कोरोना आला रे आला..
आता या इवल्याश्या विषाणूने मात्र सर्वांनाच घरात कोंडलंय. जगण्याच्या पद्धती, सवयी, जुन्याच आहेत पण त्यांना थोडं बदलून टाकलंय या कोरोनाने. मात्र सर्वांना परत एकदा बालपण नक्की देऊन गेला हा कोरोना.आधी कसं आम्ही गटारीत उतरून बॉल काढायचो, अगदी हाफ चड्डी वर
पूर्ण गल्लीत फिरून यायचो, हसायचो, रडायचो, धडपडायचो तेव्हा काही "embaraasing" नव्हतं हो, पण आता "until tomorrow" आम्हाला सर्व करण्यास भाग पाडतोय, असो....
आधी कोण जेवणाचं ताट पटकन स्वच्छ करेल, कोण पटकन अभ्यास करून खेळायला येईल, याच्यावर पैज लागायची पण आता "Virtually Challenge"
देऊन केलं जातंय, असो....
आधी संध्याकाळी शुभं करोती म्हणून पाढे म्हणायचो, एक दोन त्या काळ्या पाटीवर गिरवायचो पण आता तेच एक दोन "Instagram Story" मध्ये गिरवतोय, असो.....
आधी मित्राबद्दल फक्त "माझा आवडता मित्र" या निबंधामध्ये कौतुक करायचो, पण ते मनापासुन असायचं, आता फोटो टाकून
त्याखाली त्या ३-४ ओळीतल्या "Caption" मध्ये मित्राला गुंडाळून ठेवतोय, असो....
आधी मित्राची आठवण आली की त्याच्या घराबाहेर जाऊन तोंडाने "टॉक टॉक" केलं की तो बाहेर यायचा आणि त्याला भेटायचो, पण आता चार छोट्या चौकोनात मित्र असतात आणि त्याला "Video Call" म्हटलं जातं, असो...
या २१ दिवसात, २१ दिवस कशाला हो महिनाभरच आपण घरात आहोत. या महिनाभरात माणसाची किंमत मात्र नक्की कळतेय, माणुसकी कशी जोपासावी याचे धडे मात्र नक्की गिरवले जाताय.
खोकला, सर्दीने काही नाही होत असं म्हणणारे आपले बाबा पण आता लगेच डॉक्टर कडे जाताय...
आई "Youtube"वर नवनवीन रेसिपी शिकतेय.
...
"Sharing is Caring" म्हणत कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस, डॉक्टर, नर्स, यांना माणुसकी धर्म जोपासून जेवणाची सोय केली जातेय....
नकळत देशप्रेम ओतू जातंय, देशाबद्दल सुरक्षिततेची भावना जागृत होतेय, संकट टळून परत एकदा नव्या ताठ कण्यासह माझा देश उभा राहावा अस वाटतंय....
खरंच, हा इवलासा विषाणू अनेकांचे जीव घेऊन गेला पण जे सतर्क आहेत, सावध आहेत, काळजी घेत आहेत त्यांना खूप काही शिकवून गेला.
#IndiaFightAgainstCorona
#StayHomeStaySafe
#जातीलहेहीदिवसलवकरचजातील
~मानस अविनाश शुक्ल
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
