#महिलादिवस
देशाची संविधाननिर्मिती आणि संविधान सभा यांचा विषय आला कि प्रामुख्याने डॉ.आंबेडकर, नेहरू,डॉ प्रसाद यांचीच चर्चा होते. परंतु या संविधान सभेत सक्षम, कर्तृत्ववान आणि संविधान निर्मितीला मोलाचा हातभार लावणाऱ्या महिला देखील होत्या.
महिला दिनानिमित्त त्यांचा अल्प परीचय बघू...
1-दक्षायनी वेलायुधन या कोचीन मधुन निवडुन आल्या होत्या.तरुण उमेदवारांपैकी एक.पुलया समाजातील प्रथम शिक्षित महिला होत्या.संविधान सभेतील एकमेव दलित महिला होत्या. डॉ आंबेडकरांसोबत त्यांनी जातीव्यवस्थेसंबंधी प्रकाश टाकणारे अनेक मुद्दे सदनात मांडले.
2-हंसा जीवराज मेहता या मुंबईत निवडून आल्या होत्या.त्यांनी इंग्लंड मधून उच्च शिक्षण घेतलं होतं. ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलं होतं.लेखिका होत्या. संविधान सभेत त्यांनी महिलांचे हक्क,बालविवाह, देवदासी प्रथा, महिला शिक्षण ई अनेक विषयांवर महत्वपूर्ण काम केले.
3-अम्मू स्वामिनाथन या मद्रास प्रांताच प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांनी कास्ट डिस्क्रीमिनेशन ला कडाडून विरोध केला होता.त्यांनी ऍनी बेझंट यांच्यासोबत वुमन्स इंडिया असो.ची स्थापना केली होती.पुढे त्या लोकसभा राज्यसभेवर निवडून गेल्या.चित्रपट मंडळाच्या उपाध्यक्ष देखील राहिल्या.
4-दुर्गाबाई देशमुख मद्रास मधून आल्या होत्या. असहकार व मिठ सत्याग्रहात सहभाग घेतला होता.आंध्र महिला सभा या संस्थेची त्यांनी स्थापना केली होती. सोशल वेलफेअर बोर्ड सारख्या अनेक केंद्रीय संस्थामधे त्यांनी काम केलं होतं. त्यांनी सोशल वेलफेअर कायदे बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.
5-बेगम ऐजाज रसूल या संविधान सभेतील एकमेव मुस्लिम महिला होत्या.त्या उत्तर प्रदेश मधुन निवडून आल्या होत्या.सदनात त्यांनी अल्पसंख्याकांचे मुद्दे मांडले. त्या उ.प्र.सरकार मधे अल्पसंख्याक मंत्री होत्या. 2000 साली त्यांना पदंभूषण सन्मान देण्यात आला. वुमन हॉकी फेड. अध्यक्ष राहिल्या.
6-राजकुमारी अमरीत कौर या उ.प्र.च्या होत्या.त्यांचं उच्च शिक्षण इंग्लंड मधे झालं. देशाच्या पहिल्या आरोग्यमंत्री. AIIMSची स्थापणा व स्वायत्ततेसाठी पुढाकार घेतला. खेळ, शिक्षण आणि आरोग्य यात महिलांचे योगदान वाढविण्यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले.
7-रेणुका रे या बंगालच्या होत्या.लंडन मधून त्यांनी BA डिग्री घेतली होती. ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स मधे लीगल सेक्रेटरी होत्या.संविधान सभेत त्यांनी महिलांचे हक्क, अल्पसंख्याकांचे हक्क, द्विगृही राज्यपद्धत यावर मुद्दे मांडले. 1988 साली त्यांना पदंभूषण सन्मान देण्यात आला.
8-सरोजिनी नायडू यांचा जन्म हैद्राबाद येथील होता. लंडन मधे त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. असहकार,मिठ सत्याग्रह, होमरूळ चळवळ ई.मधे सक्रिय सहभाग. त्या काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या. गव्हर्नरपदी नेमणूक होणारी पहिली महिला हा मान नायडू यांना मिळाला.
9-कमला चौधरी या मूळ लखनऊ च्या होत्या.कायदेभंग चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. ब्रिटीश सरकारने त्यांना अनेकवेळा तुरुंगात टाकले होते. 54व्या काँग्रेस अधिवेशनाच्या त्या उपाध्यक्षा होत्या. जेंडर डिस्क्रिमीनेशन, मजुरांचे प्रश्न, विधवांचे प्रश्न ई.साठी त्यांनी काम केले.
10- मालती चौधरी या संविधान सभेत ओरिसाच प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांनी सत्याग्रह चळवळींमधे सहभाग घेतला होता.ओरिसातील मागास व अतिमागास समाजाला पुढे आणण्यासाठी त्यांनी कार्य केले होते. गांधीजींच्या ओरिसातील पदयात्रेत त्या सहभागी होत्या.
11-लीला रॉय या मुळ आसामच्या होत्या.सविनय कायदेभंग चळवळीत त्यांना सहा वर्षाची शिक्षा झाली होती.महिलांना लढाईचे धडे देण्यासाठी त्यांनी दिपाली संघाची स्थापना केली होती. ढाका महिला सत्याग्रह संघ तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी सुभाषजींच्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षात काम केलं
12-पौर्णिमा बॅनर्जी या उ.प्र.मधून निवडून आल्या होत्या.दांडी मार्च आणि चलेजाव चळवळीत सहभाग घेतला होता. ट्रेड युनियन, शेतकरी संघटना यांच्या त्या बैठका घेत असत.संविधान सभेत त्यांनी प्रास्ताविका,स्थानबद्धता,राज्यसभा निवडीचे निकष यासंबंधी मुद्दे मांडले होते.
13-सुचेता कृपलानी या हरियाणाच्या होत्या.चलेजाव चवळीत त्यांनी काम केलं होतं. महिला कॉंग्रेस स्थापन करण्यात त्यांचा वाटा होता. संविधान सभेत त्या फ्लॅग कमिटीच्या मेम्बर होत्या. पहिली महिला मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला.
14-एनी मस्करीन या मूळ त्रिवेंद्रमच्या होत्या.त्यांनी इतिहास व कायद्याचे शिक्षण घेतले होते.त्रावणकोर स्टेट असेंम्बली मधे त्या हेल्थ मिनिस्टर होत्या.संविधान सभेत त्या कोचीन प्रांताच प्रतिनिधित्व करत होत्या.संघराज्य पध्दतीबद्दल महत्वाचे मुद्दे त्यांनी सभेत मांडले होते.
15- विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्म नेहरू कुटुंबात झाला होता.स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी कार्य केलं होतं. संविधान सभेत त्या उ.प्र. मधून निवडुन आल्या होत्या. त्या देशाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री होत्या. UN जनरल असेंम्बलीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळवला.
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.