प्रथमेश सुभाष राणे. Profile picture
'मेट्रो'प्रेमी | भटकंती | गड-किल्ले प्रेम | कोकणप्रेम | वैयक्तिक मतं | युट्यूब चॅनेल : RoadWheel Rane | @RWRane | Founder And CEO @markit_official
Sep 30, 2020 7 tweets 1 min read
📌📌📌

देव न करो, की राजकारणात बलात्कार होवो!'

कुठलीही हृदयद्रावक, काळजाला भेगा पाडणारी घटना घडली की उत्स्फूर्त प्रतिक्रिया येणारच. बलात्काराच्या घटनेत देखील राजकारण होताना पहिले की देव न करो, राजकारणात बलात्कार होवो हेच शब्द ओठांवर येतात. उत्तरप्रदेशात बलात्काराची... घटना घडलीय. आपल्याइथे काय चाललंय? तर विरोधी आणि सत्ताधारी अशा दोन्ही पक्षातील 'भडव्या' कार्यकर्त्यांकडून केवळ राजकारण सुरु आहे. सत्तेतील (शिवसेना, राष्ट्रवादी) कार्यकर्ते, त्या योगी आदित्यनाथांनी आपल्या राज्यात काय करावं, कस राज्य सुरक्षित राहावं याचे...
Sep 18, 2020 9 tweets 2 min read
📌📌📌

काल मी 'अनुभव' विकत घेतला.

गुरुवारी हे ट्विट केल्यानंतर कमेंट्समध्ये काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय अशा आशयाची छान चर्चा होईल अशी अपेक्षा होती. राजकारण, ट्विटरवर आपल्या पक्षातील सर्वात मोठा कार्यकर्ता बनण्याची स्पर्धा आणि वैयक्तिक उणीधुणी यामध्ये हे ट्विट काहीतरी.. (१/९) वेगळी चर्चा घडवेल (अर्थात) अशी अपेक्षा होती. हास्यास्पद आहे अशी अपेक्षा ठेवणं असं अनेकांना वाटेलही.. माझा ट्विटरमित्र डीएमला विचारतो.. तुला अजूनही वाटतं, आता या प्लॅटफॉर्मवर चर्चा होईल? मी म्हणतो प्रयत्न करू.. असो, काही हरकत नाही.. आपण लिहत राहू..

तर अलीकडेच.. (२/९)
Sep 15, 2020 27 tweets 4 min read
फक्त काळजावर तितका दगड ठेवा..

या थ्रेडला कुठल्याही पक्षाची, विचारसरणीची मर्यादा नाही. मराठी व्यक्तीने मराठीजनांसाठी लिहिलेला 'राग'! फार काही ग्रेट लिहिलेलं नाही. तुमच्या आमच्या आजूबाजूला घडणारं दुर्लक्षित वास्तव आहे. पुढील काही वर्षात या थ्रेडमधील.. (१/२७) मुद्द्यांमुळे 'किमान' बदल घडावेत अशी अपेक्षा ठेऊन हा थ्रेड लिहितोय. त्यामुळे थ्रेड स्वतःपुरती मर्यादित ठेवावा की इतरांपर्यंत पोहोचवावा हे ज्याचे त्याने ठरवावे.

सुरुवातीला काही मुद्दे सांगतो.. (२/२७)
Sep 9, 2020 4 tweets 1 min read
'अति तिथे माती' हे सूत्र लक्षात राहूदे गं बाई.. हे ट्विट मात्र जाणूनबुजून केलेले आहे. याला समर्थन देणं म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच!
अर्थात हे राजकारण आहे. सामान्यांनी शांत राहायचं. खेळ बघायचे. अस्मितेला ठेच 'ते' पोहचवतील. माथी आपली भडकतील. डोकी आपली फुटतील. त्यापेक्षा.. कंगना विरुद्ध शिवसेना या वादाकडे दुर्लक्षाय नमः करावे असे वाटते.
त्यात, पालिकेने आताच कारवाईचं काम काढून बोट ठेवायला मुद्दा दिलाय. दोन्हीकडून इगोचा खेळ सुरूय.. याच विषयासंबंधित वादातून भांडुपला हाणामारी झालीय. ज्यांच्यासाठी 'राजकारण' हे करियर नाही अशांनी या विषयांत वेळ वाया...
Sep 9, 2020 8 tweets 1 min read
शंतनूसोबत बोलणं झाल्यावर, थ्रेड लिहेन असं म्हटलं खरं.. मात्र दोन दिवस कामाच्या गडबडीत राहून गेलं. त्याबद्दल क्षमस्व! आणि हो ज्यांनी विविध विषय गेस केले त्याही विषयावर लिहायचा प्रयत्न करेन. तर सहज म्हणून आमचा कॉल झाला. साहजिकच नोकरी हा विषय होताच.. मात्र सूर थोडा वेगळा होता. शंतनू मुलखाचा अतिविचारी आणि भावुक.. आपण शेअर करत असलेल्या नोकरीच्या संधीमुळे मुलांना नोकरी लागल्यानंतर जसा त्याला आनंद होतो. तसाच त्या संधीचा कोणी उपयोग करून न घेत नसल्यास त्याला त्याहून अधिक वाईट वाटतं.
Sep 5, 2020 35 tweets 6 min read
📌📌📌

सवय लावून घ्या. आता अशा 'अस्मिता' जाग्या होतच राहतील..

कंगनाबाई व्हायरल होणे नवीन नाही. यंदाचे व्हायरल 'ट्रोल'च्या माध्यमातले आहे. निमित्त असंय की, तिला 'मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे.' हा म्हणजे.. आम्हाला तितकंच सांगण्यात आलं.. त्याआधी राऊत साहेबांच्या.. धमकीबद्दल वर्तवलेली भीतीचे शब्द आम्ही विसरून गेलो. आम्हाला फक्त आमच्या मुंबईला बोलल्याचं लागलंय. एकदम खोलवर.. यापुढे कंगना बोलणार त्यावरून आमच्या मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाची रेंज ठरवली जाणार. बरोबर ना? असो.. थ्रेड लिहितो म्हटल्यावर अनेकांनी लाइक, रिप्लाय देणंच टाळलं.
Sep 3, 2020 5 tweets 1 min read
मिठीबाई कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांचे अकाली निधन! डॉ. राजपाल श्रीपत हांडे
शिक्षण : एमएससी, (संशोधन), पीएचडी, डीएचई, एफएझेड, एफझेडएसआय
प्राचार्य (मिठीबाई कॉलेज), (माजी संचालक, महाविद्यालय व विद्यापीठ विकास विभाग, मुंबई विद्यापीठ)
Sep 3, 2020 15 tweets 4 min read
📌📌📌

आता वाचवा नको, शेतकरी 'शिकवा' म्हणू..

ट्विटरवर सक्रिय सहभाग मागील वर्षभरापूर्वी वाढलेला.. त्यापूर्वीपासून अनेक दिग्गज या पिचवर चौफेर फटकेबाजी केलेली आहे. त्यात शेतकरी, त्यांची आत्महत्या, त्यांच्या अडचणी, त्यांना हेतुपुरस्पर दुर्लक्षित करणे अशा.. (१/१५) #शेतकरी_वाचवा अनेक विषयांवर निवडक मराठी ट्विटरकरांनी आपापली मतं मांडली. याबाबत लिहावं अशी आर्त हाक आमच्या एका मित्राने डीएमवर केली. आणि मग या थ्रेडच्या लिखाणाचं नियोजन सुरु केलं. काही कारणांमुळे उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. तर #शेतकरी_वाचवा या हॅशटॅगवर काय काय मतप्रदर्शन.. (२/१५)
Aug 30, 2020 4 tweets 1 min read
त्यांनी व्हिडीओ काढला ही चूक नाही. कदाचित पुराव्याखातर ती व्हिडीओ काढण्यात आली असावी. मात्र ती समाजमाध्यमांवर व्हायरल करणं दुर्देवी आहे. ज्या वेगाने तो व्हिडीओ पसरतोय ते पाहता ताईच्या कुटुंबियांना काय मानसिक त्रास होत असेल देवजाणे..
अनेक सेलिब्रिटी मंडळींनी 'मजेशीर' म्हणत.. व्हिडीओ टाकल्याचे समर्थन केले. काहींना समाजभान ओळकत त्या डिलीट केल्या.
या लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियाचा इतका अनावश्यक वापर वाढला की एखाद्याच्या कमीपणाचा बाजार मांडायला आपण सुरूवात केलीय. यदाकदाचित यापूर्वी हे माझ्याकडूनही झालं असेल.. मात्र श्रीगणेशा मालिकेत दाखवलेल्या...
Aug 20, 2020 16 tweets 4 min read
📌📌📌

शिक्षणाच्या गंगेसाठी तिचे भगीरथ प्रयत्न

काल म्हटल्याप्रमाणे आज स्वप्नालीच्या न व्हायरल झालेल्या वाचनाच्या आवडीबद्दल लिहितोय. काल लिहिता आले असते मात्र आज बातमी प्रसिद्ध होऊ घातली होती. त्यामुळे ब्रेक घेऊन निवांत लिहू म्हटलं. (१/१६) तर, स्वप्नालीचे प्रयत्न आज राज्यभर प्रेरणादायी ठरतायत. काल बातमीनिमित्त कॉल केल्यावर स्वप्नालीला म्हटलं, 'अगं सोशल मीडियावर फेमस झालीयेस, तुझ्या जिद्दीला आज लोक सलाम ठोकतायत..' ती अगदी थंड आवाजात म्हणाली, सर मला काही माहीत नाही. मी सोशल मीडियावर नाही. (२/१६)
Aug 17, 2020 15 tweets 3 min read
📌📌
मायझयांनी धंद्याक लावल्यान..

काल- परवा कोकणात जाणारी रेल्वे 'रिकामी' गेल्याची माहिती आलीच असेल. ६ हजार ३९२ जागा होत्या. केवळ २५५ जागा भरल्या होत्या. सोबत सविस्तर आकडेवारी जोडतोय. अशा विशेष रेल्वे सोडण्यासाठी झालेला खर्च अर्थातच वाया गेला. (१/१५) मात्र त्यापूर्वी थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊ. लॉकडाउन सुरु झाला तेव्हा मुंबईत अडकलेल्या ग्रामस्थांचा कोकणात जाण्यावरुन संघर्ष सुरु होता. लॉकडाउन शिथिल होताच चाकरमान्यांचाही संघर्ष सुरु झाला. जवळपास महिनाभर हे रणकंदन सुरु होतं. त्यात गणपतीसाठी जाण्याचे प्रयत्न सुरु झाले. (२/१५)
Aug 16, 2020 19 tweets 4 min read
📌📌📌
कुणी पाणी देतं का पाणी..

जवळपास वीसेक दिवसांच्या गॅपनंतर थ्रेड लिहितोय. हा विषय सांगून पुन्हा ८ दिवस गेले. तसदीबद्दल क्षमस्व.

काही दिवसांपूर्वी 'तुळशी तलावाएवढे पाणी चार दिवसांत पालिकेने उपसले' या मथळ्याची बातमी वाचली. बातमीनुसार, 'साधारपणे ४ दिवसांच्या कालावधीत (१/१९) सर्व उदंचन केंद्रामधून तब्बल १७ हजार १४५ दशलक्ष लीटर पाण्याचा उपसा करण्यात आला. जवळपास ८ हजार ४६ दशलक्ष लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या तुळशी तलावातील पाण्याच्या दुपटीपेक्षा अधिक पाण्याचा उपसा गेल्या ४ दिवसांत करण्यात आला आहे. तुळशी तलाव म्हणजे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या (२/१९)
Aug 14, 2020 4 tweets 2 min read
@MumbaiMT तर्फे आजपासून 'मटा हेल्पलाइन'मध्ये निवड झालेल्या गुणवंतांच्या संघर्षकथा प्रसिद्ध होणार आहेत.
रोज सकाळी दोन संघर्षकथा मी ट्विट करेन..
त्यांनी संघर्षातून मिळवलेलं यश निश्चितच प्रेरणा देईल. Image बाबांना पक्षाघाताचा झटका, आईनं घरकाम करून मोडलेल्या संसाराला दिलेला टेकू.. हे पाहतच मोठी होणारी शिवानी.. तिचं हे यश काळजात घर करणारं आहे. Image
Aug 4, 2020 7 tweets 1 min read
पावसानं पुरता झोडपलाय. बरं, आता तरी कोणी मुंबईतील कार्यसम्राट पालिकेबद्दल बोलणार आहे का? नाहीतर सत्तेतील पक्षाला बोल लावले की झोंबाझोंबी सुरु होइल..
या मंडळींनी टिका मनाला लावून न घेता जरा ग्राऊंडवर फिरावं. लोकं काय म्हणतायत पाहावं. फक्त शाखेत राहून खुशमस्करीत मश्गुल राहू नये. एकीकडे त्या मनसेकडे नगरसेवक नाही म्हणून छेडता, आणि स्थानिक स्तरावर त्यांच्याच कार्यकर्त्यांकडे मदत मागता?
राज ठाकरेंच्या कार्यपद्धतीबद्दल काही मतभेद जरूर आहेत. त्यांच्या संघटनाचं नियोजन आजही फसतंय.. मात्र त्यांच्याकडे असलेले कष्टाळू कार्यकर्ते आजही राज्यात कुठल्या पक्षाकडे नाहीत.
Jul 24, 2020 15 tweets 3 min read
गणेशोत्सवाला आजपासून २८ दिवस बाकी आहेत. रेल्वेचे बुकिंग ४ महिने अगोदर होते. (अर्थात सामान्य चाकरमान्याला ही तिकिटं मिळत नाही ही पुढील बाब) एसटी महामंडळाचे ग्रुप बुकिंग किमान दीड महिना अगोदर करावी लागते. यंदा मात्र गावी जायचे की नाही या विवंचनेत चाकरमानी अडकला आहे. राज्य शासनाकडून अद्याप कुठलीही स्पष्टता नाही. कोकणाची पार्श्वभूमी असलेले अनिल परब परिवहन मंत्री आहेत. मात्र त्यांना चाकरमान्यांची अडचण समजू नये याचे आश्चर्य वाटते. त्यांना रिस्क घ्यायची नाही हे स्पष्ट दिसतंय. दुसरीकडे ग्रामपंचायतींकडून सूचनावल्या जाहीर होत आहेत. ती मंडळी देखील..
Jul 22, 2020 6 tweets 2 min read
@CMOMaharashtra आरेतील मेट्रो कारशेडचा खोळंबा कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिलाय. मग अडलंय कुठे? Image वेळेत काम न सुरू झाल्यास सामान्य मुंबईकर भरत असलेला कर वाया जाणार आहे. गेल्या वर्षी हा विषय प्रतिष्ठेचा करण्यात आला होता.
आता ठाकरे सरकार अस्तित्त्वात असताना निर्णय होऊन कामाला सुरूवात होणे अपेक्षित होतं. दुर्देवाने ते झालेले नाही.
Jul 12, 2020 20 tweets 4 min read
📌📌📌
एय, बेगडी शिवप्रेमी.. झालं का मन शांत? मागितली माफी! पुढे? विषय संपला. चला आता पुढे कोणी शिवरायांच्या नावाने राजकारण करतंय का पाहू.. आपली सोशल मीडियाची टीम, बेगडी शिवप्रेमींची संख्या काही कमी नाही. ट्रोल करू. नाक घासायला भाग पाडू. मग पुन्हा पुढचा कोणीतरी महाभाग येणार.. काहीबाही बोलणार, आम्ही पेटून उठणार. वर्षानुवर्षे हेच चालत राहणार. सदर महिलेचा राग आला मात्र या बेगडी शिवप्रेमींची कीव वाटली. फक्त तिने तिचा कार्यभाग साधला असे काही नाही. या बेगडी शिवप्रेमींनीं देखील आपली फॉलोवर्सची भूक भागवली. इतक्या विरोधातून 'आउटपुट' काय निघालं हे स्वतःला..
Jul 6, 2020 18 tweets 4 min read
📌📌📌

त्याच्या यशाची चर्चा..

फ्रान्स देशाकडून त्यांच्या संशोधन संस्थेत रुजू होण्यासाठी त्याला प्रतिमहिना १६ लाख रुपयांची नोकरी, ५ बीएचके फ्लॅट, अडीच कोटी रकमेची चारचाकी अशी ऑफर होती. त्यानं नाकारली. एन. एम. प्रताप त्याचं नाव. अलीकडेच आपल्या देशानं या युवा वैज्ञानिकाचा उचित सन्मान करून, भारताच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये (डीआरडीओ) रुजू करून घेतलंय. पण हे यश सहजासहजी मिळालेलं नाही. अलीकडेच @satya_AmitSingh या हॅन्डलवर इंग्रजीतून थ्रेड लिहिला आहे. थ्रेड वाचल्यानंतर
Jul 4, 2020 9 tweets 3 min read
📌📌📌
तीच 'संधी' नव्या रूपात..

लॉकडाउनच्या काळात परप्रांतीय मजुरांच्या घरवापसीमुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडील रिक्त झालेल्या जवळपास १७ हजार पदांच्या भरतीकरिता कौशल्य विकास विभागामार्फत (conti..) Image पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने ६ ते ८ जुलै या कालावधीत तर..
Jun 28, 2020 27 tweets 5 min read
📌📌📌

घरोघरी 'पॉर्न'च्या गोष्टी? (भाग २)

कालच्या थ्रेडला मिळालेला प्रतिसाद म्हणजे या विषयावर 'खुलेपणाने' बोलण्याची खरंच गरज आहे ही बाब अधोरेखित करते. यावेळी सुरुवात आपण पोर्नोग्राफीपासून करू. जेणेकडून विषयाचं गांभीर्य सुरुवातीपासूनच राहील. (१/२७) (यासाठी काही प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा आधार घेत आहे.) तर देशात लॉकडाउन झाल्यापासून चाइल्ड पॉर्न, सेक्सी चाइल्ड आणि टिन सेक्स व्हिडीओ असे शब्द सर्वाधिक सर्च करण्यात आल्याची माहिती ऑनलाइन मॉनेटरिंग वेबसाईट्सच्या अहवालातून उजेडात आली. तर लॉकडाउनच्या काळात (२/२७)
Jun 27, 2020 24 tweets 5 min read
📌📌📌

घरोघरी 'पॉर्न'च्या गोष्टी?

विषयाची नेमकी सुरुवात कुठून करावी या विचारांचं काहूर माजलंय. विषय सुचणं, त्यावर लिहितोय हे सांगणं आणि प्रत्यक्षात लिहिणं हे फार कठीण काम आहे. असो! काल परवाची गोष्ट. न्यूझीलंड सरकारची एक जाहिरात पाहिली. आपल्या देशवासियांना तुमची (१/२३) कोवळी मुलं, कोवळ्या वयातच काय पाहतायत हे जाहीरपणे सांगण्यासाठी ती जाहिरात तयार करण्यात आली होती. यामध्ये पॉर्न इंडस्ट्रीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या मज्जाकरांना घेण्यात आलं होतं. त्या जाहिरातीत, एक 'नेक्ड' म्हणजेच निर्वस्त्र जोडपं एका घराची बेल वाजवतात. घरातील (२/२३)