#मंत्रिमंडळनिर्णय - कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी २०१७ मध्ये केलेली सुधारणा रद्द. पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्य निवड करण्यास व त्यादृष्टीने अध्यादेश काढण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता.
#मंत्रिमंडळनिर्णय - नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड ही निर्वाचित नगरसेवकांमधून करण्यात येणार. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
#मंत्रिमंडळनिर्णय - ‘ #तान्हाजी - द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून (#SGST) सवलत देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता.
#TanajiTheUnsungWarrior
#taxfree
#मंत्रिमंडळनिर्णय - नाग नदी प्रदूषण रोखण्याच्या प्रकल्पासाठी आवश्यक निधीच्या कर्ज फेडीसाठी राज्य शासनाच्या हिश्श्याच्या रकमेस हमी देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. प्रकल्पाच्या अंमलबजावणी आणि सनियंत्रणासाठी समन्वय समिती नियुक्त करण्यात येणार.
#मंत्रिमंडळनिर्णय - इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग कल्याण या प्रवर्गासाठी सहसचिव तसेच उपसचिव ही पदे निर्माण करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता.
#मंत्रिमंडळनिर्णय - महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ मध्ये अनुषंगिक सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
