CMO Maharashtra Profile picture
मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of Maharashtra

Dec 19, 2019, 11 tweets

#विधिमंडळअधिवेशन #विधानसभा
राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले उत्तर. सदस्य सुनिल प्रभू यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाचा अभिनंदनपर ठराव मांडला होता. यावर ५१ सदस्यांनी मांडली आपली मते.

राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे आमच्या सरकारची मार्गदर्शिका,कमी बोलून जास्त काम करायचे हा आमचा निश्चय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील ‘संताचा तो प्रचार अमर, अजूनही लोक-मनावर, राज्य चालवोनी निरंतर,लाखो जीवा उद्धरितो’ या ओव्यांनी सरकारची पुढची वाटचाल राहणार-मुख्यमंत्री

संत गाडगेबाबांनी साध्या भाषेत जीवनाचे सार सांगितले आहे. त्याप्रमाणे भुकेल्याला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी देणे, वस्त्र देणे, निवारा देणे, खचलेल्यांना जगण्याची हिंमत देणे अशा पद्धतीचे काम सरकार करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
#विधिमंडळअधिवेशन #विधानसभा

#विधिमंडळअधिवेशन #विधानसभा
आमचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहे, कोणत्याही कामांना स्थगिती दिली नसून विकास कामांच्या आदेशांमधील त्रुटी दूर करून कामे सुरू केली जातील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

#विधिमंडळअधिवेशन #विधानसभा
देशातील वैभवशाली आणि संपन्न राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक. महाराष्ट्राच्या विकासाचा गोवर्धन पेलण्याकरिता सगळ्यांनीच एकत्र येण्याचे आवाहन करतानाच हे सरकार राज्यातील जनतेला चिंतामुक्त केल्याशिवाय राहणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

#विधिमंडळअधिवेशन #विधानसभा
महाराष्ट्र कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. नवा महाराष्ट्र घडवतांनाच आपले राज्य अधिक महान होईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

#विधिमंडळअधिवेशन #विधानसभा
आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात आम्ही सुधारणा करण्यावर भर देणार.शेतकरी, महिला यांच्या समस्या आमच्या दृष्टीने प्राधान्याच्या असून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करणार. त्याचप्रमाणे राज्याची खरी आर्थिक स्थिती देखील जनतेसमोर आणणार– मुख्यमंत्री

राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नांवर आपण एकत्र येऊन महाराष्ट्राचा लौकिक आणखी वाढवूया, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यावर आपण भर देणार. कर्नाटकव्याप्त प्रदेशातील मराठी बांधवांवर कदापि अन्याय होऊ देणार नाही ही आमची भूमिका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

#विधिमंडळअधिवेशन #विधानसभा
महाराष्ट्राचा उद्योगामध्ये देशात चांगला लौकिक, पण सध्या मंदीचे वातावरण असून राज्यात गुंतवणूक वाढीचे मोठे आव्हान आहे. विविध कारणांमुळे ही परिस्थिती असून आमचे सरकार सर्वांच्या सहकार्याने यातून मार्ग काढेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

#विधिमंडळअधिवेशन #विधानसभा
गाडगेबाबांना अभिप्रेत असलेल्या धर्माच्या संकल्पनेनुसार राज्य कारभाराची दिशा ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

#विधिमंडळअधिवेशन #विधानसभा
आपल्या जबाबदारीची जाणीव कायम राहावी म्हणून मंत्रालयात गाडगेबाबांचे विचार प्रदर्शित करणार, या विचारांना अनुसरून बेरोजगारांना रोजगार, अंध-अपंगांना औषधोपचार, सामान्य जनांचे शिक्षण आणि जनतेला मूलभूत सुविधा देणारे हे सरकार असेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling