अहम् ब्रह्मास्मि 🚩 Profile picture
ᴅɪɢɪᴛᴀʟ पत्रकार 🗞️ ʙʟᴏɢɢᴇʀ ✍️ ᴇxᴘʟᴏʀᴇʀ 🧗 ꜰᴏᴏᴅɪᴇ🍕 📝बौद्धिक@#भ्रम_म्हणे▪️Follow @yathaarth_facts
Dec 11, 2023 4 tweets 1 min read
आजूबाजूला काय घडतंय यावर नीट लक्ष ठेवा..🚨

महाराष्ट्रातील एका गावाला अतिरेक्यांनी स्वतंत्र घोषित केलं होतं, नाव ठेवलं "अल् शाम" 🏴‍☠️

भारताला सीरियासारखे इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे काम इसिसने याच गावातून सुरू केले.

या लोकांनी ठाणे जिल्ह्यातील "पडघा" गावाची निवड केली होती. (1/4) Image हळूहळू सर्व दहशतवादी या गावात जमा होऊ लागले.

या दहशतवाद्यांनी गावाला 'स्वतंत्र' घोषित केले होते. त्यांनी गावाचे नाव बदलून ‘अल शाम’ केले.

जिहादच्या नावाखाली भारतात दहशत माजवणे आणि दहशतवादी कारवाया करणे ही दहशतवाद्यांची योजना होती. (2/4) Image
Oct 16, 2023 5 tweets 2 min read
अग्निवीर अमृतपाल यांचा अंत्यविधी एका सैनिकाप्रमाणे केला नाही, म्हणून विरोधी नेते सरकार आणि भारतीय सेनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

मात्र शासकीय प्रथेप्रमाणे अंत्यविधी न करण्यामागे अग्निवीर योजनेचा काहीच संबंध नाही.

जाणून घेऊया नक्की कारण काय होत? (1/5) Image 11 ऑक्टोबर 2023 रोजी सेन्ट्री ड्युटीवर असताना त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

वैद्यकीय प्रक्रिया पार पाडल्यानंतर, अंत्यसंस्कारासाठी एका एस्कॉर्ट पार्टीसह लष्कराच्या बंदोबस्तात पार्थिव देह त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले.(2/5)
Sep 13, 2023 8 tweets 3 min read
G20 साठी आलेल्या प्रत्येक राष्ट्र प्रमुखांना परत जाताना पंतप्रधान मोदींनी भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा एक "संदुक" भेट दिला.

साधा सुधा संदूक नाही तर शिशम लाकडापासून बनवलेला उत्तम प्रतीचा आहे, ज्यात एकूण 6 भेटवस्तू ठेवल्या आहेत.

जाणून घेऊया कुठल्या 6 भेटवस्तू आहेत? 👇 (1/8) Image 1️⃣ काश्मीरचे केसर -
अगदी उच्च प्रतीचे आणि जगातील सर्वात महागडा मसाल्याचा पदार्थ कुठला असेल? तर तो आहे केसर...

एका काचेच्या कुपीत केसर आणि त्याबद्दल असणारी माहिती या संदूक मध्ये आहे. (2/8) Image
Aug 16, 2022 4 tweets 1 min read
सर्व मराठी न्युज चॅनेलवर सध्या एक बातमी चालवली जात आहे,

"भारतीय फुटबॉल महासंघात तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप झाल्याने FIFA ने भारतीय फुटबॉल महासंघाची मान्यता रद्द केली."

पण खरी बातमी समजून घ्यायची असेल तर थ्रेड संपूर्ण वाचा ~

या बातमीत तिसरा पक्ष म्हणजे "भारताचे सुप्रीम कोर्ट" भारतीय फुटबॉल महासंघाच्या नियमानुसार कुठलीही व्यक्ती १२ वर्षांपेक्षा जास्त महासंघाची अध्यक्ष राहू शकत नाही.

१२ वर्षांपेक्षा जास्त वेळ अध्यक्ष राहिलेले प्रफुल्ल पटेल यांना मे २०२२ मध्ये सुप्रीम कोर्टाने राजीनामा द्यायला भाग पाडले आणि महासंघाच्या संचालनासाठी प्रशासक समिती नेमली.
Jun 23, 2021 10 tweets 2 min read
हिंदु साम्राज्य दिन उत्सव 🚩~ का आणि कशासाठी??

ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ रोजी रायगडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. आणि हाच दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपूर्ण भारतात "हिंदु साम्राज्य दिन"🚩 म्हणून साजरा करतो. (१/१०) संघाशी जेमतेम तोंड ओळख असलेल्या व्यक्तीच्या मनात असाही प्रश्न येऊ शकतो की, भारतात अनादी काळापासून अनेक शूरवीर पराक्रमी राजे महाराजे होऊन गेले मग छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झालेला दिवसच संघ "हिंदु साम्राज्य दिन"🚩 म्हणून का साजरा करतो? आणि असा प्रश्न येणे साहजिक आहे. (२/१०)
Jun 1, 2021 10 tweets 4 min read
गरमागरम भज्यांना कुरकुरीतपणा आणणारे अमृत म्हणजे #खाद्यतेल..

पण गेल्या ६ महिन्यात याच खाद्यतेलांच्या किंमती ४० ते ५० % वाढल्या आहेत.

परंतु अनेकांना याच कारणच माहिती नसल्याने ते सवयीप्रमाणे केंद्र सरकारला दोषी धरत आहेत.

याविषयावर सर्वांनाच माहिती व्हावी म्हणूनच हा लेखन प्रपंच ~ जानेवारी २०२१ ची आकडेवारी पाहिली तर जून २०२० पासून खाद्यतेलांच्या किंमती जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी वाढलेल्या आपल्याला दिसून येतील.

यातील १५ टक्के वाढ एकट्या जानेवारी महिन्यात झाली आहे.
Apr 20, 2021 7 tweets 2 min read
#जगातील_सर्वात_श्रीमंत_माणूस 🚩

जयेश कुलकर्णी, नंदुरबार येथे ११ वीत शिकणारा एक स्वयंसेवक...

आई सात वर्षापूर्वीच गेली तेव्हापासून जयेश आणि त्याची बहीण नंदुरबारला मामाकडेच राहतात तर वडील जवळच एका लहान गावात राहायचे.

काही दिवसांपूर्वी वडिलांना कोरोनाने ग्रासलं. दुखणं बळावल्याने हॉस्पिटलला दाखल कराव लागलं, त्यातून रेमिडीसिवरचा तुटवडा..

खूप फिरला इंजेक्शनसाठी , सर्वजण प्रयत्न करत होते, एका स्थानिक नगरसेवकांच्या (श्री. कळवणकर) माध्यमातुन इंजेक्शन उपलब्ध झाले, परंतु उशीर झाला. त्याच रात्री जयेशच्या वडिलांना शासकीय रुग्णालयात हलवावं लागलं.
Mar 31, 2021 5 tweets 2 min read
#पेमा_खांडू हे नाव खूपच कमी लोकांना माहिती होत. अर्थात चमकोगिरीच्या या काळात जमिनीवर काम करणारे नेहमीच दुर्लक्षित राहतात.

पण काल त्यांनी विजयनगरला भेट दिली आणि अनेकजणांना त्यांची ओळख झाली.

पेमा खांडू अरुणाचल प्रदेशातील विजयनगरला by road भेट देणारे पहिलेच मुख्यमंत्री... आता तुम्ही म्हणाल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांने राज्यातीलच एखाद्या गावाला भेट दिली तर त्याच एवढं काय कौतुक?

कौतुक यासाठीच की आजपर्यंत या भागाला कुठल्याच मुख्यमंत्र्यांने रस्त्याने प्रवास करत भेट दिली नव्हती, इतके खराब रस्ते आहेत. रस्ते कसले मातीचे ढिगारेच ते...
Mar 5, 2021 6 tweets 2 min read
#व्यवसाय म्हटलं की, आपल्या भारतीय लोकांना खूप भीती वाटते. १०-२० वर्षांपूर्वी व्यवसाय म्हणजे जणू काही आत्महत्याच आहे अशा नजरेने लोक पाहायचे...

पण ४० वर्षांपूर्वी अशी एक गोष्ट घडली होती की, एका भारतीयाने एका आंतरराष्ट्रीय बँकेला त्यांच्याच व्यवसायात धूळ चारली होती. १९८० च्या सुरुवातीस कार लोन देणारी Citi Bank ही भारतातील एकमेव बँक होती.

कुणालाही कार घ्यायची असेल तर त्यांना Citi Bank शिवाय काहीच पर्याय नव्हता.

साहजिकच Citi Bank ला दुसरा कुणी स्पर्धकच नसल्याने त्यांचा व्याजदर तब्बल २८% होता.
Mar 4, 2021 4 tweets 2 min read
राहुल गांधींनी नुकतीच संघ विचारांनी प्रेरित #विद्याभारती च्या शाळांची तुलना पाकिस्तानातील कट्टरपंथी मदरशांसोबत करत, बौद्धिक दिवाळखोरीच पुन्हा एकदा प्रदर्शन केलं आहे.

ज्यांना माहिती नाही #विद्याभारती काय आहे त्यांच्यासाठी -

➡️ शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी अशासकीय शिक्षण संस्था ➡️ संपूर्ण भारतात सुमारे १८,००० प्राथमिक शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये कार्यरत.

➡️ संलग्न विद्यालयाची संख्या जोडल्यास हाच आकडा २३,००० पर्यंत जातो.

➡️ शिक्षक संख्या - १,४७,६३४

➡️ विद्यार्थी संख्या (२०१९-२०) - सुमारे ३५ लाख
Dec 28, 2020 6 tweets 2 min read
ज्यांना वाटत छत्रपती शिवराय "सेक्युलर" होते हे त्यांच्यासाठी...!!

महाराज इतर धर्मांचा आदर करत असले तरी हिंदु धर्माचा अनादर त्यांनी कधीच सहन केला नाही.

तर गोष्ट आहे १६६३ मधली...

तळकोकणात पोर्तुगीजांची मस्ती वाढली होती. स्थानिक हिंदुंचे धर्मांतर करुन त्यांना बाटवण्यात येत होते. हे सर्व समजताच छत्रपती शिवरायांनी तत्काळ तेथील फ्रान्सिस्को तोवेरा याला पत्र लिहून जाब विचारला. मात्र त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले.

स्वत: महाराज व तान्हाजीराव मालुसरे हे ३००० सैन्यानिशी तिथे बारीक लक्ष ठेवून होते.
Dec 27, 2020 5 tweets 2 min read
गरीबांच जेवण - #पिझ्झा

पिझ्झा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येत एकदम महागडे रेस्टॉरंट, त्यांचा झगमगाट आणि त्याच भरमसाठ बिल...

पण पिझ्झाचा जन्म कसा झाला? याबाबत आपल्याला फार कमी माहिती असेल...

एकवेळ गरीबांच्या पोटाची भूक भागवणारा पिझ्झा आता श्रीमंत झालाय त्यावर एक छोटासा थ्रेड - युरोप मध्ये नेपल्स नावाचं एक बंदर होत. खलाशी, हमाल यांच्या वर्दळीने हे बंदर कायम गजबजलेलं असायचं. इथे विश्रांती घ्यायलाही कुणाला वेळ नसायचा मग निवांत बसून भरपेट जेवण करणे तर फार दूरची गोष्ट..

पण म्हणतात ना गरज ही शोधाची जननी असते, आणि याच गरजेचं भांडवल करून एक शक्कल बाजारात आली.
Dec 22, 2020 6 tweets 2 min read
अयोध्येत भव्य राममंदिर उभारणीसाठी निधी संकलन अभियान सुरू होत आहे. हे अभियान म्हणजे प्रभू श्रीरामांच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे असा आरोप शिवसेना करत आहे.

आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की निधी संकलना मागे नक्की काय प्रयोजन आहे? मला जे वाटतं त्याबद्दल हा छोटासा थ्रेड.... आपल्या देशात अंबानी, अदानी सारखे अनेक उद्योगपती आहे जे एकरकमी १५०० कोटी देऊन मंदिर उभारू शकतात.

मात्र अशा पद्धतीने मंदिर उभारल्यास किती हिंदूंना हे मंदिर "आपले" वाटेल? राम मंदिरावर त्यांच्या "सौजन्याची" पाटी आपल्याला चालेल?
Nov 25, 2020 10 tweets 4 min read
गोष्ट आहे एका तालुक्याची...
एका अशा तालुक्याची जो एकेकाळी गुन्हेगारी बाबत महाराष्ट्रात अव्वल क्रमांकावर होता.

तालुक्याचं नाव - #मुळशी

एकेकाळी नामवंत पैलवान आणि अधिकारी देणारा हा तालुका गुन्हेगारी साठी ओळखला जाऊ लागला होता आणि ही ओळख आम्हा सर्वांच्या मनाला लागत होती... सर्वांनी मनाशी गाठ बांधली की काहीही करून आपल्या तालुक्याची "गुन्हेगारांची मुळशी" ही ओळख पुसायची.

४ वर्षांपूर्वी तुळजाभवानी ट्रस्टचे संस्थापक रामदास पवळे आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी संतोष भूमकर या बालमित्रांनी हा विडा उचलला. साथीला होते ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि मित्र मंडळी..
Aug 11, 2020 9 tweets 2 min read
#tweet4bharat 🇮🇳
राष्ट्रीय एकात्मता आणि आपण -

आपला भारत देश अगदी रामायण काळापासून ते महाभारतापर्यंत आणि चंद्रगुप्त मौर्य पासून इंग्रज काळापर्यंत सांस्कृतिकदृष्ट्या अखंड आणि एकात्म राहिला आहे... परंतु इंग्रज आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांनी हे कधीच मान्य केलं नाही आणि हीच गोष्ट ते सतत आपल्या मनावर बिंबवत राहिले, त्याचा प्रभाव इतका पडला की काही भारतीय म्हणायला लागले की, "इंग्रज आल्यामुळे आपल्या देशाला शैक्षणिक सुबत्ता मिळाली आणि तुकड्या तुकड्यात विभागलेला देश एकसंध झाला."
Jul 22, 2020 12 tweets 2 min read
आज २२ जुलै - राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवस आधी २२ जुलै १९४७ रोजी भारतीय संविधान सभेच्या बैठकीत पिंगली वैंकय्या यांनी बनवलेला झेंड्यावर आधारित #तिरंगा "राष्ट्रीय ध्वज" म्हणून स्वीकारला गेला.

#तिरंगा फडकावण्यासंबंधी काही नियम खालीलप्रमाणे- २००२ पूर्वी सामान्य भारतीयाला फक्त स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाची परवानगी देण्यात आली होती. २६ जानेवारी २००२ पासून यात बदल करण्यात आले. त्यानुसार कोणताही नागरिक कोणत्याही दिवशी ध्वज फडकवू शकतो.
Jul 17, 2020 9 tweets 2 min read
संघाचे तृतीय वर्ष शिबीर सुरु होते..
दरम्यान २ स्वयंसेवकांमध्ये भांडण सुरु झालं. खरंतर स्वयंसेवकांमध्ये "भांडण" हा प्रकार तसा संघाला नवीन..

सुरुवातीला हे भांडण किरकोळ असेल म्हणून दुर्लक्ष केल गेलं. पण नंतर हे भांडण जरा जास्तच वाढलं, तेंव्हा एका ज्येष्ठ स्वयंसेवकाला पाठवण्यात आलं. ते दोघे स्वयंसेवक केरळ मधील कोणूर मधले होते. त्यांच्यात वाद चालला होता कि, "ह्या शिबिरानंतर त्यांच्या शाखेचा कोण मुख्यशिक्षक होणार?" म्हणून..

दोघांनाही त्यात प्रचंड रस होता आणि त्याच पदामध्ये, दुसऱ्या कोणत्याही पदामध्ये नाही. तडजोड कोणालाच मान्य नव्हती..
Apr 26, 2020 14 tweets 3 min read
आद्य भारतीय समाजसुधारक व युगपुरुष "महात्मा बसवेश्वर" यांची आज जयंती..!!

त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी त्यांचा जन्म ११०५ साली वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते.

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्याचा हा अल्प परिचय (थ्रेड)👇 बसवेश्वरांनी बिज्जल राजाकडे कारकूनाच्या नोकरीपासून सुरूवात केली. पुढे त्यांची राजाचा कोषाधिकारी म्हणून निवड झाली. त्यावेळी मंगळवेढा परगणा बिज्जल राजांच्या अधिपत्याखाली होता.

बसवेश्वर हे वेदशास्त्रात,धनुर्विद्येत पारंगत असल्याने राज्याचे प्रधान झाले.त्यांनी अनेक शिवमंदिरे बांधली.
Apr 25, 2020 7 tweets 2 min read
चीनमधला कोणताही बडा नेता अगदी जिनपिंग भारतात आला तरी तो एका कुटुंबाची हमखास भेट घेतो.

काहीच जणांनी ज्याचं नाव ऐकलं असेल अशा कोटणीस कुटुंबाची..

इथे भारतात आजही डॉक्टरांवर हल्ले होत असताना ७० वर्षांनी ही एका डॉक्टरला मृत्यूपश्चात चीनमध्ये किती सन्मान दिला जातो याच हे उदाहरण..!!👇 दुसऱ्या महायुद्धावेळी चीन आणि जपान एकमेकांविरुद्ध लढले होते.

त्यावेळी एका भारतीय डॉक्टरनं आपले प्राण धोक्यात घालून अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचवले होते.

डॉक्टर द्वारकानाथ शांताराम कोटणीस हे त्यांचं नाव...
Apr 3, 2020 10 tweets 3 min read
#तबलिगी_जमात चा #करोना_जिहाद ?? (थ्रेड)

तबलिगी जमात या संघटनेची स्थापना १९२६ मध्ये झाली. दिल्ली येथे निजामुद्दीन नावाचे मोठे मुख्यालय आहे. त्यालाच मरकज असे म्हणतात.

मुस्लिम धर्मातील सुन्नी पंथातील बहुसंख्य लोक या संघटनेचे सभासद आहेत. तबलीगशी मतभेद असणारा एक वर्ग देखील सुन्नी पंथात आहे.

या संघटनेच्या माध्यमातून दि. १३ ते १५ मार्च या कालावधीत संघटनेत कार्यरत असणाऱ्या सर्व सभासदांचे एकत्रित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Mar 30, 2020 25 tweets 6 min read
स्वातंत्र्योत्तर भारतातील ईस्ट इंडिया कंपन्या (थ्रेड)

शीर्षक वाचून तुम्हाला वाटेल "कंपनी" लिहायच्या एेवजी "कंपन्या" असं चुकीच लिहिलं गेलं असेल.

बऱ्याच जणांना माहिती नसेल,
स्वातंत्र्योत्तर भारतात डच, पोर्तुगिज, फ्रेंच आणि ब्रिटिश अशा ४ ईस्ट इंडिया कंपन्या अस्तित्वात होत्या. हिंदुस्थान व पूर्वेकडील राष्ट्रांबरोबर व्यापार करण्यासाठी यूरोपीय राष्ट्रांनी काही व्यापारी कंपन्यांना अधिकृत परवानगी दिल्या.

त्या त्या देशांतील कंपन्यांच्या भागधारकांनी जमविलेले भांडवल व काही शासन संस्थेकडून मिळालेले आर्थिक साहाय्य यामुळे ह्या कंपन्यांना आर्थिक स्थिरता लाभली.