Discover and read the best of Twitter Threads about #अराजकीय

Most recents (10)

कोणत्याच मेंढपाळाला कळप सोडणारं मेंढरू आवडत नाही. शंभर मेंढ्या कळपात नीट चालतील, पण ह्या अशा एक-दोन मेंढ्या गटात राहत नाहीत, त्यांचं आपलं वेगळंच चालू असतं. कळप एकीकडे अन हे एक-दोन दुसरीकडे. मेंढपाळाची उरलेल्या 98 मेंढ्या सांभाळायला जितकी ताकद खर्च होते, तितकीच किंबहुना (१/४)
त्यापेक्षा जास्त ऊर्जा ह्या दोन मेंढ्यांचा सांभाळ करायला खर्च होते.
मेंढपाळालाही शेवटी जीवाला शांती हवी असते, शिवाय ह्या दोन्हीच्या मागे लक्ष देता देता उरलेल्या 98 कडे दुर्लक्ष नाही झाली पाहिजे, अशी त्याची धारणा असते.
दोन मेंढ्या लै बाराच्या असतात. त्यांना कळपाचं डोकं मंजूर (२/४)
नसतं. सारी दुनिया एकीकडे अन ह्या दोन मेंढ्यांचं एकीकडे. बरं शहाणपणा करणं ह्यांच्या रक्तातच असतो. त्यांचं बघून बघून 98 मधल्या काही मेंढ्यासुद्धा त्यांच्या नादी लागायला सुरुवात करतात. मेंढपाळाला आधी दोन Handle करणे जड जात होते अन आता अजून दोन-चार जणींना त्याचं वारं लागतं. (३/४)
Read 4 tweets
नात्यांपेक्षा निष्ठा श्रेष्ठ

छत्रपती महाराजांचं निधन झालं... ज्यांनी राज्याभिषेकावेळी युवराज पद भुषवलं होतं ते संभाजीराजे पन्हाळगडावर होते. महाराजांच्या निधनाची वार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचायची होती. पोरक्या झालेल्या सिंहासनाला वारस नव्हता. एका विविक्षीत क्षणी
राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला. संभाजी राजेंना रायगडाचे दरवाजे बंद होते. संभाजी राजे पन्हाळगडावरुन रायगडाकडे निघालेत. राजाराम महाराजांच्या आईसाहेब सोयराबाई साहेबांना वाटलं या अटीतटीच्या वेळी त्यांचा सख्खा भाऊ, छत्रपतीपदी विराजमान राजाराम महाराजांचा
सख्खा मामा, हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबिरराव मोहिते हे संभाजी राजांच्या विरोधात बहिणीसाठी - भाच्यासाठी सर्वशक्तिनिशी उभे रहातील. पण... पण हंबिरावांनी संभाजी राजेंची बाजू घेतली. सख्या बहिणीला आणि तख्तनशिन सख्ख्या भाच्याला निक्षुन सांगीतलं की राज्याभिषेकावेळी
Read 6 tweets
ऐन बंडात, अर्ध्या रात्री.......

हॉटेलच्या आवारात सामसूम होती. सगळे वाघ डाराडूर झोपले होते. त्यांच्या गुरगुरण्याचा आवाज शांत झाला होता. सगळ्या वाघांचा राजा असलेला, ढाण्या वाघासारखा
दिसणारा तो दाढीधारी हळूच आपल्या रूममधून बाहेर पडला. त्याने चष्मा सारखा केला. एका हाताने दाढीला ताव दिला आणि (वाघ असला, तरी) मांजरीच्या पावलांनी तो हळूच बाहेर पडला.बाहेर रिक्षा त्याला न्यायला सज्ज होतीच.
आधी स्वतःच ती चालवावी, असा मोह त्याला झाला. पण मर्सिडीजपेक्षा आपली रिक्षा वेगवान आहे, हे दाखवण्याची ही वेळ नाही, ती नंतर येणार आहे, याची त्याला कल्पना होती. आवाजही न करता तो रिक्षात बसला आणि त्यानं रिक्षावाल्याला खूण केली.``अरे, दातेसाहेब, तुम्ही?``
Read 18 tweets
वाटलं होतं की कोविडनंतर लोक बदलतील!

जगण्याची एक संधी मिळावी म्हणून त्या काकांनी माझा हात घट्ट पकडून ठेवलेला अजूनही आठवतोय... पण त्यांना ती संधी मिळालीच नाही!

कोविडमुळे ५ लाखांहून अधिक लोक या देशात आपल्या डोळ्यासमोर गेले, प्रत्येकाच्या घरातील, नात्यातील किमान एकजण ...
एका न दिसणाऱ्या विषाणूने मारुन टाकला. त्यावेळी आपल्या मनात काय विचार होते हे प्रत्येकाने स्वतःला एकदा विचारून पाहावे. सगळं पहिल्यापासून सुरुवात करू, पुन्हा उभं राहू... फक्त या आजाराच्या संकटातून बाहेर पडावं, आपल्याला एक संधी मिळावी हाच विचार प्रत्येकाच्या मनात होता ना?
आपल्याला ती संधी मिळालीही... आणि आपण काय करतोय?

जागतिक पातळीवरील रशिया-युक्रेन युद्ध असो की भारतातील दंगली असो... की महाराष्ट्रातील सध्याचं किळसवाणं राजकारण असो... माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे!

३६५ दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांसाठी बेड उपलब्ध होत नव्हते...
Read 12 tweets
मांजर डोळे मिटून दूध पिते
तिला काही दिसत नाही म्हणून तिला वाटतं इतरांना ही काही दिसत नाही. तिला दुधाची विचारणा केली असता, तिनी नाही पिलं असं खोटं बोलते.
जेव्हा दुसरी मांजर खरं सांगून तिचं पितळ उघडं पाडते तेव्हा पहिली मांजर त्याच मांजरीला दोषी ठरवते
वर अजून दुसऱ्या मांजरीला दोषी ठरवते आणि ज्ञान पाझळते की तुला जर भूक लागली होती तर तू दूध मागून घ्यायचं, असं चोरून का प्यायली? तुला माझ्याबद्दल काही समस्या होती तर माझ्याशी येऊन का नाही बोलली? असं सर्वांसमोर का?
पहिली मांजर सगळ्यां मधे मोठी आणि वर्चस्व गाजवणारी असल्याने इतर मांजरी ही तिला पाठिंबा देतात. तिच्या मोठेपणाचं कौतुक करतात. तर दुसऱ्या, खरं बोलणाऱ्या मांजरीला घालून पाडून बोलतात, तिचा अपमान करतात. इतर मंजरींना तिच्या बद्दल वाईट आणि खोटं सांगून तिला एकटं पडतात.
Read 5 tweets
सुप्रीचा बाप लै कावला होता.. आद्याचा बाप त्याचे फोनच उचलंत नव्हता..! वाच्तविक सुप्रीच्या बापानंच लांड्या लबाड्या करून आद्याच्या बापाला सरपंच बनवलं हुतं.. सरपंच व्हायचं हुतं तवा दिवसाला पण्णासदा फोन करायचा आन् आता लोकांचे कामाचे फोनबी उचलीना.. त्यो टोपे आन्नाबी भडकल्याला..(१/१५)
'येकाला आर्झंट ॲडमिट करायचं हुतं तर त्ये हॉस्पिटलवालं म्हन्लं की सरपंचाचं पत्र घेऊन या, सवलतीच्या दरात उपचार होतीन.. त्यासाटी फोन लावंत हुतो.. उचललाच न्हाई.. त्येची मर्जी आसंन तरच फोन उचलितो त्यो..! त्येचं ह्रदय बावळं झालंया म्हनून काय बोलायची सोय न्हाई..(२/१५)
..घ्येतलं प्रेशर तं कायच्या बाही हुयाचं.' टोपे आन्ना बोलंत हुते.. सुप्रीचा बाप बी लै हायपर झाल्ता. सुप्रीनं लावून पाह्यला आद्याच्या बापाला फोन. नुस्तीच रिंग जात हुती. धा फोन करूनबी उचलला न्हाई तवा तिच्या तोंडून येक शिवी भायेर पल्डी. ती आयकून दाद्या आतल्या खोलीतनं वराडला,..(३/१५)
Read 17 tweets
#अराजकीय संवाद
आज एक जण भेटला आणि बोलला.

तो : काय हो काँग्रेसने बांधलेल्या शाळेत शिकतात का ?
मी : हो
तो : मग कशाला काँग्रेस विरोध करतात ?
मी : बरोबर ए.

मग एक चप्पल काढली आणि दिली हाणून.

मी : कसे आलात इथे ?
तो : चालत.
मी : रस्ते गडकरी साहेबांनी बांधले. ते पण भाजप शासनात.
तो : नाही त्याचं काय ना, २०१४ पर्यंत हवेतच होतो म्हणे आपलंच सरकार ए म्हणून.
मी : गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी.
तो : जाऊद्या माफ करा, ते प्रत्येकी रेशन मिळतंय ना मोदींनी जाहीर केलं म्हणून ते घ्यायला आलो.

दुसरी चप्पल काढली आणि मला मारून घेतली.
Read 3 tweets
पंचायत राज्याची स्थापना
सन १ ९ ४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला . भारतातील शेतकऱ्यांचा , खेड्यातील अन्य लोकांचा विकास करणे , त्यांना स्वावलंबी बनविणे यासाठी आपल्या देशात सामुहिक विकास योजना सुरू करण्यात आल्या . लोकांचा सहभाग घेऊन विकासयोजना राबविण्याचे तत्त्व अंगिकारण्यात आले .
पण त्यात यश लाभले नाही . तेव्हा बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली सन १ ९ ५७ सामुहिक विकास योजनांची पहाणी करण्याकरिता एक अभ्यासगट नेमण्यात आला .
खेड्यांच्या सामूहिक विकासाकरिता लोकसहभागाचे तत्त्व अंमलात आणण्याकरिता जिल्हा पातळी आणि गाव पातळीवर तसेच तालुका पातळीवर विकासगट पातळीवर लोकांच्या संस्था स्थापन करण्यात याव्यात असे त्या समितीने सुचविले
Read 5 tweets
#अराजकीय पोस्ट

टीप- या पोस्ट चा आणि कालच्या पवार साहेबांच्या हॉस्पिटल पाहणीचा काही संबंध नाही त्यामुळे उगाचच माझ्यावर रागाला येऊ नये व मला शिव्या घालू नये..🙏🙏😀😀
#वाचा 👇👇
खूप लोकांनी अनुभवले असेल विशेष करून गावाकडील लोकांनी.कधी कधी गावामध्ये एखादे भयंकर संकट उभे राहते..
तेंव्हा अश्या संकटाच्या वेळी गावातील सामान्य लोक एखाद्या जाणत्या,वयस्कर, श्रीमंत,ताकदवर माणसाकडे आशेने बघत असतात.गावकऱ्यांना वाटते की हा मोठा माणूस काहीतरी मदत करेल.पण हा व्यक्ती इतका निर्लज्ज किंवा माजलेला असतो की तो काय मदत करायला येत नाही तसेच कोणता उपायही लोकांना सांगत नाही.
पण हा मोठा माणूस मनातल्या मनात म्हणत असतो मरू दे यांना आणि गावकऱ्यांचे चालू असणारे हाल बंगल्याच्या टेरेसवर बसून बघत असतो.पण तो गावकऱ्यांना मदत करत नाही कारण गावकऱ्यांनी त्याला गावचा प्रमुख बनवलेले नसते.पण हा गडी खूप दिवसांनी त्याच्या एसी बंगल्यातून बाहेर येतो आणि गावातून...
Read 6 tweets
डोरेमॉन आणि नोबिता

प्रथमदर्शनी कार्टून पाहिले तर नोबिता एक आळशी आणि निर्बुद्ध मुलगा दिसतो आणि डोरेमॉन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा देवाचा अवतारच दाखवला आहे. (1/5)
डोरेमॉन आयुष्यात आल्यावर नोबिताला वाटते की मागचे कित्येक वर्षे त्याच्या घरच्यांनी काहीच केलं नाही, जे काही केलं ते डोरेमॉनच करतोय, आणि तोच करू शकतो, त्याला पर्यायच नाही. (2/5)
पण सत्य परिस्थिती ही आहे की आपल्या मनाला येईल तसे गॅजेट खपवण्याची दुकानदारी चालू ठेवण्यासाठी डोरेमॉन नोबिताला गरजेपेक्षा जास्त हुशार होऊ देत नाही. (3/5)
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!