Mustafa 🇮🇳♥️ Profile picture
INC | RAGA 💯🔥 |SARKIAN | KOLHAPURKAR | SUFISM ♥️

Jun 24, 2020, 5 tweets

पंचायत राज्याची स्थापना
सन १ ९ ४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला . भारतातील शेतकऱ्यांचा , खेड्यातील अन्य लोकांचा विकास करणे , त्यांना स्वावलंबी बनविणे यासाठी आपल्या देशात सामुहिक विकास योजना सुरू करण्यात आल्या . लोकांचा सहभाग घेऊन विकासयोजना राबविण्याचे तत्त्व अंगिकारण्यात आले .

पण त्यात यश लाभले नाही . तेव्हा बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली सन १ ९ ५७ सामुहिक विकास योजनांची पहाणी करण्याकरिता एक अभ्यासगट नेमण्यात आला .

खेड्यांच्या सामूहिक विकासाकरिता लोकसहभागाचे तत्त्व अंमलात आणण्याकरिता जिल्हा पातळी आणि गाव पातळीवर तसेच तालुका पातळीवर विकासगट पातळीवर लोकांच्या संस्था स्थापन करण्यात याव्यात असे त्या समितीने सुचविले

या तीन पातळीवरील संस्थांच्या माध्यमातून लोक त्यांना आवश्यक वाटणाऱ्या विकास योजना सुचवतील , योजना आखतील आणि त्या पार पाडतील . साहजिकच विकास योजनांमध्ये लोकांचा सहभाग वाढेल . मगच खऱ्या अर्थाने लोकांचा विकास होईल हा विचार त्या सूचनेमागे होता .

बलवंतराय समितीच्या सूचना राजस्थान सरकारने विचारात घेतल्या . दि . २ ऑक्टोबर , १ ९ ५ ९ महात्मा गांधी जयंती दिनी पंडित नेहरूंनी योजनेचे उदघाटन केले . “ देशात पंचायत राज सुरू झाले " अशी त्यांनी घोषणा केली....
#अराजकीय

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling