अभिजीत🚩🇮🇳 Profile picture
#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था . #यत्र_तत्र_सर्वत्र_देवेंद्रजी #यत्र_तत्र_सर्वत्र_बीजेपी #यत्र_तत्र_सर्वत्र_मोदीजी

Jun 5, 2020, 5 tweets

#WorldEnvironmentDay खरतर निसर्ग प्रत्येकाला त्याच्या गरजेच्या वस्तू फुकट देत असतो ऑक्सिजन,हवा,पाणी,सूर्यप्रकाश आणि आपण कशा प्रकारे परत करतो तर जंगलतोड,प्रदूषण प्राण्यांची हत्या,जलप्रदूषण,ओझोन थर कमी होत आहे तापमानवाढ, प्लॅस्टिक आणि रसायनांचा अनिर्बंध वापर..+ #विश्वपर्यावरणदिवस

माणूस आपल्या स्वार्थासाठी करत आहे पण त्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे मोठे हिमनग वितळत आहे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे परिणाम जमिन समुद्र गिळंकृत आहे, जलचर कायमचे नष्ट होत आहे, शेतजमीन रासायनिक खतांच्या मुळे नापीक बनत आहे, जंगले तोडत असल्याने त्यावर अवलंबून असलेले पशुपक्षी +

यांचापण नाश होत आहे, प्लॅस्टिक नष्ट करणे ही तर मोठी डोकेदुखी झाली आहे पृथ्वी वर सगळी कडे नष्ट न झालेले प्लॅस्टिक आढळते, जलचर,पशूपक्षी नकळत हे खातात आणि मग मनुष्य मासे, चिकन, दूध यांचे सेवन करतात आणि ते त्यांच्या पोटात जातात मग नवीन रोग निर्माण होतात. निसर्ग हया सर्व गोष्टींची +

परतपेढ पण करत असतो, कुठे चक्रीवादळ निर्माण होते, कुठे जबरदस्त भूकंप होतात, ज्वालामुखी स्फोट होतात, सूर्याची दाहकता वाढते, कुठे पावसाचे प्रमाण जास्त तर कुठे पडत नाही त्याने ओला किंवा सुका दुष्काळ पडतो, अन्न धान्याची कमतरता जाणवते. निसर्ग हा नेहमीच स्वतःला परिस्थिती प्रमाणे बदलवून+

घेत असतो पण मनुष्य त्याला नेहमीच ओरबाडत असतो वेळीच माणसाने पुढील धोका ओळखला नाहीतर निसर्ग एकदिवस सर्वच नष्ट करेल आणि पूनश् हरिओम म्हणून परत शून्या पासून सुरवात करेल.

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling