूचना दिल्या. तसेच पालिकेचा आरोग्य विभाग घेत असलेल्या खबरदारीचीही मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी माहिती घेतली.
Sep 27, 2022 9 tweets 4 min read
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील #मंत्रिमंडळनिर्णय
१/९ #मंत्रिमंडळनिर्णय
✅ राज्यात फोर्टीफाईड तांदळाचे दोन टप्प्यात वितरण करणार.

✅ विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे पुनर्गठन होणार.

✅ नगरविकास विभागाच्या प्रशासकीय कामकाजासाठी व राज्य शहर नियोजन संस्थेकरिता पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करणारी योजना.

२/९
Sep 24, 2022 4 tweets 2 min read
नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ; मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली घोषणा

➡️ उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे #पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. #पालकमंत्री

➡️ राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर

➡️ सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर, गोंदिया

➡️ चंद्रकांत दादा पाटील- पुणे

➡️ विजयकुमार गावित- नंदुरबार

➡️ गिरीश महाजन- धुळे, लातूर, नांदेड

➡️ गुलाबराव पाटील - जळगाव, बुलढाणा

➡️ दादा भुसे- नाशिक
Jan 8, 2022 4 tweets 4 min read
Measure to contain the spread of COVID
Aug 15, 2021 12 tweets 2 min read
मंत्रालयात ध्वजारोहणाच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या भाषणातील मुद्दे; Image राज्यातील सर्व नागरिकांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांचे आक्रमण परतवून लावत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची बीजे रुजवली.
Jun 23, 2021 6 tweets 3 min read
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले: Image @AjitPawarSpeaks Image