Ramesh Raktade Profile picture
प्रथम मी हिंदू आहे. मला 'हिंदू' असल्याचा गर्व आणि 'मराठा' असल्याचा अभिमान आहे. 'देव, देश आणि धर्म' कार्य हा एकच उद्देश... ।। जय हिंदुराष्ट्र ।।🚩🙏

Jul 5, 2020, 7 tweets

#भगवा रंग कोणत्याही राजकीय पक्षाची, कोणत्याही संस्था- संघटन-मंडळ इत्यादीची मक्तेदारी नाही.

भगवा रंग हा सनातन धर्माचा रंग आहे.

फार प्राचीन काळापासून ऋषी, मुनी भगव्या रंगांची वस्त्रे परिधान करत असत. संत ज्ञानेश्वर यांची वस्त्रे भगवी होती. आर्य चाणक्य यांची वस्त्रे भगव्या रंगांची होती. इतकेच काय भगवान बुद्ध सुद्धा भगव्या रंगांची वस्त्रे परिधान करायचे.

प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, महापुरुष पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती शंभुजी महाराज, पेशवे ह्या सर्वांच्या ध्वजाचा रंग भगवाच होता. संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत गोरा (गोरोबा) ह्या सर्व मंडळींच्या दिंडीतला ध्वज भगवा असायचा.

त्यामुळे भगवा रंग म्हणजे एखाद्या पक्ष, संस्था, संघटन, मंडळाचा कार्यकर्ता किंवा समर्थक कृपया सर्वांनी हे डोक्यातून काढून टाकावे.. राजकीय पक्षाचा, संस्था- संघटन-मंडळ इत्यादींचा भगवा रंग आणि वर मांडलेल्या पूज्यनीयांचा भगवा रंग यांच्यावर असलेल्या निष्ठेत कोणीही गफलत करू नये.

आपली निष्ठा नक्की कोणत्या भगव्या रंगाशी आहे हे ज्याचे त्याने स्वतःच्या मनाशी ठरवून घ्यावे.

भगवा रंग हा सूर्योदय आणि सुर्यास्ताचा रंग आहे. भगवा रंग शौर्य, बलिदान आणि वीरतेचे प्रतीक आहे. भगवा रंग त्याग, बलिदान, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे.

भगवा रंग संयम, संकल्प आणि आत्मनियंत्रणाचे प्रतीक आहे. भगवा रंग शक्ती आणि सामर्थ्य देतो. देव, देश आणि धर्माशी निःस्वार्थ बुद्धीने एकनिष्ठ, प्रामाणिक राहण्याची प्रेरणा देतो, शिकवण देतो आणि म्हणूनच हा भगवा ध्वज आमचा गुरू आहे.

युगेनयुगे आसमंतात, त्रैलोकात सदैव फडकत असलेल्या परमपवित्र भगव्या ध्वजाला आज गुरू वेद व्यास पौर्णिमेच्या पवित्र दिवशी त्रिवार वंदन...

|| जय हिंदुराष्ट्र ||

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling