Omkar Dabhadkar Profile picture
Brand | Business | Life
3 subscribers
Mar 13, 2023 21 tweets 4 min read
लोकलमधे ३-४ मंडळींमध्ये रावणाचं कौतुक करणारं डिस्कशन सुरू होतं. प्रोपागंडा रुजत रुजत सार्वत्रिक मत कसं तयार होतं याचं लाईव्ह प्रात्यक्षिक बघितलं. खोटे हिरो निर्माण करण्याचा प्रकार हसून, गंमत म्हणून सोडून देण्यात आला की सामान्य माणूस कसा घडत जातो याची जाणीव अधिकच ठळक झाली.

१+ कथा कादंबऱ्या म्हणून प्रसिद्ध झालेली पुस्तकं गाजतात, चर्चा होतात आणि वास्तवाचा अन त्याहून महत्वाचं - मूलभूत मूल्यांचा - सगळा कचरा होऊन बसतो.

रावण त्याच्या गुणांमुळे आदर्श वाटावा असं बरंच काही होतंच त्यात.
ज्ञानी, तपस्वी, कर्तबगार, योद्धा...बऱ्याच अनुकरणीय गोष्टी होत्या.

२+
Oct 7, 2022 5 tweets 2 min read
Whether you are working as an employee or have your own business - please don't fall in the "Don't worry! You have time to figure it out!" trap, that's pretty famous these days amongst the Gurus of modern age success.

1+ Time is the most valuable commodity. Time lost in vain costs way more than anything else in our lives.

So, of course don't haste. Don't jump to conclusion too soon. Have a pinch of patience and perseverance.

2+
Sep 17, 2022 8 tweets 2 min read
लोकांची फिकीर करू नका : हा सल्ला देणाऱ्यांना आधी अनफॉलो करायला पायजे.

काय मजाक लावतात यार?!

अशी कशी फिकीर करू नका?!

सोपं असतं काय? आणि बेसिकली - शक्य असतं काय?

पुस्तकी थियरी वेगळी, वास्तव जीवन वेगळं.

१+ माझं कुटुंब माझ्या स्वप्नांना समजू शकत नसेल तर तिकडे दुर्लक्ष करू शकतो का मी? काहीच किंमत नाही का त्यांची माझ्या जीवनात?

त्यांना माझी स्वप्नं का समजत नाहीयेत, त्यांना कोणते धोके दिसत आहेत हे मी समजून घ्यायला नको?! त्यांचं शंका निरसन करायला नको?! आणि - सर्वात महत्वाचं -

२+
Jun 15, 2022 14 tweets 3 min read
८-१० वर्षांपूर्वी पृथ्वीच्या कुठल्याश्या (बहुतेक चीनचाच असावा!) कोपऱ्यात, कुणाच्या तरी डोक्यात खिश्यात घेऊन फिरता येईल अश्या हलक्या, सुटसुटीत, स्वस्त मोबाईल स्टॅन्डची कल्पना आली असावी.

#म #मराठी #कृतज्ञता

१+ त्याने खटपट करून प्रोडक्ट तयार केलं असावं. रॉ मटेरियल, लॉजिस्टिक्स वगैरेची तजवीज करून घेतली असावी. आणि जगभर (किमान आमच्या डोंबिवलीपर्यंत तरी!) ते स्टॅन्ड जाण्याची साखळी यंत्रणा उभारली असावी.

२+
May 24, 2022 12 tweets 3 min read
मंदिर नको, शाळा-इस्पितळ बांधा - असं म्हणणाऱ्या लोकांची कीव येते.

यांना भारतातल्या शिक्षण, आरोग्य सेवेच्या समस्यांची फार्फार काळजी आहे.

५-६ महिन्यांपूर्वी हे लोक कोणत्या जंगलात गुडूप होते कुणास ठाऊक.

१+ भारतात शाळा इस्पितळं बांधायला हवेत हे कळायला यांना आधी मंदिर विषय चर्चेत यावा लागतो.

बरं हे इतके दळभद्री मेंदूचे आहेत की यांना फक्त मंदिराचाच प्रॉब्लेम नाहीये.

यांना मेट्रो, चांद्रयान, बुलेट ट्रेन, सरदार पटेल पुतळा - काहीही म्हटलं की शाळा इस्पितळं सुचतात.

२+
Apr 26, 2022 5 tweets 2 min read
On @elonmusk buying @Twitter - everyone's speculating complex, larger than life motives. How come nobody is talking about the obvious lowest hanging fruit : USER BEHAVIOR DATA ?

1+ @elonmusk @Twitter Twitter has a gold mine hidden in itself.

Influential, upper class user base.

This user is

2+
Mar 26, 2022 12 tweets 3 min read
सोशल मीडियावर लाखो रुपये कमावण्याच्या ३ टिप्स

एक गंमत सांगतो.

१०० पैकी ९५ लोक सोशल मीडिया अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापरतात. (बाकीचे ४ लोक सोशल मीडिया वापरतच नाहीत, तो उरलेला फक्त १ हुशार माणूस सोशल मीडियाचा परफेक्ट वापर करतो!)

१+ हे ९५ लोक फेसबुक वर भरपूर वेळ घालवतात. पण त्यांना विचारलं की या फेसबुक वर खर्च केलेल्या वेळाचा काही फायदा झाला का?

तर त्यांचं उत्तर असतं - नाही! शून्य उपयोग झालाय!

म्हणजे कित्येक दिवस, महिने, वर्ष अक्षरशः वाया गेलेली असतात!

काय कारण असतं?

२+
Mar 16, 2022 19 tweets 4 min read
द काश्मीर फाईल्सचा विषय देशभर तापलेला असताना, देशाच्या, समाजाच्या दुर्दैवाने, काही लोकांनी विविध नॅरेटिव्ह विनाकारण सेट करायला घेतले आहेत.

काश्मिरी पंडितांबद्दल एवढं वाटतं - पण गोध्राबद्दल, खैरलांजीबद्दल, दलितांवरील अत्याचारांबद्दल काहीच वाटत नाही का? : हा असाच एक नॅरेटिव्ह.

१+ जणूकाही काश्मिरी पंडितांवरील अत्याचारांवर भरभरून लिहिणाऱ्यांना "इतर" प्रकरणांचं काहीच वाटत नाही! वास्तव फार वेगळं आहे.

गोध्रा, खैरलांजी, दलितांवरील अत्याचार - सर्वांवर भरपूर लिहिलं, बोललं जातं. सहवेदना व्यक्त केली जाते. सैराट, झुंड, जय भीम - मनापासून उचलून धरले जातात.

२+
Mar 5, 2022 9 tweets 2 min read
दोन दिवसांपूर्वी "उशिरा उठणाऱ्या बायका काय संस्कार करतील?" असं काहीतरी कुणीतरी लिहून गेलं फेसबुकवर. सर्वत्र आगडोंब उसळला. तुम्हाला माहितीये ना?

हे "बदाम बदाम" व्हायरल गाणं कुठून आलं? कल्पना आहे का?

नवाब मलिक - इडि प्रकरणाचं काय होईल?

रशिया - युक्रेन युद्ध कुठे जातंय?

१+ चित्रा रामकृष्ण आणि त्यांचा हिमालयातील गुरु - काय घडतंय हे सगळं...?

तुम्हाला हे विषय माहीत नाहीत - किंवा - या विषयांवरील चर्चा घडत असताना तुमच्याकडे बोलायला काहीच नसेल - तर - यू आर लूजिंग आऊट द "बीइंग वेल इन्फॉर्म्ड" कॉम्पिटिशन.

ही कॉम्पिटिशन जोरात सुरू झालीये.

२+
Mar 1, 2022 8 tweets 2 min read
आपण अश्या काळात जगत आहोत ज्यात २ वर्षांपूर्वी शिकलेलं कौशल्य आज इतिहासजमा झालेलं असतं. अशी परिस्थितीत असताना तीनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या व्यक्तिमत्वांच्या नात्यांवरून तुम्ही आज वाद घालत असाल तर - कोणत्या का बाजूने असेना - तुम्ही हरलेल्या बाजूकडूनच आहात.

१+ फार फार पूर्वी जालन्यातील तरुण इतर जालनेकर तरूणांशी स्पर्धा करायचा. नंतर तो पुणे-मुंबईतील तरूणांशी स्पर्धा करायला लागला. आज ही झेप थेट न्यू यॉर्क पर्यंत जात आहे.

२+
Jan 1, 2022 14 tweets 3 min read
आपल्यापैकी अनेक लोक दर वर्षी न्यू इयर रेझोल्यूशन्स करतात. पण वर्ष सरल्यावर लक्षात येतं की त्यातलं काहीच करून झालं नाहीये!

२०२२ साली असं होऊ नये - यासाठी मी गेल्यावर्षी पाळलेल्या काही गोष्टी शेअर करतोय. वाचून बघा...करून बघा...दे विल डेफिनेटली हेल्प.

१+ १. रिझोल्युशन्स ठरवण्याची घाई करू नका

आपण ३१ डिसेंबर - १ जानेवारी अश्या २ दिवसांत काहीतरी ठरवतो. कधीकधी तर चालता फिरता मनात विचार येतात आणि आपण "बस्स! या वर्षात हे नक्की करणार!" असं काहीतरी ठरवतो.

तसं करू नका.

२+
Dec 1, 2021 15 tweets 3 min read
“एक भारतीय” ट्विटर सीईओ झाल्याचा आनंद सर्वत्र व्यक्त होतोय. अनेक जागतिक कंपन्यांच्या प्रमुख कार्यकारी पदावर भारतीय वळचणीची नावं दिसणं नि त्या संख्येत सतत वाढ होत जाणं सुखद आहेच. पण फक्त आनंदी नं होता त्यातून आपण काही धडे शिकावेत. मला उमगलेले ५ महत्वपूर्ण लेसन्स :

१+ १ – सुरवात महत्वाची नाही. शेवट ही नाही. प्रवास महत्वाचा.

नडेला, पिचाई, आगरवाल सुरू कुठून झाले नि आज कुठे आहेत याकडे आपण “स्टार्ट टू एंड” बघतो आणि अवाक होतो. ते स्वाभाविकच. त्यापुढे जाऊन जर आपण त्यांच्या प्रवासाचं पृथक्करण केलं –

२+
Nov 2, 2021 8 tweets 3 min read
यश "विकत" घेता आलं पाहिजे.

आपण फोन विकत घेतो. गाडी विकत घेतो.
घर, शेअर्स, फर्निचर विकत घेतो.

कधी खूप आजारी पडतो - अॅडमिट व्हावं लागतं - टेस्ट्स ऑपरेशन, आयसीयू - हे सगळं करून आरोग्य / जीवन विकत घेतो.

अगदी असंच यश "विकत" घेता आलं पाहिजे.

१+ यशस्वी होण्यासाठी २ गोष्टी कराव्या लागतात. आपल्या यशाच्या व्याख्येत बसणाऱ्या लोकांना कॉपी करावं लागतं. आणि आपल्या अपयशाच्या व्याख्येत बसणाऱ्या लोकांनी केलेल्या चुका कटाक्षाने टाळाव्या लागतात. हे करत असताना मेंदू आपोआप एक अल्गोरिदम तयार करत जातो. धडे शिकत जातो.

२+
Oct 29, 2021 12 tweets 3 min read
फेसबुक च्या "मेटा" नामांतराबद्दल महत्वाचं :

१ - हे कॉर्पोरेट नामांतर आहे. प्रोडक्ट नामांतर नाही.

फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप आणि इतर अनंत छोट्या छोट्या इंटरनेट / टेक कंपनीज ची एकत्रित मालकी असलेली कंपनी म्हणजे फेसबुक इन्क.

१+

#meta #facebook जशी बिग बझार, पँटालून या कंपनीजची मालकी किशोर बियाणींच्या "फ्युचर ग्रुप"ची होती (होती : कारण पँटालून आदित्य बिर्लांच्या आदित्य बिर्ला ग्रूपने विकत घेतलं) तसंच हे.

हे फेसबुक चं मेटा नामांतर या कॉर्पोरेट ब्रँडचं नामांतर आहे. म्हणजेच फेसबुक इन्क आता मेटा झालंय.

२+
Oct 23, 2021 16 tweets 3 min read
शेअर मार्केटमध्ये संभाव्य करेक्शनचं वारं वहात असताना, वैचारिक मार्केटमध्ये शेफाली वैद्यंच्या #NoBindiNoBusiness चा धुमाकूळ सुरु आहे. पुरोगामी विश्वाने ज्याप्रकारे हा झंझावात हॅन्डल केलाय त्यावरून त्यांच्यात कसलंही करेक्शन होण्याची अजूनही चिन्हं दिसत नसल्याचं सिद्ध झालंय.

१+ भारतातील सेक्युलर फ्रॅगमेंट तुटतोय, हिंदूंमध्ये असहिष्णुता वाढत जातीये म्हणून कळवळून उठणाऱ्या लोकांमध्ये "हे असं का घडतंय?" यावर विचार करून कसलंही कोर्स करेक्शन करण्याची कुवतच दिसत नाही.

२+
Oct 11, 2021 12 tweets 3 min read
पैश्याने पैसा बनतो हे वाक्य सर्वांना माहितीये. पण त्या तत्वावर चालण्याची मानसिकता सिस्टिमॅटिकली डेव्हलप होत नाही.

आपण नोकरी करत असतो - ठराविक पगार मिळत असतो - तो वाढावा असं वाटत असतं - त्यासाठी अॅन्यूअल अप्रेजल किंवा नोकरी बदलणे हे २ पर्याय माहिती असतात - पण -

१+ अप्रेजल असो वा स्विच, कोणत्याही पर्यायातून मॅग्झिमम आऊटपुट मिळण्यासाठी पैसा खर्च करून करिअर ग्रोथ करण्याचा विचार कितीसा करतो आपण?!

प्रमोशन मिळवण्यासाठी माझ्यात कोणत्या स्किल्स हव्यात, त्या डेव्हलप करायला काय लागेल - इतकंच नाही, मला माझं अपियरन्स सुधारावं लागेल का?

२+
Oct 8, 2021 9 tweets 2 min read
आरोग्य. संपत्ती. कौशल्य.
दॅट्स इट. दॅट्स द गोल.

३ महिन्यांनी वर्ष संपणार.
२०२२ च्या सुरुवातीला नव्याने संकल्प वगैरे घेतले जातील.

यावेळी उलटा गेम खेळता येऊ शकतो.

अर्थात, जीवनाबद्दल सिरीयस असणाऱ्या लोकांनाच.

१+ २०२२ सुरु व्हायच्या आत कायकाय साध्य करता येऊ शकतं हे आत्ताच ठरवता येऊ शकतं. पेनडायरी हातात घेऊन माईलस्टोन्स आखता येऊ शकतात.

टार्गेट्स भव्य असणारेत. उण्यापुऱ्या ३ महिन्यांत हर्क्युलिस होता येत नसतंच. पण हर्क्युलिस होण्याकडे वाटचाल सुरु होऊन एक पल्ला नक्कीच गाठता येऊ शकतो.

२+
Aug 27, 2021 7 tweets 2 min read
भारत मुघलांनी घडवलाय.

भारतीय भूमीत ख्रिस्तपूर्व ३००० सालापासूनचे नागरी सांस्कृतिक पुरावे सापडतात.

पण भारत मुघलांनी घडवलाय.

अंदाजे ६०,००० लोक रहात असावीत अशी - ड्रेनेज सिटीम्स, पक्क्या विटांची घरं, पाणीपुरवठा यंत्रणा आणि व्यवस्थित टाऊन प्लॅनिंग केलेली शहरं

१+ इथे ख्रिस्तपूर्व २५०० साल पूर्वी होती.

पण, समजून घ्या, भारत मुघलांनी घडवलाय.

बाय द वे - हे आपण नागरी संस्कृती बद्दल बोलतोय. शेती आणि तत्सम "वस्ती करून" रहाणारा माणूस इकडे ख्रिस्तपूर्व ७५०० वर्षांपूर्वीच होता.

पण, तरीही, भारत मुघलांनी घडवलाय.

२+
Aug 22, 2021 17 tweets 3 min read
आमच्याकडे दुर्गादेवीवर अश्लाघ्य शेरेबाजी करणारा सुखेनैव जगू शकतो.

आमच्याकडे गणपतीवर गलिच्छ विनोदी फोटो शेअर करणारे रोज रोज तेच करू शकतात.

आमच्याकडे शंकराच्या पिंडीवरून विकृत टोमणे मारणारे सुरक्षित राहू शकतात.

१+ आमच्याकडे ब्रह्म देवाच्या कथांवरून हिंदूंना अपमानित करणारे जन्मभर धडधाकट असतात.

आमच्या रामायण महाभारत वर रोज जजमेंट पास होतात.

आमच्या राम - कृष्णांना रोज हिणावलं जातं.
संतांविरुद्ध अपप्रचार होतो.

गुरूंवर रोज छोट्या छोट्या गोष्टींवर टीका होते.

२+
Aug 5, 2021 9 tweets 2 min read
"गवत निळं आहे!" गाढव ठामपणे म्हणालं.

"वेडायस का?! गवत हिरवं आहे...!" वाघ म्हणाला.

दोघांमधे धुवांधार शाब्दिक चकमकी झाल्या.

वाद वाढला, टोकाला गेला. ८ दिवस दोघे भांडत राहिले.

प्रकरण थेट जंगलाच्या राजाच्या दरबारात गेलं.

१+ सिंह दरबारातली एकेक प्रकरणं संपवत होता. या दोघांचं प्रकरण समोर आलं.

"महाराज, गवत निळं आहे ना?" गाढवाने किंकाळत विचारलं.

"हो, गवत निळं आहे." सिंह म्हणाला.

"महाराज! हा वाघ माझं ऐकतच नाहीये! गवत हिरवं आहे असं रेटून बोलतोय! त्यामुळे मी माझं मानसिक स्वास्थ्य हरवून बसलोय...

२+
May 25, 2021 5 tweets 2 min read
सकारात्मक विचार नावाचा ट्रॅप

"थिंक पॉझिटिव्ह" ही "सक्सेस टिप्स"च्या यादीतील सर्वात कॉमन टिप. आत्मविश्वास असला की यश मिळतंच! - असं सांगितलं जातं.
वास्तवात यश मिळवण्यासाठी "पात्रता" हा मूलभूत निकष असतो.

१+ स्वतःत क्षमता असूनही पुढे जाण्याची भीती वाटत असेल तर सकारात्मक विचार महत्वाचा. ही स्टेप टू किंवा थ्री किंवा फोर झाली. स्टेप वन किंवा स्टेप झिरो नव्हे!

फक्त स्वतःवर विश्वास आहे म्हणून परीक्षेत मार्क्स मिळत नाहीत.
सेंच्युरी मारता येत नाही.
धंदा यशस्वी करता येत नाही.

२+