Omkar Dabhadkar Profile picture
Brand | Business | Life

May 28, 2020, 10 tweets

"यशस्वी उद्योजकता" कशाला म्हणावं?!

उद्योजक लाईफस्टाईलच्या ग्रुपमध्ये एका पोस्टमध्ये "यशस्वी उद्योजकता" हा शब्दप्रयोग वापरला गेला. त्यावर एका मेम्बरने हा मस्त प्रश्न उपस्थित केलाय!

त्यांच्याच शब्दात : +

"यशस्वी उद्योजक म्हणजे काय ? त्याची व्याख्या काय ? जो जास्त नफा किवा पैसा कमावतो तो ? की अजुन काही ..."

#वरकरणी असं वाटतं की याचं उत्तर व्यक्तिपरत्वे बदलत रहाणार. परंतु प्रत्येक उत्तर शेवटी एकाच शाश्वत अभिलाषेकडे घेऊन जाणारं आहे : पूर्ण समाधान मिळणे! +

जर तुमची उद्योजकता तुम्हाला पूर्ण समाधान मिळवून देत असेल तर तुम्ही "यशस्वी" उद्योजकता आहात.

हे उत्तर वाचायला एकदम छान वाटतं. इन्स्पिरेशनल क्वोट सारखं!

गंमत त्यापुढे सुरु होते. +

#समाधान ही एकदा मिळवली की कायमची हस्तगत होणारी गोष्ट आहे का? नाही! The Pursuit of Happyness या अत्युत्कृष्ट चित्रपटाच्या नावाप्रमाणे - हॅपिनेस - समाधान ही pursue करायची गोष्ट आहे. समाधान मिळवलं आणि "काम झालं" असं होत नाही! ते सतत मिळवत रहाण्याचा प्रवास निरंतर कायम ठेवावा लागतो. +

तुम्ही रोज सरावाने उत्तम मेडिटेशनची साधना हस्तगत केलीत - आणि एक दिवस त्या अवस्थेत ब्रह्मानंदी टाळी लागली - आत्मिक समाधानाचे परमोच्च पातळीवर जाऊन आलात - म्हणजे "झालं"...असं असतं का? नाही ना! रोज मेडिटेशन करत रहावं लागणार.

तसंच उद्योगातून मिळण्याच्या समाधानाचं आहे. पण - +

गंमत ही नव्हे.

गंमत ही, की हा pursuit of happiness आपोआप होत नाही! त्यासाठी आजूबाजूची आयुधं लागतात!

@UdyojakLife या उपक्रमाद्वारे उद्योजकतेबद्दल मला जे कळलंय ते
इतरांना सांगताना खूप खूप आनंद मिळतो. पण म्हणून मी ते "तसंच" आपोआप करू शकत नाही! +

मला ते निरंतर, किंवा शक्य तितकं अधिकाधिक चांगल्या व परिणामकारकतेने करता यावं यासाठी एक स्ट्रक्चर उभारावं लागतं. सिस्टीम उभारावी लागते. त्याच्या खर्चाची तजवीज करावी लागते. आणि हे करून झाल्यावर, हे सगळं लष्कराच्या भाकऱ्या भाजणं नसेल - फक्त मजा येत राहिली पण - +

व्यावहारिक उत्कर्ष तसाच राहिला - असं होणार नसेल - याचीदेखील काळजी घ्यायची असते.

इथेच NGO आणि Enterprise वेगळे होतात. :)

इथेच समाजसेवक आणि आंत्रप्रेन्युअर वेगळा ठरतो! +

यशस्वी उद्योजकता म्हणजे काय - याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळंच असणार.

परंतु ते उत्तर "साध्य" करण्यासाठी जे जे खटाटोप करावे लागतात - ते करता येणं --- यात खरं कसब आहे!

हे कसब शिकायला, मुळात असं कसब लागतं हे कळायलाच मला ६ महिने लागले. नंतर कसब शिकायला पुढे वर्ष दीड लागलं. +

हाच कॉपी-पेस्ट फॉर्म्युला इतरांसमोर घेऊन जाण्यासाठी उद्योजक लाईफस्टाईलचा उपक्रम सुरु केला आहे!

(बाय द वे, आपली कम्युनिटी छान तयार होतीये...ज्यांना यात सामील व्हायचं आहे त्यांनी तसं @UdyojakLife च्या फेसबुक पेजवर मेसेज करून कळावं!)

चिअर्स!

: ओंकार दाभाडकर

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling