अहम् ब्रह्मास्मि 🚩 Profile picture
ᴅɪɢɪᴛᴀʟ पत्रकार 🗞️ ʙʟᴏɢɢᴇʀ ✍️ ᴇxᴘʟᴏʀᴇʀ 🧗 ꜰᴏᴏᴅɪᴇ🍕 📝बौद्धिक@#भ्रम_म्हणे▪️Follow @yathaarth_facts

Mar 25, 2020, 13 tweets

आजचा थ्रेड आहे, जगातील सर्वात प्राचीन विश्वविद्यालय - नालंदा विश्व विद्यालयावर...

#नालंदा_विश्वविद्यालय - प्राचीन भारताचे सुवर्णपान

"नालंदा" हे शहर आजच्या बिहारमध्ये पाटण्यापासून ४० किमी अंतरावर असून तेथेच
विश्वविद्यालयाची वास्तू होती. गुप्त सम्राट समुद्रगुप्त व पहिला कुमारगुप्त यांच्या
पुढाकाराने (इ.स. ३७० ते इ.स. ४५५) या काळादरम्यान विश्वविद्यालयाची स्थापना झाली
होती.

सम्राट हर्षाच्या काळात हे विश्वविद्यालय भरभराटीला आलेले होते. प्रारंभी या
विश्वविद्यालयाचे नाव "नलविहार" असे होते.

नालंदाच्या सुमारे ३५ एकर क्षेत्रात दहा मंदिरे, विविध प्रकारचे बाग बगीचे, वसतिगृह
आणि ग्रंथालय होते. नालंदाच्या ग्रंथालयाच्या नाव होते "धर्ममायायोग".

धर्ममायायोगमध्ये अनेक इमारती होत्या. त्यातील काही इमारती तर ९ मजल्यापर्यंत उंच
होत्या अस म्हटलं जात. या धर्ममायायोगमध्ये शास्त्र, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र,
अर्थशास्त्र, कला, वाणिज्य, भाषा यावर सुमारे ९० लाख ग्रंथ पुस्तके असल्याचा अंदाज
आहे.

नालंदा मध्ये शिक्षण मोफत होत. या विश्वविद्यालयाचा सर्व खर्च सम्राट हर्षवर्धनने
दान दिलेल्या शंभर खेड्यांच्या माध्यमातून भागवला जाई. या खेड्यातील लोक
विश्वविद्यालयाला अन्न, वस्त्र व दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवीत.

विश्वविद्यालयात सुमारे १०,००० विद्यार्थी शिक्षण घेत होते, त्यातले ३००० तर
विश्वविद्यालयाच्या वस्तीगृहात रहात होते. जवळपास २००० शिक्षक वृंद तिथे
अध्यापनाचे काम करत होता. प्रवेश देण्यासाठी कठीण अशी द्वारपरीक्षा घेतली जात
असे.

या अशा जगभरात नावलौकिक मिळवलेल्या विश्वविद्यालयात शिक्षण घेणाऱ्यांत
चीन, जपान, कोरिया व तिबेट यासह जगभरातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

परंतु इसवी सन ११९३ साली या संपूर्ण जगास हेवा वाटणाऱ्या नालंदा विश्वविद्यालयावर
बख्तियार खिलजी या मुघल आक्रमकाची वक्रदृष्टी पडली. नालंदावर आक्रमण करून
त्याने नालंदा बेचिराख केल. शिक्षकांवर पाशवी अत्याचार करून त्यांच शीर धडावेगळ
करून फेकून दिल गेल.

इतकी विराट ग्रंथ संपदा असणारी नालंदाचे ग्रंथालय सुमारे ३ महिने जळत होत. आपले कितीतरी शोध यात नष्ट झाले. ज्ञान संपदेच अतोनात नुकसान झाल.

विचार करून पहा जर गुगल, विकिपीडिया एका क्षणार्धात नष्ट झाल आणि याचा
backup आपल्याला घेता नाही आला तर आपली काय अवस्था होईल?
मग नालंदा जळल्याच्या आघाताने आपली वैभवशाली सभ्यता किती वर्ष मागे गेली
असेल?

नालंदा शेजारीच एक ठिकाण आहे बख्तियारपूर...
ज्या बख्तियार खिलजी नालंदा विश्वविद्यालय उध्वस्त केल त्याच्या नावावर हे शहर
असाव? जगाच्या पाठीवर दुसरा असा देश सापडेल जो इतक्या पाशवी आक्रमकाचे नाव
स्वत:च्या शहराला देईल?

नालंदा तर फक्त एक विश्वविद्यालय आहे. भारतावर हजारो वर्ष परकीय आक्रमणे होत
आली आहेत. खूप पद्धतशीर पणे आपली संस्कृती, आपला वैभवशाली इतिहास संपवण्याच काम आजही सुरूच आहे. अगदी एखाद्या शाळेत संस्कुत मंत्राच उच्चारण हि आजकाल कम्यूनल मानल जाऊ लागल आहे.

आपल्यातील बरेच महाभाग असेही आहेत जे म्हणतात जे झाल ते झाल उगाच जुन्या
गोष्टी उगाळून काय साध्य होणार आहे?

पण जर आपल्याला आपला गौरवशाली इतिहासच माहिती नसेल तर आपण आपले
भविष्य गौरवशाली घडवू शकणार नाही, या मतावर मी मात्र ठाम आहे...🙏🚩

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling