हिंदुत्व आणि पुरोगामीत्व विचारधारेचा फरक
मी हिंदुत्व ह्या विचारधारेला सर्वश्रेष्ठ का मानतो?
अनादी कालापासून हिंदूधर्माने विश्वाला मार्ग दाखवला आहे. आपण आपल्या धर्मात असलेल्या काही अनिष्ट चालीरीती बदलल्या आहेत. आज विधवाविवाह होतात, नवरा मेल्यावर कुणी स्त्री सती जातांना दिसत नाही.
केशवपन पद्धत सुद्धा आता नाहीये. हिंदुधर्माने स्वतात असलेल्या उणिवा कायम भरून काढण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि जे जे उत्तम उदात्त असच स्वीकारून यशस्वी वाटचाल केली आहे. मग त्या शिवछत्रपतींच्या रूपाने असोत, सावरकरांच्या रूपाने असोत किंवा अन्य कुणाच्या रूपाने....
हिंदुधर्मात व्यास, वाल्मिकी, ज्ञानोबा, तुकोबा, चोखामेळा ह्यांच्यासारखे आस्तिक आहेत तर चार्वाकांसारख्या नास्तिकला सुद्धा स्थान आहे. चार्वाक देव मानत नव्हते म्हणून त्यांना कुणी वाळीत टाकलेल नाही.
पण मी आज काय बघतो तर कुणीही आंडू-पांडू वॉटसपवाला(पुरोगामी) कॉपीपेस्टवीर उठतो आणि हिंदुधर्माला अक्कल शिकवण्यासाठी मोठमोठ्या पोस्ट लिहितो.
हिंदू समाजाने वेळोवेळी बुवाबाजीला विरोध केलाय आणि सर्वात आधी हा विरोध हिंदुत्ववाद्यांकडून व्हायला हवा.
बाबा रामरहीम, रामपाल बाबा, निर्मल बाबा ह्यांच्यासारख्या फालतू आणि हरामखोर लुटारू बाबांना विरोध करणारे आज ह्या देशात करोडो हिंदू मी तुम्हाला दाखवू शकतो. त्यांच्या समर्थकांपेक्षा त्यांच्या विरोध करणाऱ्या लोकांचा समूह हा संख्येने भयंकर आहे आपल्या देशात.
आणि आम्ही ह्या बाबांना विरोध करतो म्हणजे काही उपकार करत नाही हे प्रत्येक हिंदूच कर्तव्यच आहे. पण हे सांगावं लागतंय कारण जे हिंदुधर्मात आहे ते इतर धर्मात तुम्हाला अजिबात दिसणार नाही.
याकूब मेमन, झाकीर नाईक, औरंजगेब आणि टिपू सुलतान ह्यांना आदर्श मानणाऱ्या मुसलमानांना अक्कल शिकवताना मी आजवर कुठल्याही पुरोगामी संघटनांच्या प्रमुखांना पाहिलेले नाही. इस्लाममध्ये तीन तलाक, हलाला ह्या वाईट प्रथांबद्दल जिवाच्या आकांताने बोलतांना मी अजून एकाही मुस्लीमला बघितलेले नाही.
दलवाई त्याला अपवाद असू शकतील परंतु सरसकट इस्लाम धर्मात पूर्वीपासून जे चालत आलेल आहे त्याला सोडून वेगळे वागणारा हा काफिरात मोडतो. इस्लाममध्ये नास्तिकाला जागा नाही, जो नास्तिक आहे त्याच्यासाठी त्यांच्या धर्मग्रंथात कठोर शिक्षा सांगितलेल्या आहेत.
मुस्लिम मुल्ला-मौलवी आज फतवे काढत असतात त्यांच्या विरोधात मी आजवर कुठल्याही पुरोगाम्याला, सेक्युलरपणाचा आव आणून बोलणाऱ्याला बोलतांना पाहिलेलं नाही. ख्रिश्चनांमध्ये सुद्धा अनेक पोप(ख्रिस्ती धर्मगुरूंनी) चर्चमध्ये स्त्रियांच लैंगिक शोषण केल्याच्या घटना आपण बघतो,
पण त्याबद्दल कुठलीही मानवतावादी संघटना, सर्वधर्मसमभावचा संदेश देणारे भाडखाऊ बोलतांना तुम्हाला दिसणार नाहीत पण हिंदुत्वाला विरोध करण्यासाठी जमीन-अस्मान एक करतील.
एक सांगू का?
पुरोगामी, सेक्युलर, गँगची एक विशिष्ट अशी विचारधाराच नाही, सोयीचं घेणे हीच त्यांची विचारधारा आहे.
हिंदुत्ववादी चुकले तरच हे लोकांना भ्रमित करणार आणि ह्यांचा धंदा चालणार पण हिंदुत्वाचं असं नाहीये कारण हिंदुत्व हा धंदा नाही तर उत्तम जीवन जगण्याचा मार्ग आहे. हिंदुत्ववाद्यांना हिंदूत्वाच कार्य वाढवण्यासाठी मटेरियलची आवश्यकता नाही तर पुरोगामी संघटनांना -
आणि त्यांच्या कार्यकर्त्याना हिंदुत्व विरोधाच्या मटेरियलची आवश्यकता असते त्याशिवाय त्यांचा गंदा धंदा चालूच शकत नाही.
हिंदुत्व हे द्वेषावर आधारित नाही वर्षांनुवर्षे जे चालत आलंय, ह्या राष्ट्रावर परधर्मीयांकडून जे आघात झालेत,
सद्गुणविकृतीमुळे हिंदूंकडून ज्या चुका झाल्या त्या भविष्यात होऊ नये म्हणून हिंदू मनातून जी भावना, पोटीतिडीक उत्पन्न झाली, त्यातून भावनांचा उद्रेक होऊन जी प्रतिक्रिया हिंदूंकडून झाली ती भावना म्हणजे हिंदुत्व आहे.
एकंदरीत काय तर पुरोगामीत्व हा धंदा केवळ हिंदुत्ववाद्यांच्या चुकांवर अवलंबून आहे, हिंदुत्वाला प्रमाण मानणारे जर चुकले तरच ह्यांच दुकान चालणार अन्यथा एकमेकांची डोकी फोडल्याशिवाय ह्यांना पर्याय नाही. पण पुरोगामी ही जात उद्या चालून नष्ट जरी झाली तरी हिंदुत्वाच कार्य थांबणार नाही.
पुरोगामीत्वाची व्याख्या काय तर आयुष्यभर हिंदुत्ववाद्यांचा चुका शोधत राहणे हेच आहे.
हाच #हिंदुत्व आणि #पुरोगामीत्व ह्या दोन विचारधारेतला फरक आहे.
|| जय हिंदुराष्ट्र ||
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
