आणि युवराज शंभू दुसरे छत्रपती झाले!
राजमान्य राजश्री, महाधुरंधर, महापराक्रमी, संस्कृतपंडीत, शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले..
#Swarajyaveer_Sambhajiraje
शंभूमुद्रा!
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा धौरीव राजते, यंदकसेविनी लेखा वर्तते कस्यनोपरी
अर्थ : शिवाजीपुत्र संभाजीची ही मुद्रा तळपत्या सुर्याप्रमाणे शोधते आहे आणि या मुद्रेची आश्रयदायी लेखा सुद्धा कुणावरही सत्ता चालविते..
राज्याभिषेकाचा सुखद अनुभव घेणारे दुसरे अष्ठप्रधान मंडळ..
सर्वोच्च स्थानी स्वतः छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले, सेनाधिपती (घोडदळ, पायदळ, आरमारप्रमुख)
श्री सखी राज्ञी जयति महाराणी येसूबाई (छत्रपतींच्या अनुपस्थितीत स्वराज्याच्या कारभारी) मुलकी कारभार पाहण्यासाठी श्री सखी राज्ञी सचिव हा स्वतंत्र शिक्का!
#Swarajyaveer_Sambhajiraje
सरसेनापती - हंबीरराव मोहिते (संभाजी राजांचे मामा आणि यापलिकडे रणधुरंधर सेनानी, यांचा पाडाव करण्यासाठी शत्रूला तलवार नाही तर तोफ चालवावी लागली)
छंदोगामात्य - कवी कलश (स्वराज्यात संभाजी राजेंनंतर सर्वाधिक कट यांच्याविरोधात रचले गेले. एक मित्र नव्हे परममित्र!)
पेशवे - निळो मोरेश्वर पिंगळे (मोरोपंतांची चूक त्यांच्या मुलाची कशी असू शकेल? म्हणूनच हुश्शार निळोंना पेशवेपद बहाल)
मुख्य न्यायाधीश - प्रल्हाद निराजी (न्यायदानाचं महत्कार्य करण्याची संधी)
दानाध्यक्ष - मोरेश्वर पंडितराव (स्वराज्याच्या खजिनाची चावी ज्यांच्या हाती)
चिटणीस - बाळाजी आवजी (हाती जणू सरस्वतीचे देणे, मोत्यासारखं अक्षर! मात्र अण्णाजी दत्तोंच्या नादी लागले नि वळण चुकले)
सुरनीस - आबाजी सोनदेव (स्वराज्याचे आयकर अधिकारी)
डबीर - जनार्दनपंत
मुजुमदार - अण्णाजी दत्तो (सुरनीसी गेली. अपमान झाला. मात्र सुबुद्धि काही आली नाही. छत्रपतींनी माफी दिली मात्र ती पेलवली नाही. तुमची हुशारी चुकीच्या ठिकाणी वापरली गेली की विनाश अटळ आहे हे सांगणारे व्यक्तिमत्व)
वाकेनवीस - दत्ताजीपंत
#Swarajyaveer_Sambhajiraje
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
