Ramesh Raktade Profile picture
प्रथम मी हिंदू आहे. मला 'हिंदू' असल्याचा गर्व आणि 'मराठा' असल्याचा अभिमान आहे. 'देव, देश आणि धर्म' कार्य हा एकच उद्देश... ।। जय हिंदुराष्ट्र ।।🚩🙏

Jun 19, 2020, 14 tweets

#गडपती :
गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य(राज्य) आहे असे महाराज.

#शिवगर्जना

#गजअश्वपती : ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे असे महाराज.
(त्याकाळी हत्ती हे वैभवाचं प्रतीक समजलं जायचं, म्हणून गजअश्वपती हा शब्द आपण वैभवसंपन्नतेचे प्रतीक होते असे म्हणता येईल.)

#भूपती_प्रजापती : वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्यांचा भूमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भूमीचे व प्रजेचा पती हे पद स्वीकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण करणे हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज.

#सुवर्णरत्नश्रीपती : राज्याच्या खजिनातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण(सोने) यावर ज्यांचे आधिपत्य(मालकी) आहे असे महाराज.
(शिवरायांच्या बाबतीत ३२ मण सुवर्णसिंहासनाचे अधिपती.)

#अष्टावधानजागृत : आठही प्रहर जागृत राहून राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज.

#अष्टप्रधानवेष्टित : ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेतात असे महाराज.

#न्यायालंकारमंडित : कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहून सत्याचा व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज.

#शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत : सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत(निपुण) असलेले महाराज.

#राजनीतीधुरंधर : आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये(राजनीतीमध्ये) तरबेज असलेले महाराज.

#प्रौढप्रतापपुरंदर : मोठे शौर्य गाजवून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज.

#क्षत्रियकुलावतंस : क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा(अवतंस) पराक्रम गाजवलेले महाराज.

#सिंहासनाधिश्वर : जसा देव्हाऱ्यातील देव(अधिश्वर) असतो तसेच ३२ मण सुवर्णसिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज.

#महाराजाधिराज : विद्यमान सर्व राज्यांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्वीकारायला हवे असे महाराज.

#राजाशिवछत्रपती : ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरून ज्यांना आपला अधिपती म्हणून स्वीकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नाभनेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज.

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling