आत्महत्येलाही कसे स्टारडम मिळवून देतो ना हा मीडिया. ह्याच मीडियाच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र राजकीय विषय असतो. एखाद्या राजकीय नेत्याने त्याच्या राजकिय स्वार्थासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय उचलला की मीडियाला लगेच आकडेवारी सापडते. सरासरी सापडते.
#sucide
एखाद्या बड्या व्यक्तीच्या आत्महत्येला मात्र ह्या पैकी कोणतेही निकष लागत नाहीत. तो बडा असणं हेच मिडियासाठी महत्वाचं असतं.
आता हेच पहा ना, समजा उद्या आपल्यापैकी कोणी आत्महत्या केली किंवा समजा मीच काही कारणास्तव आत्महत्या केली तर माझ्या आत्महत्येला स्टारडम प्राप्त होणार नाही..
माझी अंत्ययात्रा लाईव्ह करायला मीडिया येणार नाही.. कारण मीडियाच्या दृष्टीने आपण स्टार नाही... कोण बघणार? आणि का? घरातले, आप्तेष्ट आणि परिचित नात्यातल्या तीव्रतेनुसार कमी अधिक हळहळ व्यक्त करतील हीच काय ती आपली मिळकत...
कसंय ना की जिवंत असणाऱ्यांसाठी आत्महत्या करणं हे सोल्युशन नसतंच. मात्र आत्महत्या करणाऱ्यांसाठी आत्महत्या करणं हेच अंतिम सोल्युशन असतं. शेतकऱ्यांना कोणत्याही राजकीय पक्षाने सोल्युशन दिलेले नाही. मात्र आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचं सोल्युशन शोधलं.
कोणत्याही आत्महत्येचं समर्थन होऊच शकत नाही. मात्र होणाऱ्या आत्महत्याही कोणी रोखू शकत नाही.. अनुभवणाऱ्या प्रसंगाचा, परिस्थितीचा आणि काळाचा महिमा.. असो..
|| जय हिंदुराष्ट्र ||
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
