Manas Shukla Profile picture
Finding bugs,for earning bucks | Engineer | हिंदू हित ~ राष्ट्र हित🚩 | Tweets are personal.
May 27, 2021 16 tweets 3 min read
#Thread नेहरू आणि इंडियन आर्मी !!

"जेव्हा नरेंद्र मोदींना पायजमा (पॅन्ट) घालता येत नव्हता तेव्हा इंदिरा गांधी आणि नेहरूंनी इंडियन आर्मीची भक्कम बांधणी केली."
- मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ कॉँग्रेस नेते कमलनाथ
(दि.१४ एप्रिल २०१९)

(१) आपण हे लक्षात घ्यायला हवे की प्रत्येक पंतप्रधान त्याच्या किंवा तिच्या कार्यकाळात देशासाठी व देशवासीयांच्या सुरक्षेसाठी आर्मी भक्कम करण्यासाठी सर्वतोपरी योगदान देत असतो. पंतप्रधान असताना काही विषयात नेहरु हे मात्र अपवाद ठरतात. ते कशाप्रकारे हे बघूया.

(२)
May 19, 2021 23 tweets 8 min read
#Thread अरविंद केजरीवाल, ट्विट आणि कॉन्स्पिरसी

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी दि. १८ मे २०२१ रोजी एक ट्विट केलं. काय ते आपण बघूया.

(१/२२) "सिंगापूर मध्ये आलेल्या कोरोनाचा नवा "स्ट्रेन" हा लहान मुलांसाठी खुप घातक आहे आणि भारतात तो तिसऱ्या लाटेच्या स्वरूपात येण्याची शक्यता आहे.

(२/२२)
Oct 2, 2020 8 tweets 2 min read
कसले गांधी ?
दि. ०२/१०/२०२० (शास्त्री जयंती)

अहिंसात्मक उपदेशाचा डोस पाजणारे गांधी, असतील तेव्हाच्या लोकांचे "बापू". समोरच्याने एक गालात मारल्यावर दुसरा गाल पुढे करण्याची बापूंची प्रथा गेली हो. आता दुसरा गाल सुद्धा पुढे केला तर लोकं बत्तीशी काढून हातात द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत. अशा या परिस्थितीत गांधी उपदेश पाळणं म्हणजे स्वतःच्या हाडांचा सांगडाच करून घेणं योग्य ठरेल.

१९४७ मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केलेला असून सुद्धा त्या नंतर पाकिस्तानला भारताने ५५कोटी रुपये द्यावेत असा आग्रह धरत "या महात्म्यांनी" चक्क आमरण उपोषण केलं होतं. पाकिस्तान
Aug 30, 2020 20 tweets 9 min read
#Thread अटल बोगदा / रोहतांग बोगदा

सप्टेंबर महिन्याच्या शेवटी भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी भारतीय नागरिकांना एक सुखद बातमी देणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मोदीजी "अटल बोगदा" या महत्वकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन करतील. नक्की काय आहे अटल बोगदा ? जाणून घेऊया.
(१/१९) लेह-मनाली महामार्गावरील हिमालयाच्या पूर्व पीर पंजाल या पर्वतरांगेत रोहतांग नावाच्या खिंडीत हा महामार्ग स्वरूप बोगदा बांधला जातोय. ९.२ किलोमीटर लांबीचा हा बोगदा भारतातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक असणार आहे. मनाली आणि लेह मधील ४६ किमी अंतर या बोगद्यामुळे कमी होणार आहे.
(२/१९)
Aug 10, 2020 13 tweets 5 min read
#Tweet4Bharat

विषय- राष्ट्रीय एकात्मता

राम मंदिरावर सुरू असलेला विश्लेषणाचा आखाडा चांगलाच गाजला. वर्षानुवर्षे रखडलेला विषय आज पूर्णत्वास जातोय हे पाहून जनमानसात आनंदी आणि विशेषतः भावनिक लाट उसळी मारतेय. या निमित्ताने भारतातील एकात्मतेचा एक आलेख वर्धिष्णू होताना आपण बघत आहोत. Image न्यायालयीन लढाईत बाबरी मशिदीचे मुस्लिम पक्षकार हे भूमीपूजनास निमंत्रित होते. राम मंदिर एका धर्माचा विषय नसून तो आस्था आणि श्रद्धेचा विषय आहे याचे उदाहरण धर्मनिरपेक्ष भारताच्या वहीत लिहिले गेले. हिंदू,मुस्लिम,शीख,जैन,बौद्ध अशा विविध धर्मियांनी भूमिपूजनास साश्रुनयनांनी दाद दिली. Image
Aug 8, 2020 14 tweets 6 min read
कोझिकोड विमान दुर्घटना

कोविड-१९ या जागतिक महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याचाच एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पंतप्रधानांनी भारतात लॉकडाऊन जाहीर केला. कोविड-१९चा वाढता प्रादुर्भाव पाहता इतर देशातील भारतीय नागरिकांना सुखरूप घरी आणण्यासाठी "वंदे भारत मिशन" ही योजना आखली गेली. ImageImageImage या मिशनमध्ये दुबई, फिलिपिन्स, अमेरिका, मलेशिया, बांग्लादेश, कुवैत, सौदी अरेबिया, सिंगापूर इत्यादी देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप आणण्याची जबाबदारी Air India Limited या भारत सरकारच्या कंपनीकडे दिली गेली. या मिशन अंतर्गत आता पर्यंत ६लाख ८७हजार लोकं सुखरूप घरी परतले. Image
Aug 5, 2020 11 tweets 2 min read
आज एक पोस्ट Viral झालेली वाचली. त्यात लिहिलं होतं की, आजच्या या भूमीपूजनाच्या प्रसंगी "बाळ" नावाच्या "बाप" माणसाचं नाव सुद्धा लक्षात असू द्या. जेव्हा बाबरी मशीद पाडल्यानंतर गुन्हे नोंदवत होते तेव्हा हेच "बाळासाहेब" स्वतः पुढे आले होते आणि तुमचे नेते मात्र तेव्हा "चहा विकत" होते. मला मेसेज मध्ये कोणत्याच नावाची अडचण अशी वाटली नाही किंवा चुकीचं काही वाटलं नाही. जेवढं योगदान "बाळासाहेबांचं" होतं तेवढंच योगदान आमच्या "चहा विकणाऱ्या" नेत्याचं होतं, त्यात काही मतभेद नाही. पण राम मंदिरात कोणाचं किती योगदान आहे ? या विषयावर चर्चा होऊच शकत नाही. ज्या लोकांना शक्य
Jul 22, 2020 7 tweets 2 min read
मी पुन्हा येईन.....

राजकारणात ही घोषणा तशी नवीनच, आता पर्यंत ऐकलेल्या घोषणांपेक्षा थोडी वेगळी. तशी बरीच चर्चा झाली या वाक्याची काहींनी खिल्ली उडवली, काहींनी विश्वास ठेवला, काहींना छान वाटली म्हणून आवडली तर काहींनी राजकारणात टोलेबाजी करून घेतली. काहींना हे आश्वासन वाटलं, काहींना वचन वाटलं, काहींना नुसतं वाक्य वाटलं तर काहींना दहशत वाटली. नावाची दहशत नसावी, पण कामाची दहशत नक्कीच असावी. आणि आपल्या कामाने सर्वांचे तोंड बंद करणारा नेता म्हणजे

मा. देवेंद्रजी फडणवीस (@Dev_Fadnavis) Image
Jul 11, 2020 20 tweets 11 min read
#Thread - Agrima Joshua नावाचा Virus (@Agrimonious)

Stand Up Comedy करून पोट भरणं हे काही नवीन नाही. अगदी IT कंपनी मधला जॉब सोडून "Stand Up" नावाच्या "छंदाला" जोपासणारे खूप लोकं आता या "धंद्याला" लागलेत, हरकत नाही. आज या विषयावर राजकारण करण्याची मुळीच इच्छा नाही आणि ते चुकून सुद्धा माझ्या कडून होणार नाही याची मला खात्री आहे. जिथे विषय हा अस्मितेचा येतो तिथे राजकारण शुन्य टक्के उरतं. आपण ज्या राज्यात राहतो, ज्या प्रांतात वावरतो, जी भाषा वापरतो, ज्या धर्मात नावारूपास येतो, ज्या समाजात "कॉलर" ताठ करून मान, सन्मान मिळवण्यासाठी धडपडत असतो त्याचा
Jul 7, 2020 12 tweets 4 min read
थोडा उशीर होतोय तुम्हाला उत्तर द्यायला पण हरकत नाही. जाऊया मुद्देसूद जाऊया, या नंतर माझ्या पण काही प्रश्नांची उत्तरं देता आली तर विचार करा.

१)भारताने कोरोना ऍक्टिव्ह केसेस मध्ये रशियाला मागे टाकलंय, मान्य. ते तुम्ही डॉक्टर असून सुद्धा थांबवू शकत नाही, आणि मी तर मुळीच नाही. पण भारताच्या आधी आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, त्याचा विचार केलेला बरा. भारताला कसं रिकव्हर करायचं याच उत्तर निश्चित भारताच्या कार्यक्षम नेतृत्वाकडे आहे यात शंकाच नाही बिलकुल. महाराष्ट्राचा कसा बट्ट्याबोळ या सत्तापिपासू लोकांमुळे झाला याची खूप खंत वाटते.
Jul 4, 2020 27 tweets 13 min read
#Thread -  मोदींचा लेह दौरा आणि कॉन्फरन्स रूमचं हॉस्पिटल

१) आज सकाळी @sachin_inc या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्यांची पोस्ट वाचली. पोस्ट वाचल्यानंतर त्यांच्यावर कीव आलीच तो काही वाद नाही, पण परत त्यांच्या ट्विटर प्रोफाईल च्या Bio मध्ये त्यांनी BE Electronics असं त्यांचं शिक्षण नमूद केलं होतं त्यामुळे ते पण इंजिनियर आणि मी पण म्हणून मला माझी पण लाज वाटली.
Jul 2, 2020 4 tweets 1 min read
तिरोडकर तुम्ही ज्या मालिकेतल्या नायिकेचं कौतुक करताय ना, तिची प्रतिक्रिया बघा एकदा. तिने सुद्धा सांगितलं की मी सोबत असताना माझ्या वडिलांनी सुद्धा बघायला नको ही सीरिज. Image म्हणजे हिच्या वडिलांनी ही सिरीज नको बघायला अस हिला वाटत आणि इतर तरुण वर्गावर काय परिणाम होतील याची नाही हिला चिंता. म्हणूनच तुमच्या सारखे तरुण वाहत चाललेत तिरोडकर तिकडे. फॅन्टसी आणि डिझायर या गोष्टींचा आणि भक्तांचा काही संबंध नाही.
Jul 1, 2020 5 tweets 3 min read
पर्यावरण मंत्री @AUThackeray सुरू असताना गाभाऱ्यातून उठून गाडीत जाऊन बसले. का ? तर म्हणे अस्वस्थ होत होतं. मान्य आहे पर्यावरण मंत्र्यांना सुद्धा अस्वस्थ होऊ शकतं ते पण माणूसच आहेत. पण वय पाहता आदित्यजी यांची खूप चिंता वाटते. या वयात असलं काही होणं म्हणजे थोडं नकोसं वाटतं. @OfficeofUT, रश्मी ठाकरे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वारकरी प्रतिनिधी म्हणून पूजेला बसलेले बडे जोडपे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे पण त्यांनी नाही दिले असे कारणं हे विशेष. असो ज्याचा त्याचा पाहायचा दृष्टिकोन वेगळा, आपला तर अंध दृष्टिकोन आहे, आपण अंधभक्त असल्याने.
Jun 17, 2020 11 tweets 4 min read
आता कोरोना आपल्या मागे लागण्या पेक्षा, आपणच कोरोनाच्या मागे लागायचं.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अजून सुद्धा १ल्या टप्प्यात वावरताना दिसत आहेत.१ला टप्पा हा लोकांना मानसिक धैर्य, संयम देण्याचा होता जो मुख्यमंत्र्यांनी अगदी चोखपणे बजावला, त्या बद्दल कौतुक करावं तेवढं कमी आहे, हे मान्य करणं महत्त्वाचं वाटतं. पण त्या नंतर साधारणतः बराचसा काळ लोटून गेला, कोरोनाने रौद्र रूप धारण करून "बळी" घेण्यास सुरुवात केली, त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लोकांना धीर दिला, पण या वेळेस त्यांची आरोग्य यंत्रणे बद्दलची सतर्कता तेवढी कमी दिसली.
Jun 16, 2020 7 tweets 2 min read
कोरोना आला रे आला..

आता या इवल्याश्या विषाणूने मात्र सर्वांनाच घरात कोंडलंय. जगण्याच्या पद्धती, सवयी, जुन्याच आहेत पण त्यांना थोडं बदलून टाकलंय या कोरोनाने. मात्र सर्वांना परत एकदा बालपण नक्की देऊन गेला हा कोरोना.आधी कसं आम्ही गटारीत उतरून बॉल काढायचो, अगदी हाफ चड्डी वर पूर्ण गल्लीत फिरून यायचो, हसायचो, रडायचो, धडपडायचो तेव्हा काही "embaraasing" नव्हतं हो, पण आता "until tomorrow" आम्हाला सर्व करण्यास भाग पाडतोय, असो....

आधी कोण जेवणाचं ताट पटकन स्वच्छ करेल, कोण पटकन अभ्यास करून खेळायला येईल, याच्यावर पैज लागायची पण आता "Virtually Challenge"
Jun 15, 2020 13 tweets 5 min read
स्वरा भास्कर, राजदीप सरदेसाई, निखिल वागळे, आदित्य मेनन, सोनम कपूर, अर्षद वारसी, स्वाती चतुर्वेदी इत्यादी बऱ्याच लोकांचे ट्विट्स बघितले. मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संकटातही कसे धीर ठेवून लढत आहेत, परिस्थिती हाताळताय याचं कौतुकास्पद वर्णन त्यांनी केलं. हे सर्व ठीक आहे,हरकत नाही. कारण यातले पत्रकार सोडले तर बरेच अभिनेते आणि अभिनेत्री घरातच बसून होते आणि मीडिया काय दाखवतेय ते बघत होते. अर्थात मीडिया मध्ये त्यांनी "फक्त" जे बघितलं त्यावर ते ट्विट करत असतील, हरकत नाही. पण माझी "उद्धव ठाकरेंच्या" मीडियाला सुद्धा विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्रात अडकलेल्या